Margashirsha Mahalakshmi Vrat 2024; जाणून घेऊया मार्गशीर्ष तिसरा गुरुवार बद्दल!

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024;

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024; श्री महालक्ष्मीव्रता बद्दल संपूर्ण माहिती. 

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024;भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक महिन्यात वेगवेगळे सण येत असून, मराठी वर्षाची सुरुवात ही चैत्र महिन्या पासून होते. अनेक व्रतवैकल्ये ही केली जातात.त्यात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी केल्या जाणारे एक महत्त्वपूर्ण व्रत म्हणजे श्री महालक्ष्मी व्रत.

हे व्रत महाराष्ट्रात घरोघरी मोठ्या भक्ती भावाने सुवासिनी करतात. श्री महालक्ष्मी देवीचे गुरुवारी केल्या जाणारे व्रत हे आपल्याकडे फार शुभ आणि अतिशय महत्त्वपूर्ण मानल्या जाते. तर आज आपण या या लेखांमध्ये हे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी केल्या जाणाऱ्या व्रता बद्दल माहिती पाहणार आहोत, याबाबत पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यातून मिळतील.जसे की लक्ष्मी देवीची कहाणी कोणती? कोणती आरती म्हणतात? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024;

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024; लक्ष्मी व्रताचे काही नियम

  • १) व्रत करणाराने गुरुवारी सकाळी लवकर उठावे. स्नान करावे व निर्मळ अंतःकरणाने पूजा-विधी करावा. २) दिवसभर उपवास करावा. रात्री भोजन करावे.
  • ३) या दिवशी काही आकस्मिक अडचण असेल तर दुसऱ्या कोणाकडूनही पूजा-आरती करून घ्यावी. आपण उपवास करावा. 
  • ४) एकादशी, शिवरात्र या अन्य उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा-आरती करावी. कहाणी वाचावी किंवा तेऐकावी, 
  • ५) व्रत-पूजा व कहाणी ऐकण्यास शेजारी-पाजारी बोलवावे. 
  • ६) सायंकाळी गाईची पूजा करावी. गोग्रास द्यावा. 
  • ७) उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी-वाचन झाल्यानंतर सात सुवासिनींना अथवा सात कुमारिकांना हळदी-कुंकू देऊन एकेक फळ आणि या व्रतकथेची एकेक प्रत द्यावी. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्याला नमस्कार करावा, नंतरच आपण भोजन करावे.
  • ८) गुरुवारी संध्याकाळी पूजा, आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद द्यावा. 
  • ९) कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून ह्या व्रतास सुरुवात करून ते अखंड वर्षभर पाळून शेवटी उद्यापन करावे, यश समीपच आहे.

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024; कशी कराल पूजेची मांडणी? 

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024; घरातील पूजेची जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर कोरे कापड अंथरुन त्यावर गव्हाची किंवा तांदळांची रास घालावी. त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. त्यात दुर्वा, पैसा- सुपारी घालावी.. कलशावर विड्याची पाच पाने किंवा आंब्याची डहाळी ठेवून वर नारळ ठेवावा.

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024;

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024; पाटावर किंवा चौरंगावर श्री लक्ष्मी देर्वाचा फोटो ठेवावा. लक्ष्मीची मूर्ती असेल तर फोटो न ठेवता मूर्ती ठेवावी. त्यासमोर विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा. शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी. पूजेची मांडणी पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी. पूजा संपल्यावर आरती करावी व सर्वांना प्रसाद द्यावा.

रात्री श्री लक्ष्मीला मिष्टान्नाचा नेवेद्य दाखवावा. नंतर भोजन करावे. शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा-विसर्जन करावे, कलशातील पाणी तुळशीत ओतावे. तुळशीला हळदी-कुंकू वाहून नमस्कार करावा.

श्री लक्ष्मी देवीने प‌द्मपुराणात सांगितले आहे की, जो माझें व्रत नित्यनेमाने करील तो सदैव सुखी राहील! त्या वचनावर विश्वास ठेवा.

MSBSHSE 2024;राज्यात येऊ घातलेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर !

NPS वात्सल्य योजना 2024

Dr. Zakir Hussain Death 2024:

चला, बारा राशींचा फेरफटका मारूया !

षोडस संस्कार:भारतीय संस्कृतीचे स्तंभ आणि जीवनाचे मार्गदर्शक

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024;श्रीमहालक्ष्मीव्रताची कथा (गुरुवारची कहाणी)

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024;

श्री लक्ष्मी देवीची कहाणी

आटपाट नगर होते. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो द्याळू, शुर व प्रजादक्ष होता. देवा-ब्राम्हणांना, साधुसंतांना सुखवीत होता. आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव सुरतचंद्रिका होतं. नाव चांगलं, पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवर्‍याशी भांडण होई. भांडणानं वैतागली. रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या करत होत्या, लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनही व्रत केलं. दुःख विसरली. दारिद्र्य गेलं. परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली.

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024;कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला; पण भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऎश्वर्यात लोळू लागली. गर्वानं ती फुगली. दास-दासींवर रागावली. एकदा काय झालं. देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं. मागच्या जन्माची आठवण द्यावी. ओळखते की नाही हे बघावं. राणी राजव्ड्यात सुखाने रहात होती. राजाही कौतुक करी. तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली. कन्येचं नाव होतं शामबाला.

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024;एके दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचं रुप घेतलं. फाटकं वस्त्र नेसली. माथी मळवट फासला. हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली – “अरे, आहे कां घरात कुणी ? कुणी घास देईल का ?” दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, “कोण गं तू ? आलीस कुठनं ? काय काम काढलं आहे ? तुझं नाव काय ? गाव कोणतं ? तुला हवयं कायं ?” मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, “माझं नाव कमला. द्वारकेहून आलेय गं ! राणीला भेटायचंय ! कुठं आहे गं राणी ? दासी म्ह्णाली, “राणीसाहेब महालात आहेत ! सख्यांशी गप्पा मारताहेत ! त्यांना सागितलं तर माझ्यावर रागावतील. तुला गं त्या कश्या भेटणार ! काय तुझा हा अवतार ! तुला पाहून माझ्यावर ओरडतील. उणं-दुणं बोलतील.

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024;त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोशाला बैस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना !” म्हातारी रागावली, मनोमन संतापली, “ तुझी राणी पैशाला भाळली. माणुसकी विसरली. दरिद्री मेली ! आज झालीय राणी. पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना ! मीच तिला व्रत सांगितलं देवीचं ! तिनं ते केलं. आता राणी पदावर बसली. देवीला आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा ! पैशाची धुंदी आलीय ! गोरगरिबांची पर्वा नाही. थोर्‍या मोठ्यांच्या मुली. त्या झाल्या मैत्रिणी ! म्हातारी गरीब अन्‌ भिकारीण ! तिला कोण वचारतयं ! पण, याचं फळं तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी.” दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं.

हात जोडून म्हणाली,”ते व्रत मला सांगाल ! मी ते नेमानं करीन ! उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. दिलेला शब्द मोडणार नाही.”त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली. काठी टेकीत निघाली, तोच माडीवरुन राणीची कन्या शामबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली,”आजी, रागावू नका. चुकली माझी आई ! तिच्या वतीनं मी ख्षामा मागते. कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या. पाया पडते तुमच्या ! म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीनं क्शाणभर त्या मुलीकडे पाहिलं, आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार, तोच राणी माडीवरून आली. दाराशी येते, तर म्हातारी दिसली !

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024; राणी ओरडली,” ए थेरडे ! कशाला गं आलीस? जा इथून ! ऊठ म्हणतेय ना ! जातेस की नाही ? दुसरी घरं नाही दिसली तुला ?” म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरविले. कपाळावर आठ्या पसरल्या. ती तडक घराबाहेर पडली. दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती सुधारली ! दासीपण गेलं. संसार सुखाचा झाला. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरूवारी शामबालेनं लक्ष्मीव्रतास सुरुवात केली. सगळे नेमधर्म पाळले. चार गुरुवारी तिनं लक्ष्मीव्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं.

सिध्देश्वर राजाचा पुत्र मालाधर. त्याच्याशी शामबालेचा विवाह झाला. राजवैभवातील शामबालेला राजवैभव मिळालं. हा होता, लक्ष्मीव्रताचा प्रभाव. सुखा-समाधानानं संसार सालू होता. भद्रश्रवा व सुरतचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सुरतचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रश्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरुन राजा-राणी कष्टाने दिवस काढत होते.

‘भद्रश्रवाला कन्येला भेटावसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं. घाईघाईनं ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालाधरानं माणसं पाठवली. आणायला रथ पाठवला. सासर्यांना घरी आणलं.

सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला. शामबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं, आता परत जावं. जावयाला तसं त्यानं सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईनं तिनं झाकण काढलं. आत बघते तर काय, तिला कोळसेच दिसले.

सुरतचंद्रिकेनं कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवर्याला सांगितलं. ते ऐकून तोही चकित झाला. दु:ख पाठलाग करीत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वणवा भडकतच होता. सुरतचंद्रिकेचा एकेक दिवस दु:खाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावे, डोळे भरुन पहावं वाटलं.

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024;नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सुरतचंद्रिका घरुन निघाली. मुलीच्या सासरी पोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदीतीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आलीय. नदीकिनारी बसलीय. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कुणीतरी पाठवा.”

शामबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघताच शामबालानं आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फूटेना. आईनं स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी दिली: सोन्या-मोत्यांचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं.

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024; दुपारची वेळ झाली. शामबालेने भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळला. शामबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलावलं. सुरतचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मीदेवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, “शामा, मी देखील तुझ्यासोबत उपासच करीन !” शामा म्हणाली,”ठिक आहे. “मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं. ते आईनं पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोहोचवायला शामबाला सोबत गेली.

चार दिवसांनी शामबाला निघाली. मालाधर राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता, त्याचेही भान तिला नव्हते. मालाधरानं विचारलं, “माहेराहून काय आणलसं ?” शामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविलं. मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसलं ? मिठाचे खडे ! “अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस ? इथं मिळत नाही मीठ ?” “मीठ मिळतं ना ? पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ ! समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज…” शामबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली. तो विचारांत गुंगला.

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024;शामबाला म्हणाली,“हे मीठ जीवनाचे अमृत आहे ! अन्नाला चव येते ती मिठानंच ! मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्याचं मीठ खावं, त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे.” मालाधर राजा निश्चयाने उठला. त्यानं आपले सेवक सासर्‍याकडे पाठविले. त्यांना बोलावून घेतले. भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रश्रवानं अनुमती दिली. मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं.

सेनापती आले. त्यांनी मालाधराला वंदन केले. “आज्ञा करावी महाराज” ते म्ह्णाले. “भद्रश्रवांचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. Margashirsha Mahalakshmi Vrat 2024;प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एकेक खडा ठेवा. शपथ घेवून प्रत्येकाला झुंजायला सांगा.” राजाची आज्ञा झाली. तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसरे दिवशी सोबत सेना घेवून बेसावध शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रूसैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला. अपुर्व विजय मिळविला. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं.

मालाधराला व शामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली. सैनिकांनी शत्रूराज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरुन मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रश्रवास सुरतचंद्रिका राणीस घेऊन यायाला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवार ! शामबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली. आरती झाली. धूप-दीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वान्नाचं जेवण केलं.

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024;मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार. लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस. मंगल मुहूर्ताचा दिवस. मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केले. त्यानं या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सुरतचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे सात पुत्र दुर देशाहून अचानक परत आले. त्यांना पाहून आई-वडिलांना आनंद झाला.

या व्रतामुळे राजा-राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशी साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण .

ॐ श्रीमहालक्ष्मीदेव्यै नमः। ॐ हीम् श्रीलक्ष्मीभ्यो नमः। ॐ शांतिः शांतिः शांति ।। श्रीमहालक्ष्मी देवतापर्णमस्तु ।।

अशी ही श्रीमहालक्ष्मीव्रताची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण ।।

ॐ श्रीमहालक्ष्मीदेव्यै नमः। ॐ हीम् श्रीलक्ष्मीभ्यो नमः। ॐ शांतिः शांतिः शांति ।। श्रीमहालक्ष्मी देवतापर्णमस्तु ।।

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024; श्रीमहालक्ष्मी नम अष्टक

श्रीगणेशाय नमः। इन्द्र उवाच।

नमस्तेऽस्तु महामाये, श्रीपीठे सुरपूजिते। शंखचक्रगदाहस्ते, महालक्ष्मि नमोऽस्तुत ते ।।१।।

नमस्ते गरूडारूढे, कोलासुरभयंकरि। कुमारि वैष्णवि ब्राह्मि, महालक्ष्मि नमोऽस्तु ते ।।२।।

सर्वज्ञे, सर्ववरदे, सर्वदुष्टभयंकरि। सर्वदुःखहरे देवि, महालक्ष्मि नमोऽस्तु ते।।३।।

सिद्धिबुद्धिप्रदे देवि मुक्तिमुक्तिप्रदायिनि । मंत्रमूर्त सदा देवि, महालक्ष्मि नमोऽस्तुते ।।४।।

आद्यन्तरहिते देवि, आद्यशक्ति महेश्वरि। योगजे योगसंभूते, महालक्ष्मि नमोऽस्तुते।।५।।

स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्ति महोदरे। महापापहरे देवि, महालक्ष्मि नमोऽस्तुते ।।६।।

पद्मासनस्थिते देवि, परब्रह्मस्वरूपिणि। परमेशि जगस्‌मासामहालक्ष्मि नमोऽस्तुते ।।७।।

श्वेताम्बरधरे देवि नानालंकारभूषिते। जग‌स्थिते जगस्मासामहालक्ष्मि नमोऽस्तु ते ।।८।।

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024;

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024; आरती महालक्ष्मीची

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी। बससी व्यापकरूपे तू स्थूलसूक्ष्मी ।। ध्रु० ।।

करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता । पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता ।।

कमलाकारे जठरीं जन्मविला धाता। सहस्रवदनी भूधर न पुरे गुण गाता ।।१ ।।

मातुलिंग गदा खेटक रविकिरणी। झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी ।।

माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी। शशिधरवदना राजस मदनाची जननी ।।२।।

तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी ।। सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी ।।

गायत्री निजबीजा निगमागम सारी। प्रगट प‌द्मावती निजधर्माचारी ।।३ ।।

अमृतभरिते सरिते अघदुरिते वारी। मारी दुर्घट असुरा भव दुस्तर तारी ।।

वारी मायापटल प्रणमत परिवारी। हे रूप चिद्रुप तद्रुप दावी निर्धारी ।।४।।

चतुरानने कुश्चितकर्माच्या ओळी। लिहिल्या असतील माते माझे निज भाळी ।।

पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी ।।मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी ।। जय देवी जय देवी जय महालक्ष्मी० ।।५ ।।

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024;अष्टाक्षरी मंत्र

प्रथमं भारती नाम । द्वितीयं तु सरस्वती । तृतीयं शारवादेवी । चतुर्थ हंसवाहिनी। पंचम जगतीख्याता । षष् माहेश्वरी तथा । सप्तमं तत्तु कौमारी। अष्टमं ब्रह्मचारिणी। नवमं विद्याधात्रीति। दशमं वरदायिनी । एकादशं रुद्रघंटा द्वादशं भुवनेश्वरी । एतानि नामानि । यः पठेच्छृणुयादपि । नव विघ्न भयं तस्य सर्व सिद्धीकरं तथा ।

ॐ ऐं श्री महालक्ष्मै नमः

(भाविकाने या अष्टाक्षरी मंत्राचा नित्यनेमाने रोज १०८ जप केला, तर त्याची सर्व दुःखे दूर होऊन त्याचे मनोरथ पूर्ण होतात. मनाला शान्ती मिळते. अनुभव पाहा.)

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024; मार्गशीर्ष तिसरा गुरुवार: श्रीमहालक्ष्मीच्या व्रतअशी देखील सांगता करतात या व्रताची

बऱ्याच ठिकाणी फक्त हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातच केले जाते इतर वेळेस सहसा हे वृत्त स्त्रिया करताना पाण्यात येत नाही.

तसेच मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी या व्रताची सांगता केल्याचेही आपल्याकडे पाहण्यात येते, चौथ्या गुरुवारी श्री महालक्ष्मी महात्मा व्रत पुस्तकाच्या ५/७ प्रति ह्या सुवासिनींना कुंकू लावून ओटी भरून दिल्या जाते.

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024; या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती

मनोज बाजपेयी

सुबोध भावे

भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा

शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी 

Margashirsha Mahalakshmi Vrat 2024;महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती

मुख्यमंत्री योजना दूत 2024

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024  आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: 

समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024 

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:

केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram