Shivleelaamrit Adhyay 3 In Marathi: कथा सारा सहित शिवलीलामृताचा २ अध्याय
Shivleelaamrit Adhyay 3 In Marathi:नमस्कार वाचकहो, तुम्ही संपूर्ण शिवलीलामृत कधी वाचले आहे का? शिवरात्रीच्या निमित्ताने, शिवभक्तांसाठी एक खास भेट.’शिवलीलामृत’ पारायणाची माहिती आणि कथासार… ‘शिवलीलामृत’ हे एक दिव्य ग्रंथ आहे, ज्याच्या पारायणाने भक्तांना अनेक लाभ मिळतात.
शिवरात्रीच्या काळात याचे पारायण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. ‘शिवलीलामृत’ पारायण कसे करावे? त्याचे लाभ काय आहेत? ‘शिवलीलामृत’ मध्ये किती अध्याय आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेख मालिकेत मिळतील.
Shivleelaamrit Adhyay 3 In Marathi: या लेख मालिकेत आम्ही तुम्हाला ‘शिवलीलामृत’ कथासार, प्रत्येक अध्यायाची माहिती आणि पारायणाची सोपी पद्धत सांगणार आहोत. रोज एक अध्याय वाचा आणि शिवलीलामृताच्या दिव्य अनुभवात सहभागी व्हा. तर, शिवरात्रीच्या या पवित्र काळात, ‘शिवलीलामृत’ पारायणाने आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणा. आमच्या लेख मालिकेत रोज अध्याय वाचा आणि शिवकृपेचा अनुभव घ्या.
Shivleelaamrit Adhyay 3 In Marathi: तर आज या लेखात आपण शिवलीलामृताचा तिसरा अध्याय पाहणार आहोत.
श्रीशिवलीलामृत ग्रंथाचे वाचन आपली संकटे दूर होऊन आपले सर्व ऐहिक व पारलौकिक कल्याण होण्यासाठी फार उपयुक्त आहे. या ग्रंथाचे सपूर्ण पारायण एका समाहात पूर्ण करावे. त्याचा रोजचा पाठ किती करावा ते पुढे दिले आहे.
अध्याय तिसरा राजा कल्माषपादाची कथा
Shivleelaamrit Adhyay 3 In Marathi: सुत म्हणाले, “सजन हो। पूर्वी इवाफू वंशात मित्रसह नावाचा एफ चक्रवर्ती सम्राट होउन लागला असताना त्याने एका राक्षसाला मारले म्हणून सूडाने पेटलेल्या त्याच्या भावाने मनुष्यपाल राजाची मेट घेतली ना पाककौशल्य दाखवून त्वाच्या प्रसादात आधाऱ्याची नोकरी मिळवली. पुढे नृपमेटीस आले असतानान्याने भाज्यांमध्ये नरमांत शिजवून पंक्तीत वाढले. ही गोष्ट अंतांनी विशांना समताच त्यांनी संतापाने राजाला तू निर्जन वनातील राक्षस होऊन नरमांस खाशीत’ असा शाप दिला.
राजाने चौकशीसाठी आचान्याला बोलावले, पण तो केन्हाच पळाला होता तेव्हा ऊभीनी अकारण शाप दिला म्हणून संतापलेल्या राजाने त्यांना प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतले, पण पराणी मदयंतीने त्याला परावृत्त केले, राजाने ते पाणी आपल्याच पायावर टाकले. त्यामुळे पाय काळे पडून स्वाता ‘कल्माषाद नाय पडले, सत्य प्रकार कळताच ऋषींनी त्याला ‘तू बारा वर्षानी राक्षसयोनीतून मूलतः होशील, असा शाप दिला.
ऋषिशापाने राक्षस झालेला कल्माषपाद भुकेने कासावीस होऊन भटकत असता त्याने एका ब्राह्मणास खाऊन टाकले म्हणून त्याच्या पत्नीने (ब्राह्मणीने) त्याला ‘तू शापमुक्त होऊन घरी जाशील तेव्हा पत्नीशी रममाण होताच मरण पावशील, असा शाप दिला. त्यानंतर ती सती गेली. शापमुक्त होऊन राजा घरी परतला तेव्हा त्याने ही गोष्ट आपल्या स्त्रियांना सांगितली त्यामुळे त्यांना खूप दुःख झाले.
या सर्व घटनांनी बेचैन झालेल्या राजाने गृहत्याग करून वनगमन केले. पुढे गौतमांची भेट झाल्यावर त्यांना स्वतःचे दुःख सांगून ‘वातून सुटका होण्यासाठी काही मार्गदर्शन करावे,’ अशी विनंती केली. तेव्हा गौतम ऋषींनी त्याला श्रीक्षेत्र गोकर्ण महाबळेश्वरची पावन कथा सांगितली. त्या क्षेत्राचे माहात्म्य विशद करत असताना एक अत्यंत पापिणी श्री गोकर्णक्षेत्री कशी आली, तिला शिवरात्रीस उपोषण, जागरण व पूजन कसे घडले आणि त्याच्या पुण्यप्रभावाने ती यमलोकी न जाता शिक्लोकी कशी गेली त्याविषयीची समग्र हकिकत सांगितली. गौतमांच्या मार्गदर्शनानुसार राजा कल्माषपाद श्रीक्षेत्र गोकर्णास गेला व तेथे शिव-आराधनेत रममाण होऊन ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त झाला व अंती शिवलोकी गेला.”

। श्रीशिवलीलामृत अध्याय तिसरा ॥ ।
श्रीगणेशाय नमः
।। जय जय शिव मंगलधामा । निजजनहृदय आरामा। चराचरफलांकितटुमा । नामाअनामातीत तूं ।।१।। इंदिरावरभगिनीमनरंजना । षडास्यजनका शफरीध्वजदहना। ब्रह्मानंदा भाललोचना। भवभंजना त्रिपुरांतका ।।२।। हे शिव सद्योजात वामअघोरा। तत्पुरुषा ईशाना ईश्वरा। अर्धनारीनटेश्वरा। गिरिजारंगा गिरीशा ||३|| गंगाधरा भोगिभूषणा। सर्वव्यापका अंधकमर्दना । परमातीता निरंजना। गुणत्रयविरहित तूं ।।४।। हे पयःफेनधवल जगज्जीवन । द्वितीयाध्यायीं कृपा करून । अगाध सुरस आख्यान । शिवरात्रिमहिमा वर्णविला ।।॥५॥ यावरी कैसी कथेची रचना । वदवीं पंचमुकुट पंचानना । शौनकादिकां मुनिजनां। सूत सांगे नैमिष्यारण्यी ।।६।।
इक्ष्वाकुवंशी महाराज । मित्रसहनामें भूभुज । वेदशास्त्रसंपन्न सतेज । दुसरा बिडौजा पृथ्वीवरी ।।७।। पृतनावसनेंकरून । घातलें उर्वीस पालाण। प्रतापसूर्य उगवला पूर्ण। शत्रुभगणें मावळली ।।८।। तो एकदां मृगयाव्याजेंकरून । निघाला धुरंधर चमू घेऊन । घोरांदर प्रवेशला विपिन ।मेनराड, तो सावजे चहुंकडून ऊठली ।।९।। व्याघ्न वृक रीस वनकेसरी। मृग मृगी वनगी वानर वानरी। शशकजंबुकांच्या हारी। संहारीत नृपवर ।।१०।। चातक मयूर बदका कस्तुरीकुरंग जवादिबिडालको नकुल राजहंस चक्रवाका पक्षी श्वापदे धावती ।।११।। नृपे मारिले जीव बहुवस । त्यातं एक मारिला राक्षस। महाभयानक तामस । गतप्राण होऊनि पडियेला ।।१२।।
त्याचा बंधु परम दारुण। तो लक्षिता झाला दुरोन। मनीं कापट्य कल्पून म्हणे सूड घेईन बंधूचा ।।१३।। मित्रसह पातला स्वनगरास । असुरे धरिला मानववेष । कृष्णवसनवेष्टित विशेष । दर्वी स्कंधीं घेऊनियां ।।१४।। नृपासी भेटला येऊन। म्हणे मी सूपशास्त्री परम निपुण। अन्न शाका सुवास करीन। देखोन सुर नर भूलती ।।१५।। रायें ठेविला पाकसदनीं । त्यावरी पितृतिथी लक्षुनी। गुरु वसिष्ठ घरालागुनी। नृपश्रेष्ठं आणिला ।।१६।। भोजना आला अब्जजनंदन । तों राक्षसे कापट्य स्मरून । शाकांत नरमांस शिजवून । ऋषीस आणून वाढिविलें ।।१७।। त्रिकाळज्ञानी वसिष्ठमुनी। सकळ ऋषींमाजी शिरोमणी। कापट्य सकळ जाणुनी। मित्रसह शापिला ।।१८।।
म्हणे तूं वनीं होई राक्षस । जेथे आहार न मिळे निःशेष । मी ब्राह्मण मज नरमांस । वाढिलें। कैसें पापिया ||१९।। राव म्हणे मी नेणें सर्वथा। बोलावा सूपशास्त्री जाणता । तंव तो पळाला क्षण न लागतां । गुप्तरूपें वना आपुल्या ।।२०।। राव कोपला दारुण । मज शापिलें काय कारण। मीही तुज शापीन म्हणोन । उदक करीं घेतलें ।।२१।। तंव रायाची पट्टराणी । मदयंती नामें पुण्यखाणी। रूपें केवळ लावण्यहरिणी। चातुर्य उपमे जेवीं शारदा ||२२|| मदयंती म्हणे राया। दूरदृष्टीं पाहें विचारूनियां। शिष्यें गुरूसी शापावया । अधिकार नाहीं सर्वथा ।।२३।। गुरूसी शाप देतां निर्धारीं। आपण नरक भोगावें कल्पवरी । राव म्हणे चतुर सुंदरी। बोललीस साच तें ।। २४।।
म्हणे हैं उदक खाली टाकूं जरी। तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री। मग आपुल्याच प्रपदांवरी । जल टाकी मित्रसह ।।२५।। तो जानूपर्यंत चरण । दग्ध झाले कृष्णवर्ण। कुष्ठ भरला मग तेथून । कल्माषपाद नाम त्याचें ||२६|| वसिष्ठं जाणोनि वृत्तान्त । रायासी उःशाप देत । म्हणे द्वादशवर्षी होशील मुक्त। येसी स्वस्थाना आपुल्या ।। २७।। गुरु पावला अंतर्धान । मग कल्माषपाद राक्षस होऊन ।क्षुधाक्रांत निशिदिन। बनी भक्षी जीव सर्व ||२८|| परम भयानक असुर विशाळ देह कपाळी शेंदुर । विक्राळ वदन बाहेर शुभ्र । दंतदादा वाढलिया ।।२९।। जीव भक्षिले आसमास । वनी हिंडतां तो राक्षस। एक ब्राह्मणकुमर डोळस । द्वादशवर्षी देखिला ।।३०।।
सर्वे त्याची ललना चिमणी। दोघे क्रीडती कौतुके बनीं। तंव तो ब्राह्मणपुत्र राक्षसे धरूनी। भक्षावया सिद्ध झाला ।।३१।। तंव त्याची वधू काकुळती येत। अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत । गोब्राह्मणप्रतिपाळक सत्य। माझा कांत मारूं नको ॥३२॥ गडबडां लोळे सुंदरी। करुणा भाकी पदर पसरी। सर्वेचि जाऊनि चरण घरी। सोडी झडकरी पति माझा ।।३३।। पतीस भक्षू नको राजेंद्रा । महत्पाप घेऊ नको एकसरां। स्वर्गमार्ग तरी चतुरा। कैसा पावसी अंतकाळीं ।।३४।। ऐसी करुणा भाकितां कामिनी । निर्दय भक्षिला तेचि क्षणीं। अस्थिपंजर टाकुनी। तियेपुढें दिधला ।।३५।। तंव ती दुःखेंकरूनी। आक्रोशें कपाळ पिटी धरणी। मृत्तिका घेवोनि घाली वदनीं । कोण वनीं सांवरी तीतें ।। ३६ ।।
मग तिनें शाप दिधला रायातें। जो अलोट विधिहरिहरांतें। म्हणे मदयंतीसंगसुरतें। प्राण जाईल तेचि क्षणी ||३७|| कोणे एके खीचा संगसोहळा। तुज न घडो रे चांडाळा। ऐसा शाप वदोनि ते वेळां । केल्या गोळा अस्थी पतीच्या ||३८|| तत्काळ प्रवेशली अग्नीं। इकडे द्वादशवर्षीं शापमुक्त होऊनि । राव स्वनगरा येऊनी। वर्तमान सांगे स्त्रियेसी ।।३९।। येरी कपाळ पिटी आक्रोशेंकरून । म्हणे झालें वंशखंडन । पत्तीस म्हणे ब्रह्मचर्य धरून। प्राण आपुला रक्षी कां ।।४०।। अनिवार अत्यंत मन। न करी कोणे त्रियेसीं संभाषण। खदिरांगाराची सेज आजपासून। झाली तुजलागीं जाण पां ।।४१।।
परम तळमळी राजेंद्र। जैसा सांपळां कॉडिला व्याघ्र। कीं महाभुजंगाचे दंत समग्र। पाडोनि गारुडी दीन करी ।।४२।। कीं नासिकी वेसण घालून । महावृषभ करिती दीन। कीं वनी निरंकुश वारण। धरून क्षीण करिती मग ।।४३।। तैसा कल्माषपाद भूप। होऊनि राहिला दीनरूप। पुढे प्रकाशावया कुळदीप। आपण धर्मशास्त्र पाहातसे ।।४४।। तेथींचे पाहोनि प्रमाण। वसिष्ठ मदयंतीस भोग देऊन । अमोघ वीर्य पडतां पूर्ण। दिव्य पुत्र जाहला ।।४५।। तेणें पुढे वंश चालिला। असो तो राव मृगयेस निघाला। ययारण्य तथा मूह वाटे भूपाला भोग त्यजिले सर्वही ॥४६॥ मनांत मनोजविकार उठता विवेकांशे कामइभ आवरीत म्हणे खीरा वैधव्य मज मृत्या ते कर्म सहसा न करावें ॥४७॥
आपुली कर्मगति गहन जान विचित्र दारुण। देवावरी काय बोल ठेवून। भोनिल्याचीण न सुटेचि ॥४८।। ऐसा राव उदासयुक्द बनी हिंडतां मार्गे पहात। ती विशाच भयानक अत्यंत रायापाठी उभे सदा ॥४९॥ दांपत्ये पूर्वी मारिली ती अहाहत्या पाठीसी लागली। राजा तीर्थ हिंडतां सकळी। परी कदाकाळी न सोडी ॥५०।। ন सोडी स्वप्नी जागृतीत। महाविक्राळ दांत करकरां खात। राये व्रत केली बहुत। दान देत बहुसाल ॥५१॥ ऐसा हिंडतां मिधुलानगरासमीप आला। वनश्री देखतां आनंदला । परी ब्रह्महत्या पाठीसी राय भागला। उभी ॥५२॥ वृक्ष लागले बहुत । आम्रवृक्ष फळभारे डोलत। पोफळी रातांजन विराजित । केळी नारळी खर्जुरिया ॥५३॥
चंपक जाई जुई मालती। मोगरे पुन्नागराज शेवंती। मलयागर कृष्णागर जाती। जपा करवीर, कोविदार ।।५४।। वड पिंपळ औदुंबर। पारिजातक बकुल देवदार। कपित्थ बिल्व अंजिर। अर्जुन पिचुमंद कदंब ते ।।५५।। ऐसिया वनामाजी नृपती। क्षण एक पावला विश्रांती। परी ते पाठीसी पापमती । ब्रह्महत्या उभी असे ।।५६।। तो उगवला भाग्यवासरमणी। कीं निधान जोडे रंकालागुनी। कीं क्षुधितापुढे उचंबळोनी। क्षीराब्धि जैसा पातला ।।५७।। कीं मरतियाच्या मुखांत । अकस्मात घातलें अमृत । की चिंताग्रस्तासी प्राप्त । चिंतामणी जाहला ।।५८।। तैसा तापसियांमाजी मुकुटमणी। शिष्यमांदी सर्वे घेऊनी। महाराज तपस्वी गौतममुनी। तये स्थानी पातला ।।५९।। रायें घातलें लोटांगण। दाटला अष्टभार्वेकरून । उभा ठाकला कर जोडून। करी स्तवन प्रीतीनें ।।६०।।
सहज होतां संतदर्शन। पार्षे संहारती संपूर्ण। तूं विलोकिसी जरी कृपा करून। तरी रंक सहस्रनयन होय ।।६१।। यावरी तो महाराज गौतम । कल्माषपादा पुसे कुशलक्षेम । राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम। सुर्खेकरून नांदती कीं ।। ६२ ।। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र। स्वधर्म आचरती की समग्र । पशु सेवक पुत्र कलत्र । समस्त सुखरूप आहेत की ।।६३।। राव म्हणे आपुले कृपेंकरून। समस्त आहेत क्षेमकल्याण। परंतु आलासी वाटतेंदुरून। आनंदघन दिसतोसी ।।६४।। तुझ्या दर्शने मज बाटे सत्वर। ब्रह्महत्या दूर होईल समग्र । मग पूर्वकर्म आपुलें दुस्तर । ऋषीप्रती निवेदिलें ।।६५।। गौतम म्हणे परम पवित्र । भूकैलास गोकर्णक्षेत्र । तेथूनि मी आलों अपार। महिमा तेींचा न वर्णवे ॥६६॥
ॐकाररूपें कैलासनाथ। भवानीसहित तेथे नांदत। सुर असुर किन्नर सेवीत। अर्धमात्रापीठ जें ।।६७।। त्या गोकर्णीचे शिवदर्शन। ब्रह्मादिकां दुर्लभ जाण । तेथें इंदिरेसहित जनार्दन। तप गहन आचरत ||६८ ।। कोटिसूर्यांची प्रभा। मृडानीसहित शिव उभा। कैवल्यगभींचा पूर्ण गाभा । तेींची शोभा न वर्णवे ।। ६९ ।। इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र। तेथेंचि वसती अहोरात्र । जेींचे पाषाण तरुवर। समग्र निर्जर अवतरले ।।७०।। सत्यवतीहृदयरत्न । जेथें करी अनुष्ठान । वसिष्ठ भृगुजामय । गोकर्णक्षेत्री सदा वसती ।।७१।। पाहावया मृडानीनायका मंडपघसणी होतसे देख। नारद तुंबरु गायका जेथें गाती शिवलीला ||७२।।
गोकर्णाभोंवते समग्र । उभे अखंड देवांचे भार। मुखें गर्जती शिव हर हर। आनंद थोर होतसे ।।७३।। ऋषि करिती वेदघोष । अष्टनायिकांचे नृत्य विशेष। किन्नर गंधर्व गायक सुरस । तोषविती महेशाते ।।७४।। ते अति उत्तम स्थान। तेजोमय प्रकाश गहन । नाना वृक्ष लागले सघन । कैलासभुवन प्रत्यक्ष ।। ७५।। शुभ्र सिंहासन लखलखित । चारी द्वारे मणिमयखचित। ऐरावतारूढ अमरनाथ । पूर्वद्वारीं तिष्ठतसे ।। ७६ ।। दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन । पश्चिमेसी वारुणीरमण । उत्तरेसी वैश्रवण । प्राणमित्र शिवाचा ॥७७॥ कर्पूरगौर भवानीसहित। घवघवीत तेजें विराजित । भूकैलास साक्षात । माहेर संत-साधकांचें ।। ७८ ।।
त्या मूर्तीचें करावें ध्यान । त्याभोंवतें महासिद्धीचे पूजन । त्याभोंवतें कात्यायनीआवरण। अष्टभैरव पूजिजे ।। ७९।। द्वादश मित्र एकादश रुद्र। तेथेंचि वसती अहोरात्र । अष्टवसु दिक्पाळ समग्र । जोडोनि कर उभे तेथें ।।८०।। अष्टसिद्धी नवनिधी कर जोडूनी । अखंड आराधिती पिनाकपाणी। रायासी म्हणे गौतममुनी। मीही वसतों सदा तेथें ।।८१।। वरकड क्षेत्री लक्ष वरुर्षे जाण । तप आचरला निर्वाण । गोकणीं एक दिन । होय प्रसन्न सदाशिव ||८२|| अमावास्या संक्रांति सोमवार । प्रदोष पर्वकाळ शिववासर । समुद्रस्नान करितां समग्र । फळ होय सकळ तीर्थांचें ।।८३।रावण कुंभकर्ण विभीषण। यांही पूर्वी केलें तेथे अनुष्ठान। तें निर्वाणलिंग दशाननें जाण। कैलासाहूनि आणिलें ।॥८४॥
गणेशें स्थापिलें तें लिंग। ऋषी म्हणती सूतातें कथा सांग। ऐकावया लीला सुरंग। श्रवण वाट पाहती ।।८५।। यावरी सूत वक्ता निपुण। रावणमातेसी कैकसी अभिधान । ती नित्य लिंगपूजनाविण जाण । उदक प्राशन न करीच ।। ८६ ।। पंचधान्यांचे पिष्ट करून। लिंग करी कामना धरोन। व्हावें रावणाचें कल्याण। जय संपूर्ण प्राप्त व्हावा ।।८७।। शक्रे तिचें लिंग नेऊन । समुद्री टाकिलें द्वेष करून । त्यालागीं रात्रंदिन । रावणमाता अन्न न घे ||८८।। रावण म्हणे मातेलागून । मी मुख्य आत्मलिंग आणितों जाऊन । कैलासाप्रती द्विपंचवदन । जाता झाला साक्षेपें ।।८९।। तप आचरला दारुण । जो चतुःषष्टिकलाप्रवीण। जेणें वेदांचीं खंडे करून । सारासार निवडिलें ||९० ।।
चतुर्दशविद्यापारंगत। शिवासी आवडे अत्यंत । दशमुखें गायन अद्भुत । केलें त्यानें स्वामीपुढें ।।९१।। आपुलें शिर छेदून स्वहस्तें। शिरांच्या तंती करूनि स्वरयुक्ता दशमुख गात प्रेमभरित । उमानाथ संतोषे जेणें ॥ ९२।। राग उपराग भार्यांसहित। मुच्र्छना शरीर कंपित। सप्तस्वर ताल संगीत। शास्त्रप्रमाण गातसे ||९३|| गद्यपद्यरचना नाना कळा। गीत प्रबंध अखंड नाममाळा । गातां प्रीतीनें शिवलीला। शंभु तोषला अद्भुत ।।९४।। म्हणे प्रसन्न झालों दशमुखा । इच्छित माग तुज प्रिय जें कां। दशकद्वयनयन म्हणे कामांतका। आत्मलिंग मज देई ।।९५।। या त्रिभुवनांत जे सुंदर। ऐसी ललना देईं सुकुमार। ऐकूनि संतोषला कर्पूरगौर। भोळा उदार चक्रवर्ती ।।९६ ।। कोटि चंद्र-सूर्याची प्रभा पूर्ण। ऐसें लिंग काढिलें हृदयांतून। कीं ब्रह्मानंदरस मुरोन। दिव्य लिंग ओतिलें ।॥९७।।
सहस्र बालसूर्य न पावती सरी। ऐसी प्रभा पडली दशदिशांतरीं। दिधलें रावणाचे करीं। जें अतर्क्स ब्रह्मादिकां ।। ९८ ।। जें मुनिजनांचे ध्येय ध्यान । जें सनकादिकांचें देवतार्चन । वेद शास्त्र पुराण। दिव्य लिंग वर्णिती ।।९९।। जें त्रिगुणातीत परब्रह्म । जें अज अजित अनाम। सच्चिदानंद निर्वाणधाम । योगी आराम पावती जेथें ।॥१००॥ अनंत ब्रह्मांडें विचित्रे । जेणें रचिलीं इच्छामात्रे। ज्याकारणें भांडती वेदशास्त्रे। तें दिव्य लिंग पुरातन ।।१।। हैं लिंग रावणें हाती घेऊन । म्हणे हे त्रिलोचन त्रिदोषशमन । लावण्यसागरींचेनिधान। त्रिभुवनसुंदर ललना दे ।।२।। जी अपर्णेची अपर प्रतिमा। ऐसी देई मज सर्वोत्तमा । सच्चिदानंद पूर्णब्रह्मा। नामाअनामातीत तूं ।।३।। शिव म्हणे इची प्रतिमा विशेष । निर्मू न शके विधीश । भोळा चक्रवर्ती महेश। म्हणे हेचि नेई अपर्णा तूं ।।४।।
रावणें अवश्य म्हणोनी। स्कंधी घेतली स्कंदजननी। दिव्यलिंग हाती घेऊनी। लंकानाथ चालिला ।।५।। दक्षिणपंथे जातां सत्वर । गजबजिले सकळ सुरवर। गजानन स्कंद वीरभद्र। नंदिकेश्वर तळमळती ।।६।। म्हणती हे सदाशिव त्रिनयन। हें कैसें तुझें उदारपण। भवानी बैसलासी देऊन। पंचवदन हांसतसे ।।७।। म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ। तो धावेल आतां स्नेहभरित । इकडे भवानी स्तवन करीत । हे पद्मजतात धांव वेगीं ।।८।। वारिजनयना इंदिरावरा । निगमागमावंद्या सुहास्यवक्त्रा। हे नीलपयोधरगात्रा। धांव वेगी सोडवीं मज ।।९।। हे मधु-कैटभ-नरक-मुर-भंजना । हे दशावतारधरा पीतवसना। हे मदनांतकमान-सरंजना। हे जनार्दना जगद्गुरो ।।११०।। हे कोटिमनोजतात श्रीधर । असुरमर्दन परम उदार। ऐसें स्तवन ऐकतां सर्वेश्वर। विप्ररूपें आडवा आला
।।११।। म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना। कोठें मिळविली ऐसी ललना। दशमुख म्हणे हे अपर्णा । सदाशिवें दीधली ।।१२।। विप्र म्हणे खाली उतरून। न्याहाळूनि पाहें इचें वदन। रावण पाहे तंव ते कुलक्षण। अत्यंत कुरूप देखिली ।।१३।। भुवयांस आंठी अमंगळ पूर्ण। वृद्ध गाल बैसले दंतहीन । गदगदां विप्र हांसे देखून। टाकोनि रावण चालिला ।।१४।। मग रमाधवें तये स्थळी। स्थापिली माता भद्रकाळी। इकडे असुर शिवाजवळी । म्हणे स्त्री अमंगळ कैसी दीधली ।।१५।। शिव म्हणे सत्य वचन । ते तुज नाटोपे कौटाळीण । अनंत ब्रह्मांडे दावून । सर्वेवेंचि लपवील तत्त्वतां ।।१६।। मग श्रीधरें आंगींची मळी काढून । स्वहस्तें निर्मिली रूपसंपन्न । मयासुराचे उदरी जाण । उत्पन्न झाली तेंचि पै ।।१७।।
तिच्या स्वरूपाची प्रति। नाहीं नाहीं त्रिजगतीं। आंगींच्या सुवारों धावती । काद्रवेयचक्रे प्रीतीनें ।।१८।। तिचें नाम मंदोदरी। तिची प्रतिमा नाहीं उर्वीवरी । विंशतिनेत्राचे चत्वरीं। पट्टमहिषी पतिव्रता ।।१९।। मयासुर करील कन्यादान। वरी एक शक्ती देईल आंदण । सप्तकोटी मंत्रांचे गहन । सामर्थ्य असे जियेमाजी ||१२०।। तेनिर्वाणसांगातीण शक्ती। तुज प्राप्त होईल लंकापती। महाशत्रूवरी निर्वाणी ती। प्रेरावी त्वां सत्य पै ||२१|| ऐसें ऐकतांचि रावण । परतला लिंग घेऊन । पूर्वस्थळासी आला जाण। तो गजानन गायी राखी ||२२|| गजाननाचे स्तवन । देव करिती कर जोडून। म्हणती दिव्य लिंग सोडवून। स्थार्थी अक्षयी गणपती ॥२३॥ ऐसा देवी प्रार्थिला एकदंत। तंव रावणासी मूत्र लागले बहुत । पुढे पाऊल न घालवत । चरफडीत मूत्रभरें मूत्रभरें ||२४||
भूमीवरी लिंग न ठेवावें। ऐसें पूर्वी सांगितले उमाधवें। हाती घेऊनि लघुशंकेस बैसावें। हेही कर्म अनुचित ।।२५।। तंव तो सिद्धीबुद्धींचा दाता। विप्रवेर्षे गायी राखितां । त्यासी लंकानाथ म्हणे तत्त्वतां । लिंग हातीं धरीं हैं ।। २६ ।। विप्र म्हणे लंकापती। माझ्या गायी रानोरानीं पळती। तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती। लागेल हे न कळें मज ।। २७ ।। रावण म्हणे न लगतां क्षण। येतों मूत्रशंका करून। विप्र म्हणे तीन वेळां बाहीन। न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी ।।२८।। अवश्य म्हणे लंकापती । लिंग देत विप्राच्या हातीं। दूर जाऊन एकांतक्षितीं। लघुशंकेस बैसला ||२९|| अगाध गजमुखाचें चरित्र। जो
साक्षात अवतरला इंदिरावर। शिवउपासना करावया पवित्र । झाला पुत्र शंभूचा ।।१३०।। असो रावणासी मूत्राचे पूर। लोटले न सांवरती अनिवार। एक घटिका लोटतां इभवक्त्र। हांक फोडी गर्मोनी ||३१|| माझ्या गायी गेल्या दूरी। हें आपुले लिंग घेईं करीं। रावण न बोलेचि निर्धारीं। हस्तसंकेतें थांब म्हणे ।।३२।। दुसरी घटिका झाली पूर्ण। हांक फोडी गजानन । एवं घटिका झाल्या तीन। कदापि रावण न उठेचि ||३३|| जैसें पाखंडियाचे कुमत । न सरेचि वारितां पंडित । तैसें रावणाचें मूत्र न सरे सत्य । पुनः एकदंत हांक फोडी ।। ३४ ।। राक्षसा आपुलें लिंग सांभाळीं। म्हणोनि ठेविलें भूमंडळीं। अक्षय स्थापिलें कदाकाळीं। ब्रह्मादिकां उपटेना ।।३५।।
पृथ्वीसहित अभंग। एकचि झालें दिव्य लिंग। रावण धांवे सवेग। अशौच अपवित्र क्रोधभरें ।। ३६ ।। लिंग उपटितां डळमळी कुंभिनी। महाबळे दशमुख पाहे उपटोनी। परी न उपटे तयालागुनी। अखंड अभंग जाहलें ।।३७।। गुप्त जाहला गजानन । गायी पृथ्वींत जाती लपोन। रावणें एक गायीचा कर्ण। धांवोनियां धरियेला ।।३८ ।। तोही न उपटे तयालागून।तेथेच केलें लिंगपूजन। गोकर्ण महाबळेश्वर तेथून। नाम जाण पडियेले ।।३९।। रावणमाता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन। आदिलिंग है जाणोन। करिती अर्थन सुरक्रषी ।।१४०।। रावण कुंभकर्ण विभीषण। तेथेच करिती अनुष्ठान। त्याच्या बळेंकरून। देव जिंकले रावणे ।।४१।।
मयासुर मंदोदरी आणि शक्ती। देता झाला रावणाप्रती। लक्ष पुत्र नातू गणती। सवा लक्ष जयाचे ।।४२।। इंद्रजिताऐसा पुत्र। अष्टादशाक्षौहिणी सेनामार। जेथींच्या अनुष्ठानें अपार। रावण पावला संपत्ती ।।४३।। गौतम म्हणे राजोत्तमा । ऐसा गोकणींचा थोर महिमा। वर्णं न शके मघवा ब्रह्मा। येणें आम्हां तेथूनि जाहलें ।॥४४।। मिथुलेश्वराच्या यागाकारणे। आम्ही येत असतां त्वरेने । अद्भुत एक वर्तलें तुजकारणें । कथा तेचि सांगतों ।।४५।। एक वृक्ष न्यग्रोध विशाळ । त्याखालीं आम्ही बैसलों सकळ । तों एक चांडाळीण अमंगळ। अति अपवित्र देखिली ।।४६।। सर्वरोगवेष्टित पूर्ण । जन्मांध गलितकुष्ठ भरलें जाण। किडे पडले सर्वांर्गी व्रण। दुर्गंधी उठली चहुंकडे ।।४७।। रक्तपिती भरोन। हस्त-पाद-बोटें गेलीं अहोन। पत्म कृश्चित कुलक्षण। कैचे अन्न उदक तियेतें ।।४८।। दंतहीन कर्णहीन। गभींच तियेचे गेले लोचन। कर्ण नासिका झडोन। किडे पडले बुचबुचित ।।४९।।
अंर्गीचे चर्म गेलें झडोन । वस्त्र पडलें गळोन । धुळींत लोळे चांडाळीण। पाप पूर्वीचे भोगीत ।।१५०।। तिचा मरणकाळ जवळी आला जाण । वरतें पाहिलें आम्हीं विलोकून । तों शिवें धाडिलें दिव्य विमान । तियेलागीं न्यावया ।।५१।। दशभुज पंचवदन । शिवदूत बैसले चौघेजण । कोटिसूर्यतेज विराजमान । प्रभा शशीसमान एकाची ||५२|| कोणी अग्नितेजें विराजत । भालचंद्र शोभिवंत । दिव्य विमान लखलखीत । वाद्ये वाजती चतुर्विध ।।५३।। अष्टनायिका नृत्य करिती । किन्नर गंधर्व शिवलीला गाती। गौतम म्हणे ऐकें नृपती। मग तयांप्रती पूसिलें ।।५४।। हें दिव्य विमान घेऊन । कोणाचें करूं जाता उद्धरण । ते म्हणती तया चांडाळिणीलागून । शिवें आणूं पाठविलें निजपदा ।।५५।। मग म्यां तयांसी पुसिलें। इणें पूर्वी काय तप केलें । मग ते शिवदूत बोलिले । पूर्वजन्मींचा वृत्तान्त ।।५६।।
पूर्वी केकयनामा ब्राह्मण । त्याची कन्या सुमित्रा जाण । आपुल्या सौंदर्य गर्वेकरून । कोणासहीमानीना ।।५७।। ही चाळपणी विधवा झाली। तारुण्यमदें स्वधर्म विसरली। जारकर्म करूं लागली। बापें शिकविल्या नायके ।। ५८।। तो हे जाहली गरोदर। लोक निंदा करिती समग्र । मग बायें केश धरूनि सत्वर। बाहेर घातले इयेसी ।॥५९।। मग ही हिंडतां देशांतर। कोणीएक सभाग्य शुद्ध । त्यानें इतें खी करूनि सत्वर। समग्र द्रव्य ओपिलें ॥६०॥ तेथे अपत्यें झालीं बहुत । ही अत्यंत मद्य-मांसी रत। पुष्ट जाहली बहुत। घूर्णित लोचन उधडीना ।।६१।। शुद्ध घेवोनि दासी दास। गेला क्षेत्रों कृषिकर्मास । हे क्षुधित आठवूनि मांसास। शस्त्र घेवोनि चालिली ॥ ६२॥
मयें माजली नुघडी लोचन। हा बस्तचि आहे म्हणोन। गोवत्साचे कंठीं जाण। पापिणी सुरी घालीतसे ।।६३।। तें अट्टाहासें ओरडत। गाई हुंबरोनि अनर्थ करीत। इणें कंठ छेदोनि गृहांत। वत्स नेलें त्वरेनें । ६४ ।। डोळे उघडूनि पाहे पापिणी। मग गोवत्स ओळखिलें तेच क्षणीं । तेव्हां तिनें शिव शिव उच्चारूनी। म्हणे करणी न कळतां केली ।।६५।। मग अर्ध वत्समांस भक्षून। उरलें टाकी बाहेर नेऊन । लोकांत उठविलें पूर्ण। गोवत्स मारिलें व्याघ्रानें।।६६।। त्यावरी ही काळें मृत्यू पावत। तों येऊनियां यमदूत। इयेस नेलें मारीत । बहुत जाचिती निर्दयपणें ।। ६७ ।। कुंभीपाकीं घालिती। असिपत्रवनीं हिंडविती । तप्तभूमीवरी लोळविती । स्तंभ कवटाळविती तप्त जे कां ।।६८।। चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन। इचें कांही आहे कीं नाहीं पुण्य। ते म्हणती शिवनाम उच्चारून । गोवत्सवध इणें केला ।। ६९ ।।
मग यमें दिधलें लोटून। चांडाळयोनींत पावली जनन । गर्भाध कुश्चळ कुलक्षण। विष्ठामूत्रे भरली सदा ।।१७०।। श्वानाचें उच्छिष्टे भक्षी जाण। तंव माय-बापें गेलीं मरोन। मग ही हातीं काठी घेऊन । गांवोगांवी हिंडतसे ।।७१।। तों शिवरात्र पर्वकाळ लक्षून। गोकर्णक्षेत्राप्रती संपूर्ण। यात्रा चालली घोष गहन । नानाविध वाद्यांचा होतसे ।।७२|| शिवनामाचा घोष अपार । शिवभक्त करिती वारंवार । त्यांच्यासंगें ही दुराचार। चांडाळीही चालिली ।।७३।। गोकर्णक्षेत्र गेली चांडाळी। पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी । म्हणे मज अन्न द्यावें ये वेळी । बहुत पापिणी मी आहे ।।७४।। हांका फोडीत हात पसरून । ते प्रदक्षिणा करिती भक्तजन । एकें बिल्वपत्र नेऊन । तिचे हातीं घातलें ।।७५।ते विदळ चांचपोन पाहत। मुखी घालावयाची नाहीं वस्त। म्हणोनि रागे भिरकावीत। ते पडत शिवलिंगावरी ॥७६।।
शिवरात्रीस उपोषण। बिल्यदळे घडले शिवपूजन। शिवभक्तांसवें जागरण। घडलें संपूर्ण चांडाळीस ॥७७।। शिवनामें गर्जती जन। हेही करीत तसेंचि स्मरण। ती ही बडाखाली येऊन ।पडली आहे चांडाळी ॥७८॥ ऐसा तिचा पूर्ववृत्तान्त। शिवगणी सांगितला समस्त । मग ती दिव्य देह पायोनि बैसत। शिवविमानों तेधवां ॥७९।। आपुले पूर्वकर्म आठवून। करूं लागली शिवस्मरण। मन शिवगणर्णी नेऊन। शिवपदीं स्थापिली ॥१८०॥ गीतम म्हणे ऐक राया सादर। तूं गोकर्णाप्रती जाई सत्वर। शिवरात्रीस पार्वतीपरमेश्वर। त्रिदळेकरूनि अचीं कां ।॥८१॥ ऐसें बोलोनि गौतममुनी। गेला जनकाच्या यागालागुनी। कल्माषपाद तेच क्षणीं। गोकर्णक्षेत्रीं पातला ॥८२॥
शिवरात्रीस दिव्य लिंग। मित्रसहरायें पूजिले सांग। अंतरीं सप्रेम अनुराग। उमारंग संतोषला ।।८३।। ब्रह्महत्येचे पातक विशेष । जाऊनि राव झाला निर्दोष । तों कैलासाहूनि आदिपुरुष । पाठवीत दिव्य विमान ||८४।। विमानीं बैसले शिवगण। परम तेजस्वी देदीप्यमान । अनंत विजांचे रस पिळोन। मूर्ति ओतिल्या वाटते ।।८५।।अनंत वायें गर्जती एक वेळां। तेणें रंगसुरंग दाटला । दिव्य सुमनांच्या माळा । वर्षती वरून वृंदारक ।।८६।। मित्रसह दिव्य देह पावोन। झाला दशभुज पंचानन। इंदचंद्रादिपदे ओलांडून। नेला मिरवत शिवपदा ।।८७।।
सरूपता मुक्ति पावोन। शिवरूपीं मिळाला आनंदघन । धन्य शिवरात्रिव्रत पावन। धन्य गोकर्ण शिवमंदिर ||८८ || गौतमऋषि परम धन्य। तेणे इतिहास सांगितला पावन । धन्य श्रोते तुम्ही सज्जन । श्रवणर्णी सादर बैसलां ।।८९।। मानससरोवरवेष्टित। मराळ जैसे विराजित । कीं निधानाभोंवतें समस्त । साधक जैसे बैसती ।।१९०।। तरी पंडित तुम्ही अवधान दिव्यालंकार। देवोनि गौरवा श्रीधर। ब्रह्मानंदेकरूनियां ।।९१।। तुम्ही चतुर। तुमचे श्रीमद्भीमातटविलासा। ब्रह्मानंदा आदिपुरुषा । श्रीधरवरदा कैलासविलासा। कथारस वदवीं पुढें ।।९२३॥ श्रीशिवलीलामृत ग्रंथ प्रचंड। स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड। परिसोत सज्जन अखंड । तृतीयाध्याय गोड हा ।।१९३।।
।। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।।
।। शुभं भवतु ।।
Shivleelaamrit Adhyay 3 In Marathi: आठवणीतले प्रेम व्हॅलेंटाईन डे ती सध्या काय करते!
वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..
शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
Shivleelaamrit Adhyay 3 In Marathi: तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!