Gudi Padwa Puja 2025:अशी उभारावी गुढी

Gudi Padwa Puja 2025:जाणून घेऊया शस्त्र पूजन 

Gudi Padwa Puja 2025: नमस्कार वाचकहो, उद्या आहे नववर्ष आणि महत्त्वपूर्ण सण म्हणजे गुढीपाडवा हिंदू नवीन वर्षाची सुरुवात. आनंद उत्साह आणि नवचैतन्य निर्माण करणारा गुढीपाडवा हा सण. गुढी कशी उभारावी हा प्रश्न नेहमी पडतो तर या आज आपण या लेखात जाणून घेऊया नेमकी गोळी उभारायची कशी कोणते मंत्र उच्चार करायचे आणि हा दिवस कसा साजरा करायचा ते.

शुभ मुहूर्त

सकाळी ६:२९ते ७:३९

अशी उभारावी गुढी

 प्रतिपदा प्रात:काळी अंगणात सडासंमार्जन करून गढी उभारावी.

ब्रह्मध्वजाय नमः असे म्हणून गुढीचे पूजन करावे.

ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्ट फलप्रद l प्राप्तेऽस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं करु ll

या मंत्रानें प्रार्थना करून पंचांगावरील गणपती पूजन करावे. आंब्याची तोरणें लावावीत. कडूनिंबाची कोवळे पाने भक्षण करावीत म्हणजे आरोग्य चांगले राहते.

यूपीआय युजर्ससाठी नवीन नियम १ एप्रिलपासून लागू होणारे महत्त्वाचे बदल..

अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडूनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पूढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे. मिरे, हिंग, मीठ, ओवा, साखर यांच्यासह पुष्पासहित कडूनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून, रोगशांति होण्याकरता भक्षण करावे. म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य व लक्ष्मी (संपत्ति) ही प्राप्त होते. या दिवशी नवीन पंचांगाचे पूजन करून संवत्सरफल श्रवण करावे. नूतनवस्त्रे व अलंकार धारण करावेत, व हा दिवस आनंदात घालवावा म्हणजे सर्व वर्ष सुखात जाते. या दिवशी आपल्या कुलाचाराप्रमाणें वासंतिक देवीचे अथवा श्रीरामचंद्राचे नवरात्र सुरू करावे.

टायपिंग येते? मग मिळवा ₹६,५००,अमृत योजनेचा लाभ घ्या.

Loading