MSBSHSE CBSE syllabus 2025: यंदा राज्य शाळेमध्ये सीबीएससी अभ्यासक्रम लागू

MSBSHSE CBSE syllabus 2025: जाणून घेऊया, या संदर्भात सविस्तर माहिती

MSBSHSE CBSE syllabus 2025: राज्यात अनेक दिवस चर्चा सुरू होती ती राज्यातील शाळांमध्ये MSBSHSE CBSE syllabus कधी लागू केला जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार, याबद्दलची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. 

महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील सरकारी शाळांमध्ये MSBSHSE CBSE syllabus लागू करणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्ता आणि आधुनिक शिक्षण मिळेल. यामुळे शालेय शिक्षणात सुधारणा होईल आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यास मदत होईल. 

MSBSHSE CBSE syllabus 2025: यासंदर्भात राज्यातील शालेय शिक्षण घेत असणाऱ्या प्रत्येक  विद्यार्थ्यां आणि पालकाच्या मनात विविध प्रश्न निर्माण होत होते या सर्व प्रश्नांना आता उत्तर मिळाले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 

 चला तर मग या संदर्भात जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती

 सीबीएसई अभ्यासक्रमाची अंमलबजावणी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २०२५-२०२६ मध्ये सीबीएसई अभ्यासक्रमाचा समावेश केला जाणार आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांसह इतर शासकीय शाळांमध्ये लवकरच सीबीएसई अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यास मदत होईल, असे मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेमध्ये स्पष्ट केले.

शालेय शिक्षण मंत्र्यांचे उत्तर

या संदर्भात एका वृत्तपत्राने माहितीनुसार,भाजपचे नेते,  तथा आमदार प्रसाद लाड यांनी शालेय शिक्षण मंत्र्यांना याबद्दलचा प्रश्न विचारला होता. त्यांनी विचारले की, “राज्यात इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत राष्ट्रीय शिक्षण धोरणांनुसार केंद्रीय शिक्षण माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अर्थात सीबीएसई अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे का?” यावर दादा भुसे यांनी लेखी उत्तरात सांगितले की, राज्याच्या अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संबंधित सुकाणू समितीने मान्यता दिली आहे.

कोण आहे हा फहीम खान? नागपूरमध्ये अचानक उफाळलेल्या हिंसाचाराचा मास्टरमाईंड

पाठ्यपुस्तके आणि सत्राची सुरूवात

MSBSHSE CBSE syllabus 2025: सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत. १ एप्रिलपासून सत्राची सुरूवात करण्यात येणार आहे, असे शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांचे निर्देश दिले आहेत

MSBSHSE CBSE syllabus 2025: दादा भुसे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रालयातील सर्वच विभागांसाठी १०० दिवसांच्या कामांचा अजेंडा देण्यात आला आहे. त्याचा आढावा घेण्यात आला होता. राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा स्वीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत.

MSBSHSE CBSE syllabus 2025:हे पहा>>>>>> “आता मोबाईल वरून पीएम इंटर्नशिप योजनेचा करा अर्ज” 

हे पहा>>>>>भारत सरकारचे हे सात कार्ड आहेत का तुमच्याकडे?

अनुदान मिळवा! औषधी वनस्पतींच्या विकासासाठी केंद्र सरकारची ही योजना

Loading