Krishna Janmashtami mathichi gokul: मातीच्या गोकुळाची गोष्ट

Krishna Janmashtami mathichi gokul: जाणून घेऊया, परंपरागत जपल्या जाणारी अनोखी गोकुळाची गोष्ट.

Krishna Janmashtami mathichi gokul: श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे महाराष्ट्रातील घराघरात साजरा होणारा एक खास सोहळा, जो ‘मातीच्या गोकुळा’ शिवाय अपूर्ण आहे. ही एक अशी सुंदर आणि पारंपरिक प्रथा आहे, जी आजही अनेक कुटुंबांमध्ये मोठ्या भक्तिभावाने जपली जाते. पण या परंपरेचा खरा अर्थ आणि महत्त्व तुम्हाला माहित आहे का? ‘मातीचे गोकुळ’ (mathichi gokul) म्हणजे केवळ मातीच्या मूर्ती बनवणे नव्हे, तर तो संस्कृती, संस्कार आणि आपल्या मातीशी असलेले नाते जपण्याचा एक सुंदर मार्ग आहे. आज ही प्रथा काही प्रमाणात विस्मृतीत जात असली, तरी यामागे दडलेल्या अनेक महत्वपूर्ण गोष्टी.


जन्माष्टमी म्हटलं की डोळ्यासमोर येतो श्रीकृष्ण, दहीहंडी आणि रात्री १२ वाजताचा पाळणा. पण महाराष्ट्रातील एक जुनी आणि विसरलेली परंपरा तुम्हाला माहित आहे का? ही परंपरा म्हणजे ‘मातीचे गोकुळ’. महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये एकेकाळी एका सुंदर परंपरेतून हे गोकुळ साकारले जात असे.अनेक घरांमध्ये आजही मोठ्या प्रेमाने आणि भक्तिभावाने हा सोहळा साजरा केला जातो. या सोहळ्यात केवळ मातीचे सुंदर गोकुळच बनवले जात नाही, तर यामागे एक खास मान्यताही आहे. म्हणतात की, ज्या स्त्रियांना मूल होत नाही, त्यांना या गोकुळातील गोपाळ दिला जातो. चला तर मग, महाराष्ट्राच्या या अनोख्या परंपरेबद्दल अधिक जाणून घेऊया.

Krishna Janmashtami mathichi gokul: मातीच्या गोकुळाची गोष्ट

मातीचे गोकुळ साकारण्यासाठी लागणारे साहित्य

Krishna Janmashtami mathichi gokul: साहित्य अगदी साधे आणि नैसर्गिक असते. जे या ऋतूमध्ये सहजपणे आपल्याला यामध्ये गोकुळ तयार करण्याची देखील एक कला आहे. यासाठी लागणारे साहित्य म्हणजे,काळ्याशार मऊ मातीचा गोळा, ज्वारीचे दाणे, करडईचे दाणे, गुंजा ज्या लाल काळया रंगाच्या असतात, (या गुंजा मुख्यत्वे श्रीकृष्णाच्या गोपाळणाला लावल्या जातात.) पिंपळाचे छोटेसे रोपटे, तुळशीची छोटीशी रोपटे.
या साहित्यातून, घरातील आज्जी किंवा मोठी स्त्री आपल्या प्रेमळ हातांनी एक संपूर्ण गोकुळ नगरी साकारते. श्रीकृष्णाचे भजन किंवा जप देखील करतात.

गोकुळ साकारण्याची प्रक्रिया

Krishna Janmashtami mathichi gokul: सर्वात आधी, पाटावर मातीची कोपऱ्यातून केल्या जाते चौकोन आकृती कमान,मातीच्या गोळ्याला तुळशी वृंदावनाचा आकार दिला जातो, कारण जिथे तुळस असते तिथे पावित्र्य आणि हरिनामाचा निवास असतो, अशी श्रद्धा आहे. त्यानंतर, गाय, गाढव, कावळा, जातं, गवळी-गवळणी, उखळ, पोथी वाचणारे ब्राह्मण मंडळी, श्रीकृष्णासाठी केला जातो मातीचा छोटासा पाळणा,कृष्ण-बलराम यांची छोटी-छोटी मातीची रूपे तयार केली जातात. पुतना आणि कंसासारख्या नकारात्मक पात्रांची चित्रेही बनवून त्यांना एका कोपऱ्यात ठेवले जाते.

१ मूठ धान्याने कसे मिळवाल शिवकृपा? अशी वाहतात शिवमुठ”

या मातीच्या शिल्पांना ज्वारीच्या दाण्यांनी सजवले जाते. ज्वारीचे दाणे डोळ्यांसाठी आणि कृष्णाच्या दागिन्यांसाठी वापरले जातात. तसेच करडईची दाणे देखील या सर्व मातीच्या गोकुळाला नक्षी दार रूप देतात. आणि श्रीकृष्णाचा पाळणा हा गुंजा (लाल काळया रंगाच्या) त्यामुळे पाळणा सुरेख दिसतो. गोकुळ साकारण्याचे हे काम करताना, बहुदा यामागे घरातील लहान मुलांना मातीच्या चुलीची रचना कशी असते, हे त्यांना समजावे शिकवावे.जात्यावरून हात कसा फिरवतात, यांसारख्या गोष्टींची माहिती दिली जाते. नकळतपणे त्यांच्यावर माती आणि ग्रामीण जीवनाचे संस्कार घडवले जातात.

पूजा करण्याची पद्धत

Krishna Janmashtami mathichi gokul: अनेक ठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सव हा रात्री ८ दरम्यान या काळात देखील साजरा केला जातो. या गोकुळाची पूजा यावेळेस केल्या जाते. आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा नैवेद्य म्हणून मुख्यत्वे केला जातो तो सुंठवडा (सुंठ आणि पिठीसाखरेचे एकत्रित मिश्रण)आणि डिंकवडा(जो बाळंतीण स्त्रियांना मुख्यत्वे पौष्टिक असलेला लाडू ज्यामध्ये डिंक, खोबरे, काजू, बदाम असा सुकामेवा असतो.) बाळकृष्णासाठी ठेवलेले पांढरे शुभ्र लोणी त्याला वाटीतून दिले जाते, आणि बाळगोपाळांच्या ओठांवर ठेवले जाते.

Krishna Janmashtami mathichi gokul: हा सोहळा उदबत्तीच्या सुगंधात आणि मंत्रोच्चारांच्या घोषात सुरू होतो. “वसुदेवं सुतं देवं…” यासारख्या मंत्रांनी बाळकृष्णाला घरी येण्याचे आमंत्रण दिले जाते. मातीचे गोकुळ एक पारंपरिक कला आणि शिक्षण
हे मातीचे गोकुळ फक्त एक खेळ किंवा विधी नाही. हे एकाच वेळी अनेक कामे शिकवण्याचे एक माध्यम आहे. मातीला आकार देताना, मंत्र म्हणताना, आणि गोष्टी सांगताना एकाच वेळी अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची शिकवण मिळते. या परंपरेतून घरातल्या मोठ्या स्त्रिया, त्यांच्या कोमल भावना आणि कलाकौशल्य दाखवतात.

”आयुष्मान कार्डवर ५ लाख रुपये मोफत उपचार! तुम्ही पात्र का? 


जेंव्हा हे काळ्या रंगाचे गोकुळ, फुलांनी, श्रीकृष्णाच्या जन्मामुळे गोकुळावर टाकल्या जाणारा गुलाल, पांढराशुभ्र वस्त्र माळी,तुळस, पिंपळाच्या पानांनी सुरेख सजवले जाते तेव्हा ते अतिशय मनमोहक असे दिसते.
परंपरेचा शेवट आणि नवीन सुरुवात


Krishna Janmashtami mathichi gokul: या सोहळ्याचा शेवट दुसऱ्या दिवशी होतो. तयार झालेले मातीचे गोकुळ झाडाच्या बुंध्यात समर्पित केले जाते. त्यातील ज्वारीचे दाणे पुढे अंकुरित होऊन नवीन कणसे लागतात. या कणसांवर चिमण्या येतात अशाप्रकारे, ही परंपरा पुन्हा एकदा मातीतून निसर्गाशी आणि जीवनाशी जोडली जाते.


Krishna Janmashtami mathichi gokul: आजच्या वेगवान युगात जरी ही परंपरा काहीशी विस्मृतीत गेली असली, तरी काही लोक आजही ती जपत आहेत. सोशल मीडियावर जुन्या आठवणींना उजाळा देणारे फोटो पाहून, आजही अनेकांच्या मनात या ‘मातीच्या गोकुळाच्या’ आठवणी ताज्या होतात. ही परंपरा आपल्याला आपल्या मातीशी आणि मूळ संस्कृतीशी जोडून ठेवते, तसेच नव्या पिढीला आपले पारंपरिक संस्कार आणि मूल्ये समजावून सांगते.

Loading