Navratri Special Marathi Aarti 2025: नवरात्रीच्या सर्व आरती एकाच ठिकाणी
Navratri Special Marathi Aarti 2025: नमस्कार, नवरात्रात घरातल्या जुन्या पुस्तकातल्या आरत्या शोधूनही सापडत नसतील, तर हा लेख आपल्या भक्तीसाठी खास आहे. कारण नवरात्राच्या उत्सवात जी विविध देवींच्या आरत्या भक्तगायनातून तल्लीन होऊन म्हटल्या जातात, त्या सर्व तुमच्यासाठी एकाच ठिकाणी सादर करण्यात आल्या आहेत. फक्त आरती म्हणणे म्हणजे एक परंपरा नव्हे, तर त्यात भक्तीभाव, प्रेम, श्रद्धा आणि सौंदर्य यांचा संगम असतो.
Navratri Special Marathi Aarti 2025: आजच्या या लेखात आपण नवरात्रात विशेषतः गाजलेल्या विविध आरत्या, मंगल प्रार्थना आणि पारंपारिक गजर एकत्रितपणे अनुभवणार आहोत. देवीच्या चरणी मनःशांती आणि आनंद मिळावा, कुटुंबात समृद्धी यावी, या भावनेने भक्तीची ही आराधना तुम्हाला नवचैतन्य देईल.
Navratri Special Marathi Aarti 2025: चला तर मग, नवरात्री स्पेशल म्हटल्या जाणाऱ्या विविध आरत्या, प्रार्थना आणि गजर एकत्र पाहूया आणि आपल्या भक्ती अनुभवाला नवीन उंची मिळवूया!
जाणून घ्या आदिशक्तीच्या प्रत्येक रूपाचे रहस्य!
गणपती आरती
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाचीसुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥०१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥०२॥
लंबोदर पितांबर फनी वरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥०३॥
दुर्गे दुर्घट भारी
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥
आरती नवरात्रीची-अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो
अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो। प्रतिपदेपासुनी घट स्थापना करूनी हो । मूळ मंत्र जप करूनी भोवती रक्षक ठेवुनी हो। ब्रह्मा, विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो । उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो। उदो कारे गर्जती काय महिमा वर्ण तिचा हो ।। ध्रु.।।
द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो । सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो । कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरूनी हो। उदो कारे गर्जती सकळा चामुंडा मिळुनी हो ।। उदो बोला उदो. ।।१।।
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडला हो। मळवट, पातळ, चोळी, कंठीहार मुक्ताफळा हो। कंठीची पदके कासे पितांबर पिवळा हो। अष्टभुजा मिरविता अंबे सुंदर दिसे कळा हो ।। उदो बोला उदो. ।।२।।
चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो । उपासका पाहसी अंबा प्रसन्न अंतःकरणी हो। पूर्णकृपे पाहसी जगन्माते मनमोहिनी हो । भक्ताची माऊली भक्त घेती लोटांगणी हो ।। उदो बोला उदो. ।।३।।
पंचमीचे दिवशी व्रत उपांग ललिता हो। अर्घ्य पाद्य पूजने तुजला भवानी स्तविती हो । रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो। आनंदे प्रेम ते आले सद्भावे क्रीडता हो ।। उदो बोला उदो. ।।४।।
षष्ठीचे दिवशी भक्त आनंदे वर्तला हो। घेऊनी दिवट्या हस्ते हर्षे गोंधळ घातला हो । कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो। जोगवा मागता प्रसन्न झाली भक्तकुळा हो ।। उदो बोला उदो. ।।५।।
सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो । तेथे तू राहसी भोवती पुष्पे नानापरी हो। जाई, जुई, शेवंती पूजा रेखियली बरंवी हो। भक्त संकटी पडता झेलुनी घेशी वरचेवरी हो ।। उदो बोला उदो. ।।६।।
अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो । सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगत्जननी हो। मन माझे मोहिले शरण आलो तुजलागुनी हो। स्तनपान देऊनी सुखी केले अंतःकरणी हो ।। उदो बोला उदो. ।।७।।
नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो। सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करूनी हो । षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो। आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करूनी हो ।। उदो बोला उदो. ।।८।।
दशमीचे दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो । सिंहारूढ करी शस्त्रे सबळ ती घेऊनी हो। शुंभनिशुंभादिक राक्षस सर्वही मारूनी रणी हो। विप्रा रामदासा आश्रय दिधला निजचरणी हो ।। उदो बोला उदो. ।।९।।
महालक्ष्मीची आरती- जय जय नदीपती प्रिय तनये
जय जय नदीपती प्रिय तनये । भवानी महालक्ष्मी माये ।।धृ।। आदि क्षीरसागर रहिवास जय जय कोल्हापूरवासी । अंबे भुवनत्रयी भ्रमसी । सदानिज वैकुंठ वससी । दुर्लभ द अमरासी । पावसी कशी मग इतरांसी। करुणालये मोक्षदायी। भक्त जे परम । जाण वरम । सदा पदी नरम । कृपेने त्यासी सद्धपाये । संकटी रक्षिसी लवलाहे ।। जय ।।१।।
अमरेश्वर विधी हरिहर । मिळाले असुराचे भार। मंदराचल नग रवि थोर । वे वासुकीचा दोर । ढवळिला सागर गरागर । रगडिले जलचर मीन मगर । लाजती व कामपोटी । तुझे सौंदर्य गळाले धैर्य । म्हणती सुर आर्य । जाळतो रतिपती सोसून होता जन्म तुझा सुनये ।। जय जय ।।२।।
त्रिभुवन स्वरूपे तू आगळी । वरीलासी वनमाळी । तुजसम न मिळे स्पर्शही पदकमळी । पदरज लागी तरी भाळी । पि शोभतसे पिवळा । वहा जरतार हरी भरतार । तरी तज तार । स्तविता तुज जरी गुण दशरात वदनाही भ्रमये ।। जय जय ।।३।।
सनकादिक ब्रह्मज्ञानी । ध्याती चरण ध्यानी । दृढासन घालुनी निर्वाणी। बैसले महामुनी तपी ध्यानी। तरी मी मंदबुद्धी ज तुझे गुण वर्णं कसे वदनी । जरी हा विष्णुदास तुझा । बहू अपात्र । करी सुपात्र तिळमात्र । करोनी मोक्षपदी वाहे । अंबे लवकर वर दे यें ।। जय जय ।।४।।
रेणुकामातेची आरती- लोलो लागला अंबेचा
लोलो लागला अंबेचा भेदाभेद कैचा। आला कंटाळा विषयाचा, धंदा मूळ मायेचा ।। धृ।। प्रपंच खोटा हा मृगपाणी, घोरे फिरतो प्राणी । कन्या सुत-दारा, धन माझे मिथ्या वदतो वाणी । अंती नेतील हे यमदूत, न ये संगे कोणी । निर्गुण रेणुका कुलदेवी, जपतो मी निर्वाणी ।। लोलो लागला ।।१।।
पंचभूतांचा अधिकार, केलासे सत्वर । नयनी देखिला आकार, अवघा तो ईश्वर । नाही सुख-दुःख, देहाला कैचा अहंकार । पाहे परमात्मा तो, ध्यानी भासे शून्याकार ।। लोलो लागला ।।२।।
ध्याता मुद्रा ही उन्मनी, लागे अनुसंधानी । निद्रा लागली अभिध्यानी, जे कां निरंजनी । लीला वर्णिता स्वरूपाची, शिणली शेष वाणी । देखिली भवानी जननी, त्र्यैलोक्यपावनी ।। लोलो लागला ।।३।। गोंधळ घालीन मी अंबेचा घोष अनुहाताचा, दिवट्या उजळुनिया
सदोदित पोत चैतन्याचा । आहं सोहं से, उदो उदो बोलती चारी वाचा ।। लोलो लागला ।।४।। पाहता मूळ पीठ, पर्वत सकळामध्ये श्रेष्ठ । जेथे जगदंबा अवधूत, दोघे भोपी भट । जेथे मोवाळे विंजाळे, प्रणिता पाणी लोट । तेथे तानाजी देशमुख, झाला ब्रह्मनिष्ठ ।। लोलो लागला ।।५।।
जय जय जगदंबे । श्री अंबे । रेणुके कल्पकदम्बे ।
जय जय जगदंबे । श्री अंबे । रेणुके कल्पकदम्बे ।। धृ.।। अनुपम स्वरूपाची, तुझी घाटी। अन्य नसे या सृष्टी । तुजसम रूप दुसरे, परमेष्टी । करिता झालो कष्टी । शशिरस रसरसला, वदनपुटी । दिव्य सुलोचन दृष्टी। सुवर्ण रत्नांच्या शिरी मुकुटी । लोपती रवि शशि कोटी । गजमुखी तुज स्तविले, हेरम्बे । मंगल सकळारंभे ।। जय जय ।।१।।
कुंकुमचिरी शोभे मळवटी । कस्तुरी टिळक लल्लाटी । नासिक अति सरळ, हनुवटी । रूचिरामृतरस ओठी । समान जणु लवल्या, धनुकोटी । आकर्ण लोचन भ्रुकुटी । शिरी नीट भांग बळी, उफराटी कर्नाटकची घाटी। भुजंग निळरंगा, परी शोभे । वेणी पाठीवरी लोंबे ।। जय जय ।।२।।
कंकणे कनकाची मनगटी। दिव्य मुद्या दश बोटी। बाजूबंद नगे, बाहुवटी । चर्चुनी केशर उटी। सुगंध पुष्पांचे, हार कंठी। बहु मोत्यांची दाटी। अंगी नवी चोळी, जरी काठी पीत पितांबर तगटी। पैंजण पदकमळी, अति शोभे । भ्रमर धावती लोभे ।। जय जय ।।३।।
साक्षप तू क्षितीच्या, तळवटी । तूच स्वये जगजेठी । ओवाळीन आरती, दीपताटी। घेऊनी कर संपुष्टी। करुणामृतहृदये, संकटी। धावसी भक्तांसाठी । विष्णुदास सदा, बहुकष्टी । देशील जरी निजभेटी । तरी मग काय उणे, या लाभे । धाव पाव अविलंबे ।। जय जय ।। ४।।
काशी आमुची रेणुका
काशी आमुची रेणुका मूळ पीठ नायिका। जे जे कल्पिले ते देसी इच्छा पुरवीसी । म्हणून प्रार्थना अंबेसी पावे मज दीनासी ।। काशी ।। धृ.।। अणिमा महिमा गरिना बाला बगला श्यामा । सीता सावित्री ही उमा हीच आमुची यमा। ऐसे करुणेचे उत्तर मातापूर सुंदर ।। काशी ।।१।।
पायी पैंजण वाजती कानी बाळ्या शोभती । माथी बिंदल्या झळकती त्याची प्रभा फाकती। कुंकूम लाविले लल्लाटी हार शोभतो कंठी ।। काशी ।।२।।
अंबा नाव तुझे चांगले मन माझे रंगले । अंबाबाई नाव तुझे भवानी पावे मज निर्वाणी । देशमुख तानाजी चरणी राही निरंतर ।। काशी ।।३।।
जय जय जगदंबे रेणुका आई
जय जय जगदंबे रेणुका आई तुझ्याच चरणी ठाव देई ।। धृ.।। माहूर गडावर मुख्य ठिकाण भारताचे ते आहे भूषण । अल्पमतीने करिते वर्णन ज्ञान, बुध्दी, शक्ती मला देग आई।। जय जय…. ।।१।।
मातृतीर्थावर स्नान करिते तुझे नाव घेता गड हा चढते। तुझीच पाहता मंगलमूर्ती धन्य धन्य धन्य परशुरामाची आई ।। जय जय…. ।।२।। दुसऱ्या गडावर श्री. दत्त स्थान अत्री अनसूया किती भाग्यवान। मन हे पाहता होते तल्लीन उदो उदो जयजयकार तुझा ग होई ।। जय जय…. ।।३।।
तिसऱ्या गडावर अनसूया आई साधू संत, देव ऋषी दर्शनास येई। तिन्ही गडांचे वैभव पाही अष्टमीचा खेळ खेळी रेणुका आई।। जय जय…. ।।४।।
हळद, कुंकू मळवट भरिती हिरवा चुडा खुलला हाती। कित्येक भगिनी ओट्या भरिती आशीर्वाद मला तू दे गा आई।। जय जय…. ।।५।।
कर्पूर आरती
आरतीच्या ताटात १ कापराची वडी टाकून ती पेटवून खालील आरती म्हणत ओवाळावी.
कर्पूरगौरं करुणावतारं । संसारसारं भुजगेंद्रहारम्। सदा वसन्तं हृदयारविंदे । भवं भवानी सहितं नमामि ।। मांदारमाला कृतांत काय । कृपालमाला इतिशेश्वराय । दिगंबरायच दिगंबरायच, नमः शिवायच् नमः शिवाय ।।
मंत्र पुष्पांजली
मंत्र पुष्पांजलीत प्रार्थना आहे. ती झाल्यावर देवांवर अक्षता व फुले वाहावीत.
ॐ यज्ञेन यज्ञमयजंय देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । ते ह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्या संति देवाः । ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामान्कामकामाय मह्यं । कामेश्वरो वैश्रवणो दधातु । कुबेराय वैश्रवणाय । महाराजाय नमः
। ॐ स्वस्ति । साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्य राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी स्यात्सार्वभौमः सार्वायुष आंतादापरार्धात् पृथिव्यैसमुद्रपर्यंताया एकराळिति । तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरूतः परिवेष्टारो मरूत्तस्यावसन्गृहे । आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ।
नमः सर्वहितार्थाय जगदाधारहेतवे । साष्टांगोऽयं प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः ।।
प्रार्थना
घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रूप तुझें ।
प्रेमें आलिंगिन, आनंदें पूजिन, भावें ओवाळीन म्हणे नामा ।। १।।
त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव ।।२।।
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुध्दयात्मना वा प्रकृती स्वभावात् ।
करोमी यघत्सकलं परस्मै, नारायणा येती समर्पयामी ।।३।।
अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ।
श्रीधरं माघवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्र भजे ।।४।। हरे
राम हरे राम राम राम हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।
Navratri Special Marathi Aarti 2025:१ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून
आता पोरांची बारी! जेमिनी एआयवर रेट्रो लुकमध्ये फोटो करणार, हा नवीन ट्रेंड सुरू आहे!
“घरबसल्या काढा रेशन कार्ड,फॉलो करा या सोप्या स्टेप्स”
शून्य खर्चात करा पत्नीच्या नावे शेतजमीन – लक्ष्मी मुक्ती योजनेचा लाभ घ्या!
१ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून
![]()


