Table of Contents
TogglePalna Sweet Memories 2024: श्री गणेश, श्रीराम आणि शिवरायांचा पाळणा
Palna Sweet Memories 2024:नामकरण सोहळ्या मध्ये विशेष गायले जाणारे एक गीत म्हणजे पाळणा, बाळाचे नामकरण हा एक महत्त्वाचा संस्कार आहे.असून त्या संस्कारामध्ये पाळणा हा पारंपारिक रित्या गायला जातो.
Palna Sweet Memories 2024: अनेक हौशी बायका हा पाळणा अगदी लयबद्ध गाताना आपण पाहतो, अनेक चित्रपटातील गाणे देखील आज-काल पाळणा म्हणून गायली जातात. आणि या लयबद्ध स्वरात गायल्या जाणाऱ्या पाळण्याने कार्यक्रमाची रंगत अजून वाढते.
Palna Sweet Memories 2024: श्री गणपतीचा पाळणा
जो जो जो जो रे गजवदना पतितपावना ।। निद्रा करि बाळा गजवदना मृत्युंजयनंदना ॥ धृ० ॥
पाळणा बांधियला जडिताचा । पालख या सोन्याचा ॥ चांदवा लाविला मोत्यांचां । बाळा निजवी साचा ॥१॥
दोर धरूनिया पार्वती। सखियासह गीत गाती ॥ नाना गुण वर्णिता । सुस्वर आळविती ॥ जो० ॥२॥
निदा लागली सुमुखाला ॥ सिंधूर दैत्य आला ।। त्यांचे चरणाने ताडिला । दैत्य तौ मारिला ॥ जे० ॥३॥
बालक तान्हे हें बहुकारी। दैत्य वधिले भारी ॥ करिती आश्चर्य नरनारी। पार्वती लोण उतरी ॥ जो० ॥४॥
ऐसा पाळणा गाईला । नानापरी आळवला ॥ चिंतामणि दास विनविला । गणनाथ निजविला ॥ जो० ॥५॥
Palna Sweet Memories 2024:(२)श्री गणपतीचा पाळणा
जो जो जो जो रे गजवदना । मयुरेश्वर सुखसदना ।। निद्रा करि बाळा एकदंतना । सकळादी गुणसगुणा ॥ जो० ॥
गंडस्थल शुंडा ते सरळी । सिंदूर चर्चुन भाळीं ॥ कानीं कुंडलें ध्वजाजाळीं । कौस्तुभ तेज सळाळी ॥ जो० ॥
पालख लावियला कैलासी । दाक्षायणिचे कुशी ॥ पुत्र जन्मला हृषिकेशी । गौरी हराचे वंशी ॥ जो० ॥
चौदा विद्यांचा सागर । वरदाता सुखसागर ।।पाळणे संग्रह
दुरितें निरसिली अपार । विष्णूचा अवतार ॥ जो० ॥
लंबोदर म्हणंतां दे स्फूर्ति । अद्भुत त्याची किर्ती ।॥ जीवनसुत अर्धी गुणमूर्ती । सकळिक बांछा पुरती ।। जो०॥
Palna Sweet Memories 2024: श्री रामाचा पाळणा
बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथनंदना ।। निद्रा करी बाळा मनमोहना । रामा लक्षमणा ॥धृ०॥
पाळणा लांबविता अयोध्येसी । दशरथाचे वंशी ॥ पुत्र जन्मला हृषीकेशी । कौशल्येचे कुशी ॥१॥
रत्नजडीत पालख । झळके अलौकिक ॥ वरती पहुडले कुलदीपक । त्रिभुवननायक ॥२॥
हालवी कौसल्या सुंदरी । धरूनी ज्ञानदोरी ।।
Namakaran 6th Hindu Rite 2024: नामकरण संस्काराबद्दल https://marathionlinetimes.com/entertainment/namakaran-6th-hindu-rite-2024/
Jatakarma Childs Sacred Start 2024:बाळ जन्मल्यानंतर केल्या जाणारा महत्त्वाचा संस्कार https://marathionlinetimes.com/entertainment/jatakarma-childs-sacred-start-2024/
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी https://marathionlinetimes.com/entertainment/dohala-jeevan-a-sacred-ritual-in-marathi/
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण https://marathionlinetimes.com/entertainment/anavalobhan-sanskar-3rd-rites-of-hindu-2024/
पुंसावन संस्कार पवित्र सोहळाhttps://marathionlinetimes.com/punsavan-sanskar-2nd-rite-2024/
हिंदू धर्माचे सोळा संस्कार आपल्या परंपरेचे पाऊल https://marathionlinetimes.com/sixteen-hindu-rites-in-marathi-2024/
Palna Sweet Memories 2024: (२) श्री रामाचा पाळणा
बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथनंदना ॥ निद्रा करी बाळा मनमोहना । रामा लक्षमणा ॥धृ०॥
गला मंड पाळणा लांबविता अयोध्येसी । दशरथाचे वंशी ॥ पुत्र जन्मला हृषीकेशी । कौशल्येचे कुशी ॥१॥
रत्नजडीत पालख । झळके अलौकिक ॥ वरती पहुडले कुलदीपक । त्रिभुवननायक ॥२॥
न धरूनिव हालवी कौसल्या सुंदरी । धरूनी ज्ञानदोरी ॥
पुष्पें वर्षिली सुरवरी । गर्जती जयजयकार ॥३॥
विश्वव्यापका रघुराया । निद्रा करी बा सखया ॥ तुजवर कुरवंडी करूनियां । सांडीन अपुली काया ॥४॥
येउनि वसिष्ठ सत्वर । सांगे जनर्मातर ॥ राम परब्रह्म साचार । सातवा अवतार ॥॥५॥
याग रक्षुनियां अवधारा । मारूनि रजनीचरां ॥ जाईल सीतेच्या स्वयंवरा । उद्धरी गौतमदारा ॥६॥
पर्णिली जानी सुरूपा । भंगुनियां शिवचाया ।। रावण लज्जित महाकोपा । नव्हे पण हा सोपा ॥७॥
सिंधजलडोही अवलीळा । नामे तरतिल शिळा ॥ त्यांवरी उतरूनियां दयाळा । नेईल वानरमेळा ॥८॥
समूळ मर्दुनि रावण । स्थापिल बिभीषण ।। देव सोडविल संपूर्ण । आनंदेल त्रिभुवन ॥९॥
राम भावाचा भुकेला । भक्ताधीन झाला ॥ दास विठ्ठले ऐकिला । पाळणा गाईला ॥१०॥
Palna Sweet Memories 2024: श्री रामाचा पाळणा (३)
Palna Sweet Memories 2024: जो जो जो जो रे रघुराया। निद्रा करी सखया । जोगी आलासे भेटाया । शशिसमय देखुनि काया ॥ बाळा जो० ॥
जोगी दिसतो सुंदर । मस्तकी जटाभार ॥ गळा रुंडमाळांचे हार । शोभे व्याघ्रांबर ॥ बाळा जो० ॥१॥
भस्म चूर्चनीं सर्वांगी । वेष्टिली भुजंगी । भूतें घेऊनि स्वोंगी । आला प्रेमरंगी ॥ बाळा जो० ॥२॥
जटेमधुनियां जळ वाहे । मुद्रा लावुनि पाहे ।। मान धरूनियां तो राहे । न कळे कोण आहे ॥ बाळा जो० ॥३॥
एतुकें ऐकुनियां वचन । हांसले रघुनंदन । भावें पदकमळीं तल्लीन । गोसावीनंदन ॥ बाळा जो० ॥४||
Palna Sweet Memories 2024: श्री कृष्णाचा पाळणा
बाळा जो जो रे कुलभूषणा । श्रीनंदनंदना ॥ निद्रा करि बाळा मनमोहना । परमानंदा कृष्णा ॥ बाळा ॥ धृ० ॥
जन्मुनि मथुरेत यदुकुळ । आलासी वनमाळी ।। पाळणा लांबविला गोकुळीं । धन्य केले गौळी ॥ बाळा ॥ जो० ॥ बंदीशाळेत अवतरूनी । द्वारे मोकलुनी ॥ जनकशृंखला तोडूनी । यमुना दंभागोनी ॥ बाळा ॥ जो० ॥
मार्गी नेतांना श्रीकृष्ण मघेनिवारणा ॥ शेष धांवला तत्क्षणी । उंचावूनी फंणा ॥ बाळा ॥ जो० ॥
रत्नजडित पालख । झळके अमोलिक । वरती पहुडले कुलतिलक । वैकुंठनायक ।। बाळा ॥ जो० ॥
हालबी यशोदा सुन्दरी। धरूनि हाती ज्ञानदोरी ।। पष्पें वर्षिली सुरवरी । गर्जति जयजयकारी ॥ बाळा ॥ जो० ॥
विश्वव्यापक यदुराजा । निद्रा करी बा सखया ।। तुजवरी कुरवंडी करूनियां । सांडिन मी निज काया ।। बाळा ।। जो० ॥
गर्ग येऊनि सत्वर । सांगे जन्मांतर ।। कृष्ण परब्रह्म साचार । आठवा अवतार ॥ बाळां ॥ जो० ॥
विश्वव्यापी हो बालक । दृष्ट देत्यांतक ।। प्रेमळ भक्तांचा पालक । श्रीलक्ष्मीनायक ॥ बाळा ॥ जो० ॥
विष पाजाया पूतना । येतां घेई प्राणा ॥ शकटासुराशी उताणा । पाडिले लाथे जाणा ॥ बाळा ॥ जो० ॥
Palna Sweet Memories 2024: उखळा बांधता मातेनें । रांगतां श्रीकृष्ण ॥ शकटासुराशी उताणा । पाडिले लाथे जाणा ॥ बाळा ॥ जो०।
गोधन पखितां आळविला । कालिया मर्दीला ॥ दावानल वन्ही प्रशिला । दैत्यविध्वंस केला ॥ बाळा ॥ जो०
इंद्र कोपतां धांवून । उपटी गोवर्धन ॥ नारन गाई गोपल्लां रक्षन । केले वनभोजन ॥ बाळा ॥ जो० ॥
बाळ कालिंदी तीरी जगदीश । ब्रजवनितांशी राम ॥ खेळुनि मारिलें कंसास । चाणूराम ॥ बाळा ॥ जो० ॥
उदड ऐशी चरित्रे अपार । पावुनि भूमीवर ॥ पांडव रक्षिले सत्वर । ब्रह्मानंदी स्थिर ॥ बाळा ॥ जो० ॥
Palna Sweet Memories 2024: श्री शिवरायाचा पाळणा
तुम जोजविते माय जिजाई बाळा । निज रे निज लडिवाळा ॥ धृ०॥
मध्यरात्रीचा प्रहर लाडक्या आला । झोप का येईना तुजला । झोके देते गीते गाते अंगाई। तरी डोळा लागत नाही ॥ बाळा असला थांबिब चाळा आतां । थकले मी झोके देतां ॥
तू महाराष्ट्राचा त्राता मर्नी धरली कसली चिंता पाठीशी भवानी माता माऊलिया जिवीचा जिव्हाळा । निज रे निज लडिवाला ॥१॥
चल ठेव दुरी हातामधली ढाल । निद्रा करी तान्हह्या खुशाला ॥ झोपली कशी बारा मावळी थेट । शिवनेर जुन्नर पेठ ।। निःशब्द कशी परसली रे शांति। या मराठी भूमिवरती ॥ बागुलबुवा आला काला । झडकरी झोप रे बाळा ॥
कोकणच्या चौदा ताली, झोपल्या की घाटाखाली आणि रात्रि बहुतच्चि झाली किती सांग तुला समजावेल्हाळा निजोंनिज लडिवाळा ॥२॥
Palna Sweet Memories 2024: (२)श्री शिवरायाचा पाळणा
मी लोटते झोका तुत शिवबाळा । सुंदरा, नीज स्नेहाळा ॥धृ०॥ तनुशांति शांत नीज तुम येण्या राष्ट्रगत गाते तान्ह्या ॥
बघ दास्यि जळे मही अंबिका माय हंबरडा फोडी हाय निजशत्रूनी हिचें भांगिले छत्र । मांगल्या-सूत्र स्वातंत्र्य । या दुःखाने दुःख्बी फार रे पाही । मी जिजाबाई तव आई । बहू शत्रू मातले भ्मेले रे । मेल्यांनी आर्यध नेले रे । आमचे राज्य बुडविले रे । कुणी निपजेना शास्ता । या चांडाळा संहारा नीज स्नेहाळा ॥१॥
भूमाते या भूतकाळी उद्धरणी । झुंजली रणी मृडरमणी ॥ श्रीरामाने रावण वधिला लढूनि । वानरां वीर बनवूनी ॥
घे स्वतंत्रता कंसाच्यापासूनी। गोविंद गोप मजवूनी ।।
तूं तसा वीर होशील का रे ?
तलवार करी धरशील का रे ?
रणीं वधीवयाला देशत्रूचा सुंदर नीज स्नेहाळा ॥२॥
भूभक्तीचे प्रबल दुग्ध पाजीन। पी वीर तुला बन्वीन ॥ रिपुस्क्तें भू तुझ्या करी हाणीन । स्वातंत्र्य घरी आणीन ॥
साधीन सख्या जाण लोककल्याण । राज्यपदीं स्थापून ॥ स्वातंत्र्य वीराची माता रे । मी स्वातंत्र्यं सुधन्य होतां रे । ध्वज स्वातंत्र्याचा झुलता रे ॥ वीन तनू आशा आनंदमय वेळा । सुंदरा नीज स्नेहाळा ॥३॥
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
खळखळून हसवणारी नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….