Margashirsh Yogeshwari Devi festival 2025: श्री योगेश्वरीअंबाजोगाई आणि परळी वैजनाथ यांच्यातील दिव्य अनुबंध
Margashirsh Yogeshwari Devi festival 2025: मार्गशीर्ष महिन्यात अंबाजोगाईतील श्री योगेश्वरी देवी(Yogeshwari Devi)मंदिराचा नवरात्र उत्सव सुरू आहे. जी असंख्य भक्तांची कुलस्वामिनी आहे. मार्गशीर्ष महिन्यात मराठवाड्यातील अंबाजोगाई येथे असलेले जागृत शक्तीपीठ बद्दल तुम्हाला माहिती आहे का? अंबाजोगाई हे मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी, साहित्यिक आणि शैक्षणिक वारशामुळेच नव्हे, तर जागृत शक्तीपीठ देखील आहे,ती म्हणजे श्री योगेश्वरी देवी मंदिर, ज्यामुळे महाराष्ट्राच्या नकाशावर एक महत्त्वाचे स्थान टिकवून आहे. ही केवळ एक देवता नसून, असंख्य भक्ताची कुलस्वामिनी देखील आहेत.
देवी महिमा आणि आख्यायिका
(Devi Mahima and Legend)
योगेश्वरी नाम: योगिनींवर अधिपत्य करणारी आणि योग साधनेला प्राधान्य देणारी देवता म्हणून ‘योगेश्वरी’ हे नाव प्रचलित झाले.
रुसलेली देवी: Margashirsh Yogeshwari Devi festival 2025: परळी वैजनाथ आख्यायिका: योगेश्वरी देवीचे लग्न परळी वैजनाथ येथील महादेवाशी निश्चित झाले होते, पण काही कारणामुळे ते लग्न अर्धवट राहिल्याने देवी रुसलेली आहे, असे मानले जाते. या आख्यायिकेमुळे या देवीला एक अद्वितीय भावनिक संदर्भ प्राप्त झाला आहे.
उत्सवाचा काळ आणि स्वरूप: मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव
(Margashirsha Navratra Festival)
Margashirsh Yogeshwari Devi festival 2025: मुख्यात्वे फडके कुळाची कुलदेवता मानले जाते,तसेच अनेक घराण्कुयाची कुळदेवता श्री योगेश्वरी देवी मातेचा हा नवरात्र उत्सव दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात मोठ्या भक्तीभावाने साजरा होतो.
उत्सवाच्या महत्त्वाच्या तिथी
(Important Tithis of the Festival)
मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला सुरू होऊन मार्गशीर्ष पौर्णिमेला संपन्न होतो.
यावर्षीचा काळ (Dates – 2025): यंदा हा उत्सव २७ नोव्हेंबर २०२५ (मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी) रोजी सुरू होऊन ४ डिसेंबर २०२५ (मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा) रोजी समाप्त होतो.
पौर्णिमेचे महत्त्व
(Significance of Purnima):
Margashirsh Yogeshwari Devi festival 2025: दंतासुर नावाच्या असुराचा वध करण्यासाठी देवी मातेने मार्गशीर्ष पौर्णिमेला अवतार घेतला, त्यामुळे या दिवशी पूर्णाहुती होऊन उत्सव पूर्णत्वास जातो.धार्मिक कार्यक्रम आणि कुलाचार (Religious Programs and Kula Acharas)
उत्सव काळात मंदिर प्रशासनातर्फे (योगेश्वरी देवल कमिटी, अंबाजोगाई) अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते:
सप्तमीला प्रारंभ: शासकीय पूजेने नवरात्राचा आरंभ होतो. ब्राह्मणांना सप्तशती पाठ व श्री योगेश्वरी सहस्त्रनाम जपाची वर्णी दिली जाते.
दररोज दुर्गासप्तशती पाठ (Durga Saptashati Path), कुंकूमार्चन (Kumkumarchan), सहस्रनामपाठ, श्रीसूक्त अभिषेक (Shri Sukta Abhishek) आणि महानैवेद्य (Maha Naivedya) आदी कुलाचार सेवा होतात.
होम-हवन आणि पूर्णाहुती:
पौर्णिमेच्या मंगल प्रसंगी सप्तशती पाठाचे होम-हवन होते आणि धार्मिक विधींची पूर्णाहुती केली जाते. यानंतर मंदिर गाभाऱ्यात देवीचे पूजन, साडी-ओटी आणि महाआरती (Maha Aarti) केली जाते.
कमी हप्ता, सर्वाधिक बोनस आणि सरकारी सुरक्षेची हमी! पोस्टाची जीवन विमा (PLI) योजना
आराध बसणे/किंवा धरणे बसणे.
(Aaradh Basne)
Margashirsh Yogeshwari Devi festival 2025: योगेश्वरी देवीच्या उत्सवातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि भावनिक कार्यक्रम म्हणजे ‘आराध बसणे’ (Aaradh Basne) किंवा धरणे बसणे.
आराध बसणारे भक्त (Aaradhi Bhakt) कोणी पाच दिवस, तर कोणी संपूर्ण नऊ दिवस देवीच्या मंदिरात किंवा परिसरात बसून राहतात.
उद्देश: काही भक्त नवस (Vow) बोलून आराध बसतात, तर काही भक्त आपल्या कुलस्वामिनीप्रती असलेली गाढ भक्ती प्रकट करतात.
परडी आणि पोत: देवीच्या भक्तीचे व्रत घेणारांना (आराधी होणारांना) परडी आणि पोत यांचे व्रताचे प्रमुख चिन्ह म्हणून स्वीकार करावा लागतो. देवीनेही एका हातात पात्र (परडी) धारण केल्याचा उल्लेख रुद्र्यामलखंडात आहे.
छबीना आणि पालखी मिरवणूक
(The Processions: Chhabina and Palkhi)
उत्सवात दोन महत्त्वाच्या मिरवणुका निघतात:
छबीना (Chhabina): हा नऊ दिवस चालणारा विधी आहे. यात देवीच्या प्रतिकृती असलेली छोटी मूर्ती (Small Idol) घेऊन ती उत्सवाच्या दिवसांपासून रोज गाभाऱ्यातून बाहेर काढून मिरवली जाते.
Margashirsh Yogeshwari Devi festival 2025: पालखी मिरवणूक (Palkhi Procession): मार्गशीर्ष पौर्णिमेला (४ डिसेंबर २०२५) देवीची भव्य पालखी संपूर्ण अंबाजोगाई गावातून फिरते, ज्यामुळे भक्तांना त्यांच्या घरापाशीच देवीचे दर्शन घेता येते.
भगवद्गीतेचे १८ अध्याय आजच्या पिढीला काय सांगतात?
अंबाजोगाईचा वारसा,आजूबाजूची प्रमुख ठिकाणे
(Nearby Heritage of Ambejogai Prominent Places)
योगेश्वरी देवी मंदिराव्यतिरिक्त अंबाजोगाईत खालील ठिकाणे प्रसिद्ध आहेत,
- Margashirsh Yogeshwari Devi festival 2025: श्री मुकुंदराज समाधी (Shri Mukundraj Samadhi): मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांचे समाधीस्थान.
- संत दासोपंत समाधी (Sant Dasopant Samadhi): मराठी साहित्याचे नवकोट नारायण संत दासोपंत यांचे समाधीस्थान.
- खोलेश्वर मंदिर (Kholeshwar Temple): एक प्राचीन आणि सुंदर शिवमंदिर.
श्री योगेश्वरी देवीची संपूर्ण आरती
(The Complete Aarti of the Goddess)
॥ जयदेवी जयदेवी जय योगेश्वरी ॥ महिमा न कळे तुझा वर्णिता थोरी ॥
आरती धन्य अंबापूर महिमा विचित्र !
पार्वती अवतार योगिनी क्षेत्र
दंतासुरमर्दोनी केले चरित्र !
सिध्दांचे स्थळ ते महापवित्र
जयदेवी जयदेवी जय योगेश्वरी ! महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी ! जयदेवी जयदेवी
पतित पावन सर्व तीर्थ महाद्वारी !
माया मोचन सकळ माया निवारी
साधका सिद्धीवाणेच्या तिरी !
तेथील महिमा वर्णू न शके वैखरी
जयदेवी जयदेवी जय योगेश्वरी! महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी ! जयदेवी जयदेवी
सिद्ध लिंग स्थळ परम पावन !
नृसिंह तीर्थ तेथे नृसिंह वंदन
मूळ पीठ रेणागिरी नांदे आपण !
संताचे माहेर गोदेवी स्थान !
जयदेवी जयदेवी जय योगेश्वरी ! महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी ! जयदेवी जयदेवी
महारुद्र जेथे भैरव अवतार !
कोळ भैरव त्याचा महिमा अपार
नागझरी तीर्थ तीर्थाचे सार !
मार्जन करिता दोष होती संहार
जयदेवी जयदेवी जय योगेश्वरी ! महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी ! जयदेवी जयदेवी
अनंत रूप शक्ती तुझ योग्य माते !
योगेश्वरी नाम त्रिभुवन विख्याते
व्यापक सकळा देही अनंत गुण वर्णिते !
निळकंठ ओवाळू कैवल्य माते !
जयदेवी जयदेवी जय योगेश्वरी ! महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी ! जयदेवी जयदेवी
![]()









