Table of Contents
ToggleKaranvedha Sanskar In Marathi 2024; काय महत्त्व आहे कर्णवेध संस्कार चे
Karanvedha Sanskar In Marathi 2024; विविध १६ संस्कार श्रृंखलेतील अनेक संस्कार आपण पाहिले आहेत, प्रत्येक संस्कार हा विशिष्ट वेळेला व विशिष्ट गोष्टीसाठी करतात. प्रत्येक संस्कारात आयुर्वेदिक असे विशेष महत्त्व आहे.
१६ संस्कार हे पूर्वजनांनी तुमच्या आमच्यासाठीच लावून दिले आहेत,परंतु आपल्याला बऱ्याच संस्काराबद्दल अजूनही पूर्ण माहिती नसल्याकारणाने आपण ते संस्कार करायचे टाळतो किंवा करत देखील नाही.
या आधी १६ संस्कारांपैकी याआधी आपण विविध संस्कार पाहिले जसे गर्भाधान,पुंसावन,अनावलोभन,सीमंतोन्नयन,जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चूडा कर्म हे आपण संस्कार पाहिले. जसे की जातकर्म केल्याने बाळाच्या चांगली आणि आनंदी जीवनाची सुरुवात होते, तसेच नामकरण या संस्काराने बाळाला या जगात एक वेगळी ओळख मिळते. असेही आपले संस्कार ज्यामुळे मनुष्याचे जीवन हे सुखकर आणि आरोग्यदायी जगता यासाठी केले जातात.
याआधी रोज हिंदू १६ संस्कारातील रोज एक संस्काराबद्दल माहिती पाहत आहोत, आज आपण कर्णवेध संस्कार म्हणजे कान टोचणे या संस्काराबद्दल माहिती पाहूया.
Karanvedha Sanskar In Marathi 2024; कर्णवेध संस्कार
Karanvedha Sanskar In Marathi 2024; सोळा संस्कारातील पुढचा संस्कार आहे कर्णवेध संस्कार या संस्कार श्रृंखलेतील हा संस्कार. पाच ज्ञानेन्द्रिय ही आपल्या शरीरात महत्त्वाचे आहे, पाच ज्ञानेंद्रियांपैकी कान हे एक महत्त्वाचे इंद्रिय आहे. या कानालाच आपण करणे ‘श्रवणेंद्रिय’ किंवा ‘श्रोतृ’ असे संबोधतो. अशा या कानांना खालच्या भागाला ज्याला आपण कानाची पाती असे म्हणतो त्यास छिद्र पाडणे म्हणजे कर्णवेध संस्कार होय.
कान टोचणे म्हणजे कर्णवेध संस्कारास आपल्याकडे कान टोचणे संस्कार असे देखील म्हटले जाते. कान हे पंच इंद्र यापैकी एक महत्त्वाचे इंद्रिय.
कर्णवेध हा संस्कार मुलगी असो वा मुलगा या दोघांसाठीही केला जातो.
कान टोचणे हा कार्यक्रम कसा छोट्या स्वरूपातच असतो.
ओं भद्रं कर्णेभि: श्रुणुयाम देवा
भद्रं पश्येमाक्षभि: यजत्रा:।
स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाँसस्तनूभि:
व्यशेमहि देवहितं यदायु:॥
(यजुर्वेद-२५/२१)
विवेचन
यजुर्वेदातील हा सुपरिचित असा आशयघन मंत्र आहे. यात आम्ही आमच्या कानांनी सत्य, मधुर व मंगलमय शब्द ऐकावेत आणि डोळ्यांनी पवित्र असेच दृश्य पाहावेत. समग्र शरीराने व शरीराच्या सर्व अवयवांनी सर्वांसाठी हितकारक असे सार्थक आयुष्य वेचावे, असा मंगलमय उपदेश मिळतो, जो की नेहमीच्याच जीवनात उपयुक्त ठरणारा आहे. विशेष करून कर्णवेध संस्कार प्रसंगी हा मंत्र म्हटला जातो.
जाणून घेऊया विविध जातींच्या संस्कारांचे रंग https://marathionlinetimes.com/entertainment/javal-kadhane-2nd-part-2024/
अन्नप्राशन शिशुच्या जीवनातील पहिला स्वाद !https://marathionlinetimes.com/entertainment/annaprashan-sanskar-2024/
कार्तिकी पौर्णिमा देव दीपावलीचा उत्सव!
Nishkramana 6th Hindu Rites 2024: बाळ करणार पहिल्यांदा निष्क्रमण यात्रा https://marathionlinetimes.com/entertainment/nishkramana-6th-hindu-rites-2024/
पाळणा संग्रह वात्सल्याच्या गोड आठवणी https://marathionlinetimes.com/entertainment/palna-sweet-memories-2024/
Namakaran 6th Hindu Rite 2024: नामकरण संस्काराबद्दल https://marathionlinetimes.com/entertainment/namakaran-6th-hindu-rite-2024/
Jatakarma Childs Sacred Start 2024:बाळ जन्मल्यानंतर केल्या जाणारा महत्त्वाचा संस्कार https://marathionlinetimes.com/entertainment/jatakarma-childs-sacred-start-2024/
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी https://marathionlinetimes.com/entertainment/dohala-jeevan-a-sacred-ritual-in-marathi/
Karanvedha Sanskar In Marathi 2024; आजकाल मोठ्या प्रमाणात याच अनुषंगाने बाळाच्या जन्माच्या सहाव्या किंवा सातव्या महिन्यांतच कान टोचण्याचे कार्य उरकले जाते. पण, हा संस्कार मात्र कोणीच करीत नाही. खरे तर कानटोचणी ही बाळाच्या नाजूक अशा अवयवाला त्रासदायक भासणारी ही प्रक्रिया आहे. कारण, जावळ काढताना तितक्याशा वेदना होत नाहीत. पण, कर्णवेध करणे म्हणजे एक प्रकारे शस्त्रक्रियाच नव्हे काय? म्हणूनच पूर्वीच्या काळी ऋषीमुनीनी या प्रक्रियेस १६ संस्कारात स्थान दिले आहे.
बहुतांश वेळा बाळाची कान टोचणे हा कार्यक्रम बाळ अगदी सव्वा महिन्याचे असताना देखील केला जातो, कारण बाळाचे अंग तेव्हा कोवळे असते, असे देखील म्हटले जाते की लवकर कान टोचले तर तेल आणि पाण्याने शिकून बाळाला आराम मिळेल आणि टोचलेली कानाची जखम लवकर बरी होईल.
पूर्वीच्या काळी बऱ्याच वेळा वैद्यांच्या हाताने कान टोचवून घेत, कारण वैद्यांना शरीरातील नसा ठाऊक असतात त्यातल्या त्यात काना मधील शिरांचे पुष्कळ ज्ञान होते.
हा संस्कार करताना बाळाला बऱ्याच वेळा सोनाराकडे घेऊन जातात आणि त्यांच्या करवी कान टोचून घेतात. बऱ्याच ठिकाणी सोनाराकडे कान टोचून घेताना खोबऱ्याची वाटी घेऊन जातात, असे देखील पहावयास मिळते.
बहुदा यासाठीच ‘सोनारानेच कान टोचावे’ अशा आशयाची म्हण रूढ झाली आहे. या म्हणीचा अर्थ केवळ असाच आहे की ज्या ज्या व्यक्तीला जे जे काम सोपवले आहे तेथे काम त्या व्यक्तीने करावे, इतरांनी या कामात लक्ष घालू नये किंवा ज्या व्यक्तीला ते काम शक्य आहे त्यांनी तेच काम अगदी लक्ष देऊन करावे.
भिषक् वामहस्तेन आकृष्य
कर्णं दैवकृते छिद्रे ।
आदित्यकरावभासिते
शनै:शनै: ऋजु: विध्येत्॥
भिषक् म्हणजेच प्रवीण अशा वैद्याने आपल्या डाव्या हाताने बाळाच्या कानाला ओढून वा पकडून सूर्याच्या किरणांनी चमकणार्या दिव्य अशा छिद्राला सावकाश व सावधपणे वेधावे (टोचावे).हा संस्कार का व कशासाठी करावा?
यासंदर्भात सुश्रुताचार्य म्हणतात-
‘रक्षाभूषणनिमित्त बालस्य कर्णौ विध्येत्!’
म्हणजेच शारीरिक दृष्ट्या बाळाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने व कानामध्ये आभूषणे धारण करण्याच्या निमित्ताने हा संस्कार करण्यात येतो, कानामध्ये नाना विविध दागिने घालून सौंदर्य वाढीच्या हेतूने असला तरी खऱ्या अर्थाने या मागचा मुख्य उद्देश हाच आहे की बाळाचे शारीरिक आरोग्याचे रक्षण व्हावे.
-शङ्खोपरि च कर्णान्ते
त्यक्त्वा यत्नेन सेवनीयम्।
व्यत्यासाद् वा सिरां
विध्येत् अन्त्रवृद्धिनिवृत्तये ॥
(चिकित्सा स्थान-१९,२१)आंत्रवृद्धी किंवा आंतगळ हा एक आजार आहे. यालाच आधुनिक भाषेत ‘हर्निया’ असे म्हणतात. या रोगापासून मुक्त होण्याकरिता दोन्ही कान टोचावेत लागतात.
वरील श्लोकांचा पूर्ण अर्थ असा आहे- शंख म्हणजेच कानपट्टी. या कानपट्टीच्या वर कानाच्या आतील भागात जे जोड आहे, ते सोडून व्यत्ययाने म्हणजेच नसीला छिद्र पाडल्याने आंत्रवृद्धी (हर्निया)हा आजार नाहीसा होतो. व्यत्यय म्हणजेच उजव्या बाजूकडील आंत्रवृद्धीला नाहीसे करण्याकरिता डाव्या कानाला टोचावे व डाव्या बाजूच्या आंत्रवृद्धीला रोखण्याकरिता उजवीकडील कानाला टोचावे.
Karanvedha Sanskar In Marathi 2024; काही फायदे
कान टोचल्याने होतात फायदे
- आयुर्वेदानुसार, कानाच्या खालचा भाग म्हणजेच कानाची पाती, (ear lobes)हा एक पॉईंट या पातीला छिद्र केल्यास मेंदूचा एक भाग पूर्णतः ऍक्टिव्ह राहण्यास मदत करते.
- एक्यूप्रेशर नुसार काना कानाची खालची बाजू म्हणजेच कानाच्या पात्या मध्ये डोळ्यांच्या अनेक नसा असतात, आभूषणे घालताना कळत नकळत ते बिंदू दाबल्या जातात त्यामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी ही चांगली होते.
- तसेच,एक्यूप्रेशर नुसार, केंद्रबिंदूवर दबाव पडल्यामुळे ओसीडी म्हणजे एखादी गोष्ट गरजेपेक्षा विचार करून घाबरून जाणे) आणि मानसिक अर्जात देखील दूर होण्यास मदत मिळते.
- Ear lobes मध्ये विविध असे प्रेशर पॉइंट असतात ज्यामुळे प्रजनन अंग देखील निरोगी ठेवण्यास ते सहाय्य करते, जसे की पुरुषांच्या अंडकोष आणि वीर्य संरक्षणात कान टोचण्याने लाभ होतो.
- तसेच मुलींचे कान टोचल्याने त्यांची मासिक पाळी ही नियमित राहते.
Karanvedha Sanskar In Marathi 2024; कर्णवेध संस्काराचा विधी
- ज्या दिवशी हा संस्कार करावयाचा आहे, त्या दिवशी सकाळी बाळाला स्वच्छ स्नान घालावे, व नवीन कपडे घालावी, तसेच बाळाला जिथे यज्ञ आपण करणार आहोत तिथे आणावे,
- पालक त्यांच्या मुलाला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसवतात. मग आपल्या देवतेची पूजा केली जाते. त्यानंतर मुलाचे कान सोनार टोचतात. त्यावेळी मंत्रही उच्चारले जातात.
- यामध्येही आधी कोणता कान टोचायचा हे हे देखील महत्त्वाचे जर ती मुलगी असेल तर प्रथम डावा कान टोचला जातो आणि जर मुलगा असेल तर उजवा कान प्रथम टोचला जातो.
Karanvedha Sanskar In Marathi 2024; त्याचबरोबर खालील मंत्राने डाव्या कानाला छेद करताना म्हणावा.
वक्षन्तीवेदा गनीगन्ति कर्णं
प्रियं सखायं परिषस्वजाना।
योषेव शिङ्क्ते वितताधि
धन्वञ्ज्या इयं समने पारयन्ति ॥
(यजुर्वेद-२९/४०)
Karanvedha Sanskar In Marathi 2024; कर्णवेध संस्कार करण्यासाठी काही शुभ मुहूर्त
२० नोव्हेंबर | १२:०० ते०४:०० |
२१ नोव्हेंबर | ०७:३० ते०७:१५ |
२७ नोव्हेंबर | ०७:३० ते १२:३० |
Karanvedh Sanskar In Marathi 2024; डिसेंबर महिन्यातील शुभ मुहूर्त
डिसेंबर २०२४ | |
तारीख | वेळ |
०१ डिसेंबर | १२:३० ते ०३:०० |
0६ डिसेंबर | ०८:०० ते १२:०० |
०७ डिसेंबर | ०३:०० ते ०६:०० |
११ डिसेंबर | १०:१५ ते ०४:०० |
१२ डिसेंबर | ०७:४० ते ०९:५० |
१५ डिसेंबर | ०७:५० ते ११:२५ |
२३ डिसेंबर | १२:३० ते ०५:०० |
२५ डिसेंबर | ०७:५० ते१०:३० |
२८ डिसेंबर | ०३:१५ ते ०७:०० |
या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
अमेय वाघ Amey Vagh Talented Actor :https://marathionlinetimes.com/entertainment/amey-vagh-talented-actor/
आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
खळखळून हसवणारी नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….