Navratri Aarti Sagrah 2024:नवरात्रीसाठी देवीच्या आरत्यांचा संग्रह

Navratri Aarti Sagrah 2024:

Navratri Aarti Sagrah 2024:महत्त्वाच्या आरत्या

Navratri Aarti Sagrah 2024: आपल्या सणांमध्ये आरत्या ना ही अन्यसाधारण महत्त्व असून, अतिशय उत्साहाने आणि लयबद्ध अशा आरत्या घरोघरी म्हणल्या जातात.महाराष्ट्रात बहुतांश घरी आरती म्हणतांना टाळ, मृदंग याचा देखील वापर करतात. अतिशय लयबद्ध अशा टाळीच्या स्वरात आरती ही ऐकायला आणि म्हणायला देखील छान वाटते. आरती म्हणताना अतिशय प्रसन्नता वाटते.

Navratri Aarti Sagrah 2024:

Navratri Aarti Sagrah 2024:गणपती आरती

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाचीसुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥०१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥०२॥

लंबोदर पितांबर फनी वरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥०३॥

Navratri Aarti Sagrah 2024:दुर्गे दुर्घट भारी

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥

Navratri Aarti Sagrah 2024:आरती नवरात्रीची

अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो। प्रतिपदेपासुनी घट स्थापना करूनी हो । मूळ मंत्र जप करूनी भोवती रक्षक ठेवुनी हो। ब्रह्मा, विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो । उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो। उदो कारे गर्जती काय महिमा वर्ण तिचा हो ।। ध्रु.।।

द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो । सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो । कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरूनी हो। उदो कारे गर्जती सकळा चामुंडा मिळुनी हो ।। उदो बोला उदो. ।।१।।

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडला हो। मळवट, पातळ, चोळी, कंठीहार मुक्ताफळा हो। कंठीची पदके कासे पितांबर पिवळा हो। अष्टभुजा मिरविता अंबे सुंदर दिसे कळा हो ।। उदो बोला उदो. ।।२।।

चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो । उपासका पाहसी अंबा प्रसन्न अंतःकरणी हो। पूर्णकृपे पाहसी जगन्माते मनमोहिनी हो । भक्ताची माऊली भक्त घेती लोटांगणी हो ।। उदो बोला उदो. ।।३।।

पंचमीचे दिवशी व्रत उपांग ललिता हो। अर्घ्य पाद्य पूजने तुजला भवानी स्तविती हो । रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो। आनंदे प्रेम ते आले सद्भावे क्रीडता हो ।। उदो बोला उदो. ।।४।।

षष्ठीचे दिवशी भक्त आनंदे वर्तला हो। घेऊनी दिवट्या हस्ते हर्षे गोंधळ घातला हो । कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो। जोगवा मागता प्रसन्न झाली भक्तकुळा हो ।। उदो बोला उदो. ।।५।।

सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो । तेथे तू राहसी भोवती पुष्पे नानापरी हो। जाई, जुई, शेवंती पूजा रेखियली बरंवी हो। भक्त संकटी पडता झेलुनी घेशी वरचेवरी हो ।। उदो बोला उदो. ।।६।।

अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो । सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगत्जननी हो। मन माझे मोहिले शरण आलो तुजलागुनी हो। स्तनपान देऊनी सुखी केले अंतःकरणी हो ।। उदो बोला उदो. ।।७।।

नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो। सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करूनी हो । षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो। आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करूनी हो ।। उदो बोला उदो. ।।८।।

दशमीचे दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो । सिंहारूढ करी शस्त्रे सबळ ती घेऊनी हो। शुंभनिशुंभादिक राक्षस सर्वही मारूनी रणी हो। विप्रा रामदासा आश्रय दिधला निजचरणी हो ।। उदो बोला उदो. ।।९।।

Navratri Aarti Sagrah 2024:

Navratri Aarti Sagrah 2024: महालक्ष्मीची आरती

जय जय नदीपती प्रिय तनये । भवानी महालक्ष्मी माये ।।धृ।। आदि क्षीरसागर रहिवास जय जय कोल्हापूरवासी । अंबे भुवनत्रयी भ्रमसी । सदानिज वैकुंठ वससी । दुर्लभ द अमरासी । पावसी कशी मग इतरांसी। करुणालये मोक्षदायी। भक्त जे परम । जाण वरम । सदा पदी नरम । कृपेने त्यासी सद्धपाये । संकटी रक्षिसी लवलाहे ।। जय ।।१।।

अमरेश्वर विधी हरिहर । मिळाले असुराचे भार। मंदराचल नग रवि थोर । वे वासुकीचा दोर । ढवळिला सागर गरागर । रगडिले जलचर मीन मगर । लाजती व कामपोटी । तुझे सौंदर्य गळाले धैर्य । म्हणती सुर आर्य । जाळतो रतिपती सोसून होता जन्म तुझा सुनये ।। जय जय ।।२।।

त्रिभुवन स्वरूपे तू आगळी । वरीलासी वनमाळी । तुजसम न मिळे स्पर्शही पदकमळी । पदरज लागी तरी भाळी । पि शोभतसे पिवळा । वहा जरतार हरी भरतार । तरी तज तार । स्तविता तुज जरी गुण दशरात वदनाही भ्रमये ।। जय जय ।।३।।

सनकादिक ब्रह्मज्ञानी । ध्याती चरण ध्यानी । दृढासन घालुनी निर्वाणी। बैसले महामुनी तपी ध्यानी। तरी मी मंदबुद्धी ज तुझे गुण वर्णं कसे वदनी । जरी हा विष्णुदास तुझा । बहू अपात्र । करी सुपात्र तिळमात्र । करोनी मोक्षपदी वाहे । अंबे लवकर वर दे यें ।। जय जय ।।४।।

Navratri Aarti Sagrah 2024:

Navratri Aarti Sagrah 2024: रेणुकामातेची आरती

लोलो लागला अंबेचा भेदाभेद कैचा। आला कंटाळा विषयाचा, धंदा मूळ मायेचा ।। धृ।। प्रपंच खोटा हा मृगपाणी, घोरे फिरतो प्राणी । कन्या सुत-दारा, धन माझे मिथ्या वदतो वाणी । अंती नेतील हे यमदूत, न ये संगे कोणी । निर्गुण रेणुका कुलदेवी, जपतो मी निर्वाणी ।। लोलो लागला ।।१।।

पंचभूतांचा अधिकार, केलासे सत्वर । नयनी देखिला आकार, अवघा तो ईश्वर । नाही सुख-दुःख, देहाला कैचा अहंकार । पाहे परमात्मा तो, ध्यानी भासे शून्याकार ।। लोलो लागला ।।२।।

ध्याता मुद्रा ही उन्मनी, लागे अनुसंधानी । निद्रा लागली अभिध्यानी, जे कां निरंजनी । लीला वर्णिता स्वरूपाची, शिणली शेष वाणी । देखिली भवानी जननी, त्र्यैलोक्यपावनी ।। लोलो लागला ।।३।। गोंधळ घालीन मी अंबेचा घोष अनुहाताचा, दिवट्या उजळुनिया

सदोदित पोत चैतन्याचा । आहं सोहं से, उदो उदो बोलती चारी वाचा ।। लोलो लागला ।।४।। पाहता मूळ पीठ, पर्वत सकळामध्ये श्रेष्ठ । जेथे जगदंबा अवधूत, दोघे भोपी भट । जेथे मोवाळे विंजाळे, प्रणिता पाणी लोट । तेथे तानाजी देशमुख, झाला ब्रह्मनिष्ठ ।। लोलो लागला ।।५।।

Navratri Aarti Sagrah 2024: जय जय जगदंबे । श्री अंबे । रेणुके कल्पकदम्बे ।

जय जय जगदंबे । श्री अंबे । रेणुके कल्पकदम्बे ।। धृ.।। अनुपम स्वरूपाची, तुझी घाटी। अन्य नसे या सृष्टी । तुजसम रूप दुसरे, परमेष्टी । करिता झालो कष्टी । शशिरस रसरसला, वदनपुटी । दिव्य सुलोचन दृष्टी। सुवर्ण रत्नांच्या शिरी मुकुटी । लोपती रवि शशि कोटी । गजमुखी तुज स्तविले, हेरम्बे । मंगल सकळारंभे ।। जय जय ।।१।।

कुंकुमचिरी शोभे मळवटी । कस्तुरी टिळक लल्लाटी । नासिक अति सरळ, हनुवटी । रूचिरामृतरस ओठी । समान जणु लवल्या, धनुकोटी । आकर्ण लोचन भ्रुकुटी । शिरी नीट भांग बळी, उफराटी कर्नाटकची घाटी। भुजंग निळरंगा, परी शोभे । वेणी पाठीवरी लोंबे ।। जय जय ।।२।।

कंकणे कनकाची मनगटी। दिव्य मुद्या दश बोटी। बाजूबंद नगे, बाहुवटी । चर्चुनी केशर उटी। सुगंध पुष्पांचे, हार कंठी। बहु मोत्यांची दाटी। अंगी नवी चोळी, जरी काठी पीत पितांबर तगटी। पैंजण पदकमळी, अति शोभे । भ्रमर धावती लोभे ।। जय जय ।।३।।

साक्षप तू क्षितीच्या, तळवटी । तूच स्वये जगजेठी । ओवाळीन आरती, दीपताटी। घेऊनी कर संपुष्टी। करुणामृतहृदये, संकटी। धावसी भक्तांसाठी । विष्णुदास सदा, बहुकष्टी । देशील जरी निजभेटी । तरी मग काय उणे, या लाभे । धाव पाव अविलंबे ।। जय जय ।। ४।।

Navratri Aarti Sagrah 2024: काशी आमुची रेणुका

काशी आमुची रेणुका मूळ पीठ नायिका। जे जे कल्पिले ते देसी इच्छा पुरवीसी । म्हणून प्रार्थना अंबेसी पावे मज दीनासी ।। काशी ।। धृ.।। अणिमा महिमा गरिना बाला बगला श्यामा । सीता सावित्री ही उमा हीच आमुची यमा। ऐसे करुणेचे उत्तर मातापूर सुंदर ।। काशी ।।१।।

पायी पैंजण वाजती कानी बाळ्या शोभती । माथी बिंदल्या झळकती त्याची प्रभा फाकती। कुंकूम लाविले लल्लाटी हार शोभतो कंठी ।। काशी ।।२।।

अंबा नाव तुझे चांगले मन माझे रंगले । अंबाबाई नाव तुझे भवानी पावे मज निर्वाणी । देशमुख तानाजी चरणी राही निरंतर ।। काशी ।।३।।

Navratri Aarti Sagrah 2024: जय जय जगदंबे रेणुका आई

जय जय जगदंबे रेणुका आई तुझ्याच चरणी ठाव देई ।। धृ.।। माहूर गडावर मुख्य ठिकाण भारताचे ते आहे भूषण । अल्पमतीने करिते वर्णन ज्ञान, बुध्दी, शक्ती मला देग आई।। जय जय…. ।।१।।

मातृतीर्थावर स्नान करिते तुझे नाव घेता गड हा चढते। तुझीच पाहता मंगलमूर्ती धन्य धन्य धन्य परशुरामाची आई ।। जय जय…. ।।२।। दुसऱ्या गडावर श्री. दत्त स्थान अत्री अनसूया किती भाग्यवान। मन हे पाहता होते तल्लीन उदो उदो जयजयकार तुझा ग होई ।। जय जय…. ।।३।।

तिसऱ्या गडावर अनसूया आई साधू संत, देव ऋषी दर्शनास येई। तिन्ही गडांचे वैभव पाही अष्टमीचा खेळ खेळी रेणुका आई।। जय जय…. ।।४।।

हळद, कुंकू मळवट भरिती हिरवा चुडा खुलला हाती। कित्येक भगिनी ओट्या भरिती आशीर्वाद मला तू दे गा आई।। जय जय…. ।।५।।

Navratri Aarti Sagrah 2024: कर्पूर आरती

आरतीच्या ताटात १ कापराची वडी टाकून ती पेटवून खालील आरती म्हणत ओवाळावी.

कर्पूरगौरं करुणावतारं । संसारसारं भुजगेंद्रहारम्। सदा वसन्तं हृदयारविंदे । भवं भवानी सहितं नमामि ।। मांदारमाला कृतांत काय । कृपालमाला इतिशेश्वराय । दिगंबरायच दिगंबरायच, नमः शिवायच् नमः शिवाय ।।

मंत्र पुष्पांजली

मंत्र पुष्पांजलीत प्रार्थना आहे. ती झाल्यावर देवांवर अक्षता व फुले वाहावीत.

ॐ यज्ञेन यज्ञमयजंय देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । ते ह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्या संति देवाः । ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामान्कामकामाय मह्यं । कामेश्वरो वैश्रवणो दधातु । कुबेराय वैश्रवणाय । महाराजाय नमः

। ॐ स्वस्ति । साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्य राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी स्यात्सार्वभौमः सार्वायुष आंतादापरार्धात् पृथिव्यैसमुद्रपर्यंताया एकराळिति । तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरूतः परिवेष्टारो मरूत्तस्यावसन्गृहे । आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ।

नमः सर्वहितार्थाय जगदाधारहेतवे । साष्टांगोऽयं प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः ।।

Navratri Aarti Sagrah 2024:अर्थ :- सर्वांचा जो आधार आहे त्या शाश्वत देवीला माझा नमस्कार असो.

Navratri Aarti Sagrah 2024: करून घेऊया देवीच्या नऊ रंगांची व रूपांची ओळख! https://marathionlinetimes.com/nav-duraga-the-secert-9-goddess-2024/

परशुराम महामंडळाला मिळाली मंजुरी https://marathionlinetimes.com/parshuram-mahamandal-arthik-vikasachi-navi-disha-2024/

तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/

भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/

कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/

शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी

Navratri Aarti Sagrah 2024: प्रार्थना

घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रूप तुझें । प्रेमें आलिंगिन, आनंदें पूजिन, भावें ओवाळीन म्हणे नामा ।।१।। त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव ।।२।। कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुध्दयात्मना वा प्रकृती स्वभावात् । करोमी यघत्सकलं परस्मै, नारायणा येती समर्पयामी ।।३।। अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् । श्रीधरं माघवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्र भजे ।।४।। हरे

राम हरे राम राम राम हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।

Navratri Aarti Sagrah 2024: अंबेची प्रार्थना

अंबे एक करी उदास न करी, भक्तास हाती घरी।

विघ्ने दूर करी, स्वधर्म उद्धरी दारिद्र्य माझे हरी। चित्ती मूर्ती बरी, वराऽभयकरी, ध्यातो तुला अंतरी।

वाचा शुद्ध करी, विलंब न करी, पावे त्वरे सुंदरी ।।१।।

माते एकवीरे वराऽ भयकरे, दे तु दया सागरे। माझा हेतू पुरे मनात न उरे, संदेह माझा हरे ।।

जेणे पाप सरे, कुबुद्धी विसरे, ब्रह्मक्य-धिसंचरे । देही पूर्णकरे भवाम्बुद्धी तरे ऐसे करावे त्वरे ।।२। |

अनाथास अंबे नको विसरू वो। भवसागरी सांग कैसा तरू वो ।।

अन्याय मी हे तुझे लेकरू वो। नको रेणुके दैन्य माझे करू वो ।।३।।

मुक्ताफले कुंकुम पाटलांगी। संदेह तारा न करे विभूती ।। श्री मूलपीठाचलचुबिंकाया । तामेकवीवा शरणं प्रपद्ये ।।४।।

सखे दुःखिताला नको दुखवू वो । दीना बालकाला नको मोकलू वो ।। ब्रीदा रक्षी तू आपल्या श्री भवानी।

ही प्रार्थना ऐकुनी कैवल्य दानी ।।५।।

Navratri Aarti Sagrah 2024:

Navratri Aarti Sagrah 2024: श्री रेणुका अष्टक

प्रचंड ऊर्जा देणारे अष्टक

लक्ष-कोटी चंडकीर्ण सुप्रचंड विलपती । अंबचंद्रवदनबिंब दिप्तिमाजि लोपती । सिंहशिखर अचलवासि मूळपिठनायका। धर्मअर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ।।१।।

आकर्ण अरुणवर्ण नेत्र श्रवणी दिव्य कुंडले। डोलताति पुष्पहार भार फार दाटले । अष्टदंडि बाजुबंदि, कंकणादि मुद्रिका। धर्मअर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ।।२।।

इंद्रनिळ, पद्मराग, पाच हीर वेगळा । पायघोळ बोरमाळ, चंद्रहार वेगळा । पैंजनादि भूषनेची लोपल्याति पादुका। धर्मअर्थ काम मोक्ष कल्पवृक्षरेणुका ।।३।।

इंद्र, चंद्र, विष्णु, ब्रह्म, नारदादि वंदिती । आदि अंत ठावहीन आदि शक्ति भगवती । प्रचंड चंड मुंड खंड विखंडकारि अंबिका। धर्मअर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ।।४।।

पर्वताग्रवासी पक्षि ‘अंब अंब’ बोलती। विशाल शालवृक्ष रानि भवानि ध्यानि डोलति । अवतार कृत्यसार जड मुढादी तारका। धर्मअर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ।।५।।

अनंत ब्रह्मांड कोटी पूर्व मुखा बैसलि। अनंत गुण अनंत शक्ति विश्वजननि भासलि । सव्यभागि दत्त, अत्रि, वामभागि कालिका । धर्मअर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ।।६।।

पवित्र मातृक्षेत्र धन्य वास पुण्य आश्रमी। अंब दर्शनासी भक्त अभक्त येती आश्रमी। म्हणूनि विष्णुदास निज लाभ पावला फुका। धर्म अर्थ, काम, मोक्ष कल्पवृक्ष ।।७।।

Navratri Aarti Sagrah 2024: प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/

पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/

फ्री लॅपटॉप योजनेची https://marathionlinetimes.com/free-laptop-yojana-2024/

तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?

Navratri Aarti Sagrah 2024:मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-ladaki-bahan-yojana-2024/

मुख्यमंत्री योजना दूत 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-yojana-doot-bharti-2024/ 

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/

मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!

Navratri Aarti Sagrah 2024:सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/

केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram