How to use ThumbPay in Marathi: फक्त अंगठा, आणि काम फत्ते! पैसे ट्रान्सफर करा एका टचमध्ये

How to use ThumbPay in Marathi: QR कोड किंवा स्मार्टफोनची गरज नाही – अंगठ्याने करा डिजिटल पेमेंट

How to use ThumbPay in Marathi: आता काळ बदलतोय, राव,डिजिटल पेमेंटचं जग अक्षरशः अंगठ्यावर आलंय. तुम्ही विचार करा, एकिकडे हातात मोबाईल, स्कॅनर किंवा QR कोड शोधताय, आणि दुसरीकडे – फक्त अंगठा ठेवा आणि लगेच पेमेंट. हो अगदी बरोबर.
आजपासून UPI, QR कोड, कार्ड, किंवा अगदी स्मार्टफोनचीही गरज नाही. (ThumbPay ) नावाने आलेलं नवं डिव्हाइस तुमच्या अंगठ्याच्या स्पर्शावर तुमचं पेमेंट वाऱ्याच्या वेगाने पूर्ण करणार आहे. पेमेंट करायचंय? फक्त अंगठा आणि आधार लिंक.
म्हणजे आता गावाकडं लहान दुकान असो, मोठा मॉल असो किंवा पेट्रोल पंप – कुठेही मोबाईल नसला, इंटरनेट स्लो असलं, किंवा QR दिसला नाही तरीही पैसे द्या फटकन. चला तर मग आज आलेखामध्ये या नवीन ThumbPay बद्दल माहिती घेऊया हे नेमकं वापरायचं कसं हे सुरक्षित आहे का या सर्वांची माहिती घेऊया.

नवरात्र स्पेशल देवी आरती संग्रह

ThumbPay म्हणजे नेमकं काय?

How to Use

ThumbPay हे Proxgy या स्टार्टअपने आणलेलं खास पेमेंट डिव्हाइस आहे, ज्यात ग्राहक फक्त आपला अंगठा डिव्हाइसवर ठेवतात आणि लगेच आधार व UPI कनेक्टद्वारे देयक प्रक्रिया पूर्ण होते. यात QR कोड, स्मार्टफोन, कार्ड किंवा रोख रक्कम या काहीच गरज राहत नाही.

ThumbPay कसं वापरायच?

Features,” “Is it Secure?”, and “Benefits.

  • ग्राहक आपला अंगठा डिव्हाइसवर ठेवतो.
  • बायोमेट्रिक (आधारद्वारे) तपासणी होते.
  • तपासणी पूर्ण झाल्यावर UPI द्वारे बँक–टू–बँक पैसे थेट दिले जातात.

शेतकरी बांधवांसाठी खुशखबर! आता ट्रॅक्टर आणि अवजारांची किंमत कमीत कमी – केंद्र सरकारच्या GST कपातीचा मोठा फायदा.”

याच्या मुख्य वैशिष्ट्यं कोणती?

Features

  • फिंगरप्रिंट बायोमेट्रिक स्कॅनर व आधार आधारित ओळख.
  • QR कोड, NFC, साउंडबॉक्स, 4G आणि वायफाय सपोर्ट.
  • रोख किंवा स्मार्टफोनची बिलकुल गरज नाही.
  • किंमत: सुमारे २००० रुपये. बॅटरीवर ऑपरेट करता येते.
  • ग्रामीण भाग, शोरूम, लहान-दुकाने यासाठीही योग्य.

ThumbPay सुरक्षित कसं आहे?

Is it Secure?

  • How to use ThumbPay in Marathi: या डिव्हाइसमध्ये सर्टिफाइड फिंगरप्रिंट स्कॅनर, फ्रॉड डिटेक्शन आणि UV स्टेरेलायजेशन दिलं आहे. ऑथेंटिकेशनसाठी एक लहान कॅमेरा आणि स्वच्छता राखण्यासाठी प्रगत तंत्र.

नवरात्रातील ९ दिवसाचे ९नैवेद्य

ThumbPay वापरायचे फायदे

Benefits.

  • स्मार्टफोन किंवा QR कोडशिवाय डिजिटल पेमेंट साध्य.
  • सर्वसामान्य, ज्यांच्याकडे साधं फोन आहे त्यांनाही पेमेंटची सुविधा.
  • ग्रामीण, लहान, मोठ्या सर्व स्तराच्या व्यापाऱ्यांसाठी सोयीस्कर.

Loading