Shree Gajanan Leela Gatha 6 Adhyay: श्री गजानन लीला गाथा ६ अध्याय (लहान पोथी)

Shree Gajanan Leela Gatha 6 Adhyay: गुरु गजाननाच्या पोथीचा सहावा अध्याय

Shree Gajanan Leela Gatha 6 Adhyay: आज या लेखामध्ये श्री गजानन महाराज यांचा गजानन लीला गाथा म्हणजेच लहान पोथी जी २१ अध्यायाची आहे. या गाथेचा सहावा अध्यायाय आपल्याला वाचायला मिळणार आहे.

अध्याय सहावा 

श्रीगणेशाय नमः

 ।। जय जय हनुमेता। राम भक्त वायुसुता ।। अंजनी तनया सस्यूता । धाय धाव सत्वरी ।।१।। जग सारे नास्तिक झाले । रामनाम कुणी न बोलले ।। विषयामध्ये रंगले। आत्मतत्व विसरुनी ।।२।। रामनामे शिला तरल्या । रामचाने तरला चाल्या ।। रामनामे आल्या । रिध्दी सिध्दी भेटावया ।।३।। रामनाम मुखी घ्यावे। रामाचे स्मरण करावे ।। राम भजावा जिवेंभावे । मनोमनी आत्स हो ।।४।। मरी देवा विषयाने। बेजार केले मदाने ।। म्हणोनच विनवणे । मला भाग पडे की ।॥५॥॥ मारुतीराया धावत येई। विषय वासना दूर लावी ।। राम नामी रत व्हावी। मम जिव्हा देवा रे ।।६।। तन मन धनाने। शांत चित्त आनंदाने ।। रामराया आळविणे। मज शक्य होऊ दे ।।७।। मज भेटो सीता पती मज मिळो अयोध्यापती ।। मज लाभो रघुपती । हनुमंताच्या कृपेने ।।८ ।।

बैंकटलाले सद्‌गुरुनाथा । मक्याची कणसे खाण्याकरिता ।। नेले होते ऑपुले होता। काय घडले ते सांगतो ।।९।। सवे होते शिष्यजन । बंकट भास्कर हे ही जाग ।। कणसे मक्याची आणोन । ठेविली होती भाजण्या ।।१०।। तेथे अग्नी पेटविला । त्याच्या मग उठती ज्वाला ।। धग त्याची मोहोळाला । झाडावरील लागली ।।११।। मोहोळी होत्या गांधील माशा । मग झाला तमाशा ।। धाऊन येता गांधील माशा । सारे तेथुनी पळाले ।।१२।। कुणी न मागे राहिले । फक्त गुरु बसलेले ।। माशांनी त्या वेढिले । दंश करिती देहाला ।।१३।। गुरुच्या देहावर । माशा बसल्या खरोखर ।। चावे घेती गुरु स्थिर । नाही विचलीत ते झाले ।।१४।।

बंकट धीर धरोन। गुरुपाशी येवोन ।। क्षमा मागी करुणा वचन । अपराध पोटी घालावा ।।१५।। देहावरी माशा होत्या । गुर्वाज्ञेने गेल्या त्या ।। कणसे भाजुनी त्वरिता । सारे करिती भक्षण ।।१६।। काटे रुतले माशांचे । गुरुदेहा वरी साचे ।। श्वास रोधिता त्याचे। दर्शन सर्वां घडलेसे ।।१७।। असो एकदा गुरु माऊली । आकोटासी धावली ।। तेथे नरसिंग बाबा वल्ली । वास्तव्याला असे हो ।।१८।। हा बंधू गुरुचा। पूर येई आनंदाचा ।। दोन अंत संगमाचा । अपूर्व योग येत असे ।।१९।। तेथे काही दिवस । गुरु करिती वास्तव्यास ।। तेथुनी शिवर गावास । शिष्यासवे पातले ।। २० ।।

नदी काठी वाळवंटी। प्रभात समयी गुरु येती ।। सवे होत्या शिष्य पंक्ती । नामस्मरण चालले ।।२१।। व्रजभूषण पंडित । चारी देशी विख्यात ।। संस्कृत्त प्राकृत सारे ग्रंथ । त्याने होते पढलेले ।।२२।। विद्वान होता कर्मठ । रोज होता पहाट ।। नदीवरी तो भट । स्नानासाठी जात असे ।।२३।। करुनी स्नान आणि संध्या । भास्कराशी देई अर्ध्या ।। परते घरी नित्यपूजा । त्याची सवेचि चालत असे २८ ।। २४ ।। अर्घ्य देता गुरु पाहे। म्हणे सूर्य प्रकटलाहे ।। धाव घेई लवलाहे । पाय

चुरी तो आनंदे ।।२५।। आज मला लाभ झाला । सूर्योपासना ये फळाला ।। गुरुचा तो अंकित झाला। पदी नमितसे कितिकदा ।। २६ ।। गुरु त्यास आलिंगीती । पोटी धरोनी थोपटीती ।। करू नको मनी खंती । तपश्चर्या पावेल ।।२७ ।। गुरुकृपेने तयाला । लाभ ऐसा अपूर्व झाला ।। तो पावला भाग्याला । ऐसे महात्म्य गुरुचे ।। २८ ।। ऐसी ही गजानन कथा । अतिगोड सांगू आता । श्रध्देने वाचिता ऐकता। गुरु प्राप्त होतसे ।।२९ ।।

इति श्रीगजानन लीला गाथा ग्रंथ षष्ठोऽध्याय समाप्तः ।। शुभं भवतु ।।

Shree Gajanan Leela Gatha 6 Adhyay: तर मग यंदा करताना पालक पूजन दिवस साजरा !

आता सोप्या पद्धतीत मिळवा घरबसल्या मतदान कार्ड! 

Shree Gajanan Leela Gatha 6 Adhyay: शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

असं करा इम्प्रेस तुमच्या व्हॅलेंटाईन पार्टनरला!

थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!

 तुमचं जीवन बदलणारे रहस्य !

Shree Gajanan Leela Gatha 6 Adhyay: accused-absenteeism-and-the-dispensing-of-313-statements-a-case-study-of-the-bombay-high-courts-approach-in-navneet-singh-gogia-vs-state-of-maharashtra/embed/

Loading