Table of Contents
ToggleVivah sohala Vidhi In Marathi 2024; पाहुया विविध लग्नविधी
Vivah sohala Vidhi In Marathi 2024; सामान्यता विवाह सोहळा म्हटलं की, त्यामध्ये अनेक प्रकारचे विधी आले, हे विधी होणाऱ्या वैवाहिक जीवनासाठी महत्त्वाच्या असतात. नवीन होणाऱ्या वैवाहिक जीवनासाठी
एक मात्र इथे नमूद करावयाचे आहे की विवाह संस्कारात केले जाणारे विविध विधी हे प्रत्येक जातीमध्ये हे वेगळे असू शकतात किंवा त्यांची नावे वेगळी असू शकतात, तसेच विविध भागात हेच संस्कार थोड्याफार फरकाने प्रत्येक विवाह सोहळ्यात केले जातात, फक्त नावे निरनिराळी.
Vivah sohala Vidhi In Marathi 2024;विवाह संस्कारामध्पता आपली मुलगी ही लक्ष्मी आहे व वर (होणारा जावई) म्हणजे साक्षात विष्णू आहे अशा उदात्त भावनेने आपली मुलगी त्याला अर्पण करतो.
Vivah sohala Vidhi In Marathi 2024;आपल्या संस्कृतीमध्ये १६ संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार असून,देव,अग्नी,ब्राह्मण समाजाच्या साक्षीने वैवाहिक जीवनाची सुरुवात करणे हा या विवाह संस्कारा प्रामुख्याने हेतू आहे. या सोळा संस्काराच्या शृंखलेत जसे,,गर्भाधान,पुंसावन,अनावलोभन, सीमंतोन्नयन ,जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चूडा कर्म, कर्णवेध संस्कार,उपनयन संस्कार ,वेदारंभ संस्कार,समावर्तन’ संस्कार चौदाव्या संस्कार विवाह संस्काराचे विधी पाहणार आहोत.
या संस्कारांमध्ये वधूपिता म्हणजे मुली चे वडील यांना मुलगी ही लक्ष्मी असून तिचा वर म्हणजे नवरा मुलगा किंवा होणारा जावई म्हणजे साक्षात विष्णू रुपी आहे अशा उदात्त भावनेने आपली मुलगी वधू तिचा हे वराला अर्पण करतो.
Vivah sohala Vidhi In Marathi 2024;या विवाह संस्काराची सुरुवात होते ती अनोळखी मुलगी व मुलगा च्या पाहण्याच्या सोहळ्यापासून, त्याला मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम देखील म्हणतात, चहा पोह्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर, दोघांच्या जन्म पत्रिका पाहून, मुलगा आणि मुलीस हे एकमेकांना पसंत असल्यास पुढील कार्यक्रम त्यांचे नातेवाईक व आई वडील विशेष सहभाग घेऊन पार पाडतात जसे की कुंकू लावणे, साखरपुडा, काही ठिकाणी साक्षगंध हा कार्यक्रम केला जातो. व सर्वानुमते एक शुभ मुहूर्त पाहिल्या जाऊन विवाह संस्कार पार पाडतात.
Vivah sohala Vidhi In Marathi 2024; केळवण/ गडंगनेर
मुख्य विवाह सोहळा सुरू होण्याच्या आधी नवरी मुलाला किंवा मुलीला हे आपले नातेवाईक किंवा जवळची व्यक्ती केवळ नावाचा समारंभ करतात यामध्ये नवरी मुलास किंवा मुलीस घरी गोड धोड करून भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक करतात.
Vivah sohala In Marathi 2024; ग्रहमक किंवा देव ब्राह्मण /घाणा भरणे
साधारणता लग्न सोहळ्याच्या पाच दिवस आधी मुख्यत्वे केले जाणारा हा विधी म्हणजे देव ब्राह्मण किंवा ग्रहमक म्हणून ओळखला जातो, या विधीमध्ये आमच्या घरी कार्य असून देवाने त्यासाठी यावे यासाठी देवप्रतिष्ठा नावाचा किंवा देवक हा देखील विधी केल्या जातो,
या दिवशी वधू च्या घरी वधूला आणि वराच्या घरी पोराला हळद लावली जाते, तसेच, तसेच वधूला तिच्या घरी तिच्या आई-वडिलांसोबत तर वधू तर वराला त्याच्या आई-वडिलांसोबत नातेवाईक मिळून अंघोळ घालतात आणि हळद लावतात हळद लावल्यानंतर वधू किंवा वराने घराबाहेर पडणे वर्ज असते हे मुख्यत्वे आपले पूर्वज सांगत.
Vivah sohala Vidhi In Marathi 2024;आता या सोहळ्याला इव्हेंटची रूप आले आहे जसे की हळद लावणे हा मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या सध्याच्या पिढीचा एन्जॉयमेंटचा कार्यक्रम या कार्यक्रमात सर्व नातेवाईक हे पिवळ्या कलरच्या रंग भूषण आपल्याला पाहायला मिळतात. तसेच संगीत लावून हा आनंद द्विगुणीत करतात,
Vivah sohala Vidhi In Marathi 2024; त्यानंतर मुहूर्त केल्या जाते ते उकळाचे आणि जात्याचे, उखळ हे प्राची आदीच्या काळी खूप महत्त्वाचे महत्त्वाची वस्तू होती आणि जात म्हणजे चक्की हे देखील महत्त्वाचे वस्तू असल्याकारणाने तिची आधी पूजा केली जाते त्याला मुहूर्त करणे असे देखील म्हणतात,आंब्याच्या पानांनी ,मुसळ सुशोभित केले जाते. पाच सुवासिनी व वधू/वर यांचे मातापिता मिळून उखळात गहू अशाप्रकारचे धान्य घालून कांडतात व कांडताना वधू व वर यांच्या मातापित्यांना उद्देशून मंगल ओव्या म्हणतात. त्यावर पानांचा विडा ठेवल्या जातो व सवाष्ण विविध प्रकारच्या लग्नाची गाणी म्हणून तो विडा उचलतात.बऱ्याच ठिकाणी हा विधी पाहायला मिळतो फक्त या विधीचे नाव हे वेगळे वेगळे पाहायला मिळते.
Vivah sohala Vidhi In Marathi 2024; हळद लावणे
त्यानंतर कालवलेल्या हळदीतील उरलेली हळद ( उष्टी हळद) घेऊन पाच सुवासिनी वाजत-गाजत वराच्या
बि-हाडी जातात. तिथे वराला व त्याच्या आई-वडिलांना हळद लावून स्नान घातले जाते.या कार्यक्रमात वधूला हिरव्या चुडा भरल्या जातो. चुडिया मध्ये नववधू ही ९-९ बांगड्या घालते.हिंदूंच्या दृष्टीने हिरव्या बांगडया हे सौभाग्याचे लक्षण आहे.
Vivah sohala Vidhi In Marathi 2024; मेहंदी काढणे
खरे पाहता कोणत्याही शुभकार्याला मेहंदी लावणे ही खरी राजस्थान गुजरात या राज्याचा रिवाज, आता फक्त या राज्यापुरताच हा रिवाज मर्यादित न राहता तो आपल्या देशात प्रत्येक ठिकाणी लोकप्रिय झाला आहे, मेहंदी लावल्याने वधूचे सौंदर्य खुलण्यासाठी मेंदीची प्रथा ही सुरू झाली मेहंदी काढल्यानंतर नववधू चे सौंदर्य हे खुलते.मेहंदी काढणे व मेहंदी आर्टिस्ट हा देखील त्यामधून निर्माण झालेला नवीन व्यवसाय असून, अनेक कलाकार त्यांची कला ही नववधूच्या हातावर रंगवतात, तसेच नववधूच्या जवळील नातेवाईक मेहंदी लावून नववधू सारखे सौंदर्यात आणि ह्या समारंभात सहभाग घेतात.
Vivah sohala Vidhi In Marathi 2024; साधारणत विवाह सोहळा हा कार्यालयात केला जातो, त्यामध्ये आपले नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तीला बोलावल्या जाते विवाह तारखेच्या आदल्या दिवशी वधू मंडळीकडून एक मानाचा माणूस हा वर पक्षाकडे पाठवला जातो व तो ह्या सर्व मंडळीला लग्न स्थळी घेऊन येतो त्या त्याला वराड देखील म्हणतात. आदल्या दिवशी रात्री नवरदेवास ओवाळून आदराने स्वागत करून बोलवल्या जाते, व त्यानंतर सीमांतपूजन हा कार्यक्रम पार पाडतात.
लग्न सोहळा: संस्कार आणि परंपरेचा नवीन अध्याय
समावर्तन’ संस्कार म्हणजेच सोड मुंज या संस्कार
केशांत संस्कार: युवकाच्या जीवनातील नवी दिशा
मुंज-ज्ञान आणि शिस्तीचा जीवनातील आरंभ
जाणून घेऊया विविध जातींच्या संस्कारांचे रंग !
अन्नप्राशन शिशुच्या जीवनातील पहिला स्वाद !
निष्क्रमण संस्कार: बाळ करणार पहिल्यांदा निष्क्रमण यात्रा
पाळणा संग्रह वात्सल्याच्या गोड आठवणी
जातकर्म संस्कार :बाळ जन्मल्यानंतर केल्या जाणारा महत्त्वाचा संस्कार
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण
Vivah sohala In Marathi 2024; सीमांतपूजन
सीमांतपूजन म्हणजे गावाच्या सीमेवर केले जात असे. आताच्या काळी शक्य नसल्यास मुलीच्या घरी म्हणजे जिथे लग्न समारंभ पार पडणार आहे, तेथे लग्नाच्या आदल्या दिवशी सीमांत पूजन संपन्न होतो, या समारंभात मुलीचे वडील हे नवऱ्या मुलास गणेश पूजन करून पाय धुवून नवीन वस्त्रे व अलंकार देतात तसेच विडा आणि नारळ देऊन मान देतात. वर पक्षाकडे आणि वधूपक्षाकडे मंडळीची एकमेकांना गळा भेट देऊन मान देतात, जसे की वधूचा मामा आणि वराचा मामा हा एकमेकांची एकमेकांना पेढ्याचा घास भरून भेट घेतात.
Vivah sohala Vidhi In Marathi 2024; उष्टी हळद
हा कार्यक्रम लग्न समारंभाच्या दिवशी सकाळी केल्या जातो ज्यामध्ये वधूवरासृष्टी हळद लावतात, गोष्टी हळद ही वराला लावल्या जात नाही तर वरची गोष्टी हळदही व वधूला लावले जाते व सर्व मंडळी मिळून हा कार्यक्रम साजरा करतात यावेळेस वधू वर सर्वच महिला मंडळ हे पिवळ्या साड्याया पाहावयास मिळते.वधूपक्षाकडून हळद घेऊन येणा-या सुवासिनींची खणा-नारळाने ओटी भरून , फराळाचे पदार्थ देऊन आदरातिथ्य होते. वरपक्षाकडून वधूला हळदीची म्हणून उंची साडी देण्यात येते.
Vivah sohala Vidhi In Marathi 2024; ह्या संस्कारामधील काही महत्त्वाचे विधी
तसेच हिंदू संस्कृतीमध्ये काही धार्मिक कार्ये स्त्रिया पतीच्या सहाय्याशिवाय एकट्या करु शकत नाही व काही पुरुष पत्नीशिवाय एकटे करु शकत नाहीत; म्हणजे कोणताही पुरुष स्त्रीशिवाय व स्त्री पुरुषाशिवाय पूर्ण नसतो म्ह्णून धर्माचरणेषु अधिकार सिद्धिद्वारा अर्थात धर्माचे आचरण करण्याचा संपूर्ण अधिकार प्राप्त व्हावा ह्यासाठी ह्या मुलीचा विवाह संस्कार करतो असा उल्लेख केला जातो.
Vivah sohala Vidhi In Marathi 2024; आली विवाह घटिका
मंगलाष्टके :
लग्न सोहळ्यातील सर्व उपस्थित राहून एक महत्त्वाचा विधी केला जातो तो म्हणजे मंगलाष्टक या प्रसंगी वधू वर च्या मध्ये अंतरपाट धरतात. व देवांच्या आशीर्वाद सात किंवा नऊ मंगलाष्टके गायली जातात. मंगलाष्टका मधून वधू-वरांना वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद व्यक्त केले जातात व प्रत्येक मंगलाष्टक संपल्यानंतर शुभमंगल सावधान म्हणून उपस्थित मित्रपरिवार आणि पाहुणेमंडळी मिळून वधू-वराच्या डोक्यावर अक्षदा टाकतात. याप्रसंगी सात किंवा नऊ मंगलाष्टके झाल्यानंतर वधू-वरांमधील अंतरपाट काढल्या जातो, त्यानंतर नवरदेव हा नवरी पुष्पहार घालतो व तिच्या डोक्यावर अक्षदा वाहतो, त्यानंतर नवरी ही नवरदेवाच्या गळ्यात पुष्पहार घालते आणि नवरदेवाच्या पायावर अक्षर टाकते आणि नमस्कार करते.
Vivah sohala Vidhi In Marathi 2024; गणपतीपूजन
नियोजित शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडावे ह्यासाठी गणपतीची पूजा केली जाते. त्याच्या आशिर्वादाने सर्वकाही मंगल होवो अशी प्रार्थना केली जाते.
Vivah sohala Vidhi In Marathi 2024; विवाह होम
वैदिक विवाह विधींमधील सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे विवाहहोम होय. वधूवरांची गाठ मारुन दोघांपासून उत्तम संतति प्राप्त व्हावी म्हणून प्रजापतीला उद्देशून तुपाच्या आहुती दिल्या जातात. त्यानंतर दोघांचे सहजीवन धनधान्यानी समृद्ध रहावे ह्यासाठी साळीच्या लाह्यांच्या आहुती दिल्या जातात.
Vivah sohala Vidhi In Marathi 2024; कंकण बंधन
हातात बांधतात. या विधीनंतर तसेच या क्ह्याषणा नंतर वधू वर दोघेही एकमेकांशी नवरा बायको या प्रेमळ नात्यात बांधल्या जातात. एकमेकांना समजून घेत, एकमेकांची काळजी घेत, एकमेकांना समजावून घेऊन दोघांनी एकत्र जबाबदारी आणि एकत्र संसार करणे ची जबाबदारी असून त्या उद्देशाने हे कंकण बांधल्या जाते. या कांकणामध्ये सात कंठाचे सूत असते त्याला हळदी कुंकू लावून त्यामध्ये हळकुंड बांधल्या जाते, कंकण हे वधूच्या डाव्या मनगटाला बांधल्या जाते. व्रतस्थ असणा-या वधूवरांनी बंधनात राहावे म्हणून हे बंधन असते.लग्न झाल्यानंतर हे बंधन चार दिवसांनी सोडतात.
Vivah sohala In Marathi 2024; सौभाग्य अलंकार
या विधी मध्ये मंगळसूत्र, जोडवी हे अलंकार जे की स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतिक आहेत. शंभर वर्षांपर्यंत एकत्र रहावे व सुखी संसार करावा अशा हेतूने हे अलंकार धारण करतात असे देखील मानल्या जाते.
Vivah sohala In Marathi 2024; सप्तपदी/ फेरे
सप्तपदी किंवा फेरी लग्न सोहळ्यातील विशेष असा सोहळा आणि विधी, ज्या विधी शिवाय लग्न पूर्णच होत नाही असे देखील म्हटले जाते तो हा महत्त्वाचा सप्तपदी विधी, ज्यामध्ये वधू-वरांनी एकमेकांचा हात धरून अग्नी प्रदक्षिणा घेत तसेच तांदूळ आणि त्यावर ठेवलेला सुपारीला प्रत्येक अग्निभोवती प्रदक्षिणा झाल्यानंतर वधू ने वधूच्या पायाचा अंगठा धरून सुपारी पायाने सरकवतात. वर वधू हे जीवनाची साथ पावले चालून एकमेकांना विविध वचने देतात ती खालील प्रमाणे
पहिल्या पावलाने तू मला अन्नधान्य देणारी व्हावीस आणि आपण एकमेकांस अनुकूलतेने वागू.
दुस-या पावलाने तू माझे बल वाढवणारी व मला ऊर्जा देणारी व्हावीस आणि आपण एकमेकांस अनुकूलतेने वागू.
तिस-या पावलाने तू माझ्या कुटुंबाचे पालन-पोषण करणारी व्हावीस आणि आपण एकमेकांस अनुकूलतेने वागू.
चौथ्या पावलाने तू माझे वैभव वाढवणारी व्हावीस आणि आपण एकमेकांस अनुकूलतेने वागू.
पाचव्या पावलाने तू माझी प्रजा (संतती) वाढवणारी व्हावीस आणि आपण एकमेकांस अनुकूलतेने वागू.
सहाव्या पावलाने तू मला सहाही ऋतूंमध्ये योग्य ते सौख्य देणारी व्हावीस आणि आपण एकमेकांस अनुकूलतेने वागू.
सातव्या पावलाने आपल्या दोघांमधील सौख्य दृढ होवो आणि आपण एकमेकांस अनुकूलतेने वागू.
काही ठिकाणी विशेषतः उत्तर भारतात सप्तपदी न करता अग्नीभोवती सात प्रदक्षिणा (फेरे) मारतात.
Vivah sohala Vidhi In Marathi 2024; कानपिळा
वैदिक विधींमधला नसला तरी हा थोडासा गमतीचा विधी असून यामध्ये वधूचा भाऊ, नवर्या मुलाच्या मुलाचा कान मिळतो व नवऱ्या मुलाला हे सांगू इच्छितो की माझ्या बहिणीला तू सुखात ठेव, तसेच या विधीच्या वेळेस वरमंडळीकडून वधू च्या भावास भेटवस्तू दिल्या जाते व तेव्हाच वधूचा भाऊ हा कान सोडतो. हा देखील बहीण आणि भावा चाआहे. मुलीचा भाऊ नव-या मुलाचा कान पिळतो व माझ्या बहिणीला सुखात ठेव असे बजावतो व पैसे अथवा भेटवस्तू घेतल्याशिवाय कान सोडत नाही.
Vivah sohala Vidhi In Marathi 2024; गौरीहर पूजा
कार्यालयातील एका खोलीत करतात. पूर्वी पूजा मांडण्यासाठी दगडी पाटयाचा वापर होई. पाटयावर हळदीने गौरीहराची प्रतिमा ठेवत किंवा छोटे छोटे मातीचे मटके ठेवून तिला पुजल्या जाते म्हणजे गौरी हजाराची पूजा होय ही पूजा नवरदेव नवरी करतात. ही गौरीहराची पूजा हा विविध पद्धतीने केली जाते.
Vivah sohala Vidhi In Marathi 2024; कन्यादान
हा एक महत्त्वाचा विधी असून याप्रसंगी वधू पिता आपली लक्ष्मी रुपी कन्या ही होणाऱ्या विष्णू रुपी जावयाला अर्पण करतो. त्यावेळेस ‘धर्मे च अर्थे च कामे च नातिचरामि’ म्हणजे धार्मिक कार्यांमध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये व कामविषयक गोष्टींमध्ये वधूला विश्वासात घेतल्याशिवाय वागणार नाही, कोणताही निर्णय घेणार नाही असे वचन वराकडून घेतले जाते. ह्यावेळेस नव दांपत्यांस अलंकार, संसारोपयोगी भांडी अथवा वस्तू दान म्हणून दिल्या जातात.
हा विधी लग्नाच्या इतर सर्व विधींमधील अत्यंत भावविवशतेचा असतो.
Vivah sohala Vidhi In Marathi 2024; झाल धरणे
झाल म्हणजे बांबूच्या काड्या पासून बनवल्या जाणारी एक मोठी एक टोपली यात टोपलीमध्ये कणिक आणि हळद घालून केलेले दिवे ठेवतात त्या दिव्यात तेल आणि वात घालून ते दिवे प्रज्वलित करतात त्याला झाल असे म्हणतात, वधूचे आई-वडील तसेच वधूच्या घरचे सर्व म्हणजे काका काकू, व भावकीतले सर्व मंडळी ही झाली ला हात लावतात.
Vivah sohala Vidhi In Marathi 2024; (झालीला हात लावणारे हे केवळ वधूच्या कुळातीलच असतात.) ती झाल वधूचे आई-वडील वराच्या आई वडील काका काकू मामा मामी आजोबा व जेष्ठ व्यक्तींच्या डोक्याला लावतात याप्रसंगी सर्वांच्या साक्षीने आमची मुलगी तुमच्या घरात आम्ही देत आहोत व तिचा सांभाळ करा व तिची जबाबदारी आम्ही आता तुम्हाला देत आहोत हे सांगितले जाते, तसेच आमची लेक लेखी कायमचे अंतरंग या कल्पनेने वधूच्या माता-पित्यांचा कंठ दाटून येतो, व वर पक्षातील सर्व नातेवाईक यावेळेस वधूचे सात खडीसाखरेचा घास तोंडात देऊन वधूचे स्वागत करतात.
(हा विधी हा विधी हा भावनिक असून या वेळेस मातापित्याचा तसेच नवदुचा कंठ दाटून येतो बालपणापासून आतापर्यंत ज्या आपल्या लेकीला आई-वडील प्रेमाने आणि लाळाने पालन पोषण करतात तिला आता ते कोणा दुसऱ्याला सोपवतात.)
आश्रुनयनांनी सर्वांचा निरोप घेऊन ती पतीगृही जाण्यास निघते. जाण्याआधी वधूची मालत्यांनी ओटी भरतात व गौरीहर पूजेत ज्या बाळकृष्णाची व अन्नपूर्णेच्या मूर्तीची तिने पूजा केलेली असते त्या मूर्तीही तिला सासरी नेण्यासाठी दिल्या जातात
Vivah sohala Vidhi In Marathi 2024;सूनमुख
लग्न विवाह समारंभात एक मुख्य कार्यक्रम केला जातो तो म्हणजे सुलमुख पाहणे, या समारंभात सासूच्या एका मांडीवर सुनेला बसवतात तर दुसऱ्या मांडीवर मुलाला बसवले जाते, त्यानंतर सासूही आपल्या मुलाचे आणि सुनेचे यांचे तोंडेही आरशात पाहते व गोडाचा घास तोंडात भरवते, या समारंभ आरशात प्रतिबिंब पाण्यात चे कारण म्हणजे अलंकृत केलेल्या मुलीच्या रूपाला दृष्ट लागण्याची शक्यता असते परंतु प्रतिबिंबाला दृष्ट लागत नाही त्यामुळे सासूने पूर्णतः नव्या वातावरणात व नव्या घरा तील माणसात आलेल्या आपल्या सुनेला तिच्या नजरेतून धीर द्यावा अशी पद्धत असून आता सुनेला आईची माया देण्याची जबाबदारी ही सासूवर आली असल्याचा याचा अर्थ होतो.
हा कार्यक्रम संपला की लग्नाचा सर्व कार्यक्रम पार पडला. यानंतर वधू कायमची वराच्या घरी – म्हणजेच सासरी रहावयास येत
Vivah sohala Vidhi In Marathi 2024; राज बिद
नावाचा राजवीर नावाचा देखील एक समारंभ असतो ज्यामध्ये वधूच्या सासरी मंडळीच्या डोक्यावर वधू मंडळीतील वधूची आई ही मूठभर तांदूळ डोक्यावर टाकते व तेव्हा या मंडळींना पायघड्या देखील टाकल्या जातात व पाय धुतल्या जातात आणि भेट वस्तू दिल्या जाते.
Vivah sohala Vidhi In Marathi 2024; रूखवत
मराठी लग्नामध्ये रुखवत आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये दोन प्रकारे या रुखवताकडे पाहिल्या जाते ते म्हणजे एक फराळरूपी रुखवत आणि दुसरा प्रकार म्हणजे नवरी मुलगी ही किती गुणवान आहे हे दाखवण्यासाठी मांडलेले रुखवत, नवरी मुलीने वस्तू नवीन तयार करून सासरच्या मंडळीला दाखवण्यात येतात ते हे रुखवत. Vivah sohala Vidhi In Marathi 2024; तर दुसरा प्रकार म्हणजे फराळरूपी रुखवत यामध्ये हा फळारूपी म्हणजेच न्याहारी देण्याचा प्रकार असून सात्विक आहार म्हणून देण्यात येतो तसेच उपाशी पोटी असलेल्या व्यक्तीला आपली मुलगी देऊ नये असे शासनास सांगितल्या जाते म्हणून हा विधी करण्यात येतो, म्हणून कन्यादानाचे वेळी वराने उपहार केलेला असावा म्हणून त्याला खायला घालण्याचा विधी आहे.
या कार्यक्रमानंतर वधू कडील सर्व विधी संपतात व त्यानंतर वराकडील विविध कार्यक्रमास सुरुवात होते.
Vivah sohala Vidhi In Marathi 2024; लग्न मंडपातच वर मंडळीकडील लक्ष्मीपूजन हा कार्यक्रम केला जातो त्यावेळेस पायघड्या घालून वधू ही तांदळाचे माप ओलांडून वर आणि वधू लक्ष्मीपूजनास बसतात. त्यावेळेस वधू ही आमच्या घरी आल्यानंतर वधू ही वराच्या घरी आल्या सारखेच असते व त्यावेळेस तिची जर वरास नाव बदलायचे असेल तर या वेळी तू नाव तिचे नामकरण करू शकतो, या वेळेस ठेवलेले नाव हे नववधूचे सासरचे नाव नेहमी करता ठेवल्या जाते.( तसेच मोठ्या सुनेचे नाव हे ठेवल्या जात नसून लहान सुनेचे नाव हे नवीन ठेवल्या जाते.) वनवरदेव हा तांदळावर सोन्याच्या अंगठीने त्याला आवडलेले नाव तू आपल्या वधूचे ठेवतो. व सर्वांना उखाण्यात तिचे नाव सांगतो.
Vivah sohala In Marathi 2024; पाठवणीचा कार्यक्रम
Vivah sohala Vidhi In Marathi 2024; हा स्त्री साठी अतिशय अवघड असा असून, या कार्यक्रमाच्या वेळेस मांडवातील प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यात पाणी येते, हा आनंदाचा क्षण असतो असेच दुःखाचा देखील असतो, आनंदाचा क्षण यासाठी किती आता नवीन जीवनातील तिच्या नवऱ्यासोबत सुरुवात करणार आहे, आणि दुःखाचा यासाठी किती या घरी बालपणापासून आतापर्यंत हक्काने, आनंदाने आणि लगडीतपणे राहिली ते घर तिला सोडायचे असते, खरे पाहता हा क्षण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात भावनिक आणि मार्मिक क्षण असतो. जो कोणत्याही स्त्रीला शब्दात मांडता येणार नाही असे मला वाटते.
या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
अमेय वाघ :
आर माधवन : हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा
शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी