Rangoli Info In Marathi; जाणून घेऊया रांगोळीचे काही पैलू
Rangoli Info In Marathi; भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाच्या किंवा शुभकार्याला आपण रांगोळी काढतो, रांगोळी आकर्षक आणि मन प्रसन्न करणारी. चला तर मग पाहूया या रांगोळीचे महत्त्व हे आपल्या रोजच्या जीवनात आहे परंतु अजूनही आपल्याला रांगोळी बद्दल माहिती नाही
रांगोळीचे भारतीय संस्कृतीत विशेष महत्व आहे. ती घराच्या सौंदर्यात भर घालते आणि मंगलमय वातावरण निर्माण करते. तसेच, रांगोळी रेखाटण्याची प्रक्रिया ध्यान आणि ध्यानसाधनेप्रमाणे असल्याने मनःशांती मिळवते.
रांगोळीचे आधुनिक वापर
Modern uses of Rangoli
Rangoli Info In Marathi; आजच्या काळात रांगोळी केवळ घराच्या उंबरठ्यावरच नाही, तर शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि विविध कार्यक्रमांमध्येही रेखाटली जाते. तसेच, विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते ज्यामुळे नव्या पिढीत रांगोळीची आवड निर्माण होते, रांगोळीचे महत्त्व देखील हळूहळू समजत आहे.

रांगोळीचा अर्थ आणि उत्पत्ती
Meaning and origin of Rangoli
रांगोळी हा शब्द प्राचीन संस्कृतमधून आला असून त्याचा अर्थ रंगांद्वारे भावना व्यक्त करणे असा आहे. भारतात अनेक ठिकाणी रांगोळीला ‘अल्पना’ या नावानेही ओळखले जाते. अल्पना हा शब्द ‘अलेपना’ या संस्कृत शब्दापासून बनविला आहे. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात.
दिवाळीतील रांगोळीचे महत्त्व
Importance of Rangoli in Diwali
Rangoli Info In Marathi; दिवाळीच्या पाच दिवसांत लक्ष्मी पूजन, धनत्रयोदशी, नरक चतुदर्शी, बलिप्रतिपदा, कुबेर पुजन यासारख्या दिवासाची पूजा, खुशखुशीत फराळ आणि पाहुण्यांची रेलचेल असे मंगलमय वातावरण असते. दिवाळीत खास करून, लक्ष्मीपूजन, मातीचे दिवे लावणे आणि दारात, ऑफिसमध्ये काढण्यात येणाऱ्या रंगीबेरंगी रांगोळ्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात.

रांगोळीची परंपरा आणि इतिहास
Tradition and history of Rangoli
Rangoli Info In Marathi; रांगोळीची परंपरा मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृतीपासून सुरू असल्याचा उल्लेख लेखनात सापडत आहे. तसेच, रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीराम आणि सीता अयोध्येत परतल्यावर मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी अयोध्येतल्या नागरिकांनी घराच्या दारासमोर रांगोळ्यांसह दिवे प्रज्ज्वलित केले.
रांगोळीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व
The religious and spiritual aspects of Rangoli
रांगोळी काढण्यामागे प्राचीन परंपरा असून त्याला काही धार्मिक, ऐतिहासिक कारणे आहेत. पूर्वी धान्य आणि पिठाचा वापर करून रांगोळी बनवली जायची. परंतु, सध्या रांगोळी तयार करण्यासाठी विविध घटकांचा वापर केला जातो. याशिवाय काही ठिकाणी रांगोळी काढण्यासाठी फुले, पाने आणि पाण्याचाही वापर केला जातो.
रांगोळी हे भारतीय संस्कृती-परंपरेचं एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे. यजुर्वेदाच्या काळात ज्या वेळी यज्ञसंस्थेचा जन्म झाला, तेव्हापासून रांगोळीची परंपरा आहे. रांगोळी काढण्यामागे भक्तीची भावना असली, तरी प्रांतानुसार रांगोळी काढायची साधनं बदलली. त्यामुळेही रांगोळीत वैविध्य आलं आहे.

लखपती व्हा! फक्त ८० रुपये गुंतवणूक करून?
झाली का तयारी बाळाच्या बोरन्हाणाची?
रांगोळीचे विविध प्रकार
Rangoli Info In Marathi; दिवाळीत स्वस्तिक, गो पद्मा, लक्ष्मीची पावले, अगदी खास असे चित्रांगण देखील आहे. प्रकारची चिन्हे रांगोळीत साकारली जातात. तसेच शुभ कार्यापूर्वी दिवा लावण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. संस्कार भारती रांगोळी चा प्रकार फार लोकप्रिय आहे, तसेच पाच बोटांची रांगोळी, ठिपक्यांची रांगोळी, पोस्टर रांगोळी, धान्याची रांगोळी देखील आजकाल मोठे हौसेने काढल्या जाते. तसेच अजून रांगोळीचे भरपूर प्रकार आहेत.
रांगोळीचा शास्त्रशुद्ध अभ्यास
Scientific study of Rangoli
रांगोळी या विषयात अमेरिकन युनिव्हर्सिटीची पीएच.डी. पदवी प्राप्त केलेल्या डॉ. भारती माटे यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे रांगोळीचं आयुर्मान वाढवलं आहे. ताओ आर्ट्स या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्या रांगोळी परंपरेचं जतन, संवर्धन करत आहेत.

दक्षिण भारत
South India importance of Rangoli
दक्षिण भारतात, रांगोळी (संपूर्ण भारतात ‘कोलम’ म्हणून ओळखली जाते) खूप महत्त्वाची आहे. रोजच्या जीवनाचा एक अनिवार्य भाग आहे. विशेषतः तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, आणि केरळमध्ये, रोजच्या उंबरठ्यावर कोलम काढण्याची प्रथा आहे.
दक्षिण भारतात रांगोळीचे महत्त्व
Rangoli Info In Marathi; धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व: रांगोळी घराच्या उंबरठ्यावर काढणे शुभ समजले जाते. ती देवाच्या स्वागतासाठी आणि घरात शुभता आणि समृद्धी आणण्यासाठी असते.
रांगोळी घराच्या सौंदर्यात भर घालते.
रांगोळी रेखाटण्याची प्रक्रिया ध्यानसाधनेप्रमाणे आहे, त्यामुळे मनःशांती आणि एकाग्रता मिळवते.
पारंपारिक रीतीने वापरलेल्या रंगीत पावडरमध्ये कीटकनाशक गुणधर्म असतात, ज्यामुळे घरातील कीटकांचा नाश होतो.या प्रथेत रंगाचा वापर आणि डिझाईनच्या विविधतेतून सण-उत्सवांच्या विशेष प्रसंगीही, रांगोळी काढली जाते.
महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024:
समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !