Star pravah serial premachi goshta:  “ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका घेणार आपला निरोप!”

Star pravah serial premachi goshta:’प्रेमाची गोष्ट’ फेम अपूर्वा नेमळेकरची भावुक पोस्ट..

Star pravah serial premachi goshta:मनोरंजन म्हटले की, मराठी मालिकांना आपल्याकडे घरोघरी पाहणाऱ्या प्रेक्षकांचा मोठा वर्ग लाभलेला आहे. अशाच एका लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ची या आठवड्यात भावनिक विदाई होणार आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये सुरू झालेली ही मालिका दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या हृदयात घर करून होती. दिलेल्या माहितीनुसार, टीआरपीमधील चढ-उतारामुळे हा कठीण निर्णय घेण्यात आला आहे.

Star pravah serial premachi goshta:मनोरंजन म्हटले की, मराठी मालिकांना आपल्याकडे घरोघरी पाहणाऱ्या प्रेक्षकांचा मोठा वर्ग लाभलेला आहे.

 थोडक्यात मालिकेचा सुरुवातीचा प्रवास

“प्रेमाची गोष्ट” मालिकेने सुरुवातीच्या काळात प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळवले होते. तेजश्री प्रधान यांनी मुक्ता कोळीच्या भूमिकेत उत्कृष्ट अभिनय करून मालिकेला एक वेगळी ओळख दिली होती. मात्र, जानेवारी २०२५ मध्ये तेजश्रीने मालिका सोडल्यानंतर टीआरपीवर मोठा फटका बसला. त्यानंतर स्वरदा ठिगळे यांनी मुख्य भूमिका सांभाळली, पण प्रेक्षकांची प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणे नव्हती.

 Star pravah serial premachi goshta: या मालिकेची कमी होत जाणाऱ्या टीआरपीमुळे वाहिनीने मालिकेची वेळ दोनदा बदलली. शेवटी, मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. नुकतंच मालिकेचं शूटिंग पूर्ण झालं आणि कलाकारांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट्स शेअर करून आपल्या अनुभवांची आठवण सांगितली.

आता 1 जुलैपासून विजेचं बिल 26% कमी

मालिकेतील स्वातीची भूमिका साकारणाऱ्या नम्रता सुमिराज यांनी सेटवरच्या शेवटच्या दिवसाच्या इन्स्टाग्राम स्टोरीज शेअर केल्या. बालकलाकार इरा परवडे (सई) यांनी सर्व कलाकारांना भावनिक गिफ्ट्स दिले. मुख्य कलाकार स्वरदा ठिगळे आणि राज हंचनाळे यांनी स्क्रिप्टचे फोटो पोस्ट करून मालिकेबद्दलच्या आठवणी शेअर केल्या.

 ही नवीन मालिका  सुरू होत आहे

Star pravah serial premachi goshta: “प्रेमाची गोष्ट”च्या जागी ७ जुलैपासून “हळद रुसली, कुंकू हसलं” ही नवीन मालिका सुरू होणार आहे. यात समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर (“मन धागा धागा…” फेम) प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

 आताच अर्ज करा! जिल्हा परिषद व पंचायत समिती योजना २०२५ 

Loading