Navratri 2025 Naivedya List; जाणून घेऊया, कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य देवीला दाखवावा..
Navratri 2025 Naivedya List; नवरात्र म्हटलं की देवीची आराधना, आरती आणि त्याचबरोबर मुख्यत्वे दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्य. नवरात्रीत प्रत्येक दिवसासाठी खास अर्पण करण्यात येणारा नैवेद्य हे सर्व भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या नऊ दिवसांच्या उत्सवात, प्रत्येक रूपाला वेगळा नैवेद्य अर्पण (Navratri 2025 Naivedya List) करण्याची परंपरा आहे. देवीला अर्पण केलेला प्रसाद हे केवळ भोजन नसून, भक्ती, श्रद्धा आणि प्रेमाचा सुंदर गंध असतो.
सुख, स्वास्थ्य आणि उत्तम आरोग्यासाठी भक्तांनी प्रत्येक दिवशी हा नैवेद्य अर्पण करावा, असा भाव या पवित्र नवरात्रीत जागृत होतो.
नवरात्रातील ९ दिवसाचे ९ नैवेद्य
Naivedya List
१) नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचे प्रथम रुप माता शैलपुत्रीचे पुजन केले जाते. यादिवशी देवीला गायीचे शुद्ध तुप अर्पण केले जाते. यामुळे उपवास करणारा निरोगी राहतो.
२)त्यानंतर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पुजा केली जाते. मात ब्रह्मचारिणीला प्रसन्न करण्यासाठी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. यामुळे घरातील सदस्याचे आयुष्य वाढते असे म्हटले जाते.
३) नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची पुजा केली जाते. यादिवशी देवी दुध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवला जातो. यामुळे दुःखपासून मुक्ती मिळते आणि आनंदाची प्राप्ती होते.
४) चौथ्या दिवशी माता कुष्माण्डाची पुजा केली जाते. यादिवशी देवीला मालपोह्याचा नैवेद्य दाखवला जातो. यामुळे उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या बुद्धीचा विकार होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढते.
५) नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता स्कंदमातेची पुजा-अर्जा केली जाते. यादिवशी देवीला केळ्याचा नैवेद्य दाखवला जातो. यामुळे शरीर स्वस्थ राहते.
नवरात्र स्पेशल देवी आरती संग्रह
६) नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या सहाव्या रुपाची म्हणजे कात्यायनी मातेची पुजा केली जाते. देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो. यामुळे उपवास करणाऱ्याची कांती तेजोमय होते.
७) सप्तमी दिवशी माता कालरात्रीची पुजा केली जाते. यादिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवून एक नैवेद्याचे ताट जेवासहित ब्राम्हणाला दान करावे. यामुळे उपवास करणाऱ्यावर येणार संकट दूर होते.
८) अष्टमी दिवशी देवीच्या महागौरी रुपाची पुजा केली जाते. यादिवशी देवीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो.
९) नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीला देवीच्या सिद्धिदात्रीची पुजा केली जाते. यादिवशी देवीला तिळाचा नैवेद्य दाखवावा. हा उपवास केल्या व्यक्तीला मृत्यूचे भय राहत नाही असे म्हटले जाते.
जाणून घ्या आदिशक्तीच्या प्रत्येक रूपाचे रहस्य!
या नऊ दिवसांमध्ये नऊ नैवेद्य देवीला अर्पण करून आपण तिची कृपा आणि आनंदी आयुष्य निश्चितच मिळवू शकतो. ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर आपल्या मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या पारंपारिक भक्तीचा लाभ मिळू शकेल.
१ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून
आता पोरांची बारी! जेमिनी एआयवर रेट्रो लुकमध्ये फोटो करणार, हा नवीन ट्रेंड सुरू आहे!
“घरबसल्या काढा रेशन कार्ड,फॉलो करा या सोप्या स्टेप्स”
शून्य खर्चात करा पत्नीच्या नावे शेतजमीन – लक्ष्मी मुक्ती योजनेचा लाभ घ्या!
![]()


