Mock Drill 2025 in Marathi; जाणून घेऊया या संदर्भातील सविस्तर माहिती…..
Mock Drill 2025 in Marathi; नमस्कार वाचकहो, सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे युद्धाची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, उद्या म्हणजेच ७ मे रोजी देशभरात मॉकड्रिल( Mock Drill) आयोजित करण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांची हत्या करण्यात आली होती, ज्यामुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या हल्ल्यात सामील असलेल्या ४ आतंकवाद्यांपैकी दोन पाकिस्तानी असल्याचे समोर आले आहे.
युद्धाच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय सेना, वायुदल आणि नौसेनेकडून युद्धाभ्यास सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर, भारत सरकारने युद्धाच्या आधी होणाऱ्या मॉकड्रिलचे आदेश दिले आहेत. उद्या देशभरातील २४४ जिल्ह्यांमध्ये सिव्हिल डिफेन्स मॉकड्रिल होणार आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहचला आहे. या परिस्थितीत, भारत सरकारने सर्व राज्यांना ७ मे रोजी वॉर मॉक ड्रिल आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. देशभरात २४४ जिल्ह्यात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे, ज्याचा मुख्य उद्देश नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे याचे प्रशिक्षण देणे आहे.

मॉकड्रिल म्हणजे काय?
What is Mock Drill?
Mock Drill 2025 in Marathi; मॉकड्रिल म्हणजेच युद्धाच्या काळात नागरिकांना सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे याबद्दल प्रशिक्षण देणे. १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या काळात देखील देशभरात मॉकड्रिल घेण्यात आले होते. त्या काळात, एअर रेड सायरन वाजवले जात होते, ज्यामुळे लोकांना सतर्क राहण्यास भाग पाडले जात होते.
एअर रेड सायरन आणि ब्लॅक आऊट
Air red siren and Black out
युद्धाच्या दरम्यान वाजणारे एअर रेड सायरन हे लोकांना सतर्क करण्यासाठी महत्त्वाचे असतात. सरकारच्या वतीने हे सायरन विविध ठिकाणी लावले जातात. सायरन वाजू लागल्यावर लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना दिली जाते. युद्ध काळात, ‘ब्लॅक आऊट’ म्हणजेच सर्वत्र काळोख करणे आवश्यक असते. यामध्ये खिडक्यांना काळा रंग दिला जातो, ज्यामुळे शत्रूसेनेपासून संरक्षण मिळवता येते.
उद्या होणाऱ्या मॉकड्रिलमध्ये काय अपेक्षित आहे?
Mock Drill 2025 in Marathi; उद्या होणाऱ्या मॉकड्रिलमध्ये नागरिकांना एअर रेड सायरन, ब्लॅक आऊट आणि इतर सुरक्षा उपाययोजनांची माहिती दिली जाणार आहे. यामुळे नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे लागेल याबद्दल जागरूकता वाढेल.
या मॉकड्रिलमुळे भारत सरकारने नागरिकांच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या उपाययोजनांची महत्त्वता अधोरेखित होते. युद्धाच्या काळात सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नागरिकांनी सज्ज राहणे आवश्यक आहे.
मॉक ड्रिलचे महत्त्व
Mock Drill 2025 in Marathi; या मॉक ड्रिलमध्ये विशेषतः हवाई हल्ले आणि इतर हल्ल्यांपासून वाचण्याची तयारी कशी करायची याबद्दल माहिती दिली जाईल. नागरिकांना हवाई हल्ल्याच्या इशाऱ्यावर शांतता पाळत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे महत्त्व शिकवले जाईल. हा अभ्यास विशेषतः जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, आणि गुजरात सारख्या संवेदनशील राज्यांमध्ये महत्त्वाचा असेल.
२४४ सिविल डिफेन्स जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलची तयारी
Mock Drill 2025 in Marathi; एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, दिल्ली मध्ये जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, गृह मंत्रालयाने ७ मे रोजी देशभरात सिविल डिफेन्स मॉक ड्रिल आयोजित करण्याची सूचना सर्व राज्यांना दिली आहे. ही सूचना १९७१ च्या युद्धानंतर पहिल्यांदाच देण्यात आली आहे, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांच्या तयारीवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे.
सिविल डिफेन्स जिल्ह्यांचे वर्गीकरण
२०१० च्या अधिसूचनेनुसार, सिविल डिफेन्स जिल्हे तीन कॅटेगिरीत विभागले गेले आहेत:
- कॅटेगिरी १
नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, सूरत, वडोदरा, आणि इतर प्रमुख शहरांचा समावेश.
- कॅटेगिरी २
ठाणे, पुणे, नाशिक, आणि इतर मध्यम शहरांचा समावेश.
- कॅटेगिरी ३
छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, आणि इतर लहान शहरांचा समावेश.

मॉक ड्रिलमध्ये काय होणार?
७ मे रोजी आयोजित मॉक ड्रिलमध्ये २४४ जिल्ह्यातील नागरिकांना हवाई हल्ल्याच्या परिस्थितीत कसे वागावे याचे प्रशिक्षण दिले जाईल. मॉक ड्रिलच्या काळात खालील गोष्टींचा समावेश असेल
ब्लॅकआऊट
मॉक ड्रिलच्या काळात सर्व लाईट्स बंद करण्यात येतील, ज्यामुळे शत्रूला लक्ष्य मिळवणे कठीण होईल.
सायरन वाजवणे
हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन वाजवला जाईल, ज्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी लपण्याची सूचना दिली जाईल.
प्रशिक्षण
लोकांना हल्ल्याच्या वेळी सुरक्षित स्थळी कसे लपावे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे हे शिकवले जाईल.
एअर स्ट्राईकसारख्या स्थितीत तयारी
नागरिकांना एअर स्ट्राईकच्या परिस्थितीत तयार राहण्याच्या सूचना दिल्या जातील.
Mock Drill 2025 in Marathi;
अधिक माहितीसाठी या अधिकृत संकेतस्थळ ला भेट द्या
IHMCL मध्ये अभियांत्रिकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! लाखांहून अधिक वेतन मिळवा!
रेशन के-वायसी आता कुठेही आणि कधीही!
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ
आता कुणाचं रेशन कार्ड होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?