Table of Contents
ToggleNamakaran 6th Hindu Rite 2024:सोहळा बारशाचा
Namakaran 6th Hindu Rite 2024:आपल्या संस्कृतीत विविध संस्कार केले जातात, त्यात गर्भवती स्त्री असो वा त्यानंतर केले जाणारे बाळावर विविध संस्कार टप्प्यावर करातात. हा संस्कार बाळाला नवीन जगात नवीन ओळख करून देतो.
Namakaran 6th Hindu Rite 2024:याआधी आपण हिंदू १६ संस्कारातील अनेक संस्कारांची माहिती घेतली आहे त्यात गर्भधान,पुंसावान, अनवलोभन,सीमंतोन्नयनसी,जातकर्म शाविविध संस्काराची माहिती घेतली आहे आता आपण पुढच्या म्हणजेच नामकरण या संस्कार याबद्दल माहिती घेणार आहोत.
शशश पूर्वीच्या काळी मुला मुलींची नावे ही देवाच्या नावावर ठेवली जात बहुदा त्यामागे असा हेतू असावा की त्यानिमित्ताने आपल्या तोंडात देवाचे नाव यावे आणि देवाचे नामस्मरण देखील घडावे. जातकर्म जातकमपूर्वीच्या काळी मुला-मुलींची नावे ही देवाच्या नावावर ठेवली जात बहुदा त्यामागे असा हेतू असावा की त्यानिमित्ताने आपल्या तोंडात देवाचे नाव यावे आणि देवाचे नामस्मरण देखील घडावे.
मुखत्वे हा संस्कार ही बाळाची आत्या ही बाळाचे नामकरण करते, बऱ्याच वेळेस आजी मावशी देखील करतात.
Namakaran 6th Hindu Rite 2024: नामकरण संस्कार
नामकरण हा १६ संस्कारातील सहावा संस्कार असून नामकरण सोहळा नामकरण या संस्कारास आपण बारसे असे म्हणतो.
नामकरण सोहळा सामान्यतः जन्म झाल्यानंतर दहाव्या किंवा १२ व्या दिवशी केला जातो. पूर्वीच्या काळे बाराव्या दिवशी मुख्यत्वे हा नामकरण संस्कार पार पाडत असे. काही ग्रंथ व जन्माच्या दहाव्या दिवसानंतर येणाऱ्या पहिल्या अमावस्येच्या किंवा पौर्णिमेला नामकरण समारंभ करण्याची सुचवतात.
बारशाच्या दिवशी बाळाला अंघोळ घालून नवीन वस्त्रे परिधान करतात. बहुतांश वेळा जन्माच्या वेळी असलेल्या नक्षत्रावर नाव ठेवले जाते. त्या नवरस नाव असे देखील म्हटले जाते. साधारण नंतरच्या कालावधीत पालकांनी निवडलेले बाळाचे नाव हे औपचारिक रित्या जाहीर केले जाते. नामकरण नामकरण या संस्काराद्वारे व या विधी द्वारे बाळाला समाजात एक व्यक्ती म्हणून मान्यता मिळते. तसेच जगात व्यवहार करण्यासाठी बाळाला सोपे जाते म्हणून नामकरण संस्कार हे मुख्यत्वे केले जातो.
आशा संस्कारास किंवा नामकरण संसार या समारंभास हौसेला मोल नसते म्हटल्याप्रमाणे आपल्या यत्था शक्तीनुसार भेटवस्तू देणे किंवा देवाण-घेवाण हे केले जाते तसेच मेजवानी आणि आनंद उत्सव देखील साजरा केला जातो.
Namakaran 6th Hindu Rite 2024:सध्याच्या काळात नामकरण सोहळा यास एका स्वरूपात देखील पाहिल्या इव्हेंट चे स्वरूप आले आहे. त्यासाठी बाळाचे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो काढले जातात सोबत आई-वडिलांचे देखील वेगवेगळ्या पद्धतीने फोटो काढले जातात. मोठ्या प्रमाणात मेजवानी केल्या जाते, भरभक्कम वस्तूची भेट वस्तूंची देवाण-घेवाण देखील केल्या जाते.
Jatakarma Childs Sacred Start 2024:बाळ जन्मल्यानंतर केल्या जाणारा महत्त्वाचा संस्कार https://marathionlinetimes.com/entertainment/jatakarma-childs-sacred-start-2024/
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी https://marathionlinetimes.com/entertainment/dohala-jeevan-a-sacred-ritual-in-marathi/
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण https://marathionlinetimes.com/entertainment/anavalobhan-sanskar-3rd-rites-of-hindu-2024/
पुंसावन संस्कार पवित्र सोहळाhttps://marathionlinetimes.com/punsavan-sanskar-2nd-rite-2024/
हिंदू धर्माचे सोळा संस्कार आपल्या परंपरेचे पाऊल https://marathionlinetimes.com/sixteen-hindu-rites-in-marathi-2024/
Namakaran 6th Hindu Rite 2024:थोडक्यात जाणून घेऊया नामकरण संस्काराबद्दल
अति प्राचीन संस्कृतीत व ग्रंथ पालकांना आपल्या बाळाचे नाव निवडण्यासाठी मार्गदर्शक तत्वे प्रदान करतात. सामान्यतः आपल्या बाळाचे नाव हे दोन किंवा चार अक्षराचे असावे. जे मध्यभागी अर्धस्वर आणि विसर्गाने समाप्त होते असे देखील आपल्या बाळाचे नाव आपण ठेवावे.
- मुलीचे नाव सामान्य अक्षरांच्या संकेत असावे असे देखील सांगितल्या जाते.Namakaran 6th Hindu Rite 2024:त्याचे उच्चारण करणे सोपे जाते यामुळे मुलीचे नाव सामान्य अक्षरांच्या संकेत असावे.
- ते आपण ठेवलेल्या नावाचे नावाचा प्रतिध्वनी आणि उच्चारण करणे सोपे असावे.
- अप्रिय अशोक किंवा सहजपणे वाईट अर्थात रूपांतर होणारे शब्द आपल्या बाळाच्या नामकरण नाव टाळावे.
- ग्रह सूत्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे पसंतीचे नावेही देवी,देवता, चांगले गुण,भाग्यवान, तारे, नक्षत्रे नावाची व्यक्ती यांच्याशी संबंधित असावेत.
- आई वडिलांची जन्म ठिकाण, निसर्गातील झाडे वेली पशुपक्षी प्राणी असे सुंदर घटक नावामध्ये नावानुसार नवजात बालकाचे नामकरण असावे.
- सुंदर घटक राशी नक्षत्र मास कुलदेवता यांच्या नावानुसार देखील आपण आपल्या पाल्याचे पाच नावे ठेवली जातात.
- मुख्यत्वे हा सोहळा म्हणजेच नामकरणनाचा सोहळा हा आपल्या बाळाची आत्या करते.
Namakaran 6th Hindu Rite 2024: कसा असतो नामकरण सोहळा
नामकरण सोहळ्याच्या वेळेस बाळाच्या पाळण्याला फुलाने सजवल्या जाते. तसेच बाळाच्या पाळण्यामध्ये पाच विड्याची (नागवेलीची) आणि व त्यावर थोड्याशा घुगऱ्या ठेवल्या जातात. घुगऱ्या म्हणजे काय हे वाक्य तुम्ही ऐकले असेल
सहसा आपल्या तोंडात येणारा शब्द तू माझ्या घुगऱ्या खाल्ल्या होत्यास का असा देखील बोलला जाणारा वाक्य
Namakaran 6th Hindu Rite 2024: घुगऱ्या म्हणजे ज्वारीचे दाणे किंवा त्याला बऱ्याच भाषांमध्ये दाणे जे (उकडून घेतलेले असतात हळद मीठ टाकून) ते दाणे त्या वेळी नागवेलीच्या पानावर ठेवलेले असतात. कार्यक्रम सुरू होण्याच्या वेळेस घरातील मुले ही पानं घेऊन पळून जातात. त्यानंतर नामकरण सोहळा सुरू होतो. नामकरण सोहळ्याच्या वेळेस वरवंट्याला एखादी बाळाची कोरी टोकरी तसेच ब्लाउज पीस म्हणजे चोळीला जाते त्याला मंगळसूत्र घातल्या जाते असा हा वरवंटा बाळ म्हणून आत्या एकमेकींकडे देतात व
मुलगा असेल तर मुलांची देवाची पाच नावे घेतली जातात, आणि जर मुलगी असेल तर देवीची नावे घेतल्या जातात, जसे की गोविंद घ्या, गोपाळ घ्या, राम घ्या, श्री कृष्ण घ्या, महादेव घ्या असे.
Namakaran 6th Hindu Rite 2024:जर मुलगी मुलीचे नामकरण ठेवायचे असेल तर त्यासाठी लक्ष्मी घ्या, सरस्वती घ्या, पार्वती घ्या, रुक्मिणी घ्या, रेणुका घ्या अशी नावे घेतल्या जातात व तो वरवंटा एकमेकीकडे बाळाच्या पाळण्याच्या खालून आणि वरून घेतल्या जातो. त्यानंतर पाण्यामध्ये गोड बाळाला ठेवल्या जाते. आणि त्याची आत्या नाव ठेवते.आत्या पाच नाव ठेवते त्यातील एक सगळ्यांच्या तोंडी पुढे चालून येते. त्या नाव ठेवायच्या वेळेस आत्या पूर्ण असे करते कुर्र……
असे म्हणते त्यावेळेस लाडाने आत्याच्या पाठीमागे धपाटे देतात. आणि आत्याच्या पाठीवर मानाची साडी ठेवल्या जाते. त्यानंतर बाळाची आई ही पाळण्याला पाठ लावून काही वेळ बसते. व त्यानंतर सर्व बायका मिळून बारशाचे गीत गातात.
Namakaran 6th Hindu Rite 2024: नामकरण
प्रसिद्ध धर्मशास्त्र ‘मनुस्मृति’मध्ये मनु महाराज म्हणतात,
आयुर्वयोऽभिवृद्धिश्च सिद्धिर्व्यवहृतेस्तथा।
नामकर्मफलं त्वतेत् समुद्दिष्टं मनीषिभिः।।
अर्थ : नामकरण संस्कारामुळे आयुष्य आणि तेज यांची वृद्धी होते, तसेच लौकिक व्यवहाराची सिद्धी होते, असे विद्वानांनी सांगितले आहे.
Namakaran 6th Hindu Rite 2024:‘बाळाचा जन्म होऊन १० दिवस झाल्यानंतर ११ व्या दिवशी किंवा १०० व्या दिवशी किंवा १ वर्षानंतर बाळाचे नाव ठेवण्यासाठी ‘नामकरण संस्कार’ समारंभ केला पाहिजे’, असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. या दिवशी आपले गुरुजन, पुरोहित आणि स्वतःचे नातेवाइक यांना निमंत्रित करून हा नामकरण संस्कार करण्याचा समारंभ साजरा केला पाहिजे. या अंतर्गत घराची शुद्धी आणि स्वच्छता करून बाळाच्या आईवडिलांनी आचार्यांच्या मार्गदर्शनानुसार देवतांचे पूजन करावे. काशाच्या ताटात तांदुळ पसरून त्यावर ऐपतीनुसार सोन्याच्या काडीने बाळाचे नाव लिहावे. ब्राह्मणाने बाळाच्या नावाचा उच्चार त्याच्या कानाजवळ करून त्याला दीर्घायुषी होण्याचा आशीर्वाद द्यावा.
Namakaran Ceremony: The 6th Hindu Rite: नाव कसे असायला पाहिजे
याविषयी एक श्लोक ‘पारस्कर गृह्यसूत्र’ या ग्रंथात दिला आहे. तो असा,
द्व्यक्षरं चतुरक्षरं वा घोषवदाद्यन्तरन्तस्थं दीघार्भिनिष्ठानान्तं कृतं कुर्यान्न तद्धितम्।
अयुजाक्षरमाकारान्तं स्त्रियै तद्धितम्।
शर्म ब्राह्मणस्य वर्म क्षत्रियस्य गुप्तेति वैश्यस्य। – पारस्कर गृह्यसूत्र, कारिका १, कण्डिका १७, सूत्र २ ते ४
अर्थ : बालकाचे नाव २ किंवा ४ अक्षरी असावे. त्याच्या आरंभी घोष वर्ण (ग घ ङ, ज झ ञ, ड ढ ण, द ध न, ब भ म, य र ल व ह आणि सर्व स्वर) यांपैकी कोणतेही एक अक्षर असले पाहिजे. नावाच्या अंती दीर्घ वर्ण असावा, ते तद्धित (शब्दांना वत्, इन् आदी वेगवेगळे प्रत्यय लावलेले) नसावे. स्त्रियांचे नाव विषम अक्षरांचे आणि आकारान्त असावे.Namakaran 6th Hindu Rite ब्राह्मण बालकाचे नाव शर्मा, क्षत्रिय बालकाचे नाव वर्मा आणि वैश्य बालकाचे नाव गुप्त या शब्दांनी युक्त असावे.
Namakaran 6th Hindu Rite 2024: वरील श्लोकावरून समजते की, बालकाचे नाव उच्चार करण्यास सोपे असावे, घोष आणि अक्षरे यांचा उच्चार तुलनेत सोपा असतो. यानुसार नाव न ठेवल्याचा अर्थ हा आहे की, बालकाचे नाव धातुपासून विकृत करून बनलेले नसावे, उदा. दयापासून दयाळू, कृपापासून कृपाळू इत्यादी. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे नाव कोमल ध्वनीयुक्त असावे.
त्याच समवेतच स्त्रियांचे नाव नदी, पर्वत, वन किंवा भयंकर जीव-जंतूंवरून नसावे. याचे कारण असे आहे की, नदी किंवा नक्षत्र यांची स्थिती क्षणोक्षणी पालटत रहाते.
पर्वत किंवा वृक्ष आदी कठोर आणि अचल असतात, तर भयंकर जीव-जंतूंवर आधारित नाव ऐकायलाही चांगले वाटत नाहीत अन् ते नाव उत्तम गुणयुक्तही नसते.
Namakaran Ceremony: The 6th Hindu Rite:नावाचे महत्त्व
नावाचे महत्त्व समजूनच गुरु बृहस्पति यांनी म्हटले आहे,
नामखिलस्य व्यवहारहेतुः शुभावहं कर्मसु भाग्यहेतु:।
नाम्नैव कीर्तिं लभते मनुष्यस्ततः प्रशस्तं खलु नामकर्म।।
अर्थ : नाव हे संपूर्ण व्यवहाराचे कारण, कल्याणकारक आणि भाग्यदायक असते. नावामुळेच मनुष्य कीर्ती प्राप्त करतो. त्यामुळे नामकरण एक हे अत्यंत श्रेष्ठ संस्कार आहे.
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
खळखळून हसवणारी नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….