Mahakumbh 2nd Snan In Marathi; जाणून घेऊया, महत्व आणि संपूर्ण माहिती अमृत स्नानबद्दल
Mahakumbh 2nd Snan In Marathi; यावर्षी १४४ वर्षानंतर महा कुंभमेळा असून पहिले शाही स्नान हे १४ जानेवारी रोजी पार पडले. तर आता दुसरे शाही स्नान म्हणजेच अमृत स्नान याबद्दल सर्वांना उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रयागराज येथे पवित्र नद्यांच्या संगम स्थळावर मोक्ष मिळवण्यासाठी तसेच पापकर्मापासून मुक्ती मिळण्याच्या इच्छेने तब्बल १.५ कोटी भाविकांनी पवित्र स्नान केले.
१४ जानेवारी रोजी महा कुंभमेळ्याची सुरुवात ही शंकध्वनीने झाली असून, आता दुसरे अमृत स्नान हे दिनांक २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्या या दिवशी पार पडणार आहे.
Mahakumbh 2nd Snan In Marathi;महाकुंभमध्ये शाही स्नानाचे विशेष महत्त्व आहे. महाकुंभचे दुसरे शाही स्नान मौनी अमावस्येच्या दिवशी असणार आहे. या शाही स्नानाला विशेष पुण्यदायी मानले जाते, कारण यावर्षी अनेक शुभ योग बनत आहेत. चला तर मग जाणून घेऊया महाकुंभचे दुसरे शाही स्नान कधी होणार आहे आणि त्याचे महत्व काय?
आज आपण या लेखामध्ये दुसऱ्या होणाऱ्या अमृत स्नानाबद्दल माहिती घेऊया.
Mahakumbh 2nd Snan In Marathi; हिंदू धर्मातील महाकुंभ मेळा हा सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे आणि शाही स्नान हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. दुसरे शाही स्नान विशेषत: मौनी अमावस्येच्या दिवशी होते. याचे काही महत्त्वाचे पैलू खालीलप्रमाणे आहेत.

मौनी अमावस्येच्या शाही स्नानाचे महत्त्व?
Importance of Shahi Snan on Mauli Amavasya
मौनी अमावस्येच्या दिवशी महाकुंभात त्रिवेणी संगमात स्नान केल्याने व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते. तसेच व्यक्तीच्या आध्यात्मिक शुद्धीची आणि पापांपासून मुक्तीची प्राप्ती होते. असे मानले जाते की अमावस्येच्या दिवशी पितर पृथ्वी लोकात येतात, त्यामुळे या दिवशी त्यांच्या नावाने महाकुंभात डुबकी घेतल्यास त्यांना शांती मिळते.
मौनी अमावस्या २९ जानेवारी २०२५ माघ कृष्ण अमावास्या
सर्व अमृत स्नान तारखांमध्ये ही सर्वात शुभ तारीख मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी पवित्र नद्यांचे पाणी ‘अमृत’ मध्ये बदलते.’ मौनी अमावस्येला ‘संतांची अमावस्या’ असे देखील म्हणतात. मौनी अमावस्येमधील स्नान मौन धारण करून केले जाते.

महाकुंभचे दुसरे शाही स्नान कधी होईल?
When will the second bath of Maha Kumbh be held?
महाकुंभचे दुसरे शाही स्नान २९ जानेवारी मौनी अमावस्येच्या दिवशी होईल. मौनी अमावस्येच्या शाही स्नानाला मुख्य पुण्यदायी सांगितले जाते. यावर्षी अनेक शुभ योग बनत आहेत. कारण या दिवशी चंद्र आणि सूर्य मकर राशीत राहणार आहेत आणि गुरु वृषभ राशीत राहणार आहेत. या योगामुळे मौनी अमावस्येच्या शाही स्नानाचे विशेष महत्त्व आहे. याला अमृत स्नान देखील म्हणतात.
मौनी अमावस्या कधी आहे?
Mahakumbh 2nd Snan In Marathi; पंचांगानुसार, अमावस्या तिथीची सुरुवात २८जानेवारी मंगळवारी संध्याकाळी ७:३२ वाजता होईल आणि २९ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६:०५वाजता संपेल. या दिवशी महाकुंभचे दुसरे शाही स्नान होईल.
धार्मिक महत्त्व
– शाही स्नान हे धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र मानले जाते. हिंदू धर्मानुसार, शाही स्नान केल्याने पापांचे निवारण होते आणि मोक्ष प्राप्तीचे मार्ग प्रशस्त होतात.
– या दिवशी शाही स्नान केल्याने पितरांची कृपा होते आणि त्यांच्या आत्म्यांना शांती मिळते.

अमृत स्नानाचे नेतृत्व कोण करते?
Who leads Amrit Snan?
अमृत स्नानाचे नेतृत्व हे आखाडे या विधीस्नानाचे नेतृत्व करतात, ज्यात त्यांचे महामंडलेश्वर संगमाच्या पवित्र पाण्यात प्रथम डुबकी मारतात.
आखाडे भव्य शोभायात्रेसह स्नान घाटात प्रवेश करतात. या शोभायात्रेत रथ, हत्ती, घोडे, बँड आणि नामजप करणारे संत आणि त्यांचे अनुयायी यांचा समावेश असतो.
अमृत स्नानात सहभागी होणारे नागा साधू देखील भक्तीआकर्षणाचे केंद्र आहेत. ते त्यांच्या भस्म लावलेल्या शरीरासाठी आणि कठोर आध्यात्मिक शिस्तीसाठी ओळखले जातात.
यंदाचे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे?
झाली का तयारी बाळाच्या बोरन्हाणाची?
अमृत स्नानात कशाचा समावेश असतो?
What does Amrit Snan involve?
Mahakumbh 2nd Snan In Marathi; अमृत स्नान हा श्रद्धेचा एक खरा उत्सव आहे, जो आध्यात्मिक ऊर्जा, प्रार्थना आणि ध्यान यांनी भरलेला आहे.
प्रथम आखाड्यातील देवतेच्या मूर्ती आणि शस्त्रांना स्नान घालण्यात येते. त्यानंतर महामंडलेश्वर संगमाच्या पवित्र पाण्यात पहिली डुबकी मारतात. यानंतर आखाड्यांचे साधु-संत आणि त्यांचे अनुयायी स्नान करतात.
अधिक माहितीसाठी येथे भेट द्या http://kumbh.gov.in/en/contact-us