jyeshta Gauri Pujna 2025: २०२५ चे संपूर्ण वेळापत्रक
jyeshta Gauri Pujna 2025: गणपती बाप्पाच्या आगमनानंतर वेध लागतात ते माहेरवाशिण म्हणून येणाऱ्या ज्येष्ठा गौरीच्या आगमनाचे. भाद्रपद महिन्यात घरात सुख-समृद्धी आणि चैतन्य घेऊन येणाऱ्या या महालक्ष्मीचे पूजन अत्यंत भक्तिभावाने केले जाते. विशेष म्हणजे, गौरी पूजनाचा संबंध तिथीशी नसून तो पूर्णपणे नक्षत्रांवर अवलंबून असतो.
शास्त्रानुसार, अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते. चला, तर मग दाते पंचांगानुसार २०२५ या वर्षातील गौरी आवाहनापासून ते विसर्जनापर्यंतच्या सर्व तारखा आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊया.
गणपतीच्या आरतीमुळे मिळतात मानसिक आणि शारीरिक फायदे, जाणून घ्या कसे!
गौरी (महालक्ष्मी) आवाहन २०२५
Gauri Mahalakshmi Challenge 2025
शास्त्रानुसार, महालक्ष्मीचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर केले जाते.
३१ ऑगस्ट २०२५, रविवार
या दिवशी संध्याकाळी ५ वाजून ५७ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्र आहे. त्यामुळे या वेळेपूर्वी दिवसभरात कधीही महालक्ष्मीचे आवाहन करावे.
ज्येष्ठा गौरी पूजन २०२५
jyeshta Gauri Pujna
गौरीचे पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर करण्याची परंपरा आहे.
०१ सप्टेंबर २०२५, सोमवार
या दिवशी संध्याकाळी ७ वाजून ५५ मिनिटांपर्यंत ज्येष्ठा नक्षत्र आहे. परंपरेनुसार, दुपारच्या वेळी (माध्यान्हकाळी) ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचे पूजन करावे. काही ठिकाणी सायंकाळी पूजेची पद्धत असते, त्यांनी आपल्या परंपरेनुसार पूजन करावे.
गौरी विसर्जन २०२५
jyeshta Gauri emrsion
महालक्ष्मीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर केले जाते.
०२ सप्टेंबर २०२५, मंगळवार
या दिवशी रात्री ९ वाजून ५१ मिनिटांपर्यंत मूळ नक्षत्र आहे. त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या सोयीनुसार आणि वेळेनुसार मुखवटे हलवून नंतर महालक्ष्मीचे विसर्जन करावे.
जेष्ठा कनिष्ठा गौरी आवाहन पूजन विशेष 2025
ज्येष्ठा गौरीपूजन-भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीपूजन करावें असें शास्त्र आहे. अनुराधा नक्षत्रावर आवाहन. ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन व मूळ नक्षत्रावर विसर्जन याप्रमाणे असते. या गौरीपूजनाचा तिथीशी कांहिंहिं संबंध नाही. नक्षत्र प्रधान आहे.
गौरी (महालक्ष्मी) आवाहन३१-०८-२०२५ रविवार संध्याकाळी ०५: ५७ (१७-२७) मी. पर्यंत अनुराधा नक्षत्र आहे. अनुराधानक्षत्रावर महालक्ष्मीचे आवाहन करावे.
गौरी पूजन-०१-९-२०२५सोमवार संध्याकाळी ७-५५ मी. (१९-५५) पर्यंत ज्येष्ठा नक्षत्र आहे माध्यान्हकाळीं ज्येष्ठानक्षत्रावर पूजन. कोणाकडे सायंकाळी पूजा असते. त्याप्रमाणे पूजन करावे.
गौरी विसर्जन – मूळ नक्षत्रावर विसर्जन करावें.
mention should be done on Mohan Nakshatra.
०२-९-२०२५मंगळवार रात्री ९-५१ (२१-५१) मी. पर्यंत मूळ नक्षत्र आहे. मंगळवारी ०२-९-२०२५सकाळपासून रात्री ९-५१ मी. (२१-५१) पर्यंत मूळ नक्षत्र आहे. कधीही जेव्हा वेळ असेल तेव्हा दोरे घेऊ शकता. आणि मुखवटा हलवावा. नंतर आपल्या वेळेनुसार गौरी (महालक्ष्मीचे) विसर्जन करावें.
संदर्भ :- दाते पंचाग

श्री. वेदमूर्ती आनंद गुरुजी