Gharkul Yojana Anudan 2025 New Update: घरकुल साठी मिळणार आता 2 लाख 10 हजार रुपये!

Gharkul Yojana Anudan 2025 New Update:जाणून घेऊया संपूर्ण माहिती!

Gharkul Yojana Anudan 2025 New Update: पंतप्रधान ग्रामीण आवास योजना (PM Awas Yojana) अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानात लवकरच वाढ. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली असून, योजनेत मिळणारे १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान आता ५० हजार रुपयांनी वाढवले जाणार आहे. यामुळे अनेक लाभार्थ्यांना त्यांच्या घरकुलाच्या स्वप्नांना साकार करण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्रातील घरकुल उद्दिष्ट

Purpose

महाराष्ट्राला प्रधानमंत्री आवास योजने (Gharkul Yojana) अंतर्गत २० लाख घरांचा उद्दिष्ट मिळाले आहे, जे देशातील सर्वात मोठे उद्दिष्ट आहे. गेल्या ४५ दिवसांत १०० टक्के घरांना मान्यता देण्यात आली असून, जवळजवळ १० लाख ३४ हजार घरांना पहिला हप्ता वितरित  देखील करण्यात आला आहे. उर्वरित १० लाख घरांना लवकरच पहिला हप्ता मिळण्याबाबत महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

अनुदान वाढीची गरज

subsidy

राज्यातील घरकुल लाभार्थ्यांकडून वेळोवेळी अनुदानात वाढ करण्याची मागणी केली जात होती. अनेक लाभार्थ्यांना घरकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी कमी पडत असल्याने त्यांच्या कामात अडथळे येत आहेत. त्यामुळे अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे घरकुलाची कामे वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.

येत्या 2025-26 अर्थसंकल्पातील तरतूद केल्या जाणार?

2025-26 aunnal budget Maharashtra

आगामी अर्थसंकल्पात या अनुदानात वाढ करण्याबाबतची तरतूद केली जाणार आहे. भूमिहीन लाभार्थ्यांसाठी विशेषतः एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. तसेच, शबरी आवास योजनेअंतर्गत 2.5 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. यामुळे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत २ लाख १० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे.

या (पीएम घरकुल) योजनेच्या माध्यमातून अनेक गरीब आणि गरजू कुटुंबांना त्यांच्या घरकुलाच्या स्वप्नांना साकार करण्याची संधी मिळणार आहे. तसेच, अनुदानात वाढ झाल्यास घरकुलाची कामे जलद गतीने पूर्ण होण्यास मदत होईल आणि महाराष्ट्रातील पीएम घरकुल उद्दिष्ट साध्य करण्यात यश मिळेल.पंतप्रधान ग्रामीण आवास योजना एक महत्त्वाची पायरी ठरली आहे, जी गरीबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यास मदत करेल.

“खुशखबर” आता नमो शेतकरी महा सन्माननिधी योजने अंतर्गत मिळणार 15000 रुपये !

आता घरबसल्या पहा पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आजपासून जमा! 

१८,८८२ पदांसाठी सुवर्णसंधी !

शेतकरी मित्रांनो,बनवला आहे का तुम्ही शेतकरी ओळख कार्ड?

थकित वीज बिलातून मुक्तीची सुवर्णसंधी!

तुमचे दरमहा वीज बिल जास्त येत आहे का? मग अर्ज करा सूर्य घर योजनेसाठी!

 हक्काची पेन्शन! PM श्रमयोगी मानधन योजना तुमच्या कुटुंबासाठी!

Loading