Pithori Amavasya 2025 in Marathi: “पिठोरी अमावस्या पासून श्रावणाची सुरुवात!

Pithori Amavasya 2025 in Marathi: या विशेष दिवसाबद्दलची कथा आणि थोडक्यात पण महत्त्वाची माहिती

Pithori Amavasya 2025 in Marathi:सर्वांना हवाहवासा करणारा, सनावाराने नटलेला आणि भक्तीभावाने ओसंडून टाकणारा पावन श्रावण मास परवापासून सुरू होत आहे.या मोहक महिन्याच्या पहिल्या दिवशी, २४ जुलै २०२५, गुरुवारी, आपण साजरा करत आहोत पिठोरी अमावस्या (Pithori Amavasya),या अमावस्येला दीप अमावस्या देखील म्हणतात.  ही एक अशी विशेष तिथी जी केवळ चंद्राच्या अदृश्य होण्याची नाही तर आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाची आणि दैवी कृपेचीही देखील आहे.

आणि हेच काय तर, या अमावस्येला  गुरुपुष्य योग,हर्ष योग, अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि शिववास योग असे दुर्मीळ योग एकाच वेळी जुळत आहेत. असे म्हणतात,अश्या युग्मित शक्तींच्या सान्निध्यात केलेली दीपपूजा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारी ठरते.

चला तर, आज या लेखाद्वारे जाणून घेऊया या पिठोरी अमावस्येचे, थोडक्यात महत्वपूर्ण माहिती पाहूया.

Pithori Amavasya 2025 in Marathi: "पिठोरी अमावस्या पासून श्रावणाची सुरुवात!

पिठोरी अमावस्या म्हणजे काय?

 What is PithoriAmavasya?

Pithori Amavasya 2025 in Marathi: श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला “पिठोरी अमावस्या” म्हणतात. या दिवशी पिठाचे (आट्याचे) दिवे लावून पूजा केली जाते, त्यामुळे हे नाव पडले. याला “दीप अमावस्या” किंवा “कुशाग्रहणी अमावस्या” असेही संबोधतात. हा दिवस पितृ (पूर्वज) आणि देवतांच्या पूजेसाठी समर्पित आहे.

ऐकलं का? आता एटीएम कार्ड नसतानाही पैसे काढता येतात! 

अशी देखील करतात पूजा पिठोरी अमावस्येला

This worship on the day of PithoriAmavasya?

Pithori Amavasya 2025 in Marathi: अनेक ठिकाणी आपल्या घरात असलेली सर्व दिवे, समई या घासून स्वच्छ करून, पाट मांडून समोर रांगोळी काढावी व सर्व दिव्या दिव्यांना व समईला त्यावर ठेवावे. त्यांना पाटावर ठेवून त्यांची प्रथम पाणी फुलाने शिंपडून व त्यानंतर दूध सर्व दिव्यांवर शिंपडून गंध, अक्षदा व फुल वाहून तसेच वस्त्रमाळ घालून पूजा करतात. त्यानंतर या दिव्यांना लाह्या फुटाण्याचा नैवेद्य देखील दाखवतात. हा सण म्हणजे पुढे येणाऱ्या सर्व सणांची सुरुवात असते म्हणून गोडाचा देखील नैवेद्य दाखवला जातो. विशेष म्हणजे या दिव्यांमध्ये पणती देखील ठेवल्या जाते आणि परत एक मातीचा देखील मुख्यत्वे दिव्या केल्या जातो आणि त्याची देखील पूजा केली जाते.

Pithori Amavasya 2025 in Marathi:  तसेच, अनेक ठिकाणी या दिवशी पिठाचे दिवे तयार करून त्यामध्ये तेल वाट आणि दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा करून ती पितृतर्पणासाठी वापरतात.  पिठोरी हे नाव “पिठ” (आटा) + “ओरी” (वस्तू) या शब्दांपासून “पिठोरी” नाव निर्माण झाले. आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास शांती म्हणून पिठोरीचे नैवेद्य दाखवण्याची देखील प्रथा आपल्याकडे आहे, तसेच या दिवशी पूजेसाठी “कुश” म्हणजे दूर्वा गोळा केल्या जात असून जाततात म्हणून “कुशाग्रहणी” याला असे देखील म्हणतात.

तसेच या दिवशी स्त्रिया मुलाबाळांसाठी देवींची पूजा करतात आणि चांगल्या आरोग्यासाठी आणि मुलांच्या सुखासाठी प्रार्थना करतात. या अमावस्येला ‘कुशाग्रहणी’ किंवा ‘दर्भग्रहणी’ अमावस्या देखील म्हणतात. 

शुभ मुहूर्त (24 जुलै 2025)

 Shubh muhrut

 Pithori Amavasya 2025 in Marathi: २४ जुलै २०२५ म्हणजे गुरुवार पहाटे २:२८ ते २५ जुलै दुपारी १२:४० अमावस्या असून सकाळी ५:३८ ते ७:२०  तर,चर मुहूर्त, सकाळी १०:३५ पर्यंत आहे. दीपपूजन संध्याकाळी सूर्यास्तानंतर.

Pithori Amavasya 2025 in Marathi: "पिठोरी अमावस्या पासून श्रावणाची सुरुवात!

कथा पिठोरी अमावस्याची

 Story of PithoriAmavasya?

आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई ? ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असे सहा वर्षे झाले. सातव्या वर्षीही तसंच झालं, तेव्हा सासरा रागावला. ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले. तिला रानात हाकलून लावलं. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण? इथे येण्याचे कारण काय ? आलीस तशी लवकर जा. नाही तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील !

तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, त्या करताच मी इथे आले आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जिवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली आणि इथे येण्याचे कारण सांगितले. सासऱ्यांनी घरातून घालवून दिले तर आता जगून तरी काय करायचे आहे? असं म्हणून रडू लागली.

Pithori Amavasya 2025 in Marathi: तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई तू भिऊ नको, घाबरू नको. अशीच थोडी पुढं जा. तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल, तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, साती अप्सरा तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असे झाल्यावर मी आहे म्हणून सांग. त्या तुला पाहतील. कोण, कोठची म्हणून चौकशी करतील. तेव्हा सगळी हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली. तो एक बेलाचे झाड पाहिलं. तिथेच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वार्‍यासुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे? म्हणून विचारलं.

”आयुष्मान कार्डवर ५ लाख रुपये मोफत उपचार! तुम्ही पात्र का? 

ते ऐकताच तीने मी आहे म्हणून सांगितले. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण, कोठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या- देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. पुढे तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. तिला श्रावणी अवसेचं हे व्रत सांगितलं. चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्युलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तसे तिने विचारलं, ह्याने काय होतं ? अप्सरांनी सांगितलं. हे व्रत केले म्हणजे मुलबाळ दगावत नाहीत, सुखासमाधानात राहतात. पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली.

Pithori Amavasya 2025 in Marathi: ती आपल्या गावात आली. लोकांनी हिला पाहिलं, ब्राह्मणाला जाऊन सांगितले. भटजी भटजी, तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्ध घटकेनं पाहू लागला, तो मुलबाळं दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला, मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुऊन घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुला-बाळांसहित सुखाने ती नांदू लागली. आणि प्रत्येक वर्षी पिठोरी अमावस्येचे व्रत करू लागली. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

Pithori Amavasya 2025 in Marathi:

Loading