Shivleelaamrit Adhyay 1 In Marathi: ‘शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा पहिला अध्याय!

Shivleelaamrit Adhyay 1 In Marathi: कथा सारा सहित शिवलीलामृताचा १ अध्याय 

Shivleelaamrit Adhyay 1 In Marathi: नमस्कार वाचकहो, तुम्ही संपूर्ण शिवलीलामृत कधी वाचले आहे का? शिवरात्रीच्या निमित्ताने, शिवभक्तांसाठी एक खास भेट. ‘शिवलीलामृत’ पारायणाची माहिती आणि कथासार… ‘शिवलीलामृत’ हे एक दिव्य ग्रंथ आहे, ज्याच्या पारायणाने भक्तांना अनेक लाभ मिळतात.

 शिवरात्रीच्या काळात याचे पारायण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. ‘शिवलीलामृत’ पारायण कसे करावे? त्याचे लाभ काय आहेत? ‘शिवलीलामृत’ मध्ये किती अध्याय आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेख मालिकेत मिळतील.

 या लेख मालिकेत आम्ही तुम्हाला ‘शिवलीलामृत’ कथासार, प्रत्येक अध्यायाची माहिती आणि पारायणाची सोपी पद्धत सांगणार आहोत. रोज एक अध्याय वाचा आणि शिवलीलामृताच्या दिव्य अनुभवात सहभागी व्हा. तर, शिवरात्रीच्या या पवित्र काळात, ‘शिवलीलामृत’ पारायणाने आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणा. आमच्या लेख मालिकेत रोज एक अध्याय वाचा आणि शिवकृपेचा अनुभव घ्या.

Shivleelaamrit Adhyay 1 In Marathi: ग्रंथाचे वाचन आपली संकटे दूर होऊन आपले सर्व ऐहिक व पारलौकिक कल्याण होण्यासाठी फार उपयुक्त आहे. या ग्रंथाचे सपूर्ण पारायण एका समाहात पूर्ण करावे. त्याचा रोजचा पाठ किती करावा ते पुढे दिले आहे.Shivleelaamrit Adhyay 1 In Marathi: श्रीशिवलीलामृत ग्रंथाचे वाचन आपली संकटे दूर होऊन आपले सर्व ऐहिक व पारलौकिक कल्याण होण्यासाठी फार उपयुक्त आहे. या ग्रंथाचे सपूर्ण पारायण एका समाहात पूर्ण करावे. त्याचा रोजचा पाठ किती करावा ते पुढे दिले आहे.

Shivleelaamrit Adhyay 1 In Marathi: ‘शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा पहिला अध्याय!

कधी वाचावे शिवलीलामृत

When should Shivleelaamrit be read?

Shivleelaamrit Adhyay 1 In Marathi: श्री कोणत्याही सोमवारी सायंकाळी शिवमंदिरात जाऊन बेलाची ११ विदले पिंडीवर वाहावीत व शंकराचे दर्शन घ्यावे “मी भगवान शंकरांना प्रणाम करून शांती, समाधान, आनंद प्राप्त करून; माड़ो व माझ्या कुटुंबीयांचे ऐहिक व पारलौकिक सर्व प्रकारचे कल्याण व्हाने, (अमुक एक दृष्ट गोष्ट जी असेल ती प्राप्त व्हावी, त्या गोष्टीचा उबार करावा.) म्हणून श्रीशिवलीलामृत पोथीचे ७ दिवसांत, रोज अंशतः याप्रमाणे, पारायण करणार आहे; तरी हे भगवन शिवशंकरा! आपण ही उपासना निर्विघ्नपणे मजकडून करून घ्यावी व इष्ट फल थावे अशी प्रार्थना करतो!” असे हात जोडून तेथे म्हणाये, मग रोज जमत असल्यारी तेथे किंवा स्वतःच्या घरी पुढील क्रमाने पोथीचे अध्याय वाचावेत.

सोमबार अध्याय १ व २

मंगळवार -अध्याय ३ व,४

बुधवार-अध्याय ५ व ६

गुरुवार-अध्याय ७ व ८

शुक्रबार-अध्याय ९ व १०

शनिवार-अध्याय ११ व १२

रविवार-अध्याय १३,१४ व १५

रविवार रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य शंकराला दाखवावा व प्रसाद म्हणून ते अन्न स्वतः सेवन करावे, उद्यापन म्हणून वाचन झाल्यावर त्याच दिवशी शिवमंदिरात जावे व शंकराला ११ बेल त्रिदले वाहावीत. एक कलश पाणी अभिषेक करावा. यथाशक्ति तांदूळ व द्रव्य अर्पण करावे. शैवसंप्रदायी साधूला ११ रुपये दक्षिणा ब शुभ्र बख दान यावे.

Shivleelaamrit Adhyay 1 In Marathi: या पोथीत दिलेली शिवमानसपूजा वाचावी, अर्थ वाचावा, ज्यांना संस्कृत म्हणता येत असेल त्यांनी शिवमहिम्नः स्तोत्र व इतर स्तोत्रे वाचाचीत, हे रोज सप्ताहभर करावे, आधी मानसपूजा, मग नेमलेले दोन अध्याय नंतर शिवमहिम्नः स्तोत्र व शिवस्तोत्रे म्हणावीत. शेवटच्या दिवशी घरात शंकराची पूजा, आरती करावी.

Shivleelaamrit Adhyay 1 In Marathi: पोथी घरात सर्वांनी ऐकावी अशी इच्छा असेल तर ज्याला किंवा जिला स्पष्ट वाचन करता येत असेल त्याने किवा तिने रोज ठरावीक वेळी पोथी वाचावी व सर्वांनी ऐकावी, सप्ताह पूर्ण झाल्यावर सर्वांना प्रसाद बाटावा,

“ॐ नमः शिवाय” या शिवमंत्राचा सर्वांनी त्या सप्ताहात त्या वेळी पोथी वाचनापूर्वी १०८ वेळा जप करावा.

अध्याय पहिला दाशार्ह आणि कलावती

Shivleelaamrit Adhyay 1 In Marathi: प्राचीन काळी नैमिषारण्यातील यक्षरात्रात शौनकादिकांच्या विनंतीवरून महामुनी गुल त्यांना शियमाध्यम म्हणाले, “सज्जन हो। शिवचरित्र अत्यंत अद्भुत आहे. त्याचे श्रर्द्धने श्रपण केल्याने सर्व पापांचा नाश होऊन आ च संपती प्राम होते. सर्व लीयें, व्रते व महायज्ञांचे फल प्राप्त होतेॐ नमः शिवाय’ या शिववाणाजश्री आधिव्याधीचे निरसन होऊन मनुष्याचे कल्याण होते आता याविषयीची एक कथा सांगतो

पूर्वी मथुरेत दाशार्ह नावाचा एक यदुवंशी राजा होऊन गेला. काशीराजाची कन्या कलावती ही त्याची पत्नी एकदिवशि बोलावूनही ती आली नाही म्हणून राजा स्वतः तिच्या महालात गेला व तिला आपली सहवासाची इच्छा सांगितली जाती म्हणाली, “नाथ, सध्या मी शिवोपासना करीत असून व्रतस्थ आहे तरी मला डामा करा पण कामातुर राजाने तिचेनकिताली तिला आपल्या मिठीत घेतले.

Shivleelaamrit Adhyay 1 In Marathi: तेव्हा त्याचे अंग अक्षरशः होरपळले, त्या अनुभवाने थक्क झालेल्या राजाने राणीन्लाहाकारा प्रकार आहे,’ असे विचारताच ती म्हणाली, “नाप, मी दुर्वासांकडून ‘नमः शिवाय।’ मंत्राची दीक्षा घेतली आहे ज्याचा जप केल्याने भी पायन झाले आहे. तुम्ही जप, तप, शिवार्चन यापैकी काही करीत नाही. अमध्य माण, विचार आणि पापाचरण केल्याने तुमचे शरीर अपवित्र झाले आहे न्यामुळे तुमच्या नशिबी पुढे नरकयातनाच आहेत ते ऐकून राजाला पश्चात्ताप याटू लागला. त्याने कलापतीला शिवमंत्र देण्याची विनती केली. पण पती गुरुरथानी असल्यामुळे दिने त्याला मंत्र न देता गर्गमुनर्नीकडे नेले.”

Shivleelaamrit Adhyay 1 In Marathi: गर्नमुनीनी राजाचा मनोभाय जाणून त्याच्याकडून शिवपूजन करवून घेतले आणि आपला बादहरन त्याच्या महतकी दूत त्याला शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला, त्या मंत्रप्रभावाने राजाला आत्मबोध झाला त्याच्या हृदयातील अवशानाचे व विकाराचे निरसन झाले. त्याच वेळी त्याच्या शरीरातून पापरूपी असंख्य कावळे जळत होरपळत बाहेर पड़ने, त्यामुळे राजा नियায় झात्ता. ‘आपण माझा उद्धार केलात,’ असे म्हणून त्याने मुनींना बंदन केले. आपल्या राज्यात परतल्यावर तो शिवमंत्राचा सतत जप करू लागला, त्याच्या प्रभावाने राजाचे व त्याच्या प्रजेचे कल्याण झाले,

।। श्रीशिवलीलामृत अध्याय पहिला ।।

श्रीगणेशाय नमः

।। श्रीसरस्वत्यै नमः ।। श्रीगुरुभ्यो नमः ।। श्री श्रीसांबसदाशिवाय नमः ।। ॐ नमोजी शिवा अपरिमिता । आदि अनादि शि मायातीता। पूर्णब्रह्मानंदा शाश्वता । हेरंबताता जगद्वरो ज्योतिर्मयस्वरूपा पुराणपुरुषा । अनादिसिद्धा आनंदवनविलासा । ला मायाचक्रचालका अविनाशा । अनंतवेषा जगत्पते ||२|| जय जय मृ विरूपाक्षा पंचवदना । कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या । विश्वंभरा कर्ममोचकगहना । त मनोजदहना मनमोहन जो ||३|| भक्तवल्लभ तूं हिमनगजामात । भाललोचन नीलग्रीव उमानाथ। मस्तकीं स्वर्धनी विराजित। जातिसुमनहारवत जी अ ।।४।। पक्षिरथप्रिय त्रिपुरांतक । यक्षपतिमित्र प्रतापार्क। दक्षमखविध्वंसक मृगांक । निष्कलंक तव मस्तकीं ।।५।।

विशाळ भाळ कर्पूरगौरवर्ण। काकोलभक्षक निजभक्तरक्षण। विश्वसाक्षी भस्मलेपन । भयमोचन भवहारक जो ।।६।। जो सर्गस्थित्यंतकारण। त्रिशूलपाणी शार्दूलचर्मवसन । स्कंदतात ११ सुहास्यवदन । मायाविपिनदहन जो ||७|| जो सच्चिदानंद निर्मळ । शिव शांत ज्ञानघन अचळ । जो भानुकोटितेज अढळ । सर्वकाळ व्यापक जो ।।८।। सकलकलिमलदहन कल्मषमोचन । अनंतब्रह्मांडनायक जगरक्षण। श्री पद्मजतातमनरंजन। जननमरणनाशक जो ।।९।। कमलोद्भव कमलावर । दशशतमुख दशशतकर। दशशतनेत्र सुर भूसुर। अहोरात्र ध्याती जया ।।१०।। भव भवांतक भवानीवर। स्मशानवासी गिरां अगोचर। जो स्वर्धनीतीरविहार। विश्वेश्वर काशीराज जो ।।११।।

व्योमहरण व्यालभूषण। मु जो गजदमन अंधकमर्दन । ॐकार महाबलेश्वर आनंदघन । मदगर्वभंजन त अज अजित जो ।।१२।। अमितगर्भ निगमागमनुत । जो दिगंबर अवयवरहित । उज्जयिनीमहाकाल कालातीत। स्मरणें कृतांतभय नाशी अ ।।१३।। दुरितकाननवैश्वानर । जो ला वेणुनृपवरमहत्पापहर। घृष्णेश्वर निजजनचित्तचकोरचंद्र। सनातन जो ।।१४।। जो उमाहृदयपंजरकीर। जो निजजनहृदयाब्जभ्रमर। जो सोमनाथ शशिशेखर। सौराष्ट्रदेशविहारी जो ।।१५।। कैरवलोचन करुणासमुद्र । रुद्राक्षभूषण १२ रुद्रावतार। भीम भयानक भीमाशंकर । तपा पार नाहीं ज्याच्या ।।१६।।  नागदमन नागभूषण। नागेंद्रकुंडल नागचर्मपरिधान । ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण। नागाननजनक जो ।।१७।।

वृत्रारिशत्रुजनकवरदायक । बाणवल्लभ श्री पंचबाणांतक । भवरोगवैद्य त्रिपुरहारक । वैजनाथ अत्यद्भुत जो ।।१८।। त्रिनयन त्रिगुणातीत । त्रितापशमन त्रिविधभेदरहित। त्र्यंबकराज लो त्रिदोषानलशांत। करुणाकर बलाहक जो ||१९|| कामसिंधुरविदारक ला कंठीरव । जगदानंदकंद कृपार्णव । हिमनगवासी हैमतीधव । हिमकेदार मृ अभिनव जो ||२०|| पंचमुकुट मायामलहरण । निशिदिन गाती आम्नाय त गुण। नाहीं जया आदि मध्य अवसान । मल्लिकार्जुन श्रीशैलवासी ||२१।। जो शक्रारिजनकांतकप्रियकर । भूजासंतापहरण जोडोनि कर। जेथे तिष्ठत अ अहोरात्र। रामेश्वर जगदूरु ||२२||

ऐसिया शिवा सर्वोत्तमा । अजा अजिता ध्या ब्रह्मानंदधामा । तुझा वर्णावया महिमा। निगमागमां अतर्क्स ॥२३।। ब्रह्मानंद म्हणे श्रीधर । तव गुणार्णव अगाध थोर । तेथें बुद्धि चित्त तर्क पोहणार। न पावती पार तत्त्वतां ||२४|| कनकाद्रिसहित मेदिनीचे वजन । १३ करावया ताजवा आणू कोठून। व्योम सांठवे संपूर्ण। ऐसें सांठवण कोठून आणूं ।।२५।। मेदिनीवसनाचें जळ आणि सिकता। कोणत्या मापें मोजूं आतां। प्रकाशावया आदित्या। दीप सरता केवीं होय ॥ २६।। धरित्रीचं श्री करूनि पत्र। कुधर कज्जल जलधि मषीपात्र। सुरदूम लेखणी विचित्र।  करूनि लिहित कंजकन्या ।। २७ ।। तेहि तेथे राहिली तटस्थ। तरी आतां केंवीं करूं ग्रंथ। जरी तूं मनीं धरिसी यथार्थ। तरी काय एक न होय ला ।।२८।।

द्वितीयेचा किशोर इंदु । त्यासी जीर्णद वाहाती दीनबंधु । तैसे तुझे गुण करुणासिंधु । वर्णीतसें अल्पमती ।।२९।।  सत्यवतीहृदयरत्नमराळ। भेदीत गेला तव गुणनिराळ। अंत न कळेचि समूळ । तोही तटस्थ राहिला ।। ३० ।। तेथे मी मंदमति किंकर । केवीं क्रमं  शके महिमांबर। परी आत्मसार्थक करावया साचार। तव गुणार्णवीं मीन झालों ||३१|| ऐसे शब्द ऐकतां साचार। तोषला दाक्षायणीवर। म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर। आरंभीं रस भरीन मी ।।३२।। जैसा धरूनि शिशूचा हात। अक्षरे लिहवी पंडित। तैसे तव मुखें मम गुण समस्त । सुरस अत्यंत बोलवीन मी ।।३३।। श्रोतीं व्हावें सावधचित्त । स्कंदपुराणींबोलिला श्रीशुकतात । अगाध शिवलीलामृत ग्रंथ। ब्रह्मोत्तरखंड जे ।।३४।।

नैमिषारण्यीं शौनकादि सुमती। सूताप्रती प्रश्न करिती । तूं चिदाकाशींचा रोहिणीपती। करी तृप्ति श्रवणचकोरां ।।३५।। तुवां बहुत पुराणें सुरस। श्रीविष्णुलीला वर्णिल्या विशेष । अगाध महिमा आसमास । दशावतार  वर्णिले ।।३६।। भारत रामायण भागवत । ऐकतां श्रवण झाले तृप्त । परी ला शिवलीलामृत अद्भुत । श्रवणद्वारें प्राशन करूं ।।३७।। यावरी  वेदव्यासशिष्य सूत । म्हणे ऐका आतां देऊनि चित्त । शिवचरित्र परमाद्भुत ।  श्रवणें पातकपर्वत जळती ।।३८ ।। आयुरारोग्य ऐश्वर्य अपार । संतति संपत्ति ज्ञानविचार । श्रवणमात्रं देणार। श्रीशंकर निजांगें ।। ३९ ।।

सकळ तीर्थव्रतांचे फळ। महामखांचे श्रेय केवळ । देणार शिवचरित्र निर्मळ । श्रवणें कलिमल नासती ।।४०।। सकल यज्ञांमाजी जपयज्ञ थोर। म्हणाल जपावा कोणता मंत्र । तरी मंत्रराज शिवषडक्षर। बीजसहित जपावा ।।४१।। दुजा मंत्र शिवपंचाक्षर। दोन्हींचे फळ एकचि साचार। उतरी संसारार्णव पार। २५ ब्रह्मादिसुरऋषी हाचि जपती ।।४२।। दारिद्र्य दुःख भय शोक । काम क्रोधद्वंद्व पातक । इतुक्यांसही संहारक। शिवतारक मंत्र जो ॥४३।। तुष्टिपुष्टिधृत्तिकारण। मुनिनिर्जरांसी हाचि कल्याण। कर्ता मंत्रराज संपूर्ण। श्री अगाध महिमा न वर्णवे ।।४४।। नवग्रहांत वासरमणि थोर। तैसा मंत्रांत शि शिवपंचाक्षर। कमलोद्भव कमलावर। अहोरात्र हाचि जपती ॥॥४५॥

जी शाखांमाजी वेदान्त। तीर्थांमाजी प्रयाग अद्भुत । महास्मशान क्षेत्रांत । ला मंत्रराज तैसा हा ।।४६।। शत्रांमाजी पाशुपत । देवांमाजी कैलासनाथ। म कनकाद्रि जैसा पर्वतांत। मंत्र पंचाक्षरी तेीं हा ।।४७।। केवळ परमतत्त्व त वन्मात्र। परब्रह्म हेंचि तारक मंत्र । तीर्थव्रतांचे संभार। ऑवाळूनि टाकावे ॥४८॥ हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी। कैवल्यमागींचा प्रकाशतरणी। अ अविद्याकाननदाहक ब्रह्माग्नी। सनकादिक ज्ञानी हाचि जपती ।।४९।। स्त्री प्या शूद्र आदिकरूनी। हाचि जप मुख्य चहूं वणीं। गृहस्थ ब्रह्मचारी आदिकरूनी। दिवसरजनीं जपावा ।।५०।। जागृतीं स्वप्नीं येतां जातां। उभं असतां निद्रा करितां । कार्या जातां बोलतां भांडतां । सर्वदाही जपावा  ।।५१।। शिवमंत्रध्वनिपंचानन । कणीं आकर्णितां दोषवारण। उभेचि

ली सांडिती प्राण। न लागतां क्षण भस्म होती ।।५२।। न्यास मातृकाविधि आसन। नलगे जपावा प्रीतीकरून। शिव शिव उच्चारितां पूर्ण। शंकर येऊनि पुढे उभा ।।५३।। अखंड जपती जे हा मंत्र । त्यांसी निजांगें रक्षी त्रिनेत्र। आपुल्या अंगाची साउली करी पंचवक्त्र। अहोरात्र रक्षी तयां ।।५४।। मंत्रजपकांलागुनी। शिव म्हणे मी तुमचा ऋणी । परी तो मंत्र ला गुरुमुखेंकरूनी। घेईजे आधीं विधीनें ।।५५।। गुरु करावा मुख्यवर्ण। भक्ति वैराग्य दिव्यज्ञान। सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण। या चिन्हेंकरून मंडित जो त ।।५६।। मितभाषणी शांत दांत। अंगीं अमानित्व अदंभित्व । अहिंसक अतिविरक्त । तोचि गुरू करावा ।।५७।।

वर्णानां ब्राह्मणो गुरुः। हा वेदवचनें निर्धारु। हा त्यापासोनि मंत्रोच्चारु। करोनि घ्यावा प्रीतीनें ।।५८।। जरी आपणासी ठावुका मंत्र । तरी गुरुमुखें घ्यावा निर्धार। उगाचि जपे तो अविचार। तरी निष्फळ जाणिजे ।।५९।। कामक्रोधमदयुक्त। जे कां प्राणी गुरुविरहित। त्यांनी ज्ञान कथिलें बहुत । परी त्यांचें मुख न पहावें ।।६०।। वेदशास्त्रे शोधून। जरी झालें अपरोक्षज्ञान । करी संतांसीं चर्चा पूर्ण। तरीगुरुविण तरेना ।।६१।। एक म्हणती स्वप्नीं आम्हांतें। मंत्र सांगितला भगवंतें। आदरें सांगे लोकांतें। परी तो गुरुविण तरेना ।। ६२।।

प्रत्यक्ष येऊनियां देव। सांगितला जरी गुह्यभाव। तरी तो न तरेचि स्वयमेव । गुरूसी शरण न रिघतां ।। ६३ ।। मौजिबंधनेंविण गायत्रीमंत्र। जपे तो भ्रष्ट अपवित्र । वराविण वऱ्हाडी समग्र । काय व्यर्थ मिळोनी ।। ६४ ।। तो वाचक झाला बहुवस । परी त्याचे न चुकती गर्भवास । म्हणोनि संप्रदाययुक्त गुरूस । शरण जावें निधर्धारं ।। ६५।। जरी गुरु केला भलता एक। परी पूर्णसंप्रदाय नसे ठाऊक । जैसें गर्भाधास सम्यक । वर्णव्यक्त स्वरूप न कळेचि ।। ६६ ।।

असो त्या मंत्राचें पुरश्चरण । उत्तम क्षेत्रीं करावें पूर्ण। काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य। गोकर्णक्षेत्र आदिकरूनी ।।६७।। शिव-विष्णुक्षेत्र सुगम । पवित्र स्थळीं जपावा सप्रेम । तरी येचिविषयीं पुरातन उत्तम । कथा सांगेन ते ऐका ॥६८॥ श्रवणीं पठणीं निदिध्यास । आदरें धरावा दिवसेंदिवस । अनुमोदन देतां कथेस । सर्व पापास क्षय होय ।।६९।। श्रवण मनन निजध्यास। घरितां साक्षात्कार होय सरस । ब्रह्मघ्न मार्गघ्न तामस । श्रवणें पावन सर्व होती ।। ७० ।। तरी मथुरानाम नगर। यादववंशीं परम पवित्र। दाशार्हनामें राजेंद्र। अति उदार सुलक्षणी ।।७१||

सर्व राजे देती करभार । कर जोडोनि नमिती वारंवार । त्यांच्या मुकुटरत्नकिरणें साचार। प्रपदें ज्याचीं उजळलीं ।। ७२ ।। मुकुटघर्षणेंकरूनी। किरणें पडली दिसती चरणीं। जेणें सत्तावसन पसरूनी । पालाणिली कुंभिनी हे ।। ७३ ।। उभारिला यशोध्वज । जेवीं शरत्काळींचा द्विजराज । सकल प्रजा आणि द्विज। चिंतिती कल्याण जयाचें ।।७४ ।। जैसा शुद्धद्वितीयेचा हिमांश । तेवीं ऐश्वर्य चढे विशेष । जो दुर्बुद्धिदासीस । स्पर्श न करी कालत्रयीं ।॥७५।। सद्बुद्धिधर्मपत्नीसी रत। स्वरूपासी तुळिजे रमानाथ। दानशस्त्रे समस्त । याचकांचे दारिद्र्य निवटिले ।।७६ ।।

भूभुजांवरी जामदग्य । समरांगणीं जेवीं प्रळयाग्न । ठाण न चळे रणींहून । कुठारघायें भूरुह जैसा ॥७७॥ चतुर्दश विद्या चौसष्टी कळा। आकळीं जेवीं करतळींचा आंवळा । जेणें दानमेघे निवटिला । दारिद्रयधुरोळा याचकांचा ।।७८ ।। बोलणें अति मधुर। मेघ गर्जे जेवीं गंभीर। प्रजाजनांचे चित्तमयूर। नृत्य करिती स्वानंदें ।।७९।। ज्याचासेनासिंधु देखोनि अद्भुत । जलसिंधु होय भयभीत । निश्चळ अंबरींचा ध्रुव सत्य। वचन तेवीं न चळेचि ।।८०।। त्याची कांता रूपवती सती। काशीराजकुमारी नाम कलावती । जिचं स्वरूप वर्णी सरस्वती। विश्ववदनेंकरूनियां ॥ ८१ ॥

ते लावण्यसागरींची लहरी । खंजनाक्षी बिंबाधरी। मृदुभाषिणी पिकस्वरी। हंसगमना हरिमध्या ||८२।। शशिवदना भुजंगवेणी। अलंकारा शोभा जिची तनु आणी । दशन झळकती जेवीं हिरेखाणी। बोलतां सदनीं प्रकाश पडे ।।८३।। सकलकलानिपुण। यालागी कलावती नाम पूर्ण। जें सौंदर्यवैरागरींचे रत्न । जें निधान चातुर्यभूमीच ।।८४।। आंगींचा सुवास न माये सदनांत । जिचें मुखाब्ज देखतां नृपनाथ नेत्रमिलिंद रुंजी घालित । धणी पाहतां न पुरेचि ।। ८५ ।।

नूतन आणिली पर्णन । मनसिजें आकर्षिलें रायाचें मन । बोलावू पाठविलें प्रीतीकरून । परी तेन येचि प्रार्थितां ।।८६।। स्वरूपशृंगारजाळे पसरून । आकर्षिला नृपमानस-मीन। यालागीं दाशार्हराजा उठोन । आपणचि गेला तिजपाशी ॥८७॥ म्हणे शृंगारवल्ली शुभांगी। मम तनुवृक्षासी आलिंगीं। उत्तमतंव ते पुत्रफल प्रसवसी जगीं। अत्यानंदें सर्वां देखतां ।।८८।। शृंगारसरोवरमराळी । बोले सुहास्यवदना वेल्हाळी। म्हणे म्यां उपासिला शशिमौळी । सर्वकाळ व्रतस्थ असें ।।८९।। जे स्त्री रोगिष्ठ अत्यंत । गर्भिणी किंवा ऋतुस्नात । अभुक्त अथवा व्रतस्थ । वृद्ध अशक्त न भोगावी ॥९०।। स्त्रीपुरुर्षे हर्षयुक्त । असावीं तरुण रूपवंत । अष्टभोगेंकरोनि युक्त। चिंताग्रस्त नसावीं ।।९१।। पर्वकाळ व्रतदिन निरसून। उत्तमकाळीं षडूस अन्ने भक्षून। मग ललना भोगावी प्रीतीकरून । राजलक्षण सत्य हैं ।। ९२।।

राव काममदें मत्त प्रचंड । रतिभरें पसरोनि दोर्दंड। आलिंगन देतां बळें प्रचंड । शरीर त्याचे पोळलें ।।९३।। लोहार्गला तप्त अत्यंत । तैसी कलावतीची तनु पोळत । नृप वेगळा होऊनि पुसत । कैसा वृत्तान्त सांग हा ।।९४।। शृंगारसदनविलासिनी। मम हृदयानंदवर्धिनी । सकळ संशय टाकुनी। मुळींहूनि गोष्टी सांग ।।९५।। म्हणे हे राजचक्रमुकुटावतंस। क्रोधें भरों नेदीं मानस । माझा गुरु स्वामी दुर्वास । अनुसूयात्मज महाराज ।।९६।। त्या गुरूनें परम पवित्र। मज दिधला शिवपंचाक्षरी मंत्र। तो जपतां अहोरात्र ।परम पावन पुनीत मी ।। ९७ ।। ममांग शीतळ अत्यंत । तव कलेवर पापसंयुक्त । अगम्यागमन केलें विचाररहित। अभक्ष्य तितुकें भक्षिले ।।९८।। मज श्रीगुरुदयेंकरून। राजेंद्रा आहे त्रिकाळज्ञान । तुज जप तप शिवार्चन। घडलें नाहीं सर्वथा ।।९९।।

घडलें नाहीं गुरुसेवन । पुढें राज्यांती नरक दारुण। ऐकतां राव अनुतापेंकरून । सद्गदित जाहला ।।१००।। म्हणे कलावती गुणगंभीरे। तो शिवमंत्र मज देई आदरें। ज्याचेनि जपें सर्वत्र । महत्पापें भस्म होती ।।१।। ती म्हणे हे भूभुजेंद्र । मज सांगावया नाहीं अधिकार। मी वल्लभा तूं प्राणेश्वर। गुरु निर्धारं तू माझा ॥२॥ तरी यादवकुळीं गुरु वरिष्ठ । गर्गमुनि महाराज श्रेष्ठ । जो ज्ञानियांमाजी दिव्यमुकुट । विद्या वरिष्ठ तयाची ||३|| जैसे वसिष्ठ वामदेव ज्ञानी । तैसाच महाराज गर्गमुनी। त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी । शिवदीक्षा घेइंजे ।।४।। मग कलावतीसहित भूपाळ। गर्गाश्रमीं पातला तत्काळ । साष्टांग नमूनि करकमळ । जोडूनि उभा ठाकला ।।५।। अष्टभावें दाटूनि हृदयीं। म्हणे शिवदीक्षा मज देई। म्हणूनि पुढती लागे पायीं। मिती नाहीं भावार्था ।।६।।

यावरी तो गर्गमुनी। कृत्तान्तभगिनीतीरा येऊनी। पुण्यवृक्षातळीं बैसोनि । स्नान करवी यमुनेंचे ॥७॥ उभयतांनीं करुनी स्नान। यथासांग केलें शिवपूजन। यावरी दिव्य रत्नें आणून । अभिषेक केला गुरूसी ।।८।। दिव्याभरणें दिव्य वस्त्रे। गुरु पूजिला नृपें आदरें। गुरुदक्षिणेसी भांडारे। दाशार्हरायें समर्पिलीं ।।९।। तनुमंनधनेंसीं उदार। गर्गचरणीं लागे नृपवर। असोनि गुरूसी वंचिती जे पामर। ते दारुण निरय भोगिती ।।११०।। श्रीगुरूंचे घरीं आपदा। आपण भोगी सर्व संपदा । कैचें ज्ञान त्या मतिमंदा। गुरुब्रह्मानंदा न भजे जो ।।११।। एक म्हणती तनु मन धन। नाशिवंत गुरूसी काय अर्पन। परम चांडाळ त्याचें शठज्ञान। कदा वदन न पहावें ।।१२।। धिक् विद्या धिक् ज्ञान। धिक् वैराग्य धिक् साधन । चतुर्वेद शास्त्रे आला पढून। धिक् पठण तयाचें ||१३||

जैसा खरपृष्ठीवरी चंदन । षड्रसीं दर्वी व्यर्थ फिरून । जेवीं मायें तंदुल मोजून । इकडून तिकडे टाकिती ।।१४।।० घाणा इक्षुरस गाळी। इतर सेविती रस नव्हाळी । कीं पात्रांत शर्करा सांठविली । परी गोडी न कळे तया ।।१५।। असो ते अभाविकखळ। तैसा नव्हे तो दाशार्हनृपाळ । षोडशोपचारें निर्मळ । केलें पूजन गुरूचें ।।१६।। उभा ठाकला कर जोडून । मग तो गर्ने हृदयीं धरून। मस्तकीं हस्त ठेवून। शिवपंचाक्षर मंत्र सांगे ।।१७।। हृदयआकाश-भुवनी। उगवला निजबोधतरणी। अज्ञानतम तेचि क्षणीं। निरसूनि नवल जाहले ।।१८।।

अद्भुत मंत्राचें महिमान । रायाचिया शरीरामधून । कोट्यवधि काक निघोन। पळते झाले तेधवां ॥१९॥ कितीएकांचे पक्ष जळाले चरफडतचि बाहेर आले। अवघेचि भस्म होऊनी गेले। संख्या नाहीं तयांत ।।१२०।। जैसा किंचित पडतां कृशान। दग्ध होय कंटकवन । तैसे काक गेले जळोन। देखोनि राव नवल करी ।।२१।। गुरूसी नमोनि पुसे नृप। काक कैंचे निघाले अमूप। माझें झालें दिव्य रूप। निर्जरांहूनि आगळे ।।२२।। गुरु म्हणे ऐक साक्षेपें। अनंत जन्मींची महापायें। बाहेर निघाली

काकरूपे। शिवमंत्रप्रतापे भस्म झार्ली ।।२३।। निष्पाप झाला नृपवर । गुरुस्तवन करी वारंवार । धन्य पंचाक्षरी मंत्र। तूं धन्य गुरु पंचाक्षरीनिरसून। केलें पावन गुरुराया ||२५|| पंचवीस तत्त्वांचा मेळ । त्यांत सांपडलों बहुत काळ। क्रोधमहिषासुर सबळ । कामवेताळ धुसधुसी ।।२६।। आशा मनशा तृष्णा कल्पना । भ्रांति भुली इच्छा वासना। या जखिणी यक्षिणी नाना। विटंबीत मज होत्या ||२७|| ऐसा हा अवधा मायामेळ। तुवां निरसिला तत्काळ । धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ । गुरु दयाळ धन्य तूं ।। २८ ।। सहस्रजन्मपर्यंत । मज ज्ञान झालें समस्त । पायें जळाली असंख्यात । काकरूपें देखिलीं म्यां ॥२९॥ सुवर्णस्तेय अभक्ष्यभक्षक। सुरापान गुरुतल्पक । परदारागमन गुरुनिंदक। ऐसीं नाना महत्पापें ।।१३०।। गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक। स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक। परनिंदा पशुहिंसक । वृत्तिहारक अगम्यस्त्रीगामी ॥३१।।

मित्रद्रोही गुरुद्रोही। विश्वद्रोही वेदद्रोही। प्रासादभेद लिंगभेद पाहीं। पंक्तिभेद हरिहरभेद ।।३२।। ज्ञानचोर पुस्तकचोर पक्षिघातक । पाखांडमति मिथ्यावादक । भेदबुद्धि भ्रष्टमार्गस्थापक । स्त्रीलंपट दुराचारी ||३३|| कृतघ्न परद्रव्यापहारक । कर्मभ्रष्ट तीर्थमहिमाउच्छेदक। बकध्यानी गुरुछळक ।मातृहतक पितृहत्यारा ।।३४।। दुर्बलघातक कर्ममार्गघ्न । दीनहत्यारी पाहती पैशून्य। तृणदाहक पीडिती सज्जन । गोत्रवध भगिनीवध ॥ ३५।। कन्याविक्रय गोविक्रय। हयविक्रय रसविक्रय। ग्रामदाहक आत्महत्या पाहै। भ्रूणहत्या महापापें ।। ३६ ।। हीं महापापें सांगितलीं। क्षुद्रपार्पे नाहीं गणिली। इतुकीं काकरूपें निघालीं। भस्म झालीं प्रत्यक्ष ।। ३७ ।। कांहीं गांठीं पुण्य होतें परम । म्हणोनि नरदेह पावलों उत्तम। गुरुप्रतापें तरलों निःसीम। काय महिमा बोलूं आतां ||३८||

गुरुस्तवन करूनि अपार । ग्रामासी आला दाशार्ह नृपवर। सर्वे कलावती परम चतुर । केला उद्धार रायाचा ।।३९।। जपतां शिवमंत्र निर्मळ । राज्य वर्धमान झालें सकळ । अवर्षणदोष दुष्काळ। देशांतूनि पळाले ।।१४०।। वैधव्य आणि रोग मृत्यू । नाहींच कोठें देशांत। आलिंगितां कलावतीसी नृपनाथ। शशीऐसी शीतळ वाटे ।।४१।। शिवभजनीं लाविले सकळ जन । घरोघरीं होत शिवकीर्तन । रुद्राभिषेक शिवपूजन। ब्राह्मणभोजन यथाविधि ।।४२।। दाशार्हरायाचें आख्यान । जे लिहिती ऐकती करिती पठण । प्रीतीकरूनि ग्रंथरक्षण । अनुमोदन देती जे

।।४३।। सुफळ त्यांचा संसार। त्यांसी निजांगें रक्षी श्रीशंकर। धन्य धन्य तेचि नर। शिवमहिमा वर्णिती जे ।।४४।। पुढें कथा सुरस सार। अमृताहूनि रसिक फार। ऐकोत पंडित चतुर । गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे ।।४५।। पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी। श्रीधरमुख निमित्त करूनी । तोचि बोलवीत विचारोनी। पहावें मनीं निधरिं ।।४६।। श्रीधरवरद पांडुरंग। तेणें शिरीं धरिलें शिवलिंग। पूर्ण ब्रह्मानंद अभंग। नव्हे विरंग कालत्रयीं ।॥४७॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड। स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड। परिसोत सज्जन अखंड । प्रथमाध्याय गोड हा ।।१४८।।

।। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।। ।। शुभं भवतु ।।

Shivleelaamrit Adhyay 1 In Marathi: आठवणीतले प्रेम व्हॅलेंटाईन डे ती सध्या काय करते!

Shivleelaamrit Adhyay 1 In Marathi: Premanand Maharaj In Marathi 2025; वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..

 शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

असं करा इम्प्रेस तुमच्या व्हॅलेंटाईन पार्टनरला!

थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!

 तुमचं जीवन बदलणारे रहस्य !

 accused-absenteeism-and-the-dispensing-of-313-statements-a-case-study-of-the-bombay-high-courts-approach-in-navneet-singh-gogia-vs-state-of-maharashtra/embed/

Loading