Ratha Saptami 2025 In Marathi: आरोग्य आणि संपत्तीचा मिलाप म्हणजे रथसप्तमी!

Ratha Saptami 2025 In Marathi: जाणून घेऊया रथसप्तमी चे महत्व…

Ratha Saptami 2025 In Marathi: रथसप्तमी हा भारतातील एक महत्त्वाचा सण,भारतातील इतर धार्मिक सणांप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर रथसप्तमीदेखील साजरी केली जाते. आता चाहूल लागते ती वसंत ऋतूची,

तर आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत रथसप्तमी चे मुहूर्त, तुमच्या दिवशी पूजा कशी करायची? बऱ्याच ठिकाणी केल्या रथसप्तमी ची माहिती

Ratha Saptami 2025 In Marathi: यंदा ४ फेब्रुवारी २०२५ रोजी रथसप्तमी आली आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी या तिथीला रथसप्तमी हे व्रत केल्या जाते. हे व्रत मुख्यात वे भगवान सूर्याला समर्पित असते या दिवशी सूर्य देवाची पूजा केली जाते. मकर संक्रांतीपासून सुरू झालेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रम देखील पूर्णत्वास येते.

माहिती रथसप्तमीची

रथसप्तमीलाच काही जण माघ सप्तमी, आरोग्य सप्तमी, माघ जयंती, अर्क सप्तमी, पुत्र सप्तमी अथवा सूर्य जयंती असंही म्हणतात. सूर्य हा भगवान विष्णूचा अवतार असल्यामुळे या दिवशी सूर्य नारायणाची पूजा केली जाते. महाराष्ट्रात मकर संक्रांतीला महिला हळदीकुंकवाचे वाण एकमेकींना देतात. हा समारंभ मकर संक्रातीपासून रथसप्तमीपर्यंत करण्याची पद्धत आहे. दक्षिण भारतातही हा रथसप्तमी मोठ्या प्रमाणावर साजरी होते. 

वसंत ऋतूच्या आगमनानंतर येणाऱ्या रथसप्तमीच्या दिवशी दक्षिण भारतात मोठ्या उत्साहात सूर्यपूजा केली जाते. दक्षिणेत या सणाला ब्रम्होत्सव असंही म्हणतात. तिरूपती बालाजी, बिहार, ओडिसा आणि झारखंडमध्ये या सणाचे एक वेगळे महत्त्व दिसून येते. पूजा पाठ केल्यानंतर सूर्य देवाची रथयात्राही काही ठिकाणी काढली जाते. भारत हा विविध प्रकारच्या संस्कृतीने नटलेला देश आहे. मात्र भारतातील प्रत्येक धार्मिक विधीत अथवा संस्कृतीत निसर्गपूजा नक्कीच आढळून येते. 

Ratha Saptami 2025 In Marathi:निसर्गाचा मुख्य घटक असलेल्या सूर्याची उपासना आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच रथसप्तमीदेखील भारतातील विविध राज्यात विविध पद्धतीने केली जा ते. पारंपरिक पद्धतीने सण साजरा करायचा असेल तर तुम्ही ही ट्रेडिशनल कोलम रांगोळी नक्कीट काढायला हवी. दक्षिण भारतातील ही खास मुग्गुळु रांगोळी रथसप्तमीच्या सणाला अगदी पांरपारिक टच देईल.

रथसप्तमी शुभ मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार माघ शुक्ल पंचमी तिथी मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी पहाटे ४:३७  वाजता सुरू होईल. तर ही तारीख ५ फेब्रुवारीला संपणार आहे. अशा स्थितीत उदय तिथीच्या मान्यतेनुसार रथ सप्तमीचे व्रत अर्थात अचला सप्तमीचे व्रत केले जाईल. कारण या दिवशी स्नान आणि दान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत या दिवशी स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे ५: २३ ते ७:०८  पर्यंत असणार आहे.

रथ सप्तमीला पूजा कशी करावी

रथ सप्तमीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करावे. यानंतर भगवान सूर्याचे ध्यान करून व्रताची शपथ घ्या. सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात लाल चंदन, लाल फुले आणि अक्षत मिसळून सूर्यदेवाला अर्पण करावे. तसेच सूर्यनमस्कार देखील काढावेत. बऱ्याच ठिकाणी तिळाच्या लाडूचा नैवेद्य हा दाखवला जातो

कथा सूर्य देवाची

The story of Sun God

Ratha Saptami 2025 In Marathi: मान्यतेनुसार या दिवशी सूर्याचा जन्म झाला होता. आदिती आणि कश्यप यांचा पूत्र म्हणजे सूर्य देव…रथसप्तमीच्या दिवशी सूर्याचा जन्म झाला आणि सर्व ब्रम्हांड उजळून निघालं. सूर्य देवाचे सामर्थ्य तर सर्वांना माहीत आहेच. पण पुराणातही याबाबत अनेक कथांचा उल्लेख आढळतो, हिंदू पुराण कथेनुसार एका महान राजाकडे त्याचे राज्य चालवण्यासाठी वारस नव्हता. तेव्हा त्याने देवाजवळ प्रार्थना केली. प्रार्थनेनुसार त्याला पुत्र प्राप्ती झाली मात्र त्याचा पुत्र जन्मानंतर सतत आजारी पडू लागला. तेव्हा त्या राजाला एका साधूने रथसप्तमीच्या दिवशी पूजापाठ करण्याचा सल्ला दिला.

भारतीय पुराणात सांगितल्याप्रमाणे सूर्य देव सोन्याच्या रथातून प्रवास करतो ज्याला सात घोडे असून त्याचे सारथ्य अर्जुनाकडे असते. रथसप्तमीपासून सूर्यदेवाच्या उत्तरायणाला सुरूवात होते. सहाजिकच सूर्य नारायणाची उपासना करण्यासाठी रथसप्तमी साजरी केली जाते. शिवाय सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे जोडलेले असल्यामुळे या सणाचे नाव रथ सप्तमी असं पडलं असण्याची शक्यता आहे. हा सण हिंदू धर्मामधील एक शुभ सण असून तो महाराष्ट्र आणि भारतातील काही राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 

रथ सप्तमीचे उपाय

Ratha Saptami 2025 In Marathi: रथ सप्तमीच्या दिवशी घराची पूर्व दिशा स्वच्छ ठेवा आणि तेथे दिवा लावा. यासोबतच गायत्री मंत्राचा २७ वेळा जप करावा. असे केल्याने तुम्हाला सूर्यदेवाची विशेष कृपा प्राप्त होईल.

Ratha Saptami 2025 In Marathi: आरोग्य आणि संपत्तीचा मिलाप म्हणजे रथसप्तमी!

सात धावत्या घोड्यांचे चित्र पूर्व दिशेला लावणे शुभ असते.

अशी देखील करतात रथसप्तमी साजरी.

सप्तधन्याची पूजा केली जाते, आधीच्या काळी एखाद्या पोत्यावर सात प्रकारचे वेगवेगळे धान्य ठेवले जात व त्यांची पूजा केली जात आता सर्व धान्य आपण एखाद्या ताटात किंवा बेडशीट वर टाकून त्याची पूजा करावी हे देखील चांगले असते आणि त्यानंतर हे दान म्हणून द्यावे.

Ratha Saptami 2025 In Marathi: तसेच गौरीचा (शेणाची) आणि कोळशांचा लहानशा आहारावर मकर संक्रांतीच्या दिवशी वापरल्या जाणाऱ्या सुगड्या लहान सगळ्यांमध्ये तांदूळ आणि दूध ठेवून हे त्या आहारावर म्हणजेच कोळशावर ठेवल्या जाते आणि ते या दिवशी मुद्दामून उतू घालतात हे शुभ असते आणि यातील भात हा लहान मुलांना मुख्यत्वे दिला जातो.

या दिवशी आदित्यराणूबाई ची कहाणी वाचल्या जाते किंवा ऐकल्या जाते.

Ratha Saptami 2025 In Marathi: या दिवशी रांगोळीचा अर्थ व त्याच्यामध्ये भगवान सूर्य देवाचे चित्र काढल्या जाते. त्यानंतर या रथाची पूजा केली जाते मुख्यत्वे या दिवशी तिळाच्या लाडूचा देखील नैवेद्य दाखविला जातो.

रथसप्तमीच्या दिवशीसाठी सूर्य मंत्र 

ॐ घृ‍णिं सूर्य्य: आदित्य:

ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः ।

ॐ सूर्याय नम: ।

ॐ घृणि सूर्याय नम: ।

ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा।।

ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर:।

ॐ ह्रीं घृणिः सूर्य आदित्यः क्लीं ॐ

तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

Ratha Saptami 2025 In Marathi: हे तुम्ही वाचले आहे का?

“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!

पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार आतील फरक?

तुमचं जीवन बदलणारे रहस्य !

महाकुंभचे दुसरे शाही स्नान कधी आहे आणि ते विशेष का आहे?

रहस्य नागा साधूंचे!

Loading