Maker sankrant Marathi 2026: महत्वपूर्ण मार्गदर्शन
Maker sankrant Marathi 2026: नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत,मकर संक्रांत म्हणजे सूर्याचे संक्रमण(Maker sankrant). या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि येथूनच ‘उत्तरायणाची’ पुण्यकारक सुरुवात होते. पण २०२६ ची ही संक्रांत एकादशीला आल्यामुळे बऱ्याच जणांची गडबड होत आहे. हाच गोंधळ थांबवण्यासाठी आणि योग्य शास्त्रशुद्ध माहिती मिळण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
तुमच्या लाडकाय लेकीचे भविष्य करा सुरक्षित! हे नवीन सुकन्या समृद्धी योजनेचे २०२६ चे व्याजदर!
मकर संक्रांत आणि एकादशी: संभ्रम दूर करणारी विशेष माहिती
Maker sankrant Marathi 2026: येत्या १४ जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि त्याच दिवशी एकादशी सुद्धा आहे. यामुळे आपल्या बऱ्याच माता-भगिनी संभ्रमात (confused) आहेत की नक्की उपवास करावा की संक्रांत साजरी करावी? याविषयी गुरुजींनी दिलेला निर्णय आणि सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
विशेष नोंद: या वर्षीचे वायन दान दुपारी ३ वाजून ६ मिनिटाच्या नंतर आहे. याची सर्वांनी आवर्जून नोंद घ्यावी.
१) उपवास असणाऱ्या महिलांसाठी (निर्णय क्र. १):
For women observing Ekadashi fast
Maker sankrant Marathi 2026: ज्या माता-भगिनी १२ ही महिन्यांच्या एकादशी करतात, त्यांनी या दिवशी उपवासच करावा. देवाला तिळगुळाचा नैवेद्य दाखवावा व दुसऱ्या दिवशी (द्वादशीला) गोड-धोड स्वयंपाक तयार करून, देवाला नैवेद्य दाखवून मगच जेवण करावे.
२) उपवास नसणाऱ्या महिलांसाठी (निर्णय क्र. २):
for women who do not fast on Ekadashi
ज्या महिलांना एकादशीचा उपवास नसतो, अशांनी संक्रांतीच्या दिवशी जेवण केले तरी चालेल. आणि दुसऱ्या दिवशी पण द्वादशी निमित्त स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवून तो प्रसाद ग्रहण करावा.
यंदाची संक्रांत काय सांगते? (पंचांग आणि मुहूर्त)
makar snkaranti Murtha
Maker sankrant Marathi 2026: दाते पंचांगानुसार, शके 1947 पौष कृष्ण एकादशी बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ०३:०६ मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी ३:०६ पासून सूर्यास्तापर्यंत असेल.
वाहन: यंदाचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे.
स्वरूप: देवीने हातात गदा घेतली असून ती कुमारी अवस्थेत बसलेली आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेले असून पायस (खीर) भक्षण करत आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असून वायव्य दिशेकडे पाहत आहे.
“महिलांनो, सरकार देतंय ₹१५,००० ची फ्री शिलाई मशीन! आजच असा करा मोबाईलवरून अर्ज.”
संक्रांतीच्या पुण्यकाळात ‘या’ गोष्टी आवर्जून टाळा
Avoid these things during the aus[icious time of Sankranti
संक्रांतीच्या काळात (दुपारी ३:०६ नंतर) खालील गोष्टी करणे शास्त्रात निषिद्ध मानले गेले आहे:
१. कठोर बोलू नका: कोणाशीही वाद घालू नका, सर्वांशी गोड बोला.
२. निसर्गाची हानी: झाडे किंवा गवत तोडणे टाळावे.
३. दंतधावन: पर्वकाळात दात घासणे टाळावे.
४. सात्त्विकता पाळा: मांसहार व व्यसनांपासून दूर राहा. हा काळ जप आणि दानासाठी आहे.
५. गायी-म्हशींची धार: या दिवशी पशुंची धार काढू नये.
तिळगूळ घ्या, गोड बोला!
संदर्भ: दाते पंचांग व गुरुजी मार्गदर्शन.

![]()







