Shree Gajanan Leela Gatha 3 Adhyay: गुरु श्री गजाननाच्या पोथीचा तिसरा अध्याय
Shree Gajanan Leela Gatha 3 Adhyay: आज या लेखामध्ये श्री गजानन महाराज शेगाव यांचा श्री गजानन लीला गाथा म्हणजेच लहान पोथी जी २१ अध्यायाची आहे. या गाथेचा तिसरा अध्याय आपल्याला वाचायला मिळणार आहे.
अध्याय तिसरा
श्रीगणेशाय नमः
।। गोकुळात कृष्ण सखा । तो गोपींचा पाठीराखा ।। कोणी म्हणती गुरेराखा । सारे त्याचे आश्रीत ।।१।। कृष्णा तुवा दिव्य केले । कंस चाणूर वधिले ।। पापांचे पर्वत केले । तुवा भुईसपाट ।।२।। पांडवांचा आश्रयदाता । द्रौपदीचा ज्येष्ठ भ्राता ।। भाचा तू कुंतीकरिता । सदैव हित पाहिले ।।३।। तू गीतेचा उद्गाता । सज्जनांचा पालनकर्ता ।। दुर्जनांच्या निःपाता। जन्म जगी घेतला ।।४।। बाळपणी नंदाघरी । लीला केल्या अनेकपरी ।। यशोदेचा तू मुरारी। नंदलाल गोकुळीचा ।।५।। जो जो येई शरण। अनन्य भावे करून ।। त्याते देशी अभयदान । मलाही त्वा रक्षावे ।। ६ ।।
दिव्य तुझे सुदर्शन । मला घडू दे दर्शन ।। त्याने माझे रक्षण । तवाज्ञेने करावे ।।७।। असो बंकटे गजानना । स्वगृहासी नेले १३ जाणा ।। मनोभावे पूजना । नित्य करी भक्त तो ।।८ ।। गुरुसेवा नित्य करी ।।शुध्द भाव अंतरी । त्यांचे जेवण झाल्यावरी । स्वतः प्रसाद घेतसे ।।१।। गजानन महिमा वाढला । अनेकांना प्रत्यय आला ।। जो तो धावे दर्शनाला । बंकटाच्या घरी हो ।।१०।। कोणी धन मागावे। कोणी दुः ख सांगावे ।। कोणी कृपेसी मागावे । गजानना वंदोनी ।।११।। अनेकांनी गुरु केले । प्रेमादरे शिष्य बनले ।। गुरुसेवेमाजी रमले । खरे खुरे भक्त ते ।।१२।।
गजाननाची ऐकून कीर्त । एक गोसावी तेथे येत ।। तो काशीचा असे सत्य। नवस फेडाया आला असे ।।१३।। त्याने होता नवस केला। अर्पण करू गांजाला ।। गुरु गजाननाला। म्हणजे काम होईल ।।१४।। गोसाव्याचा हट्ट होता। गुरुपदी ठेवी माथा ।। म्हणे या चिलमीचा आता। विसर तुला न पडावा ।।१५।। गोसाव्याची भाव भक्ती। नम्र कृती नम्र वृत्ती ।। सद्गुरुंच्या मनी ती। असे फार ठसावली ।।१६।। हट्ट त्यांनी १४ पुरविला। चिलमीचा वसा चालला ।। समाधान गोसाव्याला। आनंदाने परतला ।।
।।१७।। एकदा काही लोक आले। दर्शन त्यांचे घेण्या भले ।। गुरु होते निजलेले । काय करावे प्रश्न पडे ।। १८ ।। त्यांना जाण्याची घाई फार । कसा करावा विचार ।। विठोबा माळी आधार। ते समयी वाटला ।।१९।। हा विठोबा अहंकारी । त्याच्याकडे येती सारी ।। बाबा आमुची वारी। सफल आता होऊ दे ।। २० ।। जरी न महाराज जागले । तसेच जाणे आता आले ।। काही न आमचा उपाय चाले। तूच करावे काहीतरी ।।२१।। विठोबाची स्तुती केली। तेणे त्याची कळी खुलली ।। जाऊनिया गुरुमाऊली । त्याने जागे केले की ।। २२ ।। मंडळी मनी सुखावली । दर्शनाची इच्छा पुरली ।। आनंदाने परतली । आपुल्या गावाकारणे ।।२३।। महाराजांनी विठोबाला । मग यथेच्छ चोप दिला ।। अरे ढोंगीपणाला । इथे मिळे ना किंमत ।। २४ ।।
गुरु त्यास बजाविती । विठोबाची त्रेधावृत्ती ।। सोड्डुनिया गुरुप्रती १५। निघूनिया गेला तो ।।२५।। त्याच गावी जानराव । देशमुख ते होते राव ।। व्याधीमुळे शरीरभाव । त्यांचा पूर्ण पालटला ।। २६ ।। किती दिली औषधे । किती बांधले गंडेदोरे ।। रोग मुळी ना आवरे। हात टेकिले वैद्यांनी ।। २७ ।। म्हणे आता फार झाले । उपचारही खूप झाले ।। घोंगडीवरी काढून भले । यांना आता ठेवावे ।।२८ ।। घरात झाला आकांत। नाही त्यांच्या शोका अंत ।। प्रत्येकाच्या मनी खंत । काय करावे म्हणोनी ।।२९ ।।
कोणी बोलती उपाय एक। बंकटाच्या गृही देख ।। गजानन गुरु साक्षात । त्यांचे पाय धरावे ।। ३० ।। त्यांच्या पदतीर्थाने। आरोग्याचा लाभ होणे ।। कोणीतरी जाऊन येणे। तीर्थ पदीचे आणण्या ।।३१।। म्हणोनी आला एक जण । बंकटपित्यास विनवोन ।। तीर्थ पदीचे द्यावे म्हणोन। हात जोडिले तयाला ।। ३२ ।। बंकटाच्या वडिलांनी। पेला एक घेवोनी ।। त्यात भरुनिया पाणी । गुरुपदाते लाविले ।। ३३ ।। तीर्थ देतो जानरावा । त्याला आराम पडावा ।।
व्याधीचा उपशम व्हावा । मनोमनी प्रार्थिले ।। ३४ ।। गुरु देती अनुमती । आप्त नेई तीर्थाप्रती ।। जानरावा मुखात ती । धार धरिती विश्वासे ।।३५।। त्या तीर्थाने किमया केली । व्याधी दूर पळाली ।। ठणठणीत प्रकृती झाली। मग जानरावाची ।।३६ ।। तो आला धावोन। मनो भावे वंदन ।। केले शिर नमवोन । प्रचिती आली तयाला ।। ३७ ।। मग भंडारा घातला । गाव आला भोजनाला ।। गुरु गजाननाला । मनोभावे शरण तो ।। ३८ ।। अशी ही गजानन कथा । पुढील अध्यायी सांगू आता ।। श्रोते करोनी एकचित्ता । गजानना आठवावे ।। ३९ ।। गजानन गजानन । मुखे होता नामस्मरण ।। गुरु प्रत्यक्ष प्रगटोन। दर्शन देई लीलेने ।।४० ।।
इति श्रीगजानन लीला गाथा ग्रंथ तृतीयोऽध्याय समाप्त : ।। शुभं भवतु ।।
Shree Gajanan Leela Gatha 3 Adhyay:श्री गजानन लीला गाथा १ अध्याय (लहान पोथी)
शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?
असं करा इम्प्रेस तुमच्या व्हॅलेंटाईन पार्टनरला!
Shree Gajanan Leela Gatha 3 Adhyay: थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!
तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!
“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!
पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार आतील फरक?
Shree Gajanan Leela Gatha 3 Adhyay: तुमचं जीवन बदलणारे रहस्य !
Shree Gajanan Leela Gatha 3 Adhyay: accused-absenteeism-and-the-dispensing-of-313-statements-a-case-study-of-the-bombay-high-courts-approach-in-navneet-singh-gogia-vs-state-of-maharashtra/embed/