Table of Contents
TogglePadava Diwali 2024:पाडवा सण पती-पत्नीच्या प्रेम आणि स्नेहाचा सण आहे
Padava Diwali 2024: दिवाळी च्या दिवशी झाल्यानंतर दुसरा सण येतो तो म्हणजे बलीप्रतिपदा, बलिप्रतिपदास सर्वजण पाडवा या नावाने संबोधतो. पाडव्याच्या दिवशी व्यापारी वर्गाची नवीन वर्षाची सुरुवात होते. नवीन वर्षाची सुरुवात म्हणून आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जाणारा सण.
Padava Diwali 2024: पाडवा म्हटलं की बऱ्याच जणांना नवीन वर्षाच्या सुरुवातीचा सण गुढीपाडवा असे वाटते परंतु गुढीपाडवा हा चैत्र महिन्यात येतो.बली प्रतिपदा जो महाराष्ट्रात बली-प्रतिपदेला साजरा केला जातो.
अत्यंत दानशूर, परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बलीराजाला भगवान श्रीविष्णूने वामनावतार घेऊन पाताळात धाडल्याचा हा दिवस. त्रिपाद भूमी दान मागून वामनाने बलीराजाला जरी पाताळात धाडले असले, तरी सर्वार्थाने त्याचे कल्याणच केले आहे. पृथ्वीतलावर दीवाली साजरी केली जाण्यामागेदेखील या घटनेचा प्रमुख आधार आहे.
Padava Diwali 2024: व्यापारि वर्गासाठी वही पूजनाचे मुहूर्त
ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शकाचे नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. वहीपूजन मुहूर्त (2 नोव्हेंबर 2024 शनिवार) पहाटे 4.10 ते 6.40, सकाळी 8 ते 10.50
Padava Diwali 2024: पाडवा
कार्तिक शुद्ध प्रतिपदा ( दिवाळी पाडवा ). श्रीविष्णूने ही तिथी बलीराजाच्या नावाने केली, म्हणून या तिथीला ‘बलीप्रतिपदा’ म्हटले जाते.कार्तिक शुद्ध प्रतिपदा ( दिवाळी पाडवा ). श्रीविष्णूने ही तिथी बलीराजाच्या नावाने केली, म्हणून या तिथीला ‘बलीप्रतिपदा’ म्हटले जाते.पाडव्याला बलिप्रतिप्रदा असे का म्हणतात.
साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे बलीप्रतिपदाला
Padava Diwali 2024: एक आख्यायिका
बळीराजा नावाचा एक अत्यंत दानशूर राजा होता त्याच्या दारी येणाऱ्या अतिथी तो जे मागेल तो दान देत असे. दान देणे हा सदगुण आहे पण गुणांचा अतिरेक हा दोषारच असतो. कोणाला काय ध्यान द्यावे, कुठे ध्यान द्यावे याचा निश्चित विचार केला पाहिजे. याबद्दल आपल्या भगवद्गीते आणि शास्त्रात सांगितले आहे.
Padava Diwali 2024:सत्पत्री द्यावे अपात्री दान देऊ नये अपात्र माणसाच्या हाती संपत्ती गेल्याने ते होऊन वाटेल तसे वागू शकतात. बळीराजा कोणत्याही कोणाला कोणताही केव्हाही जे मागेल ते देत असते तेव्हा श्री भगवान विष्णू यांनी मुंजा मुलाचा अवतार घेतला तो अवतार म्हणजे वामन अवतार होय. वामन हा श्रीविष्णू भगवान चा पाचवा अवतार आहे विष्णू भगवान ने मुंजा मुलाचा लहान असतो आणि ओम भगवती भिक्षाम देही असे भिक्षा द्या तो म्हणतो
वामन रुपी श्री भगवान विष्णू ने बळीराजा कडे जाऊन भिक्षा मागितली,Padava Diwali 2024: बळी राजाने वामनरुपी भगवान विष्णू विचारले तुम्हास काय हवे तेव्हा वामनाने त्रिपात भूमी दान मागितले. वामन हा मुंजा रुपी लहान मुलगा कोण आहे आणि या दानामुळे काय होईल या गोष्टीत अज्ञात असल्याने बळीराजा ने श्रीपाद भूमी वामनाला दिली.
त्याचबरोबर वामनाने विराट रूप धारण करून एका पावलाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली तर दुसऱ्या पावलाने अंतरिक्ष व्यापले आणि तिसरा पाऊल कुठे टाकू असे बळीराजास विचारले, त्यावेळेस बळीराजांनी तुमची तिसरी पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा ठेवून बळीराजाला पातळ आज घालवायचे असे ठरवून वामनाने तुला काही वर मागायचं असेल तर वर माग असे सांगितले तेव्हा त्याने वर मागितले तेव्हा बळीराजांवर मागितला आणि आता पृथ्वीवर माझे सर्व राज्य संपणार आहे मी आपण मला पातळात घालणार आहात तेव्हा तीन पावले टाकायचे सर्व घडले ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस जरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे.
वामन रुपी श्री भगवान विष्णू ने यमाप्रित्यर्थ दिन करणाऱ्याला यमयातना होऊ नये त्याला अपमृत्यू येऊ नये व त्याच्या घरी लक्ष्मीची निधन वास असावा असे तीन दिवस म्हणजेच, आश्विन कृष्ण चतुर्दशी, आश्विन अमावास्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा. याला ‘बलीराज्य’ असे म्हणतात.
Padava Diwali 2024: आध्यात्मिक महत्त्व
‘बलीराजाला दिलेल्या वचनानुसार दिवाळीचे तीन दिवस आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशी, आश्विन अमावास्या आणि कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदा या दिवशी यमदीपदान केल्यामुळे जिवावर आलेले अपमृत्यूचे संकट टळते अन् धर्माचरण करणार्या व्यक्तींच्या घरी लक्ष्मी निवास करते. ‘हे तीन दिवस पृथ्वीवर बलीचे राज्य असेल’, असे सांगून भगवंताने त्याचा निस्सीम भक्त जरी असुर असला, तरी त्याचा मान राखून त्याला हा आशीर्वाद दिलेला आहे. यावरून भगवंताची ‘तत्त्वनिष्ठा, भक्तवत्सलता आणि दातृत्व’ हे गुण प्रकर्षाने दिसून येतात.
Padava Diwali 2024: भावार्थ
ईश्वरी कार्य समजून जनतेची सेवा करत देवत्वाला पोहोचलेल्या बलीची आठवण करावी ! ‘बलीप्रतिपदेला बलीची पूजा करतात. बलीने राक्षस कुळात जन्म घेऊनही त्याच्या पुण्याईने त्याच्यावर वामनदेवाची कृपा झाली. त्याने ईश्वरी कार्य समजून जनतेची सेवा केली. तो सात्त्विक वृत्तीचा आणि दानी राजा होता. प्रत्येक मानव हा प्रारंभी अज्ञानी असल्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्य घडत असते; परंतु ज्ञान आणि ईश्वरी कृपा यांमुुळे तो देवत्वाला पोहोचू शकतो,
बली वास्तविक असुर घराण्यातील असूनसुद्धा त्याच्या उदार तत्त्वामुळे आणि त्याने भगवंताला शरण जाऊन आपले सर्वस्व अर्पण केल्यामुळे भगवंताने त्याला योग्य मार्गदर्शन करून त्याच्या जीवनाला कलाटणी दिली आणि त्याचा उद्धार केला. त्याच्या राज्यात असलेले असुरवृत्तीला पोषक असे भोगमय विचार घालवून, त्या ठिकाणी त्यागाची भावना रुजवून, जनतेला दैवीविचार देऊन सुख आणि समृद्धी यांचे जीवन प्रदान केले.’
Padava Diwali 2024: पत्नीने पतीला ओवाळणे
या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात.बरेच लोक दिवाळीचा चौथा दिवस ‘दिवाळी पाडवा’ म्हणून साजरा करतात. हा पती-पत्नीच्या प्रेमाचा आणि आदराचा दिवस असतो. या दिवशी बायको प्रेमाने आपल्या पतीला औक्षण करते आणि पती बायकोला प्रेमाने भेटवस्तू देतात.
Laxmi Pujan 2024:आली दिवाळी करा लक्ष्मीपूजनाची तयारी https://marathionlinetimes.com/entertainment/laxmi-pujan-2024/
नरक चतुर्दशी पहिले पाणी https://marathionlinetimes.com/entertainment/narak-chaturdashi-2024/
धनत्रयोदशी समृद्धी आणि आरोग्याचा उत्सव https://marathionlinetimes.com/entertainment/dhantrayodashi-festival-2024/
वसुबारस दिवाळीचा शुभारंभhttps://marathionlinetimes.com/entertainment/vasubaras-diwali-2024/
Padava Diwali 2024: आध्यात्मिक महत्त्व
पुरुष हे शिवाचे आणि स्त्री हे दुर्गादेवीचे प्रतीक आहे. या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. त्यामुळे पत्नीमध्ये दुर्गातत्त्व कार्यान्वित होते आणि पतीचे औक्षण केल्यानंतर त्याची कुंडलिनीशक्ती जागृत होऊन त्याच्यातील सुप्तावस्थेत असणारे शिवतत्त्व प्रगट होते. अशा प्रकारे औक्षण केल्यामुळे पती-पत्नी या दोघांनाही आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो.
Padava Diwali 2024: दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी
आपल्या गवळी बांधवाची एक वेगळीच लगबग बलिप्रतिपदेच्या दिवशी पहावयास मिळतील ती म्हणजे त्यांच्या रेड्याला मिरवण्याची.
बलिप्रतिपदेच्या दिवशी लावतात बऱ्याच ठिकाणी रेड्याच्या काढतात मिरवणूक काढतात तसेच ठिकठिकाणी रेड्याच्या शर्यती देखील लावल्या जातात.
त्यांच्या रेड्याला ते आंघोळ घालून स्वच्छ करतात तसेच विविध रंगांनी रेड्याला सजवतात त्याच्या पायात देखील वाळे किंवा व आपल्या लाडक्या रेड्याला मिरवणू गावभर ते देखील वाजत गाजत.
डोहाळे जेवणातील चोळ्यांचे रंगीबेरंगी विश्वhttps://marathionlinetimes.com/entertainment/dohaljewan-colorful-attires-2024/
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी https://marathionlinetimes.com/entertainment/dohala-jeevan-a-sacred-ritual-in-marathi/
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण https://marathionlinetimes.com/entertainment/anavalobhan-sanskar-3rd-rites-of-hindu-2024/
पुंसावन संस्कार पवित्र सोहळाhttps://marathionlinetimes.com/punsavan-sanskar-2nd-rite-2024/
हिंदू धर्माचे सोळा संस्कार आपल्या परंपरेचे पाऊल https://marathionlinetimes.com/sixteen-hindu-rites-in-marathi-2024/
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
खळखळून हसवणारी नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….