Parents Worship Day In Marathi; आपल्या पालकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
Parents Worship Day In Marathi; मातृ-पितृ पूजन दिवस, ज्याला काहीवेळा पालक पूजन दिवस म्हणूनही ओळखला जात आहे. हा दिवस आपल्या आई-वडिलांबद्दल आदर, प्रेम आणि काळजी व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. दरवर्षी १४ फेब्रुवारी रोजी हा दिवस येतो आणि व्हॅलेंटाईन डे सोबतच त्याला विशेष महत्त्व आहे.
चला तर मग आज लेखामध्ये पाहूया पूजन दिवस याबद्दल काही विशेष माहिती ज्यामध्ये आपण आपल्या पालकांबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करण्याची संधी आपल्या आपण उपलब्ध करून देऊया.
देशभरात साजरा होतो पालकत्व दिन
भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करण्याची पद्धत सुरू झाली असून,काही राज्यांमध्ये याला ‘पालकत्व दिन’ म्हणूनही ओळखले जाते. १४ फेब्रुवारी हा दिवस अनेकजण आपल्या आई-वडिलांबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी निवडतात.
मातृ-पितृ पूजन दिवसाचा उद्देश काय आहे?
What is the purpose of Matra pitru Pujan din?
Parents Worship Day In Marathi; जसे आपले पालक आपल्या मुलांसाठी दिवसरात्र कष्ट करतात, आपल्या गरजा पूर्ण करतात, त्याचप्रमाणे मुलांचेही कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या आई-वडिलांचा आदर करावा. त्यांच्या त्यागाबद्दल त्यांचे आभार मानावेत. खरं तर, आदर आणि सन्मान वर्षभर आणि आयुष्यभर दाखवला पाहिजे. परंतु वर्षातून एक दिवस असा असावा जो फक्त त्यांच्यासाठी समर्पित असेल, म्हणूनच मातृ-पितृ पूजन दिवस साजरा केला जातो.
मातृ-पितृ पूजन दिनी काय करावे?
What to do on (Parents Worship Day )Matri Pitru Poojan Day?
जर तुमचे पालक हे वयोवृद्ध असतील तर मुख्यत्वे त्यांना तुम्ही वेळ द्या.
Parents Worship Day In Marathi; या दिवशी मुलांनी आपल्या पालकांचा आदर करावा, त्यांची पूजा करावी, त्यांच्या त्यागाबद्दल त्यांचे आभार मानावेत आणि त्यांना शक्य तितक्या भेटवस्तू द्याव्यात.
या दिवशी, तुमच्या पालकांना त्यांच्या कामातून आराम देऊन त्यांना आनंदित करण्याचा प्रयत्न करा. त्यांना भविष्यात कोणत्याही संकटाचा सामना करावा लागू नये, यासाठी एकत्र राहण्याची प्रतिज्ञा करा.
तुमच्या पालकांचे आवडते जेवण बनवा आणि त्यांना प्रेमाने आणि आदराने खायला द्या.
पूजा कशी करावी:
तुमच्या पालकांना उंच आसनावर बसवा.
त्यांच्या कपाळावर कुंकूचा टिळा लावा.
त्यांना फुलांचा हार घाला आणि आरती करा.
एक महत्त्वाचे म्हणजे त्यांची सेवा करण्याचा आणि ऐकण्याचा संकल्प करा.
या दिवसाचे महत्त्व काय आहे?
What is the significance of this day?
पालक नेहमीच त्यांच्या मुलांवर प्रेमळ असतात आणि त्यांचे कल्याण इच्छितात. जेव्हा मुले त्यांची पूजा करतात, तेव्हा त्यांना त्यांचे आशीर्वाद मिळतात. हा दिवस कुटुंबातील प्रेम आणि एकतेचे महत्त्व दर्शवतो. एकमेकांबद्दल आपुलकी निर्माण करतो.
ही कथा अनेकजण सांगतात
Many people tell this story
Parents Worship Day In Marathi; एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती यांचे पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांच्यात कोण मोठा यावरून वाद झाला. दोघांनी आपापल्या परीने आपली बाजू मांडली, पण शंकराने दोघांनाही एक परीक्षा दिली.शंकराने दोघांना सांगितले की जो कोणी पृथ्वीची प्रदक्षिणा घालून लवकर परत येईल तो मोठा. कार्तिकेय आपल्या मयूरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले.
गणेश मात्र विचारमग्न झाले. त्यांनी आपल्या जागी बसून विचार केला की माझे आई-वडील हेच माझे सर्वस्व आहेत. त्यांच्यातच सारे तीर्थ आहेत. त्यांनी आपल्या आई-वडिलांना एका उच्च आसनावर बसवले आणि त्यांची पूजा केली.
गणेशाने माता-पित्याची प्रदक्षिणा पूर्ण केली आणि शंकराकडे आले. शंकराने त्यांना विचारले की तू पृथ्वीची प्रदक्षिणा कधी पूर्ण केलीस? तेव्हा गणेश म्हणाले, “आई-वडिलांमध्येच सारे जग सामावले आहे. त्यांची प्रदक्षिणा म्हणजेच पृथ्वीची प्रदक्षिणा.”
या कथेवरून आपल्याला बोध मिळतो की आई-वडिलांची सेवा करणे हे सर्वात मोठे पुण्य आहे. त्यांची पूजा करणे म्हणजे सर्व देवांची पूजा करणे.
Parents Worship Day In Marathi; आज-काल हा दिवस सगळीकडे साजरा केला जातो. याला काही ठोस असे सांस्कृतिक पुरावा किंवा विशेष काही संदर्भ सापडला नाही परंतु आपल्या आई-वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा जर आपल्याला मोका मिळत असेल तर सेलिब्रेट करायला काय हरकत आहे.
Parents Worship Day In Marathi; आता सोप्या पद्धतीत मिळवा घरबसल्या मतदान कार्ड!
शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
असं करा इम्प्रेस तुमच्या व्हॅलेंटाईन पार्टनरला!
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!