Shree Gajanan Leela Gatha 11 Adhyay: गुरु गजाननाच्या पोथीचा अकरावा अध्याय
Shree Gajanan Leela Gatha 11 Adhyay: आज या लेखामध्ये श्री गजानन महाराज यांचा गजानन लीला गाथा म्हणजेच लहान पोथी जी २१ अध्यायाची आहे. या गाथेचा अकरावा अध्यायाय आपल्याला वाचायला मिळणार आहे.
अध्याय अकरावा
श्रीगणेशाय नमः
।। हे रामदास स्वामी समर्था । नामजपाचा तू उद्गाता ।। आधी केले मग उपदेशिता । झालास तू भूमंडळी ।।१।। मारुतीचा अवतार । तुला मानिती भूवर ।। राम नामाचा विस्तार। जगामाजी केला तू ।।२।। ऐन लग्न मंडपात । विषय सुखावर मारोनी लाथ ।। मारुतीच्या मंदिरात । टाकळीशी पातला ।।३।। उदंड केले अनुष्ठान । तेणे काया पावन ।। दर्शन देऊनी खुद्द राम | तुज बहुत नावाजिले ।।४।।
छत्रपतीच्या कार्यात । स्वराज्याच्या ध्येयात ।। सुराज्याच्या कल्पनेत । रंग तुवाची भरीयेले ।।५।। तू संत रोख ठीक। दरारा तुझा जनलोक ।। पापीयासी वाटे धाक । सज्जनांचा वाली तू ।। ६ ।। तुझी कृपा ४ मजवरी । रामदासा असो तरी ।। रामनाम जप हृदयांतरी ।सदा काळ चालावा ।।७।।
पुढील वर्षी बाळापुरी | गजाननाची जाय स्वारी ।। ના વિદ્યાર્ટના दात्तनवनी उत्सवामितरी। हजिरी त्यांनी लाविली ।।८।। बाळापुरच्या वास्तव्यात एक घडली गोष्ट विचित्र ।। भास्कर हा समर्थ भक्त । त्यासी श्वान चावला ।।९।। कुत्रा होता पिसाळलेला । त्याचाच होता धाक पडला ।। गुरुपुढे भास्कराला । नेऊन सारे सांगती ।।१०।। गुरु वदती निमित्त झाले । आयुष्यचि त्याचे सरले ।। त्याला आता जाणे आले। परमेश्वरा निकट ।।११।। दोन महिने मुदत वाढ । भक्तजनां वाटे गोड ।। भास्कराच्या मनी चाड। कशाचीच नव्हती हो ।।१२।। दोन महिने उलटून गेले । त्र्यंबकेश्वरी जाऊन आले ।। भास्कराला सवे नेले । तीर्थयात्रा घडविली ।।१३।।
एकदा भास्करा गुरूने । तुरु केले बढविणे।। बाळाभाऊच्या विनतीन। गुरु मारणे थांबले ।।१४।।भास्कराने बाळाला । गुरु हस्ते बडविला ।। तो प्रमाद दुरुस्त केला| फेर शिक्षा करुनी ।।१५।। भास्करासवे आडगावाला । झामसिंगाच्या घराला ।। गुरु येती, पंचमीला | म्हणे भास्कर जाईल ।।१६।। पंचमीचा दिवस आला । गुरु सांगती भास्कराला ।। विसरू नकोस हरीला | वैकुंठासी सुखे जाई ।।१७।। ऐन दुपारच्या अवसरी । भास्कर तो आसनावरी ।। प्राण पक्षी उडोनी दुरी | देह कुडीतूनी गेला हो ।।१८।। महाराजांनी हरहर | केला अवचित गजर ।। भास्कर गेला निघून दूर । पुन्हा भेट कधी ना ।।१९।। आडगाव आकोली दरम्यान । समाधीचे रम्य स्थान ।।भास्कराच्या स्मृती कारण | भंडाराही घातला ।।२०।।
लोक बसता भोजनास ।| कावळे देती अती त्रास ।। समर्थ सांगती तयास | उद्या येणे नच येथे ।।२१।। ते कावळ्यांना समजले । पुन्हा न ते परत आले ।। निर्विघ्नपणे पार पडले । भंडा-याचे कार्य ते ।।२२।। दिवस होते उन्हाळयाचे। काम विहीर खोदण्याचे ।। संकट गणु जव-याचे । महाराजांनी दूर केले ।। २३ ।। सुरुंगाते घालोनी हात । गणू सुखरुप विहिरीत ।। सद्गुरुची लीला खचित । तो पायी लागला ।। २४।।
हाक भावे मारिता । गुरु धाव घेई स्वतः ।। पुरवी अवघ्या मनोरथा । ऐसे त्यांचे सामर्थ्य ।।२५।। गजानन पायी मम शिर । दर्शन घडो सत्वर ।। करी कृपा अपार | लिहून घेई चरित्र हे ।। २६ ।। येथ माझे काही नाही। त्याचेच कागद पेन शाई ।। मी तो हमाल भारवाही । सांगेल ते लिहितो मी ।। २७ ।। आता पुढील अध्यायी । पितांबराची कथा येई ।। भक्तजना लागो धाई। चरित्र गुरुचे ऐकण्याची ।। २८ ।।
इति श्रीगजानन लीना गाथा ग्रंथ एकादशोऽध्याय समाप्तः ।। शुभं भवतु ।।
Shree Gajanan Leela Gatha 11 Adhyay: १८,८८२ पदांसाठी सुवर्णसंधी !
आठवणीतले प्रेम व्हॅलेंटाईन डे ती सध्या काय करते!
वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..
शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
Shree Gajanan Leela Gatha 11 Adhyay:तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!
Shree Gajanan Leela Gatha 11 Adhyay: श्री गजानन लीला गाथा ७ अध्याय (लहान पोथी)