Skandamata Navratri 2025 5th Day; “योग्य निर्णयक्षमता आणि प्रगतीचे वरदान देणारी स्कंदमाता”
Skandamata Navratri 2025 5th Day; सध्शाया सुरू असलेल्या शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी दुर्गेचे पाचवे स्वरुप म्हणजे स्कंदमाता. (Skandamata Navratri 2025 5th Day) या नावाने पूजले जाते. कुमार कार्तिकेय (स्कंद) यांची माता असल्यामुळे देवीचे हे रूप स्कंदमाता म्हणून ओळखले जाते. नवरात्रीच्या या दिवशी देवीची उपासना ज्ञान, बुद्धी, विवेक, प्रेम आणि वात्सल्याची प्रतीक मानली जाते. जे श्रद्धेने स्कंदमातेची भक्तिभावाने पूजा करतात त्यांना सुख-समृद्धी, कुटुंबातील ऐक्य, अपत्यप्राप्ती तसेच सर्व संकटांतून मुक्ती मिळते, असा विश्वास आहे.
स्कंदमाता चतुर्भुजा असून त्यांच्या दोन हातांत कमळ आहे, एका हातात कुमार कार्तिकेय बसलेले आहेत. देवीचे वाहन सिंह आहे आणि त्यांच्या तेजोमय रुपातून वात्सल्य, प्रेम आणि मातृत्वाचा संदेश प्रकट होतो. या रूपात त्या भक्तांना ज्ञान, विवेक आणि योग्य निर्णयक्षमता प्रदान करतात. आज या लेखांमध्ये आपण या Skandamata बद्दल थोडक्यात महत्वपूर्ण अशी माहिती पाहूया.
नवरात्रातील ९ दिवसाचे ९नैवेद्य
स्कंदमातेचे स्वरूप
Skandamata’s Divine Appearance
Skandamata Navratri 2025 5th Day; नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पूजले जाणारे दुर्गेचे स्कंदमाता स्वरूप हे प्रेम, वात्सल्य आणि मातृत्वाचे प्रतीक मानले जाते. त्या चतुर्भुज असून त्यांच्या दोन हातांत कमळाचे फूल आहे, एका हातात कुमार कार्तिकेय बसलेले आहेत आणि चौथा हात भक्तांचा आशीर्वाद करण्यासाठी सदैव उचललेला असतो.
त्यांचे वाहन सिंह असून त्या आपल्या तेजोमय रुपातून भक्तांना ज्ञान, विवेक आणि आत्मविश्वास प्रदान करतात. स्कंदमाता सौरमंडळाच्या अधिष्ठात्री मानल्या जातात आणि त्यांच्या उपासनेने साधकाला आध्यात्मिक उन्नतीबरोबरच जीवनातील योग्य निर्णय घेण्याची क्षमता लाभते.
पाचव्या दिवशी पूजेची पद्धत
Skandamata’s Puja
Skandamata Navratri 2025 5th Day; नवरात्रीचा हा दिवस स्कंदमातेला समर्पित असल्याने सकाळी लवकर स्नान करून मंदिर किंवा पूजाघर स्वच्छ करावे. गंगाजल शिंपडून शुद्धी करून देवीचे चित्र किंवा मूर्ती पिवळ्या अथवा लाल वस्त्रावर स्थापित करावी. माता स्कंदमातेला लाल वा पांढरी फुले, गुलाब, जास्वंद अर्पण करावे. पूजेत दिवा, अगरबत्ती, मिठाई, फळे, विशेषतः केळी नैवेद्य म्हणून ठेवावीत.
तुपाचा दिवा लावून दुर्गा सप्तशती वा चालिसाचे पठण करावे आणि नंतर आरती करून क्षमायाचना करावी. या दिवशी पांढरे किंवा लाल वस्त्र धारण करणे शुभ मानले जाते. श्रद्धेने ही पूजा केल्यास कुटुंबात सुख-समृद्धी टिकून राहते तसेच भक्ताला जीवनातील सर्व अडथळ्यांवर मात करण्याची ताकद मिळते.
स्कंदमातेच्या देवीच्या पूजेचे लाभ
Skandamata’s Puja Benefits
- भक्तामध्ये ज्ञान, विवेक व आत्मविश्वास वाढतो.
- भीती दूर होते व योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होते.
- कुटुंबात सुख-समृद्धी व शांती नांदते.
- अपत्यप्राप्तीसाठीही स्कंदमातेला अर्ज केला जातो.
- सर्व संकटांचा नाश होऊन जीवनात प्रगतीची दारे उघडतात.
- देवीच्या आशीर्वादाने भक्ताच्या जीवनातील दुविधा नष्ट होतात, विचारशक्ती आणि आध्यात्मिक उन्नती घडते. तसेच स्कंदमातेला संतान प्राप्तीसाठीसुद्धा भक्त भावपूर्ण अर्ज करतात, आणि तिच्या आराधनेने इच्छित आशीर्वाद लाभतात.
स्कंदमाता मंत्र
Skandamata’s Mantra
“या देवी सर्वभुतेषु मां स्कंदमाता रूपेण संस्थिता,
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।”
“सिंहासना गता नित्यं पद्माश्री तकरद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी।।”
देवीच्या आशीर्वादाने भक्ताच्या जीवनातील दुविधा नष्ट होतात, विचारशक्ती आणि आध्यात्मिक उन्नती घडते. तसेच स्कंदमातेला संतान प्राप्तीसाठीसुद्धा भक्त भावपूर्ण अर्ज करतात, आणि तिच्या आराधनेने इच्छित आशीर्वाद लाभतात.
जीवनात यश, स्वास्थ्य आणि आनंदाची गुरुकिल्ली म्हणजे “दुर्गा सप्तशती पाठ”
आवडता रंग, फुले आणि नैवेद्य
Favourite Colour, Favourite Flowers, Favourite Offering/Naivedya of Skandamata
पाचवा माळी ला आपण स्कंदमाताची पूजा करतो या स्कंदमातेला पांढरा, पिवळा किंवा लाल रंग अत्यंत प्रिय आहे, म्हणून या दिवशी या रंगांच्या वस्त्रांचा वापर भक्तांसाठी शुभ मानला जातो. देवीला आवडणाऱ्या फुलांमध्ये मुख्यत्वे लाल गुलाब, पिवळी किंवा पांढरी फुले, जास्वंद स्वीकृत आहेत.
Naivedya of Skandamata
(Naivedya of Skandamata ) नैवेद्य म्हणून केळी सर्वात प्रिय फळ आहे, तसेच पांढरी मिठाई, केळीचा हलवा, खीर किंवा गोड पदार्थ देवीला अर्पण करावेत, असा शास्त्रात निर्देश आहे. पूजा करताना या गोष्टी निरपेक्ष भावाने अर्पण केल्यास देवीचा कृपाशीर्वाद मिळतो आणि जीवनाचे मार्ग सुकर होतात.
Skandamata Navratri 2025 5th Day;
![]()








