Table of Contents
ToggleNishkramana 6th Hindu Rites 2024: यात्रा बाळाचा पहिला बाहेरचा प्रवास
Nishkramana 6th Hindu Rites 2024: भारतीय संस्कृती ही प्राचीन काळापासून आपली सभ्यता आणि संस्कृती या कारणामुळे नेहमीच आकर्षणाचा केंद्र राहिली आहे. या आकर्षणामुळे पाश्चात्य लोकांमध्ये देखील भारतीय संस्कृती हे अनुकरण ही आता पाश्चात्य संस्कृती देखील करत आहे.
हिंदू १६ संस्कारांपैकी याआधी आपण सहा विविध संस्कार पाहिले जसे की गर्भाधान,पुंसावन,अनावलोभन,सीमंतोन्नयन,जातकर्म, नामकरण हे आपण संस्कार पाहिले.निष्क्रमण संस्कार या सहाव्या संस्काराबद्दल माहिती पाहणार आहोत.
Nishkramana 6th Hindu Rites 2024: भारतीय हिंदू १६ संस्कारातील काही संस्कार ची माहिती लेखांमध्ये पाहिली आहे आता यापुढील संस्काराची माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.निष्क्रमण संस्कार हा सोळा संस्कार यातील सहावा संस्कार असून याबद्दल आपण या लेखांमध्ये संपूर्ण माहिती पाहूया
आपल्याकडे साधारणपणे बाळाला तीन किंवा चार महिने पूर्ण झाल्यानंतर घेऊन जातात, त्याला निसर्गाशी व परिसराशी पहिल्यांदाच अनुभवयास मिळते.
Nishkramana 6th Hindu Rites 2024: निष्क्रमण संस्कार
निष्क्रमण हा सोळा संस्कारातील सहावा संस्कार आहे म्हणजेच निष्क्रमण म्हणजे बाहेर निघणे असा असून, बाळाला काही वेळेसाठी घराच्या बाहेर घेऊन येणे या आधी बाळाला घराच्या बाहेर काढले जात नसते बाळाचे शारीरिक आणि मानसिक विकास या संस्कारात होतो, असे देखील मानल्या जाते.
ज्यामुळे बाळाचा सर्वांगीण विकास होईल व सूर्यप्रकाश याचे तेज बाळाला मिळेल, बाळाचे शरीर आणि मन हे उस्फुर्त आणि सकारात्मक ऊर्जा समाविष्ट होईल बाळामध्ये सूर्यनारायणासारखे तेज निर्माण होईल.
पाळणा संग्रह वात्सल्याच्या गोड आठवणी https://marathionlinetimes.com/entertainment/palna-sweet-memories-2024/
Namakaran 6th Hindu Rite 2024: नामकरण संस्काराबद्दल https://marathionlinetimes.com/entertainment/namakaran-6th-hindu-rite-2024/
Jatakarma Childs Sacred Start 2024:बाळ जन्मल्यानंतर केल्या जाणारा महत्त्वाचा संस्कार https://marathionlinetimes.com/entertainment/jatakarma-childs-sacred-start-2024/
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी https://marathionlinetimes.com/entertainment/dohala-jeevan-a-sacred-ritual-in-marathi/
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण https://marathionlinetimes.com/entertainment/anavalobhan-sanskar-3rd-rites-of-hindu-2024/
पुंसावन संस्कार पवित्र सोहळाhttps://marathionlinetimes.com/punsavan-sanskar-2nd-rite-2024/
हिंदू धर्माचे सोळा संस्कार आपल्या परंपरेचे पाऊल https://marathionlinetimes.com/sixteen-hindu-rites-in-marathi-2024/
Nishkramana 6th Hindu Rites 2024: निष्क्रमण हा संस्कार कधी केला जातो
जननात् य: तृतीय: ज्यौत्स्न: तस्य तृतीयायाम्…..
अर्थात निष्क्रमण संस्कार हा संस्कार बाळ जन्माला नंतर तिसऱ्या शुक्ल पक्षाच्या तृतीया हा संस्कार केला जातो.
म्हणजेच चंद्रमासाच्या दृष्टीने जन्माच्या दोन महिने, तीन दिवसानंतर हा संस्कार करण्यात यावा, तर पारस्कर गृह्यसूत्रात म्हटले आहे- चतुर्थे मासिनिष्क्रमणिका…!अर्थात बाळाच्या जन्माच्या चौथ्या महिन्यात हा संस्कार केला जावा
या संस्काराची तात्पर्य हेच आहे की जर बाळ शारीरिक दृष्ट्या नाजूक असेल तर
Nishkramana 6th Hindu Rites 2024: त्यादिवशी करावे निष्क्रमण संस्कार
कधी करावे निष्क्रमा संस्कार यासाठी काही तिथी वार तसेच नक्षत्र यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
शुभ तिथी-प्रतिपदा (कृ), द्वितीया, तृतीया, चतुर्थी, सप्तमी, दशमी, एकादशी,द्वादशी शुक्ल आणि पौर्णिमा
शुभ वार -सोमवार,बुधवार,गुरुवार आणि शुक्रवार
शुभ नक्षत्र-अश्विनी, पुनर्वसू, पुष्य, हस्त, अनुराधा, श्रवण, धनिष्ठा ही काही नक्षत्रांची नावे ज्या तिथीला आपण निष्क्रमण संस्कार अवश्य करावे.
Nishkramana 7th Hindu Rites 2024: हा सोहळा आहे छोटासा
या दोन्ही वेळांचा तात्पर्य हाच की जर बाळ शारीरिकदृष्ट्या कमजोर असेल, तर तो इतक्या महिन्यांच्या कालावधीपर्यंत धष्टपुष्ट होऊन आपल्या पुढील प्रगतीसाठी सिद्ध होतो. ही प्रगती म्हणजेच शारीरिक व मानसिक! यासाठी हा निष्क्रमण संस्कार, हा सोहळा फारच छोटा असतो.परमेश्वर आराधनेचे तीन मंत्र, विस्तृत अग्निहोत्र, बाळाच्या मस्तकस्पर्शाचे तीन मंत्र, बाळाच्या उजव्या आणि डाव्या कानात उच्चारले जाणारे दोन मंत्र, सूर्यदर्शन व चंद्रदर्शनाचे दोन मंत्र आणि आशीर्वादपर मंत्र! रहस्यात्मक भागदेखील तितकाच मोलाचा व महत्त्वाचा आहे.
Nishkramana 7th Hindu Rites 2024: कधी करावा हा संस्कार
एखाद्या शुभ दिनी सूर्योदयानंतर बाळाला स्नान घालून नवीन कपडे घालावे.
बाळाला घेऊन त्याची आईने आपल्या पतीच्या उजव्या बाजूला यावे व नंतर समोर उभे राहून बाळाचे डोके उत्तर दिशेकडे करून त्यास पतीच्या हाती सुपूर्द करावे. पुन्हा पतीच्या मागून येऊन त्यांच्या डाव्या बाजूला पूर्वाभिमुख बसावे. यज्ञवेदीवर विराजमान झाल्यानंतर प्रथमतः संस्कारविधी ग्रंथात दर्शविल्याप्रमाणे तीन मंत्रांनी भगवंताची आराधना करावी. त्यानंतर संकल्पपाठ, आचमनमंत्र, इंद्रियस्पर्श, स्वस्तिवाचन, शांतिकरण प्रकरण घेऊन पूर्ण यज्ञविधी संपन्न करावा. त्यानंतर पित्याने खालील तीन मंत्राचे उच्चारण करून बाळाच्या चेहर्याकडे पाहत त्याच्या डोक्यास स्पर्श करावा-
अदात् संभवसि हृदयादधि जायसे।
आत्मा वै पुत्रनामासि स जीव शरद: शतम्॥
यासोबत इतरही दोन मंत्रांचे उच्चारण करावे. या दोन्ही मंत्रात आलेल्या ‘असौ’ या त्याच्याऐवजी त्या ठिकाणी बाळाचे नाव घ्यावे. तद्पश्चात वडिलांनी बाळाच्या उजव्या कानात ‘ओम् प्रयन्धि मघवन्नृजीषिन्द्र रायो…..!’ या मंत्राचे तर डाव्या कानात ‘इन्द्र श्रेष्ठानि द्रविणानि धेहि चित्तिं दक्षस्य सुभगत्वमस्मै …!’ या मंत्राचे पठण करावे.
यानंतर बाळाला बाहेर आणून सर्वांच्या साक्षीने सूर्याचे दर्शन घडवावे आणि खालील मंत्र म्हणावा –
पश्येम शरदः शतं जीवेम शरद: शतं श्रृणुयाम शरद: शतं प्रब्रवाम शरदः शतमदीना: स्याम शरदः शतं भूयश्च शरद: शतात्॥ (यजुर्वेद -३६/२४)
या मंत्रोच्चारणाबरोबरच बाळाला शुद्ध हवेत फिरवावे. बाळाच्या शरीरावर सूर्याचे प्रकाश किरण पडतील, या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावा. शेवटी अग्निहोत्राच्या कार्यक्रमस्थळी येऊन सुमधुर फुलांच्या वर्षावाने बाळाला आशीर्वाद देण्यात येतात.
Nishkramana 6th Hindu Rites 2024:त्यानंतर रात्री आकाशात चंद्र उगवल्यानंतर बाळाला पुन्हा चंद्राच्या चांदण्यात घेऊन तसेच,बाळाचे डोके उत्तरेकडे आणि पाय दक्षिणेकडे घेऊन वडिलांनी बाळास आपल्या कुशीत घ्यावे व आईने त्याच्या वडिलांच्या डाव्या बाजूस उभी राहून चंद्राकडे पाहत
‘ओम् यददश्चंद्रमसि कृष्णं पृथिव्या हृदयं श्रितम…..!’हा मंत्र उच्चार करीत ओंजळीने जमिनीवर पाणी सोडावे.
Nishkramana 6th Hindu Rites 2024:या निष्क्रमण संस्काराचे महत्त्व का आहे.
बाळाचे निसर्गाशी व सर्व प्राकृतिक तत्त्वांशी नाते जोडणे. सूर्याय हा केंद्रस्थानी असून समग्र विश्वाचा आधारस्तंभ म्हणजे सूर्य होय, संपूर्ण प्राणी समूहाच्या शक्तीचा आणि ऊर्जेचा केंद्र म्हणजे सूर्य होय. बाळाच्या वडिलांकडून बाळा चे शारीरिक आरोग्य वाढीसाठी आणि दीर्घ आयुष्याकरिता तसेच मानसिक सामर्थ्य उत्तम राहण्यासाठी सूर्य प्रकाशाची गरज आहे हे काही वेगळे सांगायला नको.
Nishkramana 6th Hindu Rites 2024:प्राचीन काळी आणि सध्नयाच्या आधुनिक जीवनात चिकित्सकांनी सूर्य व सूर्य प्रकाशाचे बलस्थान आणि सामर्थ्य हे आपल्याला वेळोवेळी सांगितले आहे. सूर्याच्या तेजोमय प्रकाशकिरणांसोबत असलेली ताजी हवा ही जीवनशक्ती प्रदान करणारी आहे.यामुळे पृथ्वी राहणार्या प्रत्येक जीवाला जगण्याकरिता प्राणवायू मिळतो. या उलट सध्या जी आपली जीवनशैली आहे,एकाद्या खोलीमध्ये आपण बसून दार व खिडक्या लावून बसत आहोत,ही एक आपल्या भावी आयुष्यासाठी घातक अशी जीवनशैली असून तिचा आपण वापर करतोय.
Nishkramana 6th Hindu Rites 2024:चंद्र दर्शन देखील महत्त्वाचे आहे
Nishkramana 6th Hindu Rites 2024: त्याचबरोबर चंद्राचे शीतल चांदणेदेखील सबंध प्राणिसमूहाकरिता फारच उपयुक्त मानले जाते. निष्क्रमण संस्कारात नवजात शिशुला सूर्य आणि चंद्राच्या प्रकाशात आणून हवा, पाणी, पृथ्वी व इतर नैसर्गिक तत्त्वांशी नाते जोडणे म्हणजेच या नव्या जगाशी त्याचा पहिल्यांदाच परिचय करून देणे होय.
जन्मप्रदात्या आईनंतर आता बाळाला निसर्गरुप आई भेटत आहे. जणू काही हीच प्राकृतिक आई आता बाळाला शतायुषी बनविण्याकरिता आपली मूलभूत निसर्गतत्वे त्याला समर्पित करीत आहे. यादृष्टीने निष्क्रमण संस्कार अतिशय उपयुक्त ठरणारा आहे.
अमेय वाघ Amey Vagh Talented Actor :https://marathionlinetimes.com/entertainment/amey-vagh-talented-actor/
आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
खळखळून हसवणारी नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/
पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/
फ्री लॅपटॉप योजनेची https://marathionlinetimes.com/free-laptop-yojana-2024/