Shree Gajanan Leela Gatha 10 Adhyay: गुरु गजाननाच्या पोथीचा दहावा अध्याय
Shree Gajanan Leela Gatha 10 Adhyay: आज या लेखामध्ये श्री गजानन महाराज यांचा गजानन लीला गाथा म्हणजेच लहान पोथी जी २१ अध्यायाची आहे. या गाथेचा दहावा अध्यायाय आपल्याला वाचायला मिळणार आहे.
अध्याय दहावा
श्रीगणेशाय नमः
।। हे शिवपत्नी गिरिजा। गजानन माता शैलजा ।। महिमा अपार वाढे तुझा । चराचरी सदैव ।।१।। माते तू शिवप्रिया । कैलास पतीची प्रिय जाया ।। अनन्य भावे तव पाया। मस्तक मी ठेवितो हे ।।२।। माते केला पराक्रम । महिषासुर मारुन ।। कितीक राक्षसचे प्राण । तुवा लिलया घेतले ।।३।। भक्तांसाठी जगन्माता । पतीसाठी सुशील कांता ।। हिमालयाची तू दुहिता । राक्षसा काळ ठरलीस ।।४।। शिव प्राप्त होण्यासाठी। आई केलीस आटाटी ।। ठेवूनिया प्राण कंठी । तप घोर आचरलीस ।।५।। त्या तुझ्या तपाने । धाव घेतली शिवाने ।। तुज अर्धांगी करून त्याने । तपश्चर्येचे फळ दिले ।। ६ ।।
तू श्रेष्ठ पतिव्रता । आदर्श तू विवाहिता ।। पती सेवेच्या व्रता । सर्व स्त्रियांना देई तू ।। ७ ।। माते तुला जोडोन कर। शिर ठेवितो चरणावर ।। शरण आलो पामर। चरित्र लिहूनी घेई है ।।८।। एकदा महाराज अमरावतीसी । आत्माराम भिकाजी सदनासी। आले असता त्यास खुषी । गुरुपूजन करी तो ।।९ ।। गणेश आप्पा, चंद्राबाई । निष्ठा नांदे गुरुपायी। घरी नेऊन लवलाही । पूजिती ते प्रितीने ।।१०।। महाराज आले शेगावला । कृष्णा मळा सोडून दिला । वास्तव्य ओस जागेला । तेथेच मग मठ झाला ।।११।। बाळापुरी सुकलाला घरी। द्वाड एक गाय खरी ।। उभी न राहे क्षणभरी। गावभर हिंडतसे ।। १२ ।। उपद्व्याप केले नाना । त्रासविले तिने जना ।। नको नको म्हणताना । धान्य फस्त करी ती ।।१३।।
लोक गेले कंटाळून कोणी गेले चिडून ।। कोणी हाती शस्त्र घेवून । मारावया धावती ।।१४।। गाय द्यावी गजानना । सुकलालाच्या वाटे मना ।। तेणे मुक्ती अवघ्यांना । पुण्य तेही लाभेल ।।१५।। एके दिनी सर्वांनी । गाय बांधिली मिळोनी ।। गाडीवरी घालोनी। शेगावासी आणिली ।।१६।। गाय गेली बदलून ।गाडीखाली येऊन ।। लागे पायी गजानन । सारे अचंबित जाहले ।।१७।। कळला गुरुंचा अधिकार । सारे करिती जयजयकार ।। गाय राहिली मठावर । परतोनीया जन गेले ।।१८।। बाळाभाऊ समर्थ भक्त । रहात होता मुंबईत ।। पोस्टाच्या नोकरीत । त्याने दिवस काढले ।।१९।। गजाननाची भेट होता । अलभ्य लाभ त्याच्या हाता ।। राजीनामा देऊनि त्वरिता। शेगावासी आला तो ।।२०।।
त्याचे ऐसे ते येणे। नच रुचले भास्कराकारणे ।। बोलला तो अधिक उणे । संतापुनी तयाला ।।२१।। गुरुहस्ते मार दिला। गुरु बडविती बाळाला ।। खंड नसे परी त्याला । भास्करही सचिंत ।। २२ ।। भास्कर मनी खंतावला । म्हणे उगिच द्वेष केला ।। बाळाभाऊच्या शिष्यत्वाला । मान त्याने दिला असे ।।२३।। लक्ष्मण घुडे विप्र एक । रोग झाला पोटात ।। वैद्यांनी टेकिले हात। आरोग्य त्याला नसेची ।।२४ ।। पत्नीसह तो आला। अतिकष्टे शेगावाला ।। पत्नी करी विनवणीला । सौभाग्य माझे राखा हो ।।२५।। पती झाला रोगजर्जर । दिली औषधे अपार ।। गुण न आला खरोखर । म्हणोनी मी पायी आले ।। २६ ।। तिचे ऐकूनी करुणा वचन । द्रवूनी गेले गुरुमन ।। हातातील आंबा देऊन । म्हणे पतीस खाऊ घाल ।। २७ ।।
तिने ते मान्य केले | पतीस खाऊ घातले ।। जोडपे स्वग्रामी परतले । लोक आले भेटण्या ।। २८ ।। कशास आंबा दिला त्याला । उपाय नाही अपाय झाला ।। जो तो सांगे अबलेला । चक्रावून गेली ती ।। २९ ।। नाही घडले विपरीत | लक्ष्मण झाला तंदुरुस्त ।। आला तो शेगावाप्रत । संत गजानन दर्शना ।।३० ।। पाय धरी संताचे | त्या गजाननाचे ।। एकची म्हणणे असे त्याचे । मम गावी चला हो ।। ३१।। आग्रह त्याचा पाहून | गावी आले गजानन ।। त्याने मूर्ती+ पूजोन । माथा चरणी ठेविला ।। ३२ ।। त्याने आपुले घरदार | धनदौलत अपार ।। अर्पण केली पायावर । जे हवे ते न्या म्हणे ।। ३३ ।। असे मुखे बोलला । परी अंतरी कचरला ।। काढोनी काही धनाला । त्याने दूर ठेविले ।। ३४ ।।
त्या धना पाहून । गुरु करिती त्यास प्रश्न ।। हे रुपये कोठोन | सांग मला आले रे ।। ३५ ।। ततप प करी लक्ष्मण | गुरु जाणती लक्षण ।। तसेच उपाशी तेथोन | निघोन ते गेले हो ।।३६ ।। जाता जाता म्हणती त्याला । त्या लक्ष्मण घुडयाला ।। आलो अधिक द्यावयाला । परी नशिबी नाही तुझ्या ।। ३७ ।। गुरु वाक्य खरे झाले। लक्ष्मणाचे भाग्य गेले ।। दारिद्रय ते ठाकुनि आले । अन्नान्न दशा जाहली ।। ३८ ।। म्हणोनी प्रत्येकाने । गुरुपाशी आदराने ।। वागावे हे सांगणे । भाग असे खरोखरी ।।३९ ।।
इति श्रीगजानन लीला गाथा ग्रंथ दशमोऽध्याय समाप्तः ।। शुभं भवतु ।।
Shree Gajanan Leela Gatha 10 Adhyay: १८,८८२ पदांसाठी सुवर्णसंधी !
आठवणीतले प्रेम व्हॅलेंटाईन डे ती सध्या काय करते!
वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..
Shree Gajanan Leela Gatha 10 Adhyay: शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!
Shree Gajanan Leela Gatha 10 Adhyay: तुमचं जीवन बदलणारे रहस्य !
Shree Gajanan Leela Gatha 10 Adhyay: https://marathionlinetimes.com/uncategorized/shree-gajanan-leela-gatha-7-adhyay/embed/#?secret=gX5uweNPQB#?secret=RFdJFdXtf2