Shree Gajanan Leela Gatha 13 Adhyay: गुरु गजाननाच्या पोथीचा तेरावा अध्याय!
Shree Gajanan Leela Gatha 13 Adhyay: आज या लेखामध्ये श्री गजानन महाराज यांचा गजानन लीला गाथा म्हणजेच लहान पोथी जी २१ अध्यायाची आहे. या गाथेचा तेरावा अध्यायाय आपल्याला वाचायला मिळणार आहे.
अध्याय तेरावा
श्रीगणेशाय नमः
।। जय जयाजी क्षीरसागरविहारा। जय जय कमलावरा ।। जय जय गजेन्द्रोध्दारा । शीघ्र घेई धाव तू ।।१।। शंख चक्र तुझ्या हाती । गदा पद्मेही शोभती ।। अति साजिरी तुझी मूर्ती। भावे तुजला नमितो मी ।। २ ।। तू ब्रम्हदेवाचा पिता । शेषशायी अनंता ।। चतुर्भुजा रुपवंता । भक्ती तुझी घडू दे ।।३।। कोणा मुखी विष्णु नाम । म्हणती कोणी नारायण ।। कोणी देवाधिदेव म्हणोन । शरण तुला येताती ।।४।। तू जगाचा निर्माता । तूच देवा पालनकर्ता ।। कल्पांती विश्वमोडिता | तूच अससी सर्वेश्वरा ।।५।। नारद धृव प्रल्हाद | भक्त घालीता तुला साद ।। मनोमनी आनंद । तुझ्या प्रकटे देवराया ।।६।। देवा दोन्ही जोडोन हाता । करीत प्रार्थना अनंता ।। पाव पाव मला आता । तुझी कृपा होऊ दे ।।७।।
पारमार्थिकआणि लौकिक । इच्छा आकांशा अनेक ।। पुरवाव्या मज द्यावी भाक । हीच नम्र विनवणी ।।८ ।। असो आता कृपा करी । बुध्दी द्यावी सत्वरी ।। गजानन लीला लिहून पुरी । दर्शन गुरुचे घडो दे ।।९।। सवडद नामक गावाचा। एक गोसावी येई साचा ।। व्हावया उपशम व्याधीचा । त्याला असे रक्तपिती ।।१०।। हा होता साथीचा रोग । पूर्व जन्मीचा जणू भोग ।। सर्वस्वाचा करुनी त्याग | गंगाभारती आला असे ।।११।। भक्त सांगती राहे दुरी । दुरून गुरुचे चरण स्मरी ।। नको नको स्पर्श तरी। अवघे मनी सचिंत ।।१२।।
एकदा कोणी नसता तेथ । गोसावी आला दर्शनार्थ ।। गुरुपुढे दंडवत । अनन्य भावे शरण तो ।।१३।। गुरु त्यास मारिती । थापट त्याच्या गालावरती ।। थुंकूनिया बेडक्याप्रती । निघोनिया गेले ते ।।१४।। तो बेडका गोसाव्याला । मलम जणू वाटला ।। त्याने चोळिला सर्वांगाला।धन्य म्हणे मी जगी ।।१५।। ज्यांनी हा प्रकार पाहिला। किळस वाटली सर्वांना ।। जा करी जा आंघोळीला | शीघ्र ये ते बोलले ।।१६ ।। परी त्या रोग्याते । दुःख नव्हते मनाते ।। दूर राहूनी भजनाते । गुरुपुढे करीतसे ।।१७।।
त्याची व्याधी पळाली । सुवर्णसुंदर काया झाली ।। तोच त्याची जाया आली । समागमे मुलाच्या ।।१८।। दोघे म्हणती गावी जाऊ । नको आम्ही इथेच राहू ।। विनवी आता नका नेऊ । व्यर्थ मला गावाला ।।१९ ।। त्यांना दिले पाठवून | स्वतः राही विरक्त मन ।। मलकापुराकारण । गुरुनिरोपे पुढे गेला ।। २० ।। मुंडगावच्या झ्यामसिंगाने । कितीदा केले बोलवणे ।। पौषमासी जाऊन गुरूने । त्याचे केले कल्याण ।।२१।। पुंडलिक भोकरे मुंडगावचा | नेम असे वारीचा ।। रोगी झाला प्लेगचा । आणि यात्रेचा दिन आला ।। २२ ।। व्याधी त्याने चोरीली। शेगावाची वाट धरीली ।।रस्त्यामध्ये फजिती झाली सर्वांग लापे लापले ।।२३।।
तशाही अवस्थेत । मुंडलिक थे शेगावात ।। गुरु स्वतःची काख दाबत । गाठ प्लेगची निमाली ।।२४ ।। गुरुकृपेने पुंडलिकांची। गाठ गेली प्लेगधी ।। ऐसी किर्ती गुरुची। शरण जावे गुरूला ।।२५।। नव्या जागी महासाठी । सामान गाडया वाहती ।। गुरुही त्यांच्या सवे जाती। कामकाज बघावया ।।२६।॥ एका जागी विशिष्ट ठिकाणी । गुरु बैसली येऊनी ।। लोच मध्य घ्यावा म्हणुनी। जादा जागा संपादिती ।।२७।।
परी ही कळली माल। अधिकारी जागृत होत ।। त्यांनी धाडून आपुले दूत । शहानिशा करविली ।।२८ ।। परी गजानन कृपेने । बुध्दी झाली त्याकारणे ।। म्हणे दंड नसे करणे । गजानन संस्थेला ।।२९ ।। तेव्हा सारे खुष झाले । अरिष्ट आले दूर गले ।। जादा जागा मिळाल्याने । कामही झाले सुलभ ।। ३० ।। ऐसी ही गजानन कथा । ती वाचिता ऐकता ।। पुरतील सर्व मनोरथा। जगी कृतार्थ व्हाल हो ।।३१।।
इति श्रीगजानन लीला गाथा ग्रंथ त्रयोदशोऽध्याय समाप्तः ।। शुभं भवतु ।
Shree Gajanan Leela Gatha 13 Adhyay: ‘शिवलीलामृत’ संपूर्ण पारायण दिव्य कथांचा चौथा अध्याय!
Shree Gajanan Leela Gatha 13 Adhyay: १८,८८२ पदांसाठी सुवर्णसंधी !
आठवणीतले प्रेम व्हॅलेंटाईन डे ती सध्या काय करते!
वृंदावन वाले प्रेमानंद जी महाराज..
Shree Gajanan Leela Gatha 13 Adhyay: शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!
हक्काची पेन्शन! PM श्रमयोगी मानधन योजना तुमच्या कुटुंबासाठी!