8th Pay Commission 2025 in Marathi: जाणून घेऊया सविस्तर माहिती
8th Pay Commission 2025 in Marathi: केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. ती म्हणजे यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये सरकारने आठवा वेतन आयोग अधिकृत घोषणा. ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा होण्याची आशा निर्माण झाली आहे. पण, वेतन आयोग केवळ पगारवाढीचा फॉर्म्युला ठरवणारे नसून, कर्मचाऱ्यांच्या सोयी-सुविधा आणि आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे निर्णय घेतात. याच अनुषंगाने, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन आणि सर्वसमावेशक आरोग्य विमा योजना लवकरच लागू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांचे आरोग्य सुरक्षित होणार आहे.
8th Pay Commission 2025 in Marathi: सध्या अस्तित्वात असलेली केंद्र सरकार आरोग्य योजना म्हणजे CGHS (Central Government Health Scheme) शहरी भागातील कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना माफक दरात डॉक्टरांचा सल्ला, उपचार, चाचण्या आणि औषधे मिळतात. मात्र, ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांसाठी ही योजना तितकीशी प्रभावी नाही. याचमुळे, सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगानेही CGHS च्या मर्यादा लक्षात घेऊन, अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक आरोग्य विमा योजना सुरू करण्याची शिफारस केली होती.
अशी करा फार्मर आयडीमध्ये ऑनलाईन दुरुस्ती
सातव्या वेतन आयोगाने तर सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आरोग्य विमा सुविधा देण्याची अत्यंत महत्त्वाची सूचना केली होती, तसेच CGHS ला CS (MA) आणि ECHS सारख्या इतर आरोग्य योजनांमध्ये समाविष्ट करण्याची कल्पना मांडली होती, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना कॅशलेस उपचारांचा लाभ मिळू शकेल.
आता, जानेवारी २०२५ मध्ये आरोग्य मंत्रालयाच्या विचाराधीन असलेली नवीन विमा-आधारित योजना (CGEPHIS) ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील कर्मचाऱ्यांसाठी एक वरदान ठरू शकते.
खुशखबर! तुमच्या गावांतील कोणत्या शेतकऱ्याला मिळालं अनुदान?
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) कडे नोंदणीकृत विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही योजना कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. जरी सरकारकडून याबाबत अधिकृत दुजोरा येणे बाकी असले तरी, ही बातमी सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे आणि आशेचे वातावरण निर्माण करणारी आहे. नवीन आरोग्य विमा योजना केवळ कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणार नाही, तर त्यांच्या आर्थिक नियोजनालाही एक सुरक्षित आधार देईल, यात शंका नाही.
8th Pay Commission 2025 in Marathi: रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ
आता कुणाचं रेशन कार्ड होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?
शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?