Vasubaras Diwali 2024:वसुबारस दिवाळीचा शुभारंभ

Vasubaras Diwali 2024::

Vasubaras Diwali 2024:वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस

Vasubaras Diwali 2024:हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक प्राण्याला व त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध सण असून,वात्सल्य प्रदान सण. म्हणजे वसुबारस वाळीचा सण ज्याची सुरुवात ही एका कृतज्ञता आणि वात्सल्य प्रदान करणाऱ्या गायी बद्दल आहे.अंधकाराकडून तुझ्याकडे नेणारा सण.

वर्षाचा महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी, अंधकाराकडून तुझ्याकडे नेणारा सण,दिवाळीचा सण,दिवाळी सर्व जीवन उजळून टाकणारी आणि दीपमय करणारी दिवाळी. दिवाळी या सणाची सुरुवात वसुबारस ने होते. दिवाळीचा उत्सव हा आपल्या देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

वसुबारस म्हणजे गोवत्सद्वादशी ही द्वादशी दिवाळी या सणाला जोडून येते, म्हणून या सणाला दिवाळीच्या सुरुवातीस केले जाते. मुख्यत्वे हा सण कामधेनु या यास उद्देशून केला जातो. 

Vasubaras Diwali 2024:वसुबारस कधी आहे

Vasubaras Diwali 2024:यावर्षी सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी अश्विन कृष्ण एकादशीला वसुबारस आणि रमा एकादशी आहे, त्यामुळे यंदाच्या वसुबारसला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा करतात, अशी मान्यता आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.

Vasubaras Diwali 2024:

Vasubaras Diwali 2024:वसुबारस पूजन

या दिवशी जे व्रत करतात त्यात सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात व पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात.

तत: सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृते |

मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि ||

हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर, असा याचा अर्थ आहे. 

Vasubaras Diwali 2024:अधिक माहिती 

या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात. उत्तर प्रदेशात त्या व्रताला बछवाँछ असे म्हणतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गाईची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे, वारसे आहेत, त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.

या दिवशी राळण्याचा भात (भगरी सारखे दिसणारे एक धान्य )

Vasubaras Diwali 2024:वसुबारस सणाचे महत्त्व

भारतीय संस्कृतीत प्रत्येक प्राण्याला त्याच्या त्याचे महत्त्व हे आपल्याला कळावे यासाठी विविध सण हे आपल्या संस्कृतीमध्ये आहे. गाईला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये फार महत्त्व असून, गाईला माता देखील म्हटल्या जाते. गाय ही सात्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक असलेल्या सर्व गुणांची सर्वांनी या पूजनाद्वारे स्वीकार करावा असे देखील म्हटले जाते. 

Vasubaras Diwali 2024:गाय ही सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणारी असून आपल्या दुधाने समाजाला वरिष्ठ करणारी आहे. गाय ही मनुष्यासाठी अंग प्रत्यांग अर्पण करते व समाजाच्या उपयोगी पडते. गाईच्या दुधाने जसे आपल्याला पौष्टिकत्व मिळते तसेच गायीच्या सेनाद्वारे देखील खत आणि शेतीला पौष्टिकता निर्माण करून देते. शेतकऱ्याचा मित्र असलेल्या बैलाला जन्म देणारी गौ मातेचे या दिवशी पूजन केल्या जाते. यावेळी या ठिकाणी गोमातेचे रक्षण संवर्धन आणि तिला उज्ज भाव देऊन तिचे पूजन केल्या जाते.

अशा या गौ मातेचे पूजन केल्याने समाज व राष्ट्र भरभराटीस येते अशा या गोमातेचे प्रथम वत्सासहित पूजन करून दीप उत्सव साजरा केला जातो. गाय ही का पूजनी आहे गाईंमध्ये ते तीस कोटी देवांचा वास असून गाईचे शेण, गाईची गोमूत्र, तसेच गाईचे दूध गाय पासून मिळणारी प्रत्येक गोष्ट ही आपली मानवी जीवनासाठी अतिशय उत्तम आणि गुणकारी ठरते. गाय ही माणसासारखी तोंडाने पाणी पिते. गाय ही मांसाहार कधीच करत नाही तर कुत्रा आणि इतर मांसाहारी प्राणी हे पाणी चाटून पितात. कारण कुत्रा हा मांस देखील खातो हा फरक गायीमध्ये आणि इतर प्राण्यात आहे.

Vasubaras Diwali 2024:वसुबारस सणाचे काही नियम

वसुबारण सणाच्या दिवशी गहू, मूग खात नाही. महिला या दिवशी दिवसभर उपास करतात. बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपास सोडतात. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले तसेच तव्यावर बनवलेले पदार्थ खात नाहीत, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.

Vasubaras Diwali 2024: तसेच गाय आणि वासराची भेट झाल्यानंतर बायकांनी उपवास सोडावा.

Dohaljewan Colorful Attires 2024:डोहाळे जेवणातील चोळ्यांचे रंगीबेरंगी विश्वhttps://marathionlinetimes.com/entertainment/dohaljewan-colorful-attires-2024/

सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी https://marathionlinetimes.com/entertainment/dohala-jeevan-a-sacred-ritual-in-marathi/

अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण https://marathionlinetimes.com/entertainment/anavalobhan-sanskar-3rd-rites-of-hindu-2024/

पुंसावन संस्कार पवित्र सोहळाhttps://marathionlinetimes.com/punsavan-sanskar-2nd-rite-2024/

हिंदू धर्माचे सोळा संस्कार आपल्या परंपरेचे पाऊल https://marathionlinetimes.com/sixteen-hindu-rites-in-marathi-2024/

तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/

भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/

कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/

शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी

खळखळून हसवणारी नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/

प्राजक्ता माळी  https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/

आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram