Indian Army Recruitment in Marathi: जाणून घेऊया सविस्तर माहिती
Indian Army Recruitment in Marathi: नमस्कार, भारतीय लष्करात अधिकारी म्हणून करिअर करायचे आहे का? तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. जर तुम्ही अभियांत्रिकी पदवीधर असाल किंवा अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकत असाल, तर (Indian Army Recruitment) भारतीय लष्कर तुम्हाला एक सन्माननीय आणि गौरवशाली करिअरची संधी देते. १४२ वा टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (जानेवारी २०२६) अंतर्गत अभियंत्यांसाठी अधिकारी पदांची भरती सुरू आहे.
भारतीय लष्करात अधिकारी म्हणून करिअर करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या अभियांत्रिकी पदवीधरांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध आहे. १४२ वा टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (जानेवारी २०२६) अंतर्गत एकूण ३० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.
या लेखात आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ कोण अर्ज करू शकतो, एकूण किती जागा आहेत, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करायचा याबद्दल सर्व तपशील. तर चला, या सुवर्णसंधीबद्दल सर्व काही जाणून घेऊया.
Indian Army Recruitment in Marathi: यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग (८),
संगणक विज्ञान/आयटी (६),
इलेक्ट्रॉनिक्स (६),
मेकॅनिकल (६),
इलेक्ट्रिकल (२)
आणि इतर (२) अशा विविध शाखांतील उमेदवारांना संधी दिली जात आहे.

काय पात्रता लागते ?
Eligibility
- मुख्यत्वे अर्जदार हा भारतीय, नेपाळी किंवा भारतीय वंशाचे विदेशी नागरिक (PIO/OCI).
- अर्जदाराचे शैक्षणिक शिक्षण हे बी.ई./बी.टेक पदवीधर किंवा अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेले देखील पात्र आहेत.
- अर्जदाराचे वय हे २० ते २७ वर्षे (जानेवारी २०२६ पर्यंत).
- तसेच अर्जदार हा अविवाहित असावा.

निवड प्रक्रिया कशी?
How is the selection process?
Indian Army Recruitment in Marathi: शॉर्ट लिस्टिंगनुसार अभियांत्रिकी शाखा आणि गुणवत्तेनुसार तसेच (एसएसबी) SSB म्हणजे सेवा निवड मंडळाद्वारे इंटरव्यू घेतल्या जाईल तसेच वैद्यकीय तपासणी आणि त्यानंतर अंतिम निवड अशी निवड प्रक्रिया असेल.
अर्ज करण्याची पद्धत कशी?
How is the Application process?
Indian Army Recruitment in Marathi: तुम्ही या लष्करी नोकरी करिता दिलेल्या सांगेच स्थळावर जाऊन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज: joinindianarmy.nic.in अधिक माहितीसाठी जवळच्या लष्करी कार्यालयाशी संपर्क साधा आणि या सन्माननीय करिअरच्या संधीचा लाभ घेण्यासाठी शेवटची तारीख ही २८ मे 2025 असून, मुख्यत्वे २८ मे नंतर या संदर्भातील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
हे “मधाचे गाव” माहिती आहे का तुम्हाला?
घरबसल्या फक्त २मिनिटांत जॉब कार्ड कसे मिळवायचे?