Raksha Bandhan 2025 in marathi: जाणून घेऊया मुहूर्त, थोडक्यात महत्वपूर्ण माहिती
Raksha Bandhan 2025 in marathi: श्रावण महिन्याच्या सणांच्या रेलचेलमध्ये, रक्षाबंधन हा भावा-बहिणीच्या निखळ प्रेमाचा अनमोल धागा असतो. बाजारातील रंगीबेरंगी राख्या पाहिल्यावर मनात येते ही राखी पौर्णिमा नेमकी कधी आहे? भावाने बहिणीकडे जाण्याचे नियोजन, तर बहिणीने कधी भावाकडे राखी बांधण्यासाठी येण्याची नियोजन करीत प्रेमाने केल्या जाणारा हा राखी पौर्णिमेचा उत्सव..यंदा ९ ऑगस्ट २०२५ रोजी हा सण साजरा करावा लागेल. या राखी पौर्णिमेला काही’ रक्षाबंधन’, ‘राखी पौर्णिमा’ किंवा ‘नारळी पौर्णिमा’ म्हणून ओळखतो.
भावाच्या हातात राखी बांधताना बहिणीच्या मनातील ‘तू माझं संरक्षण करशील ना?’ तू माझ्या पाठीशी उभा आहेस ना. हा विश्वास आणि भावाचं ‘हो, नक्की’ हे मौन आश्वासन, हसत आनंदाने, थोडी थट्टा मस्करी करत या अनबोल भावनांचा हा उत्सव आहे.
Raksha Bandhan 2025 in marathi: भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या पूर्वजनांनी प्रत्येक नात्याला हे विशिष्ट असे महत्त्व दिले आहे, त्यापैकीच हे एक भावा बहिणीचे भांडणातून निखळ प्रेमाचा आपल्यास अनुभव देणारे हे नाते. बहिणी केवळ भावाला नुसती राखी बांधत नाही तर ती भावाबद्दल देखील प्रेम आणि आदर व्यक्त करते, मोठी बहीण असेल तर हक्काने भावाला योग्य तो मार्ग आणि प्रेमळ असा आयुष्याच्या प्रत्येक वेळेस सल्ला देते तर लहान भाऊ असेल तर त्याची नेहमी काळजी आणि विचारपूस करते.
अखेरीस प्रतीक्षा संपली! PM किसानचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात

रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता?
Raksha Bandhan Muhurta
यावर्षी पौर्णिमा तिथी प्रारंभ ही ८ ऑगस्ट दुपारी २ वाजून १२ मिनिटांपासून प्रारंभ होत असून,९ ऑगस्ट दुपारी १ वाजून २१ मिनिटांपर्यंत असणार आहे, ज्योतिष शास्त्रानुसार, उदय तिथीनुसार ९ ऑगस्ट ची रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा साजरी करावी.

रक्षासूत्राचे अनेक पुराणांमधील प्रसंग
Raksha Bnadhan many stories
द्रौपदी-कृष्ण
Raksha Bandhan 2025 in marathi: कृष्णाच्या बोटाला जखम झाल्यावर, द्रौपदीने आपल्या साडीचा तुकडा फाडून त्यावर गंठण बांधले. या प्रेमाच्या बदल्यात, कृष्णाने चीरहरणाच्या वेळी तिचा सन्मान राखला.
कुंती-अभिमन्यू
महाभारतात, कुंतीने नातू अभिमन्यूला युद्धाला जाताना राखी बांधली, ज्यामुळे हा सण मातृभावना आणि संरक्षण यांचा देखील प्रतीक बनला.
गणेश-मनसा-संतोषी माँ
गणेशाच्या बहिणी मनसाने त्याला राखी बांधली. यावेळी गणेशाच्या पुत्रांनी (शुभ-लाभ) आपल्यासाठी बहीण हवी असल्याचे सांगितल्यावर, संतोषी माँ (देवी स्वरूप) त्यांची बहीण बनली.
इंद्राणी-इंद्र आणि बलिराजा
देवराज इंद्राच्या पत्नी सचीने युद्धाच्या वेळी त्याच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले. हा धागा त्याला दैवी संरक्षण देतो, अशी श्रद्धा आहे.
विष्णू-बलि-लक्ष्मी कथेत, लक्ष्मीने बलिराजाला राखी बांधून त्याला भाऊ म्हणून स्वीकारले आणि विष्णूंना परत मागितले.