Makar Sankranti 2025 Marathi: जाणून घेऊया, मकर संक्रांती बद्दल
Makar Sankranti 2025 Marathi: दरवर्षी प्रमाणे यंदाही मकर संक्रांति हा सण 14 जानेवारीला आला असून, संपूर्ण भारतभर हा अगदी उत्साहात साजरा केला जातो. मकर संक्रांतीचा हा नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणार सण.
Makar Sankranti 2025 Marathi: संक्रांत हा सण तीन दिवस साजरा करतात. भोगी संक्रांत आणि किंक्रांत असा. जसे की 13 तारखेला भोगी, 14 तारखेला संक्रांत तर 15 तारखेला असते.
संक्रांत म्हणजे काय?
संक्रांत म्हणजे संक्रमण पुढे जाणे किंवा ओलांडून जाणे होय. या संक्रांतीची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. मराठी महिन्यातील पौष महिन्यातील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत.

कथा संक्रांतीच्या सणाची
The story is about Sankranti.
Makar Sankranti 2025 Marathi: आपल्याकडे मकर संक्रांति बद्दल अनेक कथा कहाण्या सांगितल्या जातात. जसे की मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांतिदेवीने संकारसूर नावाच्या राक्षसांचा वध केला होता आणि संक्रांति देवीने सर्व भक्तांना सुखी केले. त्यादिवशी सूर्य हा मकर राशीत होता म्हणून मकर संक्रांति असे नाव या दिवसाला पडले.
अशी देखील दुसरी कथा आपल्याला ऐकावयास मिळते की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान श्री विष्णू राक्षसांचा वध करून त्यांचे मस्त मंदार पर्वतात मुरले होते. राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणतो.
एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी उत्तम हा दिवस आहे. तसेच एका पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनु राशि सोडून मकर राशि प्रवेश करतात. शनिदेव हा मकर राशीचा स्वामी असून मकर राशि प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असे देखील म्हटले जाते.

महत्व पवित्र नदीत स्नान करण्याचे
Importance of Bathing in the holy river
Makar Sankranti 2025 Marathi: भारतीय संस्कृतीमध्ये नदी स्नान करणे हे महत्त्वाचे मानले जाते, गंगा, गोदावरी, प्रयाग, यमुना आधी पवित्र नद्या मध्ये स्नान केल्याचे विशेष महत्त्व आहे. असे देखील सांगतात,मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केलेल्या जे जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात स्नान केल्याने प्राप्त होते.
संक्रांतीत काळ्या रंगाचे महत्त्व काय?
What is the significance of the Color Black
मकर संक्रांति पासून दिवस वाढायला सुरुवात होते. इतके दिवस असलेल्या काळोख्या मोठ्या रात्रीला कळ्या रंगाचे कपडे घालून निरोप दिला जातो म्हणून संक्रांतीच्या दिवशी कळ्या रंगाचे कपडे घालतात.

त्यामागे वैज्ञानिक कारण असे असावे की जानेवारी महिन्यात थंडीचे दिवस असतात काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. तसेच थंडीच्या दिवसात उबदार रहावे म्हणून मकर संक्रांतीच्या सणाला कळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत रूढ झाली असावी. आपल्याकडे काळा रंग हा नकारात्मकतेचा रंग मानला जातो शुभकार्यात कळ्या रंगाचे कपडे घालत नाहीत.
परंतु संक्रांत या सणाच्या दिवशी हा काळा रंग घातल्या जातो.
शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणूनच तिळगुळ खाल्ला जातो. त्यावर हलव्याचे दागिने घातल्या जातात आणि शरीर उबदार ठेवण्यासाठी तीळ आणि गुळाचा लाडूचे सेवन करतात.
सूर्याचे उत्तरायणस सुरूवात
The Beginning of the Sun’s Uttarayan
Makar Sankranti 2025 Marathi: प्रत्येक महिन्यात सूर्य हा एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो म्हणजेच प्रत्येक महिन्यात संक्रांतही येत असते परंतु जेव्हा सूर्य हा मकर राशि प्रवेश करतो तेव्हा ही संक्रांत येते त्या संक्रांत मकर संक्रांत म्हणतात.
यावेळेस सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते.
Makar Sankranti 2025 Marathi:मकर संक्रांत हा सण इंग्रजी कॅलेंडरनुसार एकाच दिवशी येणारा हा एकमेव सण. हा सण फक्त सूर्याच्या स्थानानुसारच येतो तर बाकीचे येणारी सर्व सण हे चंद्राच्या स्थानानुसार येतात.
Makar Sankranti 2025 Marathi: प्रत्येक महिन्यांतच संक्रांत येत असते. म्हणजेच सूर्याचे एका राशीतून दुसर्या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो.
भास्करस्य यथा तेजो मकरस्थस्य वर्धते।
तथैव भवतां तेजो वर्धतामिति कामये।।
मकरसंक्रांन्तिपर्वणः सर्वेभ्यः शुभाशयाः।
ज्याप्रमाणे मकर राशीत प्रवेश केल्यानंतर सुर्य देवाचे तेज वाढते त्याप्रमाणे ही मकर संक्रांत तुमचे यश, संपत्ती, आरोग्यरुपी तेज वाढवणारी ठरो, असा या श्लोकाचा अर्थ आहे.
काही शुभ मुहूर्त
गंगा स्नानाचे महत्त्व हे फार असून या दिवशी शुभ मुहूर्त सकाळी 09:03 पासून सुरू होणार असून संध्याकाळी 05:46 मिनिटांपर्यंत आहे. यावेळेस दान धर्म आणि गंगा स्नान केल्याने पुण्य लागते.
तसेच ज्योतिष शास्त्रानुसार सकाळी 08:42 ते 01:45 हा पवित्र काळ असून या काळात सूर्यदेवाची पूजा केली जाते.
जबरदस्त सस्पेन्सने भरलेला पाताळ लोक’चा सीझन
Bima Sakhi Yojana In Marathi 2024:
MSBSHSE 2024;राज्यात येऊ घातलेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर !
चला, बारा राशींचा फेरफटका मारूया !
षोडस संस्कार:भारतीय संस्कृतीचे स्तंभ आणि जीवनाचे मार्गदर्शक

यावर्षी संक्रांत कोणत्या रंगावर
What color is Sankranti this year?
मकर संक्रांत ही यावर्षी पिवळ्या रंगावर आली असून, या दिवशी पिवळा रंगाचा पोशाख परिधान करणे टाळावे दरवर्षी संक्रांति देवी ही वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते. यावर्षी देवीच्या हातात वेगवेगळ्या प्रकारे शस्त्रे आणि वेगवेगळ्या रंगाची वस्त्रे परिधान केलेली असतात.
Makar Sankranti 2025 Marathi: संक्रांत देवी ही वेगवेगळ्या वस्त्रात आणि शस्त्रात आणि वाहनात बदल होत असतो, तसेच देवी ही कुठल्या वाहनावर येते हे खूप महत्त्वाचे मानले जाते.असे देखील म्हटले जाते की ज्या रंगाच्या वस्त्रात संक्रांती देवीने बलिदान केले असते तो रंग वर्ज करावा.तसेच यावर्षी पिवळ्या रंगाची कोणती वस्तू वापरू नये.
Makar Sankranti 2025 Marathi: या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा
शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी
महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024:
समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !