FASTag 3000 Pass in Marathi: जाणून घ्या सविस्तर माहिती
FASTag 3000 Pass in Marathi: नमस्कार वाचको,तुम्ही वारंवार राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने FASTag वापरणाऱ्या प्रवाशांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. आता तुम्ही ३००० रुपयांचा वार्षिक पास काढून वर्षभर टोलच्या खर्चातून सुटका मिळवू शकता. चला तर मग घेऊया नवीन पासबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
काय आहे FASTag चा वार्षिक पास?
FASTag 3000 Pass in Marathi: केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घोषित केल्यानुसार, FASTag चा वार्षिक पास खासगी कार चालकांसाठी आहे. हा पास एकदा घेतल्यास तुम्ही वर्षभर राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगती महामार्गांवरील टोल कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ओलांडू शकता.
अशी करा नोंदणी
हा पास फक्त Rajmargyatra Mobile App आणि NHAI पोर्टलवर जाऊनच ॲक्टिवेट करता येतो.
अनिवार्य नाही
FASTag 3000 Pass in Marathi: हा पास घेणे बंधनकारक नाही. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही नेहमीप्रमाणे FASTag रिचार्ज करून टोल भरू शकता.पासची वैधता आणि ट्रिप्सची मर्यादा हा पास वार्षिक असला तरी त्यावर काही मर्यादा आहेत.
पासची वैधता
पासची वैधता संपूर्ण वर्षभर असेल.
ट्रिप्सची मर्यादा किती?
या पासवर २०० ट्रिप्सची मर्यादा आहे. त्यामुळे, वर्षभरात २०० ट्रिप्स पूर्ण झाल्यास किंवा एक वर्ष पूर्ण झाल्यास, यापैकी जे आधी होईल, तो पास कालबाह्य होईल.
ट्रिपची गणना कशी करणार
FASTag 3000 Pass in Marathi: दोन्ही बाजूंनी एक टोल क्रॉसिंग एकच ट्रिप मानली जाईल (उदा. जर तुम्ही मुंबई ते पुणे जाताना एक ट्रिप, परत येताना दुसरी). बंद टोल प्लाझावर प्रवेश आणि निर्गमनसाठी एक ट्रिप म्हणून गणले जाईल.
महत्वपूर्ण माहिती
FASTag 3000 Pass in Marathi: हा पास फक्त खासगी नॉन-कर्मशियल वाहनांसाठी उपलब्ध आहे. तुमच्या वाहनाची तपासणी VAHAN डेटाबेसद्वारे केली जाईल आणि त्यानंतरच तुम्हाला पास मिळेल. हा पास फक्त एकाच वाहनावर वापरता येतो. जर तो दुसऱ्या वाहनावर वापरला गेला, तर तो त्वरित निष्क्रिय केला जाईल.