Why Lakshmi & Ganesh Together on Diwali?; जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती
Why Lakshmi & Ganesh Together on Diwali?; दिवाळी भारतातील सर्वात मोठा आणि वैश्विक सण प्रकाशाचा, समृद्धीचा सण आहे. संस्कृतीच्या लाखो वर्षांच्या परंपरेचा उज्वल उत्सव म्हणजे दिवाळी. आपण हा सण प्रामुख्याने प्रभू श्रीरामाच्या वनवासातुन पुनरागमनावर आनंदानं साजरा करतो, आणि या दिवशी आपण करतो देवी लक्पष्णमीची आराधना याच काळात बहुतेक घरांमधील लहान मुले घरी असतात आणि कुतहलांनी काही प्दोरश्नन विचारतात.
Why Lakshmi & Ganesh Together on Diwali?; त्यात एक प्रश्न हमखास विचारतात,ती म्हणजे ‘‘दिवाळी हा सण श्रीरामाच्या स्मरणार्थ साजरा करतो, तर आपण लक्ष्मीची पूजा का करतो? राम व सीतेची पूजा का नाही?’’ तसेच, ‘‘लक्ष्मीसोबत गणेशपूजन का करतात,(Why Lakshmi & Ganesh Together on Diwali?) भगवान विष्णूचा समावेश का नाही?’’ या प्रश्नांची उत्तरे मुलांना नेहमी मिळेलच असे नाही, आणि अनेकदा ‘लिबरल्स’ मुलांच्या मनात शिक्षकालाही कुतूहल वाटावे असे प्रश्न निर्माण करतात की, दिवाळीचा रामाशी काय संबंध? लक्ष्मीपूजनाचे औचित्य काय?
म्हणून, आजच्या या लेखात आपण दिवाळीच्या सत्ययुग, त्रेतायुग आणि आधुनिक समाजातील परंपरांचा सांस्कृतिक संदर्भ, धार्मिक कथा आणि मनाला भारावून टाकणारे संदर्भ जाणून घेणार आहोत —जी माहिती प्रत्येक वाचकाने स्वतःसाठी आणि पुढच्या पिढीसाठी नक्की लक्षात ठेवावी.
आता कृषी यांत्रिकीकरण योजनेची अनुदान मर्यादा काढली, जाणून घ्या नवीन नियम
दिवाळीची ऐतिहासिक पार्श्वभूमी
(Historical Background of Diwali)
Why Lakshmi & Ganesh Together on Diwali?; दिवाळी सणाचा उगम दोन प्रमुख युगांमध्ये शोधता येतो. सत्ययुगात समुद्रमंथनाच्या दिवशी माता लक्ष्मीदेवी क्षीरसागरातून प्रकट झाल्या, म्हणून सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याच्या कामनेने लक्ष्मीपूजन दिवाळीत अनिवार्य ठरले. त्यानंतर, त्रेतायुगातील दुसऱ्या मोठ्या घटनेंत, प्रभू श्रीराम १४ वर्षांच्या वनवासातून अयोध्येत परतल्यावर अयोध्यावासीयांनी त्यांच्या स्वागतार्थ घरोघरी दिव्यांचा प्रकाश केला. म्हणून दिवाळीला ‘दीपावली’ असे नाव पडले, आणि त्यातून स्वागत, प्रकाश आणि समाधान यांची भावना उमटली.
लक्ष्मी आणि गणेश पूजनातील दैवी कथा
(Significance of Lakshmi & Ganesha Worship)
Why Lakshmi & Ganesh Together on Diwali?; लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुख्यत्वे लक्ष्मीपूजन केल्या जाते तसेच त्याचबरोबर गणपती म्हणजे श्री गणेशाची देखील पूजा केली जाते श्री गणेश हे प्रथम वंदनीय आहेत त्यांचा पण पहिल्यांदी आहे म्हणून लक्ष्मीपूजनाच्या वेळेस गणपतीची पूजा केली जात नसून त्यामागे आणखीन एक गोष्ट आहे. ती अशी की,
एकदा माता लक्ष्मीजींनी धन संपत्ती वाटण्यासाठी कुबेराला आपल्यासोबत ठेवले, कुबेर खूप कंजूस होता, त्याने धन वाटलेच नाही उलट तो स्वतःच धनाचा भंडारी होऊन बसला, हे पाहून माता लक्ष्मी दुःखी झाल्या, त्यांच्या मुलांना आशीर्वाद मिळत नव्हता. त्यांनी आपली व्यथा भगवान विष्णूना सांगितली. भगवान विष्णूंनी सांगितले की, कुबेराच्या जागी संपत्ती वाटण्याचे काम दुसऱ्यावर सोपवा. माता लक्ष्मीजी म्हणाली की यक्षांचा राजा कुबेर हा माझा महान भक्त आहे, त्याला वाईट वाटेल.
तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना गणपतीच्या अफाट बुद्धीचा उपयोग करण्याचा सल्ला दिला, माता लक्ष्मीजीनीही गणेशजींना कुबेरा सोबत ठेवले.गणेशजी अतिशय बुद्धिमान होते. ते बोलले, माताश्री, मी तुम्हाला कोणाचेही नाव सांगेल, त्यांना तुम्ही कृपा आशीर्वाद द्या. मला कुठलाही उलट किंतू परंतु प्रश्न विचारू नका, माता लक्ष्मीजी हो म्हणाल्या , व गणेशजींनी लोकांच्या धन सौभाग्याचे अडथळे दूर करण्यास सुरुवात केली, कुबेर फक्त पाहत राहिला आणि अशा प्रकारे कुबेरांच्या भांडाऱ्याची द्वारे गणेशजीनी उघड केली.
“खात्यात पैसे नाहीत, चिंता नको,नवीन फीचरमुळे भीम UPI पेमेंट करू शकता”
Why Lakshmi & Ganesh Together on Diwali?; भगवान गणेशाची आपल्या भक्तांप्रती असलेली प्रेमळ कृपा पाहून माता लक्ष्मीने आपला मानसपुत्र श्री गणेश याला आशीर्वाद दिला की ज्यावेळी माझे पती नारायण माझ्या सोबत नसतील त्यावेळी माझा पुत्र म्हणून तू माझ्यासोबत रहावे.
विष्णू आणि सीता पूजन का होत नाही?
(Why not Vishnu or Sita Worship in Diwali?)
दिवाळीच्या अमावस्येला भगवान विष्णू योगनिद्रेत असतात, ते एकादशीस जागृत होतात. या काळात पृथ्वीवरील ऐश्वर्याचा, सौख्याचा, आणि परमार्थाचा लाभ माता लक्ष्मीजी पृथ्वीवरील भक्तांपर्यंत पोहोचवतात, यासाठी त्या आपल्या मानसपुत्र गणेशजीला सोबत ठेवतात. म्हणूनच दीपावलीच्या रात्री श्री लक्ष्मी आणि गणेश, या दोन दैवतांची पूजा मुख्यत्वे केली जाते, तर प्रभू श्रीराम-सीतामाईची प्रत्यक्ष पूजा क्वचित प्रांतनिहाय साजरी होते.
परंपरांचा संस्कृतीतील महत्त्व
(Cultural Importance of Rituals in Diwali)
Why Lakshmi & Ganesh Together on Diwali?; दिवाळी ही फक्त देवतेच्या लोककथा, आरत्या, किंवा सांस्कृतिक इतिहास न राहता, आजच्या समाजातील एकत्रिकरण, मुलांना त्यांच्या धार्मिक परंपरेशी जोडणारा बंध आणि सणामधील मूल्यांची जाणीव निर्माण करणारा क्षण आहे. त्यामुळे वाचकांनी ही माहिती अभ्यासली, जाणली आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचवली पाहिजे ,कारण ही माहिती अभ्यासक्रमाच्या पुस्तकात क्वचित मिळते. दिवाळीचा लक्ष आणि अर्थ नुसता ‘राम विजय’ किंवा ‘लक्ष्मी पूजा’ इतका मर्यादित नसून, आपल्या जीवनातील सौख्य, ऐश्वर्य, विवेक, आणि सकारात्मकतेचा खरा महोत्सव आहे.
ही माहिती तुम्हाला योग्य वाटल्यास तुम्ही इतरांना देखील शेअर करा.
![]()


