Table of Contents
ToggleUpanayana Sanskar In Marathi 2nd Part 2024:जाणून घ्या उपनयन संस्कारात केल्या जाणाऱ्या विविध विधीची माहिती
Upanayana Sanskar In Marathi 2nd Part 2024: प्रत्येक व्यक्तीचे जीवन आरोग्यपूर्ण, विकसित व्हावे, सुसंस्कृत व्हावे त्याद्वारे उत्तम व्यक्ती निर्माण होते. यासाठी विविध संस्कार करतात,मुख्यत्वे उपनयन संस्कार हा संस्कार पिता आणि पुत्रांमध्ये होतो पिता आपले संस्कार हे आपल्या पुत्रास बहाल करतात.
वैदिक हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी उपनयन संस्कार हा दहावा संस्कार, उपनयन संस्कार म्हणजे काय? व्रत बंध म्हणजे काय? आशा आणि प्रश्नांची माहिती याआधी लेखात पाहिली आहे.
संस्कार म्हणजे जन्मजात असणारे विकार किंवा दुर्गुण दूर करून मनुष्य जीवन अधिक सुदृढ व निर्दोष व्यक्तिमत्व घडविण्यासाठी केलेला एक प्रयत्नपूर्वक विधी होय. चांगल्या समाज रचनेची पायाभरणी व्हावी व त्यासाठी चांगले व सुसंस्कृत व्यक्ती निर्माण व्हावे हा या संस्कारा मागील उद्देश असावा.
Upanayana Sanskar In Marathi 2nd Part 2024:साधारणपणे बालकाला वयाच्या पाचव्या किंवा आठव्या वर्षी उपनयन संस्कार करणे योग्य मानले जाते, आठव्या वर्षापासून बालकाच्या कोवळ्या मनात संस्काराची स्मृती तयार होते. व ती कायम टिकून राहते असे देखील मानण्यात येते. तसेच १२ ते १६ वर्षाचा काळ हा अध्ययनाचा काळ मानला जातो.
याआधी आपण पाहिले की उपनयन संस्कार म्हणजे काय या लेखामध्ये आपण पाहणार आहोत उपनय संस्कारामध्ये अनेक विधी केले जातात आज आपण पाहूया उपनयन संस्कारांमध्ये केल्या जाणारे विविध विधी.
गुरुगृही जाणारा बटू सुसंस्कारित असावा यासाठी हे विविध विधी केले जातात.
Upanayana Sanskar In Marathi 2nd Part 2024: चौलकर्म
१) चौलकर्म :
- चौलकर्म हा उपनयन संस्कारात केला जाणारा पहिला विधी यामध्ये बटूचे केस काढले जातात त्यामध्ये केसांचा एक घेरा आणि शेंडी ठेवणे म्हणजेच चौलकर्म संस्कार,
- यामागील उद्देश: केसांच्या मुळाशी असलेले दोष हे बालकांमधून जावे व डोक्यावरच्या माथ्याभागी असलेल्या बुद्धीचे रक्षण व्हावे तसेच मेधा शाबूत राहावी यासाठी हा घेरा आणि शेंडी चे प्रयोजन केले जाते हा यामागील उद्देश.
- चौलकर्म केल्यानंतर बालकास औक्षवंत करून बालकास अभ्यंगस्नान घातल्या जाते, तसेच बालकास सोवळे किंवा उपरणे घातल्या जाते तेव्हा बालक हा बटूरेषात मुंज मुलगा तयार होतो, आणि त्यापुढील मातृभोजना भोजनासाठी तयार होतो.
Upanayana Sanskar In Marathi 2nd Part 2024: मातृभोजन
२) मातृभोजन:
हा सोहळा तसा छोटासा असतो परंतु त्याचे महत्त्व खूप आहे. या सोहळ्यामध्ये मुलाची आई होणे याचे कौतुक थोडक्यात केले जाते असे मला वाटते, मातृभोजनाच्या वेळेस बटूला त्याच्या आईच्या हातून शेवटचे जेवण जेवायचं असतं त्यानंतर ज्ञानप्राप्तीसाठी तयार झालेल्या बटूला अनेक नियम पाळावे लागतात. या विधीच्या वेळेस गीत देखील गायल्या जाते, आईचा या विधीत गोड कौतुक केल्या जाते, त्यावेळेस आई आणि मुलाचे सर्वजन गोड घास भरून कौतुक करतात.
येई बाळा लवकरी माय पाहे वाट । मातृभोजनाचा केला बघ किती थाट ॥
मातृभोजनानंतर बटूला अनेक नियम पाळावे लागतात जसे की सर्वात पहिला नियम म्हणजे ‘ उष्ट अन्न वर्ज्य ’ उष्ट्या अन्नामुळे बुद्धी भ्रष्ट होते, म्हणून बटूने शुद्ध, सात्विक अन्न घ्यावे, परान्न टाळाव . बाहेरचे अन्न टाळावे.
यामागचा उद्देश : बालकाने सात्विक अन्न घ्यावे, परान्न टाळावे, तसेच बाहेरचे अन्न टाळावे हा उद्देश. चौलकर्म आणि मात्र भोजन या विधीनंतर तिसरा विधी येतो तो म्हणजे अक्षतारोपण / मंगलाष्टक
Upanayana Sanskar In Marathi 2nd Part 2024: अक्षतारोपण /मंगलाष्टक:
३)अक्षतारोपण /मंगलाष्टक:
मंगलाष्टक (देव-देवतांच्या स्तुतीपर श्लोक व आशिर्वचनपर काव्यगायन म्हणजे मंगलाष्टक होय) हा विधी सुरू करायच्या आधी मुलाचा मामा कडेवर घेऊन मांडवात आणतो, बटू व त्याच्या वडिलांनी समोरासमोर पाटावर बसावे.बटूच्या हातात नारळ देऊन दोघांमधे अंतरपाट धरतात.
Upanayana Sanskar In Marathi 2nd Part 2024:बटू व त्याच्या वडिलांनी समोरासमोर पाटावर बसावे. बटूच्या हातात नारळ देऊन दोघांमधे अंतरपाट धरावा.मंगलाष्टके म्हटल्यावर शुभ मुहूर्तावर अंतरपाट बाजूला करावा. वडिलांनी मुलाचे मुख पाहावे व त्याच्या गळ्यात हार घालावा. बटूने स्वत:च्या हातातील नारळ वडिलांना द्यावा व त्यांना वाकून नमस्कार करावा.
वडिलांनी मुलाला त्यांच्या उजव्या मांडीवर बसवावे. मंत्र म्हणून झाल्यावर उपस्थितांनी अक्षता बटूच्या डोक्यावर वाहाव्यात.
मंगलाष्टके म्हटल्यावर शुभ मुहूर्तावर अंतरपाट बाजूला करतात. या मंगलाष्टकात “कुर्या बटो मंगलम सावधान”असे म्हटले जाते. पित्याने पुत्राचे मुख पाहावे व त्याच्या गळ्यात हार घालावा. बटूने स्वत:च्या हातातील नारळ वडिलांना द्यावा व त्यांना वाकून नमस्कार करतो. वडिलांनी मुलाला त्यांच्या उजव्या मांडीवर बसवावे. मंत्र म्हणून झाल्यावर उपस्थितांनी अक्षता बटूच्या डोक्यावर वाहतात.
मुंज-ज्ञान आणि शिस्तीचा जीवनातील आरंभ
जाणून घेऊया विविध जातींच्या संस्कारांचे रंग !
अन्नप्राशन शिशुच्या जीवनातील पहिला स्वाद !
कार्तिकी पौर्णिमा देव दीपावलीचा उत्सव!
निष्क्रमण संस्कार: बाळ करणार पहिल्यांदा निष्क्रमण यात्रा
पाळणा संग्रह वात्सल्याच्या गोड आठवणी
जातकर्म संस्कार :बाळ जन्मल्यानंतर केल्या जाणारा महत्त्वाचा संस्कार
Upanayana Sanskar In Marathi 2nd Part 2024: प्रायश्चित्त होम
गर्भादानापासून चौलकर्मापर्यंतचे पहिले नऊ संस्कारांपैकी काही संस्कार जर काही म्हणजेच १६ संस्कारांपैकी नऊ संस्कार जसे की, जात कर्म,नामकरण, अन्नप्राशन, चूडा कर्म असे संस्कार करावयाचे राहिले असतील तर त्याबद्दल होमहवनपूर्वक प्रायश्चित्त घेऊन मग उपनयन हा दहावा संस्कार करायचा असतो.
Upanayana Sanskar In Marathi 2nd Part 2024: उपनयन होम
५)उपनयन होम:
या संस्कारातील हा सर्वात महत्त्वाचा विधी असून यामध्ये बटूला म्हणजेच मुंजाला सूर्य आणि अवमान आधी देवांचे आशीर्वाद मिळावे यासाठी अग्नीमध्ये आहुती दिल्या जातात. मृगाजीन, यज्ञोपवीत व पलाशदंड देऊन बटूचे मौंजीबंधन केले जाते. यज्ञोपवीत हे आपल्या वैदिक जीवनधारणेचे प्रतीक आहे. यज्ञोपवीतामध्ये ९ तंतू असतात. त्यांमध्ये अनुक्रमे ॐकार, अग्नी , नाग, सोम, पितर, प्रजापती, वायू, यम आणि विश्वेदेव यांची स्थापना केली जाते. या नऊ तंतूंची तीन-तीनची त्रिसूत्री केली जाते. त्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद यांची स्थापना करतात.
या सर्वांची मिळून एकत्र गाठ म्हणजे ‘ब्रह्मगाठ’ बांधली जाते. असे हे पवित्र यज्ञोपवीत (जानवे) इथून पुढे आयुष्यभर धारण करायचे असते.
जानवे: बटू चा मामा हा बटूस सोन्याचे जानवे उपनयन संस्कारात करतो. तसेच बटूला संध्या करण्यासाठी लागणारे साहित्य जसे की, पळी, फुलपात्र, ताम्हण हे मामा देतो. जसं जमेल तसे ( चांदीचे किंवा तांब्याचे) तसेच कौतुक म्हणून मुंजास चांदीचे, सोन्याचे, फुलाचे व मोत्याचे जाणवे घालतात.
Upanayana Sanskar In Marathi 2nd Part 2024: मौंजीबंधन
६) मौंजीबंधन:
जीवनात येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी कंबर कसून बटू तत्पर राहावा यासाठी उपचार म्हणजेचमौंजीबंधन विधी होय.
मुंज नावाच्या गवताची दोरी वळून ती कमरेभोवती मेखलेप्रमाणे धारण करतात. Upanayana Sanskar In Marathi 2nd Part 2024: पलाशदंड म्हणजे काय पळसाच्या झाडाची काठी (दंडधारण) : शक्यतो बटूच्या उंचीचा पळसाचा दंड (जाड काठी) त्याच्या हातात द्यावा,बटो या दंडाचा वापर आत्मरक्षणासाठी नाही तर आत्मशासनासाठी सुद्धा करू शकतो. पूर्वीच्या काळात रानावनातून फिरताना स्वसंरक्षणासाठी याची आवश्यकता भासत असे. कालांतराने त्याचा उद्देश लोप पावला.
Upanayana Sanskar In Marathi 2nd Part 2024: गायत्री उपदेश व अनुप्रवचनीय होम
७)गायत्री :
या उपनयन विधीमध्ये पिता आपल्या पुत्राला गायत्री उपदेश करून पित्याचा असलेला वैदिक परंपरेचा वारसा त्याच्या पुढच्या पिढीकडे सोपवतो. बुद्धीचा उदय, संवर्धन व जतन व्हावे यासाठी पिता आपल्या पुत्राला गायत्री उपदेश करतो.
असे म्हणतात की, गायत्री मंत्र ही ब्राह्मणांची माता आहे,तो मंत्रराज आहे. सत्-चित्-आनंद स्वरुप सृष्टीकर्त्या तेजोमय प्रकाशमान परमात्म्याच्या तेजाचे आम्ही ध्यान करतो; तो परमात्मा आमची बुद्धी व कर्म यांना सत्याकडे, सन्मार्गाकडे प्रवृत्त करत राहो अशी सदिच्छा या मंत्रात व्यक्त केलेली आहे.
Upanayana Sanskar In Marathi 2nd Part 2024: मेधाजनन
उपनयन संस्कारातील मेधा जनन हा संस्कार केला जातो तो बटूची बुद्धी- मेधा-स्मरणशक्ती वाढावी यासाठी.
उद्देश: बटोनी केलेला अभ्यास त्याच्या जास्तीत जास्त लक्षात राहावा यामागील या विधीचा उद्देश.
Upanayana Sanskar In Marathi 2nd Part 2024: भिक्षावळ
९)भिक्षावळ:
भिक्षावळ म्हणजे विद्यार्थ्यांसाठी गुरुगृही निघालेल्या बटूला तहानलाडू, भूक लाडू बांधून देण्याचा प्रकार म्हणजे भिक्षावळ होय. भिक्षावळ दीक्षा ओळीमध्ये रिक्षावर भिक्षा व भिक्षावळीत अनेक प्रकारचे लाडू हे बटूस आई व इतर महिला नातेवाईक घालतात, ही भिक्षावळ घालताना आईच्या हातात एक पळी म्हणजेच (वरण वाढायचा चमचा) व त्यास मंगळसूत्र गुंडाळले जाते, मग बटू ची आई त्याला भिक्षावळ देते.
आई भिक्षावळ घालताना कौतुक म्हणून फुलांच्या पायघड्या घातल्या जातात, तसेच आईच्या डोक्यावर छत्री देखील धरल्या जाते,तसेच ही भिक्षावळ बटूचे आई तयार करते व बटू च्या आजोळी देखील बटू साठी भिक्षावळ आणते. बटू च्या आईने केलेली भिक्षावळ ही ब्राह्मणांना दिली जाते तर आजोळची भिक्षावळ ही बटूस खायला दिली जाते, या भिक्षा वेळीस सुकामेवा, अनेक प्रकारचे लाडू, तसेच सध्या आवडणाऱ्या मुलांना पदार्थ देखील दिले जातात उदा .चॉकलेट
भिक्षावळचा उद्देश: भिक्षेमुळे अहंकार कमी होतो व मिळेल त्यात समाधानी रहाण्याची शिकवण भिक्षा देते. यामागील हा उद्देश. बटू ने पाच खरी भिक्षा मागून दुपारच्या भोजनाची व्यवस्था करावी अशी पूर्वीची व्यवस्था होती.
समाजालाही दारी आलेल्याला माधुकरी देण्याची सवय लागली पाहिजे. त्यातून आपोआपच विद्यार्थ्यांच्या विद्यार्जनाला हातभार लागत असे देखील केल्या जात असे.
Upanayana Sanskar In Marathi 2nd Part 2024: मातृभोजनाचे गीत
मातृ भोजनाचा थाट बाळा पाटावर बैस भरविते आई तुला आज अमृताचा घास || ध्रु ||
जन्मलास जेव्हा बाळा भूक लागली जाणून भागविले माऊलीने पान्हा रक्ताचा करून मामा करी उष्टावण खीर लावुनी तोंडास भरविते आई तुला आज अमृताचा घास || १ ||
फेणी जिलेबी श्रीखंड खीर करंजी बासुंदी पंच पकवानांचे ताट मोती चोर आणि बुंदी आत्या मावशी प्रेमाने देती तुला गोड घास भरविते आई तुलाआज अमृताचा घास || २ ||
व्रत बंधनाने आता होशील तू बद्ध बाळा संपले रे बालपण मोठेपणाला तुला वाढवील तुझे आयु माऊलीचा एक घास भरविते आई तुला आज अमृताचा घास || ३ ||
मातृभोजनाचा थाट बाळा पाटावर बैस भरविते आई तुला आज अमृताचा घास आज अमृताचा घास आज अमृताचा घास
मुंज झाल्यावर प्रत्येकाने संध्या व गायत्री उपासना का करावी?
मुंज झालेल्या प्रत्येकाने संध्या व गायत्री उपासना जरुर करावी कारण ‘ गायन्तं त्रायते यस्मात् गायत्री त्वं ततः स्मृता’ म्हणजे ह्या मंत्राचे गायन करणाऱ्याचे रक्षण करते, ती गायत्री होय.
या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
अमेय वाघ :
आर माधवन : हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा
शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी