Cough Syrup Ban Marathi; पालकांनो सावधान! हे कफ सिरप तुमच्या मुलांसाठी घातक आहे. सरकारने आणली आहे बंदी.

Cough Syrup Ban Marathi; थोडक्यात महत्वपूर्ण माहिती

Cough Syrup Ban Marathi; सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला आणि तापाचा त्रास मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना होत आहे. अशा परिस्थितीत पालक घरातील लहान मुलांच्या खोकल्यावर त्वरित उपाय म्हणून कफ सिरप देत असतात. परंतु सावधान! जे औषध तुमच्या मुलाच्या खोकल्यावर आराम देण्यासाठी दिले जात आहे, तेच आता जीवघेणे ठरत आहे. (Cough Syrup Ban Marathi) महाराष्ट्रासह देशभरात कफ सिरपमुळे मुलांच्या मृत्यूची धक्कादायक प्रकरणे समोर आली आहेत.

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कोल्ड्रिफ कफ सिरप सेवनामुळे एकूण १७ मुलांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने तातडीने या औषधावर संपूर्ण बंदी घातली आहे. या सिरपमध्ये डायइथिलीन ग्लायकोल हा विषारी रसायन ४८.६% प्रमाणात सापडला आहे, ज्यामुळे मुलांचे मूत्रपिंड निकामी होऊन मृत्यू होत आहे.

Cough Syrup Ban Marathi; वृत्तपत्राच्या माहितीनुसार, घटना निदर्शनास येताच महाराष्ट्र सरकारने तातडीने ‘कोल्ड्रिफ कफ सिरप’च्या SR-13 बॅचवर संपूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे आणि नागरिकांना किंवा मेडिकल स्टोअरमध्ये हे औषध आढळल्यास, तातडीने माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

या लक्षणे कडे करू नका दुर्लक्ष

 Noticed Symptoms/Warning Signs

मुत्राचे प्रमाण कमी होणे किंवा बंद होणे

उलट्या होणे

पोटदुखी

मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होणे.

“कोणताही वय असो, महिला, वयोवृद्धांसाठी आणि सर्वांसाठी ही पोस्ट ऑफिस योजना”

पालकांसाठी सूचना

Advice for Parents

२ वर्षाखालील मुलांना कफ सिरप देऊ नका

डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषध द्या.

संशयित औषध असल्यास तातडीने टोल फ्री नंबरवर कळवा.

टोल फ्री नंबर: १८०० २२२ ३६५

शरद ऋतुतील पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा,चंद्राची सोळा कला आणि शुभ फल

विषारी रसायनाचा धोका

Danger of Toxic Chemical

डायइथिलीन ग्लायकोल ४८.६% (मर्यादा ०.१%)

हा रसायन ब्रेक फ्लुइड आणि अँटीफ्रीझमध्ये वापरला जातो

मुलांमध्ये अत्यंत थोड्या प्रमाणातही जीवघेणा

Loading