Shree Gajanan Leela Gatha 1 Adhyay: गुरु गजाननाच्या पोथीचा पहिला अध्याय
Shree Gajanan Leela Gatha 1 Adhyay: आज या लेखामध्ये श्री गजानन महाराज यांचा गजानन लीला गाथा म्हणजेच लहान पोथी जी २१ अध्यायाची आहे. या गाथेचा पहिला अध्यायाय आपल्याला वाचायला मिळणार आहे.
अध्याय पहिला
।। श्री गजानन प्रसन्न ।।
श्रीगणेशाय नमः ।। जयजयाजी गणराया। जयजयाजी गौरीतनया ।। जयजयाजी मोरया । नमन माझे पदासी ।।१।। तू विद्येचा सागर । तू ज्ञानाचे आगर ।। तू बुध्दीचा अवतार । कृपा करी मजवरी ।। २ ।। व्यासे जे कथिले ज्ञान । तुवा घेतले उतरोन ।। त्याचा लेखकू बनून । लेखन महिमा वाढविला ।।३।।
वक्रतुंड तू महाकाय । विघ्नांतक तू शिवसूताय ।। लंबोदरा तुझे पाय । शरण तुला धरितो मी ।।४।। संत गजानन चरित्र । कथन करावे समग्र ।। हा असे मनीचा हेत । सिध्दीस नेई एकदंता ।। ५ ।। प्रथम वंदिले गणेशाते। आता नमितो सरस्वतीते ।। करी कृपा अंबे माते । कार्यसिध्दी मम करी ।।६।। सर्व देवांना वंदन । सर्व संतांना नमन ।। सर्व भक्तांना शरण। दास असे मी पदीचा ।। ७ ।।
मम प्रार्थना जोडोनी हात । पूर्ण करावे मनोरथ ।। गुरु गजानन चरित्र। लिहून घ्यावे मम करी ।।८ ।। गजानना तुझ्या पायी। मला सदाचा ठाव देई ।। तव चरित्र लवलाही । पूर्ण करूनी घेई तू ।।९।। विदर्भ प्रांती शेगांव । भाग्यवान एक गाव ।। तिथे प्रगटले स्वयमेव । कैलासीचे शिवप्रभू ।।१०।। देविदास नामे एक । भक्त असे भाविक ।। ऋतुशांतीनिमित्त ऐक । लोक बहु जेवले ।।११।।
पत्रावळी उष्टया होत्या । दाराबाहेरी पडल्या त्या ।। लोक बघती जाता येता । कुणा ना काही वाटले ।।१२।। तरुण एक दिगंबर । शिते पत्रावळीवर ।। पडली ती भराभर । मुखी उचलुनी घालीत ।।१३।। बंकटलाल दामोदर । यांनी पाहिला प्रकार ।। भिकारी ना योगेश्वर । असे मनी वाटले ।।१४।। बंकट पुसे जेवणाते । देऊ का या समयाते ।। देविदासा सांगोनी ते । ताट वाढूनि आणिले ।।१५।। पदार्थ त्या ताटात । रुचकर होते बहुत ।। एकत्र ते कालवत। तरुण जेवी आनंदे‡ ।१६।।
भराभरा भोजन केले । नाल्यावरी पाणी प्याले ।। तृप्तीचे ते ढेकर दिले । धूम ठोकली तेथोनी ।।१७।। नाव गाव काहीही । कोणास तो वदला नाही ।। बंकटास लागे घाई । त्याच्या पुनर्दर्शनाची ।।१८।। पुन्हा कधी भेटेल । दर्शन त्याचे घडेल । बंकटाच्या घालमेल । मनामाजी सुरू असे ।।१९।। देविदास दामोदर । ते ही झाले आतूर ।। म्हणे बंकटा खरोखर । योगीच तो वाटला ।।२०।। ऊन होते रणरणत । त्याला नसे त्याची खंत ।। खरोखरी तो संत । असावा ऐसे वाटते ।।२१।।
मुद्रा होती तेजस्वी । भाषा होती ओजस्वी ।। वाटत होता तपस्वी । उध्दारार्थ पातला ।। २२ ।। त्या योग्याला मनोभावे । तिघे वंदिती स्वभावे ।। विनविती दर्शन द्यावे। ओढ लागे भेटीची ।। २३ ।। माघ वद्य सप्तमीला । गुरु प्रगटले शेगावला ।। बंकटलाल दामोदराला । प्रथम भेट जाहली ।।२४।। यापुढील चरित्र । येईल दुस-या अध्यायात ।। गजाननपदी एकचित्त । ठेवूनी स्वस्थ असावे ।। २४।।
इति श्रीगजानन लीला गाथा ग्रंथ प्रथमोऽ ध्याय समाप्तः ।। शुभं भवतु ।।
Shree Gajanan Leela Gatha 1 Adhyay:असं करा इम्प्रेस तुमच्या व्हॅलेंटाईन पार्टनरला!
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!
पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार आतील फरक?
महाकुंभचे दुसरे शाही स्नान कधी आहे आणि ते विशेष का आहे?