Narasimha Navratri 2025 in Marathi: मानसिक शांतता देणारे आणि संकटे दूर करणारे स्तोत्र! श्री लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्र!

Narasimha Navratri 2025 in Marathi: आद्य शंकराचार्य रचलेले श्री लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्र

Narasimha Navratri 2025 in Marathi: सध्या सुरू असलेल्या नृसिंह नवरात्रीच्या (Narasimha Navratri) पावन पर्वावर,आद्य शंकराचार्य रचित नृसिंह लक्ष्मी स्तोत्र. हे एक अतिशय प्रभावी आणि अद्भुत स्तोत्र आहे. या स्तोत्राचे नियमित वाचन केल्याने भक्तांना जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते, तसेच मानसिक शांती, उत्तम आरोग्य, समृद्धी आणि मोक्ष प्राप्ती होण्याची संधी प्राप्त होते. नरसिंह देवाच्या कृपेने हे स्तोत्र भक्तांच्या आयुष्यात दिव्य प्रकाश पसरवते आणि त्यांच्या आत्म्याला अनमोल आधार देते. या नवरात्रीत या स्तोत्राच्या वाचनाने भक्तांना शांतता आणि समृद्धीचा अद्वितीय अनुभव होतो, ज्यामुळे ते त्यांच्या जीवनातील अंधकाराला दूर करू शकतात.

या स्तोत्राच्या विशेष लाभ 

Benefits Lakshmi Narasimha Karavalamba Stotram

शनिदेवाचा त्रास दूर

Narasimha Navratri 2025 in Marathi: लक्ष्मी नृसिंह देवाची आराधना करणाऱ्यांना शनिदेवाचा त्रास सहन करावा लागत नाही. हे एक महत्त्वाचे वरदान आहे, जे भक्तांना मानसिक शांती प्रदान करते.

संध्याकाळी वाचनाचे महत्त्व

नरसिंह देवाचा अवतार संध्याकाळी झाला असल्याने, लक्ष्मीनृसिंह स्तोत्र तिन्हीसांजेस म्हटल्यास विशेष फल मिळते. यामुळे भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतात.

कष्ट दूर करणे

हे स्तोत्र नियमितपणे वाचन केल्यास, विशेषतः शनिवारी सायंकाळी, भक्तांचे कष्ट दूर होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते.

मोक्ष प्राप्ती

या स्तोत्राच्या पठणाने सर्व दु:ख, अनारोग्य, पापे नष्ट होऊन मोक्ष प्राप्ती होण्याची करुणा होते. हे भक्तांच्या आत्मिक उन्नतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

शांतता आणि संरक्षण

हे स्तोत्र वाचन केल्याने भक्तांना मानसिक शांतता आणि जीवनातील संकटांपासून संरक्षण मिळते.

या स्तोत्राची कथा

Story Lakshmi Narasimha Karavalamba Stotram

Narasimha Navratri 2025 in Marathi: एकदा श्रीशंकर श्रीशैलम येथे निवास करत होते. त्यावेळी कापालिक नावाचा एक संन्यासी शंकराकडे येऊन सांगतो की, त्याला स्वत:च्या पूजेसाठी एका संन्यासाचा बली द्यायचा आहे. कारुण्यमूर्ती श्री शंकर त्याला लगेच संमती देतात.

गुरुंचा परम शिष्य पद्मराज, नरसिंह देवाची प्रार्थना करून, नरसिंह देवाला आपल्या शरीरात प्रवेश करण्याचे आवाहन करतो. क्रोधपूर्ण आवेशात, पद्मराज त्या कापालिकाचा बली देतो. श्री पद्मराजाच्या अंगी झालेला नरसिंहाचा अविर्भाव शांत करण्यासाठी श्री शंकर त्याक्षणी १७ चरणांचे हे स्तोत्र रचतात, ज्याला श्री लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्र असे नाव दिले जाते.

Narasimha Navratri 2025 in Marathi: मानसिक शांतता देणारे आणि संकटे दूर करणारे स्तोत्र! श्री लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्र!

 बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

IHMCL मध्ये अभियांत्रिकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! लाखांहून अधिक वेतन मिळवा!

स्तोत्राचे महत्त्व

Narasimha Navratri 2025 in Marathi: हे स्तोत्र परमात्म्याच्या करावर अवलंबून राहून भवसागर तरून जाण्यासाठी रक्षणाची प्रार्थना करते. या श्लोकाच्या पठणाने भक्तांच्या जीवनातील सर्व कष्ट, दु:ख, अनारोग्य आणि पापे नष्ट होतात. हे स्तोत्र प्रात:काळी तसेच संध्याकाळी पठण केल्यास उत्तम फल मिळते.

स्तोत्राचे वाचन

Narasimha Navratri 2025 in Marathi:संध्याकाळी वाचन,विशेषतः संध्याकाळी हे स्तोत्र वाचन केल्यास अधिक लाभ मिळतो,नियमित वाचन,नियमितपणे हे स्तोत्र वाचन केल्यास भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो.

स्तोत्रातील काही महत्त्वाचे श्लोक

Lakshmi Narasimha Karavalamba Stotram important sholak

श्री मत्पयोनिधिनेकेतन चक्रपाणी – या श्लोकात भगवान विष्णूच्या स्वरूपाची महिमा केली आहे.

संसारदावदहनाकरभिकरोरुज्वा – या श्लोकात संसारातील दु:ख आणि संकटांपासून मुक्तीची प्रार्थना केली आहे.

प्रल्हादखेदपरिहारपरावतार – या श्लोकात भक्त प्रल्हादाच्या दुःखांपासून मुक्तीची प्रार्थना करतो.

श्री लक्ष्मीनृसिंह करावलंब स्तोत्र। 

Lakshmi Narasimha Karavalamba Stotram

श्री मत्पयोनिधिनेकेतन चक्रपाणी । भोगिंद्रभोगमणेराजित पूण्यमूर्ती ।

योगिश शाश्वत शरण्य भवाब्धिपोत लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १ ।।
ब्रम्हेंद्ररुद्रमरुदर्ककिरिटकोटि संघ-  टितांघ्रिकमलामलकांतिकांत।
लक्ष्मीलसत्कूचसरोरुहराजहंस लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। २ ।।
संसारदावदहनाकरभिकरोरुज्वा- लावळीभिरतीदग्धतनुरुहस्य ।
त्वत्पादपद्मसरसिरुहमागतस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ३ ।।
संसारजालपतिततस्य जगन्निवास सर्वेंद्रियार्थ बडिशाग्र झशोपमस्य ।
प्रोत्कंपित प्रचुरतालुकमस्तकस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ४ ।।
संसारकुपतिघोरमगाधमुलं संप्रास्य दु:खशतसर्पसमाकुलस्य ।
दीनस्य देव कृपणापदमागतस्य । लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ५ ।।
संसारभिकरकरींद्रहराभिघात निष्पिड्यमानवपूष: सकलार्तिनाश ।
प्राणप्रयाणभवभीतीसमाकुलस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ६ ।।
संसारसर्पविषदिग्धमहोग्रतीव्र दंष्ट्राग्रकोटिपरिदष्टविनष्टमूर्ते: ।
नागारिवाहन सुधाब्धिनिवास शौरे लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ७ ।।
संसारवृक्षबिजमनंतकर्मा- शाखा यातं करणपत्रमनंगपुष्पम ।
आरुह्य दु:खफलित: चकित: दयालो लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ८ ।।
संसारसागरविशालकराळकाळ नक्रग्रहग्रसितनिग्रहविग्रहस्य ।
व्यग्रस्य रागनिचयोर्मिनिपिडितस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ९ ।।
संसारसागरनिमज्जनमुह्यमानं दीनं विलोकय विभो करुणानिधे माम ।
प्रल्हादखेदपरिहारपरावतार लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १० ।।
संसारघोरगहने चरतो मुरारे मारोग्रभीकरमृगप्रचुरार्दितस्य ।
आर्तस्य मत्सरनिदाघ्रसुदु:खितस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। ११ ।।
बध्पदागले यमभटा बहु तर्जनीयंत कर्षंती यत्र भवपाशशक्तैर्यातं माम  ।
ऐकाकीनं परवशं चकितं दयालो लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १२ ।।
लक्ष्मीपते कमलनाभ सुरेश विष्णो  यज्ञेश यज्ञ मधुसुदन विश्वरुप ।
ब्रम्हण्य केशव जनार्दन वासुदेव लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १३ ।।
एकेन चक्रमपरेण करेण शंख- मन्येन सिंधुतनयामवलंब्य तिष्ठन ।
वामेतरेण वरदाभयपद्म चिन्हं लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १४ ।।
अंधस्य मे हृतविवेकमहाधनस्य चोरैर्माहाबलिभिरिंद्रियनामधेय्यो: ।
मोहांधकारकुहरे विनिपातितस्य लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १५ ।।
प्रल्हादनारदपराशरपुंडरिकव्यासा-दिभागवतपुंगवहृन्मिवास ।
भक्तानुरक्तपरिपालनपारिजात लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंबम ।। १६ ।।
लक्ष्मीनृसिंह चरणाब्जमधुव्रतेन स्तोत्रं कृतं शुभकरं भूवि शंकरेण । 
यो तत्पठंति मनुजा हरिभक्तियुक्ता-स्तेयांति तत्पदसरोजमखंडरुपम ।। १७ ।।

Narasimha Navratri 2025 in Marathi: “स्मार्ट मीटरमुळे लाईट बिल वाढणार का?”

 “साडेतीन मुहूर्तापैकी शुभमुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया”

“तुम्हाला एक्स्ट्रा सोलर पंप लावायचा आहे का?

 उद्योगाचं स्वप्न? सरकार देणार ५० लाखांपर्यंत मदत!

Narasimha Navratri 2025 in Marathi: उद्योगाचं स्वप्न? सरकार देणार ५० लाखांपर्यंत मदत!

रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ

आता कुणाचं रेशन कार्ड  होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?

Loading