Table of Contents
ToggleNarak Chaturdashi 2024: छोटी दिवाळी
Narak Chaturdashi 2024: वर्षाचा दिवाळीचा सण पाच दिवसाचा असतो,वसुबारस पासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होते त्यानंतर दुसरा सण येतो धनत्रयोदशी. धनत्रयोदशीनंतर येणारा सण पहिले म्हणजेच नरक चतुर्दशी.
आश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्थी साजरी केली जाते त्यामुळे नंतर चतुर्दशीच्या दिवशी असे म्हटले जाते की सूर्योदयाच्या पूर्वी अभ्यंग स्नान करावे नाहीतर अंगावर नर्क पडतो. नर्क पडतो म्हणजे मनुष्यास पुढच्या वर्षभर त्याच्या मागे दरिद्र आणि संकटे येतात. तसेच त्या व्यक्तीची संकटे ही पाठ सोडत नाहीत.
Narak Chaturdashi 2024: नरक चतुर्दशी शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी गुरुवार ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ०१:१५ वाजता सुरू होईल. त्याचवेळी, तो दुसऱ्या दिवशी ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ०३:५२ वाजता संपेल. अशा परिस्थितीत नरक चतुर्दशी ३१ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. तसेच नरक चतुर्दशीच्या संध्याकाळी दिवे दान केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार या प्रसंगी दिवे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
नरक चतुर्दशी म्हणजे अश्विन कृष्ण चतुर्दशी होय. या नरक चतुर्दशी निगडित अनेक कथा आपल्याला पहावयास मिळते,नरकासुराची वधाची कहाणी असुण,नरका सुरू हा एक दृष्ट आणि दमली असा असुर होता.
Narak Chaturdashi 2024:महत्व अभ्यंगस्नानचे
नरक चतुर्दशीला सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल आणि उटणे लावून स्नान करावे. त्यावेळी खालील मंत्र म्हणावा.
‘यमलोकदर्शनाभावकामोऽअभ्यंगस्नान करिष्ये।’
अर्धी आंघोळ झल्यावर आंघोळ करणार्याला औक्षण करावे.
Narak Chaturdashi 2024: हे देखील करावे
या दिवशी गव्हाच्या पिठामध्ये चिमूटभर हळद टाकून, त्याचा एक दिवा तयार करून त्यात तिळाचे तेल टाकून, किंवा जमेल ते तेल टाकून दिव्याच्या कापसाची वात लावून दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर पूर्वेला तोंड करून अक्षता आणि फुलांनी पूजा करावी. त्यासाठी खालील मंत्र बोलून देवालयात दिवा लावा. बऱ्याच ठिकाणी हा दिवस संध्याकाळी लावतात, तर काही ठिकाणी हा दिवा सकाळी लावल्या जातो. तसेच बऱ्याच ठिकाणी नरक चतुर्दशीच्या दिवशी गॅस वर म्हणजेच (आधीच्या काळी चुलीवर) हळद आणि कुंकवाचे स्वस्तिक काढतात.
‘दत्तो दीप: चतुर्दश्यां नरक प्रीतये मया।।
चतु : वर्ती समायु सर्वपापापनुत्तये।।’
Narak Chaturdashi 2024: थोडक्यात माहिती
नरक चतुर्दशीला ग्रामीण संस्कृतीत विशेष महत्त्व दिले जाते. समाजातील अहंकारी, अत्याचारी वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा, यासाठी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. या दिवशी घर परिसराची सफाई केली जाते. आता गावांचा विकास झाला आहे त्यामुळे शेणामातीची घरं फारशी राहीलेली नाहीत.
Narak Chaturdashi 2024: अनेक वर्षांपूर्वी शेणामातीने सारवलेल्या आणि रांगोळ्यांनी सजलेल्या अंगणात या दिवशी सूर्याचे पहिले किरण पडावे, सूर्यप्रकाशाप्रमाणे घर सद्गुणांनी उजळावे यासाठी ग्रामीण भागात पहाटे गाईच्या शेणाने सडा, सारवण केले जाते. गाईगुरांच्या गोठ्यात, शेतात या दिवशी शेतकरी दिवे लावतात. कोणत्याही अस्मानी संकटात शेती धोक्यात येऊ नये, पिकांचे नुकसान होऊ नये, पशुधन सुरक्षित व निरोगी राहावे यासाठी धरणीमाता आणि गोमातेची प्रार्थनाही केली जाते.
Narak Chaturdashi 2024: अभ्यंगस्नान केलं जातं.
नरक चतुर्दशीच्या दिवशी ‘अभ्यंगस्नान’ केलं जातं. दिवाळीचे हे दिवस थंडीचे असतात. थंडीच्या दिवसात शरीराची त्वचा कोरडी पडते. अशावेळी अभ्यंगस्नान केल्यामुळे त्वचा मृदू आणि सतेज होते. तसेच शरीराचे स्नायू बलवान होतात. त्यामुळेच दिवाळीत अभ्यंगस्नान करण्यास सांगितलेले आहे.
या दिवशी अभ्यंगस्नानानंतर यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची प्रथा आहे असेही मानतात. संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट आणि अहंकाराचे उच्चाटन करायचे असते. तेव्हाच आपल्या आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. हा दिवस ‘छोटी दिवाळी’ म्हणून ओळखला जातो.
नरक चतुर्दशीला ग्रामीण संस्कृतीत विशेष महत्त्व दिले जाते. समाजातील अहंकारी, अत्याचारी वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा, यासाठी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. या दिवशी घर परिसराची सफाई केली जाते.
मात्र शेणामातीने सारवलेल्या आणि रांगोळ्यांनी सजलेल्या अंगणात या दिवशी सूर्याचे पहिले किरण पडावे, सूर्यप्रकाशाप्रमाणे घर सद्गुणांनी उजळावे यासाठी ग्रामीण भागात पहाटे गाईच्या शेणाने सडा, सारवण केले जाते. शेतात या दिवशी शेतकरी दिवे लावतात.गाईगुरांच्या गोठ्यात, पशुधन सुरक्षित व निरोगी राहावे यासाठी धरणीमाता आणि गोमातेची प्रार्थनाही केली जाते.
वसुबारस दिवाळीचा शुभारंभhttps://marathionlinetimes.com/entertainment/vasubaras-diwali-2024/
धनत्रयोदशी समृद्धी आणि आरोग्याचा उत्सव https://marathionlinetimes.com/entertainment/dhantrayodashi-festival-2024/
Narak Chaturdashi 2024: कहाणी नरकासुराची
नरकासुराला भूदेवी कडून वैष्णववस्त्र प्राप्त झाले होते,त्यामुळे तो अतिशय बलाढ्य आणि उन्नत झाला होता नरकासुरारा गर्व झाल्याने त्यांनी तिन्ही लोकातील सर्व देवी देवतांना त्रास द्यायला सुरुवात केली. स्वर्गा तील इंद्रदेवाचा ऐरावत त्याने पळाविला होता अनेक राज्याच्या आणि जनतेच्या एकूण १६ सहस्त्र मुली त्याने पळवून आपल्या बंदीवासात ठेवल्या होत्या. नरकासुराच्या अत्याचारामुळे सर्व देवी देवता त्रस्त झाले होते, त्यावेळेस इंद्राने श्रीकृष्णाची प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णाने नरकासुराल वर स्वारी करून त्याचा वध केला.
Narak Chaturdashi 2024: श्रीकृष्ण जेव्हा नरकासुर सोबत युद्ध करावयास गेले त्यावेळेस त्यांच्यासोबत त्यांची तृतीय पत्नी सत्यभामा (सत्यभामा ही श्रीकृष्णाची तृतीय पत्नी असून ती एक भूमीचा अवतार तसेच लक्ष्मीचा देखील एक पैलू असे तिचे वर्णन केल्या जाते, सत्यभामा ही पृथ्वीचा अवतार देखील मानला जाते).ही देखील त्यांच्यासोबत होती.ज्या दिवशी नरकासुराचा वध झाला तो दिवस होता.
अश्विन प्रश्न चतुर्दशीचा, नरकासुराने मृत्यू समय भगवान श्रीकृष्णांकडे वर मागितला आजच्या दिवशी जो अभ्यंग स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये तसेच माझा म्हणजेच नरकासुराचा हा मृत्यू दिन सर्वत्र दिवे लावून साजरा केला जावा यावर भगवान श्रीकृष्णांनी नरकासुरास वर दिला.
म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान केल्या जाते व त्या दिवशी पहाटे व रात्री दीप उत्सव करण्याची प्रथम पडली.
श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्यानंतर त्याच्या बंदीवासात असलेल्या १६ सहस्त्र मुलींना मुक्त केले. पण त्या १६ सहस्त्र मुलींना त्यांच्या घरी पाठवण्यात आले परंतु मुलींच्या माता-पितांना त्यांच्या मुलींना नेण्यासाठी आलेच नाहीत बंदीवासात नरकासुराच्या बंदिवासात आलेल्या मुलींना समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी व त्यांचा उद्धार करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी १६ सहस्त्र मुलींची विवाह केल्याचे जाहीर केले त्यामुळे श्रीकृष्णाला सोळा सहस्त्र पत्नी असल्याचे सांगितले जाते. यामध्ये श्रीकृष्णाने त्या मुलींची उदरनिर्वाहाची सोय केली आणि त्यांना सन्मानपूर्वक समाजात मान सन्मान प्राप्त करून दिला.
Narak Chaturdashi 2024: नरकासुर हा मिळालेल्या वरदान मुळे आणि सत्तेच्या नशीब स्वतःचा पराक्रमात अतुलनीय मानत होता त्याने पृथ्वीवरील सर्व राज्य आपल्या अधिपत्याखाली आणली पुढे स्वर्गलोकाकडे देखील त्याने नजर फिरवली पराक्रमी इंद्र सुद्धा या विष्णुपुत्राच्या तोंड हल्ल्याला हल्ल्यापासून वाचला नाही इंद्र देवाला देखील स्वर्गातून पळून जावे लागले,नरकासुराने स्वर्ग आणि पृथ्वी या दोन्हीचा अधिपती झाला होता पराक्रमाच्या नशेत त्याने स्वर्गीय मात्र देवता अदिती चे कानातले चोरले आणि तिचे काही प्रदेश देखील बळकावले तसेच १६ सहस्त्र बायकांचे अपहरण केले. अशी देखील कथा सांगितल्या जाते.
डोहाळे जेवणातील चोळ्यांचे रंगीबेरंगी विश्वhttps://marathionlinetimes.com/entertainment/dohaljewan-colorful-attires-2024/
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी https://marathionlinetimes.com/entertainment/dohala-jeevan-a-sacred-ritual-in-marathi/
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण https://marathionlinetimes.com/entertainment/anavalobhan-sanskar-3rd-rites-of-hindu-2024/
पुंसावन संस्कार पवित्र सोहळाhttps://marathionlinetimes.com/punsavan-sanskar-2nd-rite-2024/
हिंदू धर्माचे सोळा संस्कार आपल्या परंपरेचे पाऊल https://marathionlinetimes.com/sixteen-hindu-rites-in-marathi-2024/
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
खळखळून हसवणारी नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….