Table of Contents
ToggleVanaprastha Ashram In Marathi 2024; वनप्रस्थ आश्रम: आत्मिक उत्कर्षाचा मार्ग
Vanaprastha Ashram In Marathi 2024; आपल्या संस्कृतीमध्ये मनुष्य जीवनात चार आश्रम असून, एखादा व्यक्ती आपल्या जीवनात या आश्रमांचा स्वीकार करू शकतो. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वनप्रस्थाश्रम आणि संन्यास आश्रम ही चार महत्त्वाची हिंदू धर्मातील आश्रम संस्कृती आहे.
याआधी आपण सोळा संस्कार या संकलित अनेक संस्कार पाहिले त्यामध्ये ब्रह्मचर्य आश्रम व गृहस्थाश्रम या दोन आश्रमा संदर्भातील संस्कार देखील आपण या आधी पाहिले आहेत.
ब्रह्मचर्याश्रम हा वय वर्ष ० ते २५ वयाच्या जसे की जात कर्म, नामकरण, चुडा कर्म, उपनयन असे विविध केले जातात या या संस्कारात शिक्षण शारीरिक, मानसिक आणि नैतिक विकास बालकाचा होतो हा या उद्देशाने हे संस्कार केले जातात.
ब्रह्मचर्याश्रम नंतर गृहस्थाश्रम हा मनुष्याच्या जीवनाच्या टप्प्यात येतो, यामध्ये व्यक्ती हा विवाह करून,कुटुंबाची स्थापना आणि समाजसेवा अशा विविध उद्देशाने या गृहस्थाश्रमचे महत्वपूर्ण असतो,तसेच कुटुंबाची जबाबदारी घेणे धर्म,अर्थ, काम आणि मोक्ष या महत्त्वाच्या तत्त्वाचे पालन करतो.
Vanaprastha Ashram In Marathi 2024; वानप्रस्थाश्रम
वानप्रस्थ या शब्दाचा अर्थ जंगलाकडे जाणे असा होतो. या आश्रम पद्धतीमध्ये विवाह संस्कारातीलया सर्व जबाबदाऱ्याचा समतोल सांभाळून हळू -हळू आत्मशोधनासाठी जरा वेगवेगळी पध्दती अवलंबिणे म्हणजेच संसारातून स्वत:चे लक्ष परमेश्वर चिंतनाकडे देणे.
गृहस्थश्रम व विवाह नंतर सर्व जिम्मेदाऱ्या पार पाडून आपल्या मुलांवर सोडून किंवा घराची जबाबदारी ही मुलांवर सोपवून एखादी व्यक्ती जीवन आध्यात्मिक जीवनात परिवर्तित करतो, म्हणजेच वनप्रस्थ संस्कार किंवा वानप्रस्थाश्रम होय.
आपल्या शास्त्रात असेही सांगितले आहे की गृहस्थ नंतर वनप्रस्थ घ्यावे व त्यामुळे सर्व मानसिक विकार हे दूर होतात आणि मनाची. मनाची शुद्धता वाढते जे त्यामुळे सन्या यासाठी आवश्यक असणारे गुण हे व्यक्तीमध्ये निर्माण होतात.
Vanaprastha Ashram In Marathi 2024; वानप्रस्थाश्रमाचे वैशिष्ट्ये
शास्त्रात असेही सांगितले आहे की ग्रहस्थानंतर वानप्रस्थ घ्यावे, यामुळे सर्व मानसिक विकार दूर होतात आणि मनाची शुद्धता येते जी संन्यासासाठी आवश्यक असते.
आपल्या धर्मात चार आश्रम आणि त्या आश्रमातील व्यक्तींची कर्तव्ये सांगितली आहेत त्यातील तिसरा आश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम.
“वानप्रस्थाश्रम हा वय वर्ष ५० नंतर घेतात “
Vanaprastha Ashram In Marathi 2024; वनप्रस्थ आश्रमाचे वैशिष्ट्ये
वानप्रस्थाश्रम या आश्रमाचे वैशिष्ट्य असे आहे की, या एकाचआश्रमातून माघारी येत येते. म्हणजे केवळ शारीरिक वय झाले म्हणून जार कोणी वानप्रस्थ स्वीकारला असेल पण मन त्यात रमत नसून पुनःपुन्हा संसारात ओढ घेत असेल तर आशा माणसाला पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारता येतो.
Vanaprastha Ashram In Marathi 2024; याचे कारण म्हणजे हा आश्रम स्वीकारताना कोणातही धार्मिक विधी वगैरे नसतो. जसे गृहस्थाश्रम स्वीकारताना सोडमुंज हा विधी करून काही लग्नाचे विधी पार पाडाळे जातात तसेच संन्यास घेतानासुद्धा आधी आत्मश्रद्धा वगैरे करण्याचा विधी आहे असा कोणातही विधी वानप्रस्थ या आश्रमात प्रवेश करताना केला जात नाही. गृहात स्थायिक असलेला माणूस फक्त वनात स्थायिक होण्यासाठी जातो जेणेकरून त्याचे संसारातील मोहपाश क्षीण होऊन त्यास मागे खेचत नाहीत.
Vanaprastha Ashram In Marathi 2024; एक प्रकारे हा आश्रम म्हणजे संन्यास या शेवटच्या आश्रमाची पूर्वतयारी करणे आहे. जर माणूस पुरेसा पिकला नसेल तर त्यास माघार घेता येते – ज्यात दोष नाही.
अनेक वैदिक साहित्यात फक्त तीन आश्रमांचाच उल्लेख केलेला दिसतो परंतू या आश्रमाचा उल्लेख किंवा समावेश केलेला दिसत नाही. किंबहुना या आश्रमास गृहस्थाश्रमाचाच एक भाग असे समजण्यात येते. याचे कारण म्हणजे ज्या प्रमाणे एकदा माणसाने गृहस्थाश्रमात प्रवेश केला की तो ब्रह्मचारी रहात नाही त्याच प्रमाणे एकदा का संन्यास घेतला की पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारता येत नाही.
उदा : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता आणि नंतर गुरूच्या आज्ञेवरून गृहस्थाश्रमात प्रवेश केला त्याचे परिणाम त्या चारही भावंडांना आयुष्यभर भोगावे लागले. हे आपण ऐकले आहे.
Vanaprastha Ashram In Marathi 2024; कधी घ्यावा जीवनातून वानप्रस्थाश्रम!
मुलं शिकून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली असतात. त्याहीपुढे जाऊन त्यांची लग्न, मग लेकी-सुनांची बाळंतपणं वगैरे जबाबदाऱ्याही पार पडलेल्या असतात. सगळी सांसारिक कर्तव्यं संपल्यावरचा काळ म्हणजे वानप्रस्थाश्रम!
संसारात राहूनही अलिप्त राहणं, नातवंडांचं कौतुक पहाणं, मुला बाळांना गरज पडली तर मदत करणे संसाराकडून विशेष तर मुलाबाळांकडून फारशी अपेक्षा न ठेवता स्वतःला आवडतील ते छंद जोपासणे उपयोगाच्या आणि युक्तीच्या चार गोष्टी सांगणे जे जमतय ते सांगणे व सगळ्यांमध्ये न गुंतता सर्व पाहणे आणि हा आजच्या काळातला वानप्रस्थ आहे.
वृद्धत्व आल्यावर माणसाने सुख-विलासापासून दूर राहून वनात मुनिवृत्ति अंगीकारली पाहिजे. मुलगा जेव्हा कुटुंबाचा भार उचलण्यास सक्षम होतो, तेव्हा कुटुंबातील सदस्य मोक्षाच्या मागे लागतात. महर्षी वेदव्यासांनी वानप्रस्थासाठी वयाचा तिसरा भाग सांगितला आहे.
विवाह विधी परंपरा आणि संस्काराचा अनमोल ठेवा
लग्न सोहळा: संस्कार आणि परंपरेचा नवीन अध्याय
समावर्तन’ संस्कार म्हणजेच सोड मुंज या संस्कार
केशांत संस्कार: युवकाच्या जीवनातील नवी दिशा
मुंज-ज्ञान आणि शिस्तीचा जीवनातील आरंभ
जाणून घेऊया विविध जातींच्या संस्कारांचे रंग !
अन्नप्राशन शिशुच्या जीवनातील पहिला स्वाद !
निष्क्रमण संस्कार: बाळ करणार पहिल्यांदा निष्क्रमण यात्रा
पाळणा संग्रह वात्सल्याच्या गोड आठवणी
जातकर्म संस्कार :बाळ जन्मल्यानंतर केल्या जाणारा महत्त्वाचा संस्कार
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण
Vanaprastha Ashram In Marathi 2024; वानप्रस्थ धर्माचे पालन करावे.
वनात गेल्यावर एकाग्र चित्ताने तपश्चर्या करावी, रोज पवित्र फळे व मुळांचे अन्न गोळा करावे, नित्य भोजन करताना पितरांची व देवतांची पूजा करावी. रोजच्या जेवणानंतर पाहुण्यांची पूजा करून देवांची पूजा आणि नित्य स्वअभ्यासात मग्न राहावे.
वानप्रस्थाश्रमात प्रवेश करणे म्हणजे कर्तव्य न करता भिक्षुत्व अंगीकारणे असा कधीच होत नाही. म्हणूनच वानप्रस्थाश्रमाकडे झुकलेल्या गृहस्थाला सावध करण्यात आले आहे की तो कर्जमुक्त असावा आणि त्याच्याशिवाय त्याचे कुटुंब जगू शकेल याची खात्री दिली पाहिजे, त्याचा मुलगा कर्तव्यदक्ष आणि घराची काळजी घेण्यास सक्षम असावा, तरच त्याने वानप्रस्थाश्रमाकडे जावे.
Vanaprastha Ashram In Marathi 2024; कधी करावे वानप्रस्थाश्रमात प्रवेश
Vanaprastha Ashram In Marathi 2024; वयाची पन्नास वर्षे ठरवण्याचे कारण असे की, जोपर्यंत माणूस सक्षम आहे तोपर्यंत त्याने पैसा कमावण्याचे कर्तव्य पार पाडावे. वानप्रस्थाश्रमात पोहोचल्याने व्यक्ती या सांसारिक कर्तव्यांपासून मुक्त होते आणि जंगलातील नैसर्गिक वातावरणात सहज आध्यात्मिक प्रगती साधू शकते. यासोबतच सर्व प्रकारच्या कर्मकांडापासून शुद्ध होऊन ब्रह्मचर्य व्रत पाळल्यानंतर वानप्रस्थींनी गावातून काढून जंगलात राहावे. म्हणजेच वानप्रस्थाश्रम हे ब्रह्मचर्याश्रमाचे परिपक्व स्वरूप मानले जाऊ शकते.
Vanaprastha Ashram In Marathi 2024; कसे करावे वानप्रस्थ धर्माचे पालन?
वानप्रस्थ जीवनात माणूस त्याग, तपश्चर्या, अहिंसा आणि ज्ञान प्राप्त करत असे. आध्यात्मिक उन्नती आणि सर्व भौतिक इच्छांपासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न हा त्याचा मुख्य उद्देश होता. वानप्रस्थ हे ज्ञानवृद्धीसाठी, शरीरशुद्धीसाठी आणि तपश्चर्यासाठी सेवन केले जात असे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांनी कठोर आणि कठोर जीवन पाळले.
वानप्रस्थीने अशा वातावरणात आणि पोशाखात राहायला हवे की तो इंद्रिय वासनांपासून दूर राहू शकेल. वानप्रस्थीला तीन वेळा स्नान करावे लागते.Vanaprastha Ashram In Marathi जेणेकरून त्यांचे शरीर स्वच्छ राहील. त्याला रजोगुण आणि तमोगुण वाढवणाऱ्या मध, मांस इत्यादी पदार्थांचे सेवन करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे, जेणेकरून तो सात्विक स्वभावाचा राहील. वानप्रस्थी हा त्रास सहनशील असला पाहिजे, म्हणूनच त्याने उन्हाळ्यात झोपू नये.
इंद्रियांवर नियंत्रण, प्राणिमात्रांप्रती करुणा, सांसारिक गोष्टींपासून अलिप्तता, परमार्थावर उपजीविका करणे इत्यादि वानप्रस्थीचे मुख्य धर्म होते.
या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
अमेय वाघ :
आर माधवन : हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा
शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी