Shree Gajanan Leela Gatha 12 Adhyay: गुरु गजाननाच्या पोथीचा नववा अध्याय
Shree Gajanan Leela Gatha 12 Adhyay: आज या लेखामध्ये श्री गजानन महाराज यांचा गजानन लीला गाथा म्हणजेच लहान पोथी जी २१ अध्यायाची आहे. या गाथेचा बारावा अध्यायाय आपल्याला वाचायला मिळणार आहे.
अध्याय बारावा
श्रीगणेशाय नमः
।। नमो नमोजी गिरीजा कुमरा । शिवसुता परमेश्वरा ।। विघ्ने अवधी दूर करा । प्रसन्न व्हावे मजला तू ।।१।। गणेशा तू विद्यादाता । गणेशा तू बुध्दिदाता ।। गणेशा तू संकटहर्ता । प्रसन्न व्हावे मजला तू ।।२।। प्रथम तुला वंदना | शंभू-गिरिजा नंदना ।। पाव पाव आनंदघना । प्रसन्न व्हावे मजला तू ।।३।। तुझे लाभता आशीर्वचन । साध्य होई सर्व काम ।। तुझ्याविना ना जीवनी राम | प्रसन्न व्हावे मजला तू ।।४।। दोन्ही करा जोडोन | मी करीतो तव ध्यान ।। मम ध्यानी येऊन । प्रसन्न व्हावे मजला तू ।।५।। गजानन संत थोर । शिष्य त्यांचे अपार ।। त्यातच एक पितांबर | पाप भिरु प्राणी तो ।।६।। अति होती गरिबी । राहे गुरु सन्निधानी ।। गुरुपदावाचोनी । अन्य ठाव नसेचि ।। ७ ।।
कपडेत्याचे फाटके । किती किती घालावे टाके ।। जीर्ण वस्त्र झाले निके । परी नसे इलाज ।।८।। नवे कुठून आणावे। मुखे कोणास मागावे ।। कशास कोणा सतवावे । ऐसा मनी विचार ।।९।। गजानने केली लीला | त्यास आपुला दुपेटा दिला ।। नेसावया सांगितला । गुरु मनी आनंद ।।१०।। आज्ञा मानूनी गुरुची । पितांबर नेसे दुपेटाची ।। परी अन्य भक्तांची लाही लाही झाली असे ।।११।। ते बोलले टाकोन । पितांबरा कारण ।। गुरुचा केला अपमान । म्हणोन रुष्ट झाले ते ।।१२।। पितांबराच्या मनात । भाव वसे शुध्द सत्य ।। गुरुचि मानस जाणत | त्याला होती कल्पना ।।१३।। परी त्या शिष्यांनी । अती काहूर करोनी ।। पितांबरा लागोनी । जिणे केले अशक्य ।।१४।।
गुरु आज्ञा देती त्याला | सोडून जा तू मठाला ।। प्रश्न पडे त्याजला । कोठे जावे म्हणोनी ।।१५।। परी आज्ञा मानली। नमोनिया गुरुमाऊली ।। शेगाव सोडूनी निघाली । स्वारी पितांबराची ।।१६।। फिरत फिरत तो आला । कोंडोली नामे गावाला ।। चालून चालून थकलेला । बसे आम्रतरुतळी ।।१७।। त्या आम्रवृक्षावरी। मुंग्या मुंगळे कितीतरी ।। त्यांच्या त्रासाने अखेरी। झाडावरी चढे तो ।।१८।। लहान मोठ्या फांदीवर । बसुनी पाहे पितांबर ।। गुराखी पोरे खरोखर । चकीत की जाहली ।।१९।। लोक येती धावत । पितांबरासी पुसत ।। शिष्य गजानन म्हणता देख | साकडे त्यांनी घातले ।।२०।। या वठलेल्या वृक्षाला । हिरवागार करी भला ।। जरी चमत्कार कळो आला । पाय तुझे धरू रे ।।२१।।
पितांबर ध्यानस्थ | मनी गुरुसी आठवत ।। बघता बघता अकस्मात । पालवी फुटली वृक्षाला ।। २२ ।। पितांबरासी मिरवित । सारे नेती गावात ।। मठ त्याचा कोंडालीत । समाधीही तेथेची ।। २३ ।। एकदा गजानन अकोल्याला । आले भेटण्या बच्चुलाला ।। आनंद मनी फार त्याला । षोडशोपचारे पूजी तो ।। २४।। म्हणे मम ओट्यावर | नसे मुळी अवसर ।। मनी बांधणे मंदिर । रामरायाचे येथे हो ।।२५।। त्याची इच्छा सफल झाली । गुरुकृपेची प्रतीती आली ।। श्रीरामे येऊनी मंदिरी। वास तेथे केला असे ।। २६ ।। ऐसी ही गजानन कथा । गजानन लीला गाथा।। वर्णिलीसे एकचित्ता । गोड मानुनी घ्यावी हो ।। २७ ।।
।। इति श्रीगजानन लीला गाथा ग्रंथ द्वादशोऽध्याय समाप्तः ।। शुभं भवतु ।।
Shree Gajanan Leela Gatha 12 Adhyay: श्री गजानन लीला गाथा ११ अध्याय (लहान पोथी)
‘शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा तिसरा अध्याय!
Shree Gajanan Leela Gatha 12 Adhyay: हक्काची पेन्शन! PM श्रमयोगी मानधन योजना तुमच्या कुटुंबासाठी!
आठवणीतले प्रेम व्हॅलेंटाईन डे ती सध्या काय करते!
वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..
शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
Shree Gajanan Leela Gatha 12 Adhyay:तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!
Shree Gajanan Leela Gatha 12 Adhyay: श्री गजानन लीला गाथा ७ अध्याय (लहान पोथी)