Shree Gajanan Leela Gatha 4 Adhyay: श्री गजानन लीला गाथा ४ अध्याय (लहान पोथी)

Shree Gajanan Leela Gatha 4 Adhyay: गुरु श्री गजाननाच्या पोथीचा चौथा अध्याय

Shree Gajanan Leela Gatha 4 Adhyay: आज या लेखामध्ये श्री गजानन महाराज शेगाव यांचा श्री गजानन लीला गाथा म्हणजेच लहान पोथी जी २१ अध्यायाची आहे. या गाथेचा चौथा अध्याय आपल्याला वाचायला मिळणार आहे.

अध्याय चौथा

श्रीगणेशाय नमः

।। जयजयाजी शिवशंकरा । जयजयाजी विश्वंभरा ।। जयजयाजी पार्वतीवरा । माथा पदी ठेवितो ।।१।। जयजय सांब सदाशिवा । जयजयाजी नीलग्रीवा ।। उध्दरोनी मज शिवा । तव पायी लावावे ।।२।। तुवा शबरासी उध्दरीले । महानंदेला स्वर्गी नेले ।। सीमंतीनीचे पुरविले । कोड सर्व मनीचे ।।३।। तुझ्या कृपेने चांडाळणीला । कैलासपदाचा लाभ झाला ।। सिंहकेतरायाला। स्वास्थ्य लाभे सहजची ।।४।। शिवरात्रीच्या पावनदिनी । निरूपण करीती हरिणी ।। त्यायोगे व्याधा लागोनी। शिवपद प्राप्त जहाले ।।५।। तू भोळा सदाशिव । भक्त पायी घेता धाव ।। जाणोनी मनीचा भाव। उध्दरीसी तयाते ।। ६ ।।

भस्मधारण विधिते। सांगोनिया भक्ताते ।। भस्माच्या महात्म्याते। १८ तूचि देवा वर्णिले ।।७।। असो गजानन शेगावाते। बंकटाच्या घराते ।। सदैववास्तव्याते । करील होते आनंदे ।।८ ।। कितीतरी भक्त येती । गुरुपदातेवंदिती ।। शंका मनीच्या पुसती । गुरु देती उत्तरे ।।९।। चंदन चावल बेलकी पतिया । नित्य बोलती भजना या ।। दूरदूरचे भक्त पाया। विनम्र भावे वंदिती ।।१०।। अक्षय तृतीयेचा सण आला । गुरु बोलती शिष्याला ।। म्हणे चिलीम द्यावी मला । तंबाखू आत घालूनिया ।।११।।

चिलीम झाली तयार । अग्नीसाठी आतूर ।। जाणूनी जानकीराम सोनार । त्याच्या घरी पातले ।।१२।। दे रे बाबा विस्तवाते । स्वामी गजाननाते ।। परी त्याने शिष्याते । रिक्त हस्ते पाठविले ।।१३।। गजानन थोर संत । अग्नी नसे घरात ।। परी काडी धरीता तेथ । चिलीम गुरुंची पेटली ।।१४।। गजानन संत थोर । धाव घेई वैश्वानर ।। जानकीरामा घरी प्रकार। काय झाला पाहू या ।।१५।। या जानकीरामाने । केले होते चिंचवणे ।। १९ सुरु होता भोजने । अळ्या चिंचवण्या माझारी ।।१६ ।।

लोक उठती सोडून पाने ।नको नको ते जेवणे ।। जानकीरामाच्या मनाने। हाय मात्र खाल्ली की ।।१७।। त्याने जाणिला प्रकार । गजाननाचा अधिकार ।। म्हणे अन्याय केला फार । शरण आला पदाले ।।१८।। गजानन पायी मिठी त्याने घातली शेवटी ।। होता ऐशी गुरुभेटी। चिंचवणे ते सुधारले ।।१९।। सो मग भक्त झाला। वंदी गुरु चरणाला ।। म्हणे दयाळा मोक्ष मला । देई तव चरणासी ।। २० ।। मुकीन चंदू शेगावीचा । नेम असे दर्शनाचा ।। गुरु पुढे त्याची वाचा। अति मुग्ध होत असे ।।२१।।

त्यास गुरु बोलले। जा आण कान्होले ।। जे होते घरात उरले। उत्तरंडी माझारी ।।२२।। चंदू तडक घरी आला । कांतेसी मागे कान्हो ल्याला ।। ती ही होती भाविक अबला । करीन म्हणे स्वयंपाक ।।२३।। ताजे नकोत कान्होले । उत्तरंडीत जे ठेवले ।। तेच देई मला भले । असेच गुरु सांगती ।। २४।। तिने उत्तरंड धांडोळली । २० कान्होल्याची स्मृती झाली ।। दोन कान्होले घेऊन आली। पतीपाशी लवलाहे

।।२५।। चंदू मनी खूष झाला। कान्होल्याते घेऊन आला ।। लोक करीती आश्चर्याला । धन्य धन्य गजानन ।।२६।। माधव ब्राह्मण चिंचोलीचा । नुरला पाश प्रपंचाचा । ध्यास त्याला भक्तीचा । शेगावासी पातला ।। २७ ।। गुरुपदी बसोन । सुरु केले उपोषण ।। मज न्याये उध्दरोन। हट्ट त्याने धरियेला ।।२८ ।। गुरु घालती समजूत । त्याला न काही उमगल ।। नामजप करीत । एके ठायी बैसलासे ।। २९ ।। मध्यरात्रीच्या समयास । “आ” करोनी भक्षायास ।। गुरु धावुनी येता त्यास । धडकी भरली अंतरी ।।३० ।। पळे सोडून आसन। कसले मौन कसले ध्यान ।। गळाले अवघे अवसान। परी गुरु कृपा झाली ।।३१।। गुरु दयेचे सागर । कृपा केली माधवावर ।। किल्मिष त्यांचे करोनी दूर । इच्छित ते मिळाले ।। ३२ ।। ऐसी गुरुची परमकृपा । थारा नाही तेथे पापा ।। नसे थारा विकल्पा । सत्य संकल्पा आधार तो ।।३३।। गजानना तुझा दास । न करावे उदास ।। तुझ्या पदी मानस । स्थिर सर्वदा राहो हे ।।३४।। 

 इति श्रीगजानन लीला गाथा ग्रंथ चतुर्थोऽध्याय समाप्त : ।। शुभं भवतु ।।

Shree Gajanan Leela Gatha 4 Adhyay: आजच गुंतवणूक करा आणि तुमचे भविष्य सुरक्षित करा !

श्री गजानन लीला गाथा १ अध्याय (लहान पोथी)

शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

असं करा इम्प्रेस तुमच्या व्हॅलेंटाईन पार्टनरला!

थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

Shree Gajanan Leela Gatha 4 Adhyay: तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!

 तुमचं जीवन बदलणारे रहस्य !

:accused-absenteeism-and-the-dispensing-of-313-statements-a-case-study-of-the-bombay-high-courts-approach-in-navneet-singh-gogia-vs-state-of-maharashtra/embed/

Loading