Budget 2025-2026 In Marathi: थोडक्यात फेरफटका मारूया केंद्रीय अर्थसंकल्पाचा !

Budget 2025-2026 In Marathi: जाणून घेऊया, थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे 

Budget 2025-2026 In Marathi: भारतीय संसदेत देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२५-२६ हा सादर केला. निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सलग आठव्यांदा सादर केला आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य आणि मध्यमवर्ग मग मध्यमवर्गीय इच्छा पूर्ण केल्याचे पाहायला मिळत आहे.

Budget 2025-2026 In Marathi: तर आज आपण या लेखांमध्ये देशाचा अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना तसेच इतर सर्व बाबतीत अर्थसंकल्पामध्ये काय काय मिळाले आहे हे पाहणार आहोत. या लेखांमध्ये अगदी थोडक्यात पण महत्त्वपूर्ण अशा अर्थसंकल्पातील सर्व बाबींवर प्रकाश टाकला आहे.

1. कर सवलती आणि मध्यमवर्गीयांसाठी उपाय

१ लाख पर्यंतच्या सरासरी मासिक उत्पन्नावर शून्य (०)आयकर

नवीन कर प्रणालीत १२.७५ लाख वार्षिक उत्पन्नापर्यंत शून्य (०)आयकर

उत्पन्नकर
0 ते 12 लाखांपर्यंतकर नाही
12 ते 16 लाखांपर्यंत15 %
16 ते 20 लाखांपर्यंत20 %
20 ते 24 लाखांपर्यंत25 %
24 लाखांपेक्षा जास्त30 %

2. विकासाच्या चार प्रमुख इंजिन्स

  • कृषी, एमएसएमई,गुंतवणूक, आणि निर्यात
  •  एमएसएमई,(MSME कर्ज, किंवा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग कर्ज, लहान व्यवसायांच्या वाढीसाठी आणि विकासास समर्थन देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.)

3. कृषी आणि शेतकरी कल्याण

  • ‘पंतप्रधान धन-धन्य कृषी योजना’ –  १.७ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, १०० कृषी उत्पादक जिल्हे समाविष्ट आहेत.
  • ‘डाळी आत्मनिर्भरता मिशन’ – तूर, उडीद आणि मसूर उत्पादन वाढीसाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
  • KCC अंतर्गत कर्ज योजना – ५  लाख पर्यंत व्याज अनुदान देण्यात येणार आहे.

4. वित्तीय स्थिती आणि MSME क्षेत्रासाठी उपाय

  • वित्तीय तूट: FY-25 मध्ये ४.८ टक्के FY-26 मध्ये ४.४ टक्के करण्याचे लक्ष्य
  • MSME साठी मोठे क्रेडिट समर्थन
    •  ५ कोटी ते १० कोटीपर्यंत हमी कव्हर
  • राष्ट्रीय उत्पादन मिशन – मेक इन इंडियाला चालना मिळणार आहे.

Budget 2025-2026 In Marathi: थोडक्यात फेरफटका मारूया केंद्रीय अर्थसंकल्पाचा !

5. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रासाठी तरतुदी

  • ५०,००० सरकारी शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब्स
  • AI शिक्षणासाठी उत्कृष्टता केंद्र उभारण्यासाठी ५०० कोटी खर्च
  • ज्ञान भारतम मिशन – १ कोटीहून अधिक हस्तलिखितांचे संवर्धन

6. आर्थिक समावेशन आणि रोजगार सुधारणा

  • PM स्वानिधी योजनेत वाढीव कर्ज आणि ३०,०००पर्यंतचे UPI लिंक्ड क्रेडिट कार्ड
  • GIG कामगारांसाठी ओळखपत्रे आणि ई-श्रम पोर्टल नोंदणी
  • प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्यसेवा

7. शहरी विकास आणि पायाभूत सुविधा

  • १ लाख कोटी ‘शहरी आव्हान निधी’ – शहरे ग्रोथ हब म्हणून विकसित करण्यासाठी उपलब्ध करण्यात येणार.
  • UDAN योजना सुधारित – 120 नवीन गंतव्यस्थाने

8. ऊर्जा आणि नाविन्यपूर्ण संशोधन

  •  २०,००० कोटी खर्चासह अणुऊर्जा मिशन – लहान मॉड्युलर अणुभट्ट्यांचा विकास
  • २०,००० कोटी खाजगी क्षेत्रातील संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी निधी

9. गृहविकास क्षेत्रासाठी धोरणे

  • १५,००० कोटी स्वामिह निधी – १ लाख तणावग्रस्त गृहनिर्माण युनिट्स पूर्ण करण्यासाठी

10. विमा आणि कायदेशीर सुधारणा

  • विमा क्षेत्रातील FDI मर्यादा – ७४ वरून १००%पर्यंत वाढ
  • जन विश्वास विधेयक २.० –१०० + कायद्यांच्या सुधारणा

11. कर संलग्न सुधारणा आणि सवलती

  • अद्ययावत आयकर रिटर्न वेळ मर्यादा – २ ते ४ वर्षे
  • TDS भाडे मर्यादा –२.४ लाख वरून ६ लाख रुपये
  •  ३६  जीव वाचवणाऱ्या औषधांवर कर सवलत
  • EV आणि मोबाइल बॅटरी उत्पादनासाठी सवलती
  • जहाज बांधणीच्या कच्च्या मालावर १० वर्षांसाठी कर सूट

12. आयात-निर्यात शुल्क सुधारणा

  • फिश पेस्टवर BCD३० % वरून ५ %
  • फिश हायड्रोलायझेटवर BCD १५ % वरून ५%
  • IFPD वर BCD २०% पर्यंत वाढ
  • खुल्या पेशींवरील BCD ५ % पर्यंत कमी

Budget 2025-2026 In Marathi: असे म्हणणे वावगे ठरणार नाही की केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ हा मध्यमवर्ग तसेच कृषी, एमएसएमइ (MSME)आणि नवीन तंत्रज्ञानाला चालना देणारा असून,  कर  सवलती,वित्तीय सुधारणा संशोधन आणि विकास त्याप्रमाणे शहरी आणि ग्रामीण विकासासाठी देखील या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. 

Budget 2025-2026 In Marathi: Warrant Trial by Magistrate on Police Report

Budget 2025-2026 In Marathi: तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

Ganesh Jayanti 2025 In Marathi: हे तुम्ही वाचले आहे का?

“तुम्ही फेब्रुवारीत जन्मलेले आहात का? जाणून घ्या तुमच्या खासियत!

पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार आतील फरक?

तुमचं जीवन बदलणारे रहस्य !

महाकुंभचे दुसरे शाही स्नान कधी आहे आणि ते विशेष का आहे?

रहस्य नागा साधूंचे!

Loading