Republic Day vs Independence Day Marathi: थोडक्यात महत्वपूर्ण
Republic Day vs Independence Day Marathi: भारत दरवर्षी दोन मोठे राष्ट्रीय सण साजरे करतो – १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) आणि २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन). वरवर पाहता दोन्ही दिवशी ध्वजारोहण आणि देशभक्तीचे कार्यक्रम होत असले, तरी या दोन्ही दिवसांच्या परंपरांमध्ये आणि पद्धतींमध्ये मोठे फरक आहेत.
चला जाणून घेऊया यातील रंजक आणि तांत्रिक फरक थोडक्यात माहिती करून घेऊया खालील प्रमाणे.
१. ध्वजारोहण की ध्वज फडकवणे?
(Hoisting vs Unfurling)
१५ ऑगस्ट (Flag Hoisting): स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज खांबाच्या तळाशी बांधलेला असतो. तो दोरीने खालून वर ओढला जातो आणि मग फडकवला जातो. याला इंग्रजीत ‘Flag Hoisting’ म्हणतात. हे ब्रिटिशांपासून मिळालेल्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे.
२६ जानेवारी (Flag Unfurling): प्रजासत्ताक दिनी ध्वज खांबाच्या वरच्या बाजूलाच बांधलेला असतो. तो फक्त दोरी ओढून उघडला जातो आणि फडकवला जातो. याला ‘Flag Unfurling’ (ध्वज फडकवणे) म्हणतात. हे आपण आधीच स्वतंत्र आणि प्रजासत्ताक देश आहोत, याचे प्रतीक आहे.
२. मुख्य पाहुणे आणि ठिकाण
chef guest and place
१५ ऑगस्ट:Republic Day vs Independence Day Marathi: स्वातंत्र्य दिनाचा मुख्य कार्यक्रम दिल्लीतील लाल किल्ल्यावर (Red Fort) होतो. या दिवशी भारताचे पंतप्रधान देशाला संबोधित करतात.
२६ जानेवारी: प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा कर्तव्य पथावर (पूर्वीचा राजपथ) होतो. या दिवशी भारताचे राष्ट्रपती उपस्थित राहतात. तसेच, दरवर्षी एका परदेशी पाहुण्यांना (Chief Guest) आमंत्रित केले जाते.
३. पंतप्रधान की राष्ट्रपती?
Prime Minister or President
१५ ऑगस्ट: स्वातंत्र्यदिनी देशाचे राजकीय प्रमुख असलेले पंतप्रधान ध्वजारोहण करतात. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताचे संविधान लागू झाले नव्हते, त्यामुळे पंतप्रधान हेच देशाचे प्रमुख होते.
२६ जानेवारी: प्रजासत्ताक दिनी देशाचे संवैधानिक प्रमुख असलेले राष्ट्रपती ध्वज फडकवतात. २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती.
४. परेड आणि शक्ती प्रदर्शन
parade
१५ ऑगस्ट: या दिवशी कोणताही मोठा लष्करी संचलन किंवा चित्ररथ नसतो. फक्त पंतप्रधानांचे भाषण आणि काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात.
२६ जानेवारी: Republic Day vs Independence Day Marathi: या दिवशी भारतीय लष्कराचे भव्य शक्ती प्रदर्शन (Parade) होते. विविध राज्यांचे चित्ररथ, हवाई दलाचे चित्तथरारक प्रयोग आणि भारतीय संस्कृतीची झलक कर्तव्य पथावर पाहायला मिळते.
थोडक्यात सांगायचे तर,१५ ऑगस्ट हा आपल्या स्वातंत्र्याचा दिवस आहे, तर २६ जानेवारी हा आपल्या लोकशाहीचा आणि संविधानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे.
“महिलांनो, सरकार देतंय ₹१५,००० ची फ्री शिलाई मशीन! आजच असा करा मोबाईलवरून अर्ज.”
![]()


